जोखड झुगारून देणारा स्त्री देह

* नसीम अंसारी कोचर

शकानुशतके समाजाने स्त्रीला सात पडद्यांमध्ये आणि चार भिंतीत जखडून ठेवले आहे. ती समाजाच्या तथाकथित ठेकेदारांनी स्त्रियांसाठी बनवलेल्या नियमांचे उल्लंघन तर करत नाही ना याकडे सतत लक्ष ठेवले गेले. तिच्या प्रत्येक मर्यादेची सीमा पुरुषाने ठरवली. तिच्या शरीराला आणि मनाला कधी कशाची गरज आहे, तिला किती आणि कधी दिले पाहिजे हे पुरुषांनी आपल्या सोयीनुसारच ठरवले. परंतु प्रत्येक गोष्टीची एक मर्यादा असते, हा दबाव आणि लादलेपण कधीतरी थांबणारच होते.

शिक्षणाने स्त्री सक्षम झाली. लोकशाहीने तिला उभे राहायला आधार दिला. आचार, विचार स्वातंत्र्य आणि आपले अधिकार जाणून घेण्याची संधी दिली. गेल्या अनेक दशकांमध्ये स्त्रीने कधी बंडखोर होऊन तर कधी घरातील अन्यायाला कंटाळून, कधी घरातील आर्थिक समस्येमुळे सबळ बनण्यासाठी चार भिंती तोडून बाहेरच्या जगात प्रवेश केला. गेल्या दोन शतकांत आर्थिक दृष्टया सक्षम होण्यासोबतच स्त्री वैचारिक पातळीवरही खूप प्रगल्भ झाली आहे. तिला केवळ एक शरीर म्हणून नाही तर माणूस म्हणून ओळख मिळाली आहे.

बेडयांतून मुक्त स्त्री देह

आजची स्त्री आपल्या इच्छा व्यक्त करायला संकोचत नाही. ती तिच्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम भोगायलाही तयार आहे. आपली पर्सनॅलिटी आणि समजूतदारपणा यांमुळे ती अशी दारेही आपल्यासाठी उघडत आहे, जी आजपर्यंत तिच्यासाठी बंद होती. सर्वात मोठी क्रांती तर शरीराच्या पातळीवर झालेली आहे. स्त्री देह ज्यावर पुरुष शतकानुशतके स्वत:चा अधिकार मानत आला आहे, त्या आपल्या देहाला तिने त्याच्या नजरेच्या बेडयांतून मुक्त केले आहे.

तिच्या शरीराला जखडू पाहणाऱ्या धार्मिक आणि सामाजिक मर्यादांना तिने झुगारून दिले आहे. आता ती आपल्या शारीरिक गरजांविषयी मुक्तपणे बोलते. आधी आपल्या इच्छा व्यक्त करायला संकोचणारी स्त्री आता बेडरूममध्ये खाली मान घालून राहण्याऐवजी आपल्या इच्छा बेधडक पुरुषांसमोर व्यक्त करून त्याला आश्चर्यचकित करून सोडत आहे.

तिचे बेडरूम दररोज नव्या उत्तेजनेने परिपूर्ण असते. लग्नाआधी सहमतीने सेक्स संबंध ठेवायलाही ती आता मागेपुढे पाहत नाही.

या नवीन स्त्रीची उन्मुक्त चाहूल अनेक दशकांआधीच लागली होती. विवाहाच्या असमान बंधनात कैद, नैतिक द्विधांनी त्रस्त आणि अपराधीपणाच्या भावनेने कंटाळून आता एका नवीन स्त्रीचे पदार्पण झाले आहे, जी आपले भविष्य स्वत: लिहिते, स्वत:च वाचते, जी आपल्या पसंतीचे कपडे परिधान करून रात्री उशीरापर्यंत पार्टी अटेंड करते. मोठमोठी स्वप्ने पाहते आणि ती पूर्ण करण्याची हिंमतही बाळगते.

माझे आयुष्य माझ्या अटी

एका सर्व्हेनुसार २००३ साली जेव्हा पोर्न पाहण्याची सवय फक्त ९ टक्के महिला कबूल करत होत्या, तिच संख्या आज ४० टक्के इतकी वाढली आहे. आता स्त्री आपल्या इच्छा आकांक्षांचा बळी देत नाही तर ती विनासंकोच आपल्या प्रेमी सोबत लग्नाआधीही शारीरिक संबंध प्रस्थापित करते. आता हे तिच्या इच्छेवर अवलंबून असते की एखाद्या पुरुषाशी लग्न करावे की नाही. तसेच तिने आई कधी बनायचे हेही तिच ठरवते. जर तिला विवाह बंधनात अडकायचे नसेल तर त्याशिवायही ती तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आई होण्यासाठी स्वतंत्र असते.

आजची स्त्री आपल्यावर झालेल्या अन्यायावरही बोलते. छेडछाड, लैंगिक छळ, हिंसा, बलात्कार यासाठी ती स्वत:ला दोषी समजत नाही. उलट ज्याने हा गुन्हा केला आहे त्याला गजाआड करण्याची हिंमतही बाळगते. ‘मी टू’ कॅम्पेन याचे ताजे उदाहरण आहे. इंटरनेट सेवांनी स्त्रीला खूप सपोर्ट दिला आहे तर सोशल मिडियाने तिला आपल्या भावना व्यक्त करायला एक प्लॅटफॉर्म दिला आहे.

स्त्री आणि पुरुष दोघेही थोडयाफार फरकाने एकमेकांविषयी समान वासनेने प्रेरित असतात. आपल्या शारीरिक सौंदर्याची जाणीव आजच्या स्त्रीला पुरेपूर आहे आणि ते सौंदर्य अधिकच खुलवण्याचा ती क्षणोक्षणी प्रयत्न करत असते. आपल्या या सामर्थ्याचा वापर कधी, कुठे आणि किती करायचा हेही ती जाणते.

वर्कप्लेसवर बॉसला खुश करून नोकरीत बढती मिळवणे यासाठी तिचे शरीर हे तिचे खास शस्त्र बनले आहे. मिडिया इंडस्ट्री, फिल्म इंडस्ट्री, टीव्ही किंवा मॉडेलिंगच्या क्षेत्रात स्त्रीचे शरीर हे तिच्या टॅलेंटपेक्षा अधिक महत्त्वाचे ठरू लागले आहे आणि तिच्या यशाचे मार्ग उघडणारे ठरू लागले आहे. पुढे जाण्यासाठी सेक्सचा वापर करणे यात आता तिला काही गैर वाटत नाही. या लैंगिक स्वातंत्र्यामुळे स्त्रीला पुरुषाच्या समान पातळीवर तर कधी त्याच्यापेक्षाही वरचढ ठरवले आहे.

समाजाने आता हे सत्य मानलेच पाहिजे की सेक्सची जितकी गरज आणि महत्त्व पुरुषासाठी आहे, तितकेच ते स्त्रीसाठीही आहे. जर पुरुष आपल्या पत्नी व्यतिरिक्त दुसऱ्या स्त्रीशी संबंध बनवू शकतो, विवाहबाह्य संबंध प्रस्थापित करू शकतो आणि आनंदी राहू शकतो तर एक स्त्री असे का करू शकत नाही? स्त्रीने का एकाच पुरुषासोबत आयुष्यभर जबरदस्तीने बांधून घ्यावे? का तिने आपल्या इच्छेविरुद्ध त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण कराव्यात? जर तिचा पती तिच्या भावनात्मक आणि शारीरिक गरजा पूर्ण करण्यात असमर्थ ठरत असेल तर तिला दुसऱ्या पुरुषासोबत नाते जोडण्याचा अधिकार का नसावा?

ही चिंतेची बाब आहे की तनुश्री दत्ता नंतर जी प्रकरणे ‘मी टू’समोर आली, त्या एकातही छळवणूक करणाऱ्या पुरुषाने असे म्हटले नाही की स्त्रीने स्वत:ला समर्पित केले होते. ते असेच म्हणत राहिले की असे काहीही घडले नाही.

सुरक्षित आर्थिक भविष्य

आर्थिक स्वातंत्र्याने स्त्रीला पुरुषाच्या गुलामीतून मुक्त केले आहे. तिच्यातील उत्साह आणि सौंदर्य वाढवले आहे. आज त्यांची सुंदर शरीरे आणि लोभसवाणे चेहरे वर्कप्लेसला फ्रेशनेस देत आहेत. आपल्या पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत स्त्रिया वर्कप्लेसवर अधिक खुश दिसून येतात. आजचे वास्तव हे आहे की स्त्रीला सुरक्षित आर्थिक भविष्य आणि समाधानकारक नात्यांचे वातावरण जसे आज लाभत आहे, ते पूर्वी कधीच नव्हते.

स्त्रीच्या स्वातंत्र्याला सर्वोच्च न्यायालयानेही खूप सपोर्ट केला आहे. मग ते लिव्ह इन रिलेशनशिप असो की विवाहबाह्य संबंध असोत, न्यायालयाने नेहमीच स्त्रीच्या बाजूनेच सर्व निर्णय दिले आहेत. यामुळे स्त्रियांमध्ये जोशाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. बंधनाना तोडत ताज्या हवेत श्वास घेणारी स्त्री आपल्या सुरक्षेप्रति खूप जागरूक बनली आहे.

‘मी टू’ कॅम्पेन याचे ताजे उदाहरण आहे. १०-२० वर्षांपूर्वी ज्या स्त्रिया त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचाराविरुद्ध समाज बंधने आणि आर्थिक दृष्टया विशेष सक्षमता नसल्याने नाईलाजाने गप्प राहिल्या होत्या, आज सोशल मिडियावर आपली ही वेदना ठासून व्यक्त करत आहेत. कायदेशीररित्या एफ आय आरला नोंदवत आहेत आणि आरोपींना गजाआड करण्यासाठी कायदेशीर लढाई लढायलाही तयार आहेत.

पुरुषांना असे वाटते की स्त्रियांसोबत त्यांनी काहीही केले, तरी आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी त्या तोंड उघडणार नाहीत. काहींना सेक्सच्या बदल्यात पद किंवा पैसा देऊन त्यांना असे वाटू लागले होते की प्रत्येक स्त्री देह हा विकाऊ आहे. प्रत्येक स्त्री ही गायीसारखी आहे जेव्हा वाटले तेव्हा तिचा फायदा घेतला आणि जेव्हा वाटले तेव्हा लाथाडले.

हा ‘मीटू’ कॅम्पेनचाच परिणाम आहे, ज्यामुळे देशाचे तत्कालिन परदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांना न केवळ आपले पद गमवावे लागले, पण जगभरात त्यांचे नाव खराब झाले. त्यांच्या वाह्यात अपराधी कृत्यांमुळे राजकीय आणि मिडिया जगत दोन्हीही लाजिरवाणे झाले आहेत.

जागरूक आहे अर्धी लोकसंख्या

आज स्त्री ही आपल्या स्वातंत्र्याविषयी जागरूक तर आहेच, पण आपल्या विरोधात घडणाऱ्या अपराधांविषयीही ती तितकीच जागरूक आहे. यामुळे पुरुषांमध्ये भय निर्माण झाले आहे. कामाच्या ठिकाणी, घरात, पार्टीमध्ये, सार्वजनिक ठिकाणी आधी जिथे महिलांसोबत छेडछाड आणि अश्लील चाळे करणे हे पुरुष आपला जन्मसिद्ध अधिकार मानत होते आणि त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नसे, आता तो काळ गेला आहे. आता त्याला आपल्या चुकीच्या कृत्यांकरता एक्स्पोज केले जाते. त्याच्या विरोधात कायदेशीर खटला चालवला जाऊ शकतो. त्याला शिक्षा होऊ शकते आणि हे सर्व अशामुळे होते की स्त्री आता जागरूक झाली आहे.

जेव्हा शारीरिक संबंधांमध्ये स्त्रीची इच्छा ही ग्राह्य धरली जाईल, तेव्हा हे अपराधाच्या चौकटीतून बाहेर पडून आनंदाची परिसीमा गाठेल. ज्या दिवशी स्त्रीच्या ‘होय’चा अर्थ ‘होय’ आणि ‘नाही’चा अर्थ ‘नाही’ हे पुरुषांच्या लक्षात येईल, त्यादिवशी स्त्रीपुरुष संबंध या विश्वात नवीन परिभाषा रचतील आणि सुंदर रूपात समोर येतील.

देहाच्या स्वातंत्र्याचा अर्थ आहे जे सहमतीने होते त्याच्यासाठीच प्रेम आहे. स्त्री हे काही खेळणे नाही जिच्याशी तुम्ही खेळाल आणि सोडून निघून जाल.

साठीतले प्रेम काय करावे आणि काय करू नये

* दीपान्विता राय बॅनर्जी

अर्ध्याहून अधिक वय उलटून गेल्यानंतर जेव्हा आपल्या जीवनात नव्या साथीदाराच्या स्वरूपात एखाद्या स्त्री किंवा पुरुषाचे आगमन होते, तेव्हा एका नव्या अध्यायाची सुरुवात होते. हा नवा अध्याय वाचण्याची जबाबदारी घेणे हे महाकठीण काम आहे.

आपण या अशा नवीन नात्यांविषयी खासकरून उतारवयात निर्माण झालेल्या या नात्यांची जोपासना, जोखीम, पारख आणि दक्षता यावर चर्चा करूया. म्हणजे वयाचे अनेक टप्पे पार करून तुम्ही जेव्हा एखाद्या नव्या नात्यात बांधले जाता, तेव्हा त्यातील धोका वेळीच ओळखता येईल. हट्टीपणा किंवा मानसिक असंतुलनाच्या नाही तर वास्तवाचे भान विकसित करणारी समज तुमच्यात निर्माण होईल.

स्त्री-पुरुष मैत्रीतील काही खास गोष्टी :

* स्त्री आणि पुरुष यांच्यातील मैत्री ही फक्त मैत्रीपुरतीच मर्यादित राहणे कठीण असते. याची परिणती रोमान्समध्ये होण्याची दाट शक्यता असते.

* स्त्री आणि पुरुष यांच्यातील मैत्री सामान्य असेल तर ती दीर्घकाळ टिकू शकते, पण अशा मैत्रीत जेव्हा रोमान्स येतो तेव्हा त्या मैत्रीचे आयुर्मान खुंटते. मध्येच साथ सोडून देण्याची शक्यता वाढते.

वयाच्या एका टप्प्यानंतर केलेली क्रॉस मैत्री म्हणजे विरुद्ध लिंगी व्यक्तिशी केलेली मैत्री ही कधी आणि कोणत्या परिस्थितीत होऊ शकते आणि अशा मैत्रीचे लाभ काय आणि यात काय जोखीम असते यावर बरेच संशोधन झाले आहे.

जेव्हा एखाद्या कमी वयाच्या मुलाला त्याच्याहून अधिक वयाच्या स्त्रीप्रति आकर्षण वाटते : अनेकदा काही कमी वयाच्या युवकांची मानसिक स्थिती परिपक्व असलेली दिसून येते आणि ते त्यांच्याप्रमाणेच एखाद्या मानसिकदृष्टया परिपक्व स्त्रीच्या साथीची अभिलाषा बाळगतात आणि जेव्हा अशी स्त्री त्याचवेळेस त्यांना भेटते जिच्या आवडीनिवडी, वर्तन, विचार आणि दृष्टिकोन यांच्याशी मिळतेजुळते असतात, तेव्हा तिच्यासोबत मैत्री अधिक घट्ट होते. आणि नंतर या मैत्रीचे रूपांतर प्रेमात अथवा लग्नात झाले तर आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नसते.

कमी वयाच्या स्त्रीला जास्त वयाच्या पुरुषाचे वाटणारे आकर्षण आणि याची कारणे : अशा स्थितीत स्त्रिया आपल्याहून दुप्पट वयाच्या किंवा अगदी आपल्या पित्याच्या वयाच्या व्यक्तिसोबत मानसिक, शारीरिक पातळीवर नाते प्रस्थापित करण्याची इच्छा बाळगतात. सायकोलॉजिकली पाहिल्यास असे पुरुष हे वयाने परिपक्व असण्यासोबत सेक्स अपीलनेही परिपूर्ण असतात. त्यांना स्वत:ला पेश करण्याची कला अवगत असते आणि ते आपल्या वयानुसार नाही तर आपल्या व्यक्तिमत्त्वानुसार जगत असतात.

असे पुरुष प्रभावशाली असतात. हे आपल्या कर्म, विचार आणि सामर्थ्य यात शक्तिशाली असतात. आपल्या परिवाराची पूर्ण काळजी घेणारे किंवा आपले प्रतिष्ठेचे पद आणि कर्मजीवन उत्तमरीतीने निभावून नेणारे असतात. अशा पुरुषांना आपले सर्वस्व अर्पण करून कमी वयाच्या स्त्रिया तृप्त होऊ पाहतात.

अनेकदा तर पतिकडून होणारी अवहेलना यामुळे या स्त्रिया अशा कर्मठ आणि रोमँटिक पुरुषांकडे आकर्षित होतात. यांच्या सान्निध्यात या असमाधानी स्त्रिया आपला गमावलेला आत्मविश्वास परत मिळवतात. या पुरुषांनी केलेली प्रशंसा किंवा मदत यांना जगण्याची उमेदही दाखवते.

६० किंवा त्याहून अधिक वयाच्या पुरुषांना कमी वयाच्या स्त्रियांचे आकर्षण : अशी स्थिती आजच्या काळात सर्वसामान्य समजली जाते. काम आणि व्यवसायाच्या निमित्ताने जास्त वयाच्या पुरुषांचा कमी वयाच्या स्त्रियांशी जेव्हा सतत जवळून संबंध येत असतो, तेव्हा पुरुषांना या स्त्रियांप्रति सहानुभूती, आपलेपणा आणि रोमान्सची भावना निर्माण होणे स्वाभाविक असते.

कमी वयाच्या स्त्रियांसोबत त्यांचे नाते कसे असेल हे त्या पुरुषाच्या व्यक्तित्वावर अवलंबून असते. त्या पुरुषाच्या बॅकग्राउंडवरच त्याच्याशी नाते प्रस्थापित करू पाहणाऱ्या स्त्रीच्या त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा स्पष्ट होत असतात. कसे ते जाणून घेऊया :

वयस्कर कामुक पुरुष आणि त्याच्या स्त्रीकडून अपेक्षा : असे पुरुष स्त्रीच्या शरीराची लालसा बाळगणारे असतात. ते आपल्या कामनापूर्तीतील असमाधानाची ढाल करून स्त्रियांना भोगण्याचा बहाणा शोधत असतात. यामुळे त्यांना समाजव्यवस्था, न्यायव्यवस्थेला न मानण्याच्या दोषातून मुक्त होण्याचे कारण मिळते. अशाप्रकारे अपराधभावनेतून स्वत:ला सोडवून फक्त आपला स्वार्थ साधण्याचे काम हे करत असतात.

भोगी पुरुषांची ओळख आणि अशा पुरुषांपासून स्त्रियांचे स्वसंरक्षण : हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. नोकरी असो किंवा व्यवसाय किंवा करिअरचा कोणताही टप्पा असो २० ते ४० वयोगटातील स्त्रियांना विशेषकरून वयस्कर पुरुषांच्या सान्निध्यात काम करावे लागते.

अशा स्त्रिया या आपल्या संभाषण, विचार, व्यवहार आणि गुणांमुळे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. त्यामुळे हे स्वाभाविक आहे की वयस्कर पुरुषांना अशा स्त्रियांचे सान्निध्य आवडते. पण गोष्टी तेव्हा बिघडू लागतात, जेव्हा हे मैत्रीच्या नावावर या स्त्रियांना भुलवून आपल्या जाळयात ओढतात. ज्या स्त्रिया जाणूनबुजून स्वत:च्या रिस्कवर या नात्याला वाढवतात, त्यांच्यासाठी ही चर्चा भलेही काही कामाची नसेल परंतु त्यांना सावध करणे गरजेचे आहे ज्या अशा पुरुषांशी काहीही विचार न करता मैत्री करतात आणि नंतर न त्यांना पाठी फिरण्याचा मार्ग उरतो वा पुढे जाण्याचा. अशा वासनांध पुरुषांच्या मानसिकतेची झलक पुढे देत आहे, जेणेकरून अशा पुरुषांना सहज ओळखता येईल :

* असे पुरुष सुरुवातीच्या काळात भावनिक पातळीवर संवाद साधतात.

* ते त्या स्त्रीच्या प्रत्येक गरजेची काळजी घेऊ पाहतात.

* त्या स्त्रीचा पती किंवा तिच्या कुटुंबातील लोकांतील उणीवा शोधून स्वत:ला चांगले भासवून तिच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करतात.

* कामाच्या ठिकाणी अतिरिक्त सुविधा देतात.

* कधीकधी स्त्रीच्या शरीराला स्पर्श करून त्याला केअरचे स्वरूप देतात.

* खोटं बोलण्यात आणि अभिनयात हे माहीर असतात.

* आपल्या सावजास भरपूर वेळ देतात, जाळयात ओढण्याची घाई करत नाहीत.

वयस्कर पुरुषांचा कमी वयातील स्त्रीसोबत भावनात्मक संबंध : जास्त वयाचे काही असेही पुरुष असतात, जे कमी वयाच्या अशा समजूतदार स्त्रीसोबत मैत्रीपूर्ण भावनात्मक संपर्क ठेवू पाहतात. जी विचार, स्वभाव आणि भावना यात त्यांच्याशी साधर्त्य साधणारी असते.

जर असे संबंध सहज असतील, विचारांच्या आदानप्रदानापासून स्वस्थ मानसिकता दर्शवणारे असतील आणि दोघांच्या कौटुंबिक संबंधाना नष्ट न करणारे असतील तर अशी मैत्री योग्य आहे.

भावनात्मक आधार शोधणाऱ्या पुरुषांची कौटुंबिक स्थिती : असे पुरुष बऱ्याचदा आपल्या पत्नीला तो मान देऊ शकत नाहीत, ज्याची त्याच्या पत्नीला अपेक्षा असते. असे पुरुष आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या तर निभावत असतात आणि आपल्या पत्नीच्या गरजाही पूर्ण करतात, पण पत्नीला स्वत:च्या योग्यतेचे समजत नाहीत.

असेही असू शकते की पत्नीमध्येही त्यांचा सहारा बनण्याची योग्यता नसेल. घर परिवारांत क्लेश असतील किंवा पुरुषाच्या कामकाजी जीवनातील समस्या त्याची पत्नी समजून घेत नसेल किंवा त्या पुरुषाच्याच आपल्या पत्नीकडून इतक्या अपेक्षा असतील ज्या पूर्ण करणे पत्नीला शक्य नसेल.

कारण काहीही असो जर बाहेरील स्त्री पुरुषांमध्ये संबंध निर्माण झाले असतील तर लव्ह इन सिक्स्टीजसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या स्त्रीपुरुष दोघांनाही लागू होतील :

* अशा संबंधांना निभावताना पहिल्यांदा त्या संबंधाचा प्रकार निश्चित करा. यावर दोघांनीही अंमल केला पाहिजे. उदाहरणार्थ हे नाते शेवटपर्यंत फक्त मैत्रीचेच राहील किंवा हे नाते पुढे कोणत्याही वळणावर नेण्यासाठी दोघे मोकळे असतील.

* दोघे आपली मैत्री समाज, कुटुंब यांच्यापुढे जाहीर करणार की लपून छपून मैत्री ठेवणार हे दोघांनी ठरवावे.

* दोघांनी एकमेकांना लहानशी भेटवस्तू देण्यापुरतेच सीमित राहावे. मोठमोठया भेटवस्तू देणे टाळा, ज्यामुळे कुटुंबात कलह निर्माण होतील आणि तुम्ही नसत्या समस्येत फसू शकता.

* आपल्या नात्यात पारदर्शीपणा ठेवा आणि सत्याच्या बाजूने रहा. यामुळे तुमच्या मित्राला मर्यादेचे भान राहील आणि तुमच्याकडून तो कमी अपेक्षा ठेवेल.

व्यावसायिक आयुष्यात ढवळाढवळ नको

* गीता सिंह

एका बहुराष्ट्रीय कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर असणाऱ्या रोलीसोबत लग्न करून शिशिर खूप आनंदी आणि समाधानी होता. सुंदर, स्मार्ट आणि नोकरदार स्त्री पत्नी म्हणून मिळाल्यावर कोणत्या तरुणाला अभिमान वाटणार नाही, पण काही दिवसांनंतर बायकोचं उशिरापर्यंत घराबाहेर राहणं आणि घरी आल्यावर रात्ररात्रभर लॅपटॉपवर आपल्या प्रोजेक्टवर्कमध्ये अडकून राहणं त्याला असह्य होऊ लागलं. त्यातून पुन्हा सतत कंपनीच्या कामासाठी बाहेरगावी टूरवर जाणं.

अखेरीस एक दिवस हिंमत करुन शिशिरने तिच्यासमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचला.

रोलीने त्याला समजावलं, ‘‘हा तर माझ्या कामाचा भाग आहे, शिशिर. ‘‘आणि लग्नापूर्वी या सर्व गोष्टींची कल्पना मी तुला दिली होती.’’

‘‘अगं पण कल्पना असणं आणि वास्तवात ते सहन करणं यात खूप फरक आहे. या वैवाहिक आयुष्याला अर्थ काय राहिला मग?’’

‘‘मलाही वाटतं आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद लुटावा, पण आता मी काय करू शकते?’’

‘‘तू आपल्या बॉसना सांगून वेळ कमी का करून घेत नाहीस कामाची आणि बाहेरगावच्या टूरवर जायला नकार नाही का देत तू?’’

‘‘काय बोलतोस हे, शिशिर? अरे हा माझ्या करियरचा प्रश्न आहे. लवकरच माझं प्रमोशन होईल आणि मग माझं पॅकेजही वाढेल. अशावेळी मी माझ्या बॉसला कामाची वेळ कमी करायला सांगू? तू असा विचार तरी कसा करू शकतोस, शिशिर?’’

खरंच, रोलीच्या बोलण्यात तथ्य होतं. आजकाल जवळजवळ सर्वच करियर ओरिएण्टेड पतिपत्नींमध्ये त्यांचं करियर आणि त्यांचं दाम्पत्यजीवन यामध्ये अशीच रस्सीखेच चालू असते. एकीकडे पतिपत्नी दोघांनीही नोकरी करणं काळाजी गरज बनली आहे, तर दुसरीकडे त्यांच्या वैवाहिक आयुष्यातली सुख.

काळाची गरज

आजच्या काळात नोकरदार पतिपत्नीचं आयुष्य खूप आव्हानात्मक झालं आहे. पूर्वी जेव्हा पती नोकरी करायचा आणि पत्नी घर सांभाळायची, तेव्हा बऱ्याच गोष्टी साध्यासोप्या होत्या. दोघंही एकमेकांच्या क्षेत्रात हस्तक्षेप न करता आपापल्या परिघात समाधानी होते.

परंतु आजकाल परिस्थितीच्या मागणीनुसार काळाच्या गरजेनुसार दोघांच्या भूमिका काही बाबी सोडल्या, तर जवळजवळ एकसारख्या झाल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यामध्ये वादविवाद होण्याच्या शक्यता वाढल्या आहेत.

हस्तक्षेप करू नका

प्रत्येक कामाची आपली एक गरज आणि एक स्वरूप असतं. या गोष्टी पतिपत्नींनी योग्यप्रकारे समजून घेतल्या पाहिजेत. परंतु बऱ्याच वेळा पत्नीबाबत पतीचा एक मालकी दृष्टिकोन दिसून येतो.

‘‘तू अमुक एकीकडे टूरवर जायचं नाहीस, तू रात्री उशिरापर्यंत घराबाहेर रहायचं नाहीस, बॉसच्या पार्टीमध्ये तू हा ड्रेस घालून जाऊ शकत नाहीस. मुलाची तब्येत बरी नाही, तर तू तुझी महत्त्वाची मीटिंग रद्द करून सुट्टी घे, तू ऑफिसमध्ये इतकं काम करतेस, तू एखादा खास बोनस मागून घे, पगारवाढ मागून घे, तुझ्या बॉसना सांगून फॅमिली हॉलीडेसाठी एखादं टूरिस्ट पॅकेज कबूल करून घे,’’ इत्यादी.

केवळ पतीच नाही, तर कितीतरी पत्नी ज्यांना कॉर्पोरेट विश्वाबद्दल काहीही माहिती नाही, आपल्या पतीच्या कामात हस्तक्षेप करतात.

एका खाजगी कंपनीत नोकरी करणाऱ्या प्रवीणच्या चांगल्या चाललेल्या करियरचा त्याची पत्नी अश्विनीच्या हस्तक्षेपामुळे सत्यानाश झाला. ती रोज प्रवीणला उचकवायची, ‘‘ तू इतक्या मोठ्या पोस्टवर आहेस, मग तुला इकॉनॉमी क्लासचं विमानाचं तिकिट का मिळतं? तू बिझनेस क्लासची मागणी कर. इतकी मेहनत करतोस कंपनीसाठी, कमीतकमी थ्री स्टार हॉटेलमध्ये तरी त्यांनी तुझी राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. आपल्यासाठी एखाद्या आरामशीर मोठ्या गाडीची मागणी कर कंपनीकडे.

प्रवीण मेहनती कर्मचारी होता. परंतु चांगलं पॅकेज देऊनही रोजरोज त्याच्या मागण्या ऐकवून त्याने त्याच्या बॉसचा मूड खराब केला. परिणामी त्याला नोकरीवरुन कमी करण्यात आलं.

पत्नीचे असे बरेच युक्तिवाद असता की हे सगळं तर ती आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच तर करते. पतीचंही आपल्या पत्नीवर प्रेम असल्याने ते आपल्या पत्नीच्या सर्व इच्छांचा आदर करतात. तेही या घोळात अडकून मग आपल्या चांगल्या करियरची माती करतात.

व्यवसायामध्ये तडजोड आवश्यक

खरं तर लग्न हीच एक तडजोड आहे. परंतु आजकाल वैवाहिक आयुष्यात अधिक समजूतदारपणाची आणि तडजोडीची गरज आहे. पतिपत्नी दोघंही करियर ओरिएण्टेड असतील आणि त्यांनी जाणीवपूर्वक आपल्या आवडीनुसार जोडीदाराची निवड केली असेल तर त्याची जबाबदारी अधिक वाढते.

उदाहरणार्थ, त्यांनी एकमेकांच्या कामाच्या प्राथमिकता आणि गरजा ओळखून त्यांमध्ये योग्य समन्वय साधला पाहिजे. उत्तम आयुष्य आणि सर्व सुखसोयीयुक्त जीवनासाठी जर दोघांनीही करियरचा मार्ग स्वीकारला असेल, तर त्यामुळे होणाऱ्या त्रासाचा आणि असुविधांचा दोघांनी मिळून सामना करायला हवा.

आजकाल चित्रपट, मॉडेलिंग म्हणजेच फॅशन, जाहिरात क्षेत्रातील पती-पत्नींनी एकमेकांच्या ग्लॅमरचा मोकळ्या मनाने स्वीकार करायला हवा. त्याच्याशी सलग्न त्रासांचा अस्वीकार केल्याने त्यांच्या वैवाहिक आयुष्यात भांडणं, वादविवाद आणि शेवटी घटस्फोट  अशा बाबी आजकाल सामान्य होत चालल्या आहेत.

भविष्याचा विचार करा

बऱ्याच वेळा पतिपत्नी एकमेकांच्या चालू कामाबद्दल असमाधानी राहून एकमेकांची सतत निर्भर्त्सना करत राहतात. एकमेकांच्या कामामध्ये विनाकारण नाक खुपसत राहतात. अधिक कामामुळे कुटुंबाला वेळ देऊ न शकल्याची सल तर दोघांच्याही मनात राहते, पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की दरवेळा परिस्थिती एकसारखी नसते.

वैवाहिक आयुष्याच्या प्राथमिकताही काळानुसार बदलतात. म्हणूनच योग्य वेळेची वाट पाहिली पाहिजे. बऱ्याच वेळा पतिपत्नी एकमेकांच्या नोकरीवर असमाधानी राहून सल्ले देत राहतात की तुझ्या कष्टाच्या मानाने पगार खूपच कमी आहे.

बेरोजगारीच्या या काळात दुसरी नोकरी मिळवणं काही सोपी गोष्ट नाही. म्हणूनच आपल्या जोडीदाराच्या कामधंद्यात विनाकारण हस्तक्षेप न करता दूरदर्शीपणा दाखवा. उदाहरणार्थ, आज आपल्या जोडीदाराच्या कामाचं जे स्वरूप आहे त्यासोबतच भविष्यातील शक्यतांचाही विचार करणं आवश्यक आहे. काही कंपन्या सुरूवातीला तितकासा चांगला पगार किंवा सोयीसुविधा देत नाहीत, पण जसजशी कंपनीची प्रगती होत जाते तसतसा ते आपल्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर सोयीसुविधा वाढवतात. म्हणूनच भविष्यात घडणाऱ्या सकारात्मक बदलांकडेही लक्ष द्या.

लग्न गरजेचेही आणि निश्चिंतपणाही नाही

* मदन कोथुनियां

लग्नात प्रामाणिकपणा हा पाया आहे, पण आपण तो ढासळल्यानंतरही लग्न टिकवण्यावर विश्वास ठेवतो. आपल्या न्यायसंस्था, समाज सर्वच लग्न वाचवण्यावर विश्वास ठेवतात, कारण सर्व मतभेदांनंतरही सकाळी भांडणारे पती-पत्नी संध्याकाळी एक होतात. कितीतरी जोडपी घटस्फोटाच्या सीमारेषेला स्पर्श केल्यानंतरही असे एक होतात की त्यांनी कधी वेगळे होण्याचा विचार केला होता हे जाणवतही नाही.

महिमाचे आईवडील तिच्यासाठी मुलगा बघत होते. पण तिला मुलगी बघण्याचा पारंपरिक कार्यक्रम मान्य नव्हता. मात्र लग्न म्हटले की दोन कुटुंबांचे, दोन जीवांचे मिलन असते हे तिला माहीत होते. त्यामुळे बऱ्याच विचाराअंती एका नातेवाईकाच्या लग्नात भेटायचे ठरले. पुढे या भेटी हॉटेल्स आणि घरातही झाल्या. दोघांनी एकमेकांना चांगल्याप्रकारे समजून घेतल्यानंतर रीतिरिवाजानुसार त्यांचे लग्न झाले.

आता जोडीदाराची निवड समान मानसिकता आणि विचारधारेनुसार होऊ लागली आहे. तरुणाई आपली आवड, विचार यांसह दोन्ही कुटुंबांच्या आवडीचाही विचार  करू लागली आहे. आता परिस्थिती अगदी बिकट असेल तरच पळून जाऊन लग्न करण्याचा विचार केला जातो.

जयपूरमध्ये मॅट्रिमोनियल एजन्सी चालवणाऱ्या श्वेता विश्नोई सांगतात, ‘‘आवडीचाच जोडीदार हवा यावर ठाम राहायला तरुणाई शिकली आहे. आता लग्नाची व्याख्याही आपोआप बदलत आहे. जिथे पती-पत्नी एकमेकांचे सखा, मित्र, प्रेमी आहेत. अशा बदलांमुळे विवाह संस्थेचे अस्तित्व टिकून राहील शिवाय अन्य संबंध त्यांना कधीच वेगळे करू शकणार नाही.’’

लग्नानंतर आठ वर्षांनी एका अपघातात राजेशच्या पत्नीच्या जवळपास सर्वच शरीराला लकवा मारला. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले लहान होती. त्यांना आईची खूप गरज होती. राजेशने आपली जबाबदारी ओळखत उपचार आणि सेवा करून पत्नीला इतके बरे केले की ती मुलांशी बोलू शकेल. त्यांच्या लहानसहान गोष्टींवर लक्ष ठेवू शकेल. भलेही येथे राजेशची शारीरिक गरज दुय्यम होऊन गेली, पण यातून हे सिद्ध होते की पत्नी आणि मुलांप्रतीच्या या जबाबदारीची भावना लग्न संस्थेत प्रवेश करताच निर्माण होऊ लागते.

विवाहामुळे पती-पत्नीच्या शारीरिक आणि मानसिक गरजांची पूर्तता होते. जी समाजात कायदा सुव्यवस्था आणि शिस्त राखण्यासाठी गरजेची आहे. याच्या नसण्याने समाज मुक्त यौन संबंधांच्या चिखलात अडकला असता. लग्न पती-पत्नीच्या रूपात स्त्री आणि पुरुषाला यौन, आर्थिक आणि अन्य अधिकारांची सामाजिक व कायदेशीर मान्यता देते. वैवाहिक संबंधातून जन्मलेले मूल वैध आणि कायदेशीर मान्यता मिळालेले असते. यातून त्याचे अधिकार आणि कर्तव्य ठरते.

लग्न संस्थेचा दुसरा पैलू

घटस्फोटाचे अनेक खटले न्यायालयात सुरू आहेत आणि पोलीस ठाणी हुंडयाच्या सामानाने भरली आहेत. हेच कारण आहे की लग्नासोबतच पती-पत्नीला आपली संपत्ती स्पष्ट करावी लागेल. हे दस्तावेजच लग्नानंतर होणाऱ्या वादातून वाचवतील. एकनिष्ठ राहण्याच्या भावनेला कीड लागली आहे का की मग कुटुंबाचा अनावश्यक हस्तक्षेप नाते टिकू देत नाही?

रीना आणि महेशच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. महेशने व्यवसायात जम बसवल्यावर रीनाने नोकरी सोडली. अचानक महेशला व्यवसायात नुकसान झाले आणि रीना पुन्हा नोकरी शोधू लागली, पण तिला ती मिळाली नाही. आर्थिक चणचण निर्माण झाल्याने दोघांमध्ये तणाव वाढला. कटकट रोजचीच झाली. तीन वर्षे सोबत राहूनही ते एकमेकांसाठीची जबाबदारी ओळखू शकत नव्हते. रीनाला वाटत होते की तिचे खूपच शोषण झाले तर याउलट रीनाने आपला भरपूर फायदा घेत मौजमजा केली, असे महेशला वाटत होते. अखेर एक दिवस दोघांनी घटस्फोट घेऊन वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

खरंतर किती वर्षे सोबत होतो यापेक्षा ती सोबत किती सुंदर आणि गोड होती हे समजून घेणे जास्त गरजेचे आहे. लग्नाचा वाढदिवस साजरा करणे, सामाजिक समारंभात ग्रुप फोटोत हसताना दिसणे, फेसबुकवर प्रेम व्यक्त करणारा फोटो ठेवणे वेगळी गोष्ट आहे आणि एक आनंदी, विश्वास आणि सन्मानाने परिपूर्ण असलेले एकमेकांना समजून घेणारे नाते जगणे वेगळी गोष्ट आहे.

लग्न कसे ही होऊ देत सुरुवातीच्या दिवसांत फुललेले, बहरलेले असते, दोन शरीर, भिन्न लिंगाचे आकर्षण, खूप सारे स्वातंत्र्य यामुळे जणू पंखच मिळतात. पण हळूहळू कापराप्रमाणे प्रेम उडून जाते. आरोप-प्रत्यारोप, तक्रारी, नाराजी, बेचैनी, जे केले आणि जे केले नाही त्याचा हिशोब आणि शेवटी सुकलेल्या फांद्या असलेल्या वृक्षासारखे नाते, ज्याच्या फांद्यांवर टांगलेल्या रीतीभाती, जबाबदाऱ्या, चीडचिडेपणा त्याला कुरूप बनवतात. प्रेम विवाहातही असेच घडते.

नात्यात समानाधिकार हवा, नात्याचा सुगंध कापरासारखा न उडता कायम दरवळत राहावा, असा विचार जो करतो तो लग्नाच्या नावाने घाबरतो. मग तो मुलगा असो किंवा मुलगी. कदाचित अशीच भीती, प्रश्नांमधून लिव्ह इन रिलेशनशिपचा मार्ग निघाला असेल. अर्थ स्पष्ट आहे. सोबत राहण्यात अडचण नाही, पण ती लग्न करण्यात आहे. काय आहे लग्न जे गरजेचे आहे आणि निश्चिंतपणाही नाही? का लग्नानंतर दोन व्यक्ती एकमेकांवर आगपाखड करतात, स्वत:चे अस्तित्व पणाला लावतात आणि दुसऱ्याचे अस्तित्व संपवण्यासाठी आतूर होतात?

राजस्थान विद्यापिठातील समाजशास्त्राच्या प्राध्यापक रजनी कुंतल यांनी सांगतात, ‘‘हे नाते समाज आणि रीतीरिवाजाचे बळी ठरले नसते, दोन व्यक्तींमधील एक समर्पण आणि दुसरा अधिकाराची अपेक्षा ठेवत पुढे गेला नसता आणि दोन व्यक्तींच्या नात्यात त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत दरवेळी कुणी ना कुणी नाक खुपसले नसते तर कदाचित लग्न संस्थेचे स्वरूप काही वेगळेच असते. सन्मान आणि समानतेच्या भावनिक पायावर उभे राहिलेले हे नाते आयुष्यभर दरवळत राहिले असते. समाजाने लग्न संस्थेची दोरी आपल्या हातात ठेवली आहे. तो दोन व्यक्तींच्या अतिशय खासगी क्षणातील खासगी भावनांवरही नियंत्रण ठेवतो. ही दोरी लग्न संस्था तर वाचवते, पण यातून निर्माण होणाऱ्या प्रेमाचा गळा घोटते.’’

टिकवले तरच टिकते लग्न

लग्नानंतर स्त्री-पुरुष दोघांचेही आयुष्य बदलते. पण तरीही आपल्या समाजात सर्व समज मुलींनाच देण्यात येते. मुलांना क्वचितच काही सांगितले जाते किंवा मानसिकरित्या तयार केले जाते. काही दशकांपूर्वी यामुळे काहीच फरक पडत नव्हता, कारण तेव्हा मुलीलाच नवरीच्या रूपात नवे घर, कुटुंब, नात्यांनुसार स्वत:मध्ये आमूलाग्र बदल करावे लागत होते. एकत्र कुटुंब पद्धतीत मुलांच्या जगण्याच्या पद्धतीत काहीच फरक पडत नव्हता. पण जग बदलले तसे कुटुंबाचे स्वरूप आणि नात्याचे समीकरणही बदलले. पालनपोषण, महिलांची मानसिकता आणि त्यांच्या दृष्टिकोनातही बदल झाला. या परिवर्तनात हे गरजेचे झाले की पुरुषांनीही काही गोष्टी समजून या नव्या प्रकाशात नाते टिकवायला शिकायला हवे. यावरच लग्न संस्थेचे यश अवलंबून आहे.

प्राध्यापक रजनी कुंतल सांगतात, ‘‘पती-पत्नीचे नाते प्राथमिक असते. इतर नाती यातूनच तयार होतात. त्यामुळे स्वाभाविकपणे पत्नी आपल्या जोडीदाराकडूनच सहकार्य आणि आधाराची सर्वात जास्त अपेक्षा करते. म्हणून पतीसाठी गरजेचे आहे की तिचे ऐकून घ्यावे, तिच्या भावना समजून घ्याव्यात.’’

‘‘मुलाच्या लग्नानंतर कुटुंबाची रचना बदलते. सर्व व्यवस्था नव्याने तयार होते. यामुळे खासकरून काही महिला सदस्यांमध्ये ओढाताण होण्याची शक्यता असते. अशावेळी त्यांनी काही तक्रार केल्यास पुरुष सदस्यांनी नि:पक्ष राहणे शिकायला हवे. जर पुरुषांनी समजावण्याचा प्रयत्न केला किंवा एकीचे म्हणणे दुसरीपर्यंत पोहोचवले तर परिस्थिती सुधारण्याऐवजी आणखी बिघडेल. अनेकदा असे प्रश्न महिलाच आपापसात समजून घेतात.

सुखी वैवाहिक जीवनासाठी ९ टीप्स

* गरिमा

पती-पत्नी आणि ती वा तो ऐवजी पती-पत्नी आणि जीवनाच्या आनंदासाठी नात्याला प्रेम, विश्वास आणि सामंजस्याच्या धाग्यांनी बळकट बनवावे लागते. लहानसहान गोष्टी दुर्लक्षित करायच्या असतात. अडचणीच्या काळात एकमेकांचा आधार बनावे लागते. काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते :

मॅसेजवर नव्हे तर संवादावर अवलंबून राहा : ब्रीघम युनिव्हर्सिटीत केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार जी दाम्पत्य जीवनाच्या छोटया-मोठया क्षणांमध्ये मॅसेज पाठवून जबाबदारी पार पाडतात. उदा-चर्चा करायची असेल तर मॅसेज, माफी मागायची असेल तर मॅसेज, कुठला निर्णय घ्यायचा असेल तर मॅसेज अशा सवयी नात्यांमध्ये पाडतात जसं की आनंद आणि प्रेम कमी करतात. जेव्हा एखादी मोठी घटना असते तेव्हा जोडीदाराला सांगण्यासाठी खऱ्या चेहऱ्याऐवजी इमोजीचा आधार घेऊ नये.

अशा मित्रांची संगत ज्यांचे वैवाहिक जीवन आनंदी आहे : ब्राऊन युनिव्हर्सिटीमध्ये केल्या गेलेल्या एका अभ्यासानुसार जर आपल्या जवळच्या नातेवाईकाने किंवा मित्राने डिवोर्स घेतला असेल तर आपणही असाच निर्णय घेण्याची शक्यता ७५ क्क्यांपर्यंत वाढते.

पती-पत्नीने बनावे बेस्ट फ्रेंड्स : ‘द नॅशनल ब्युरो ऑफ इकॉनॉमिक’द्वारा केल्या गेलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की जी दाम्पत्य एकमेकांना बेस्ट फ्रेंड मानतात, ती दुसऱ्यांच्या तुलनेत आपले वैवाहिक जीवन दुपटीने जास्त समाधानाने जगतात.

छोटया-छोटया गोष्टीही असतात महत्वपूर्ण : भक्कम नात्यांसाठी वेळोवेळी आपल्या जीवनसाथीला तो वा ती स्पेशल असल्याची जाणीव करून देणे गरजेचे असते. हे दर्शवणेही आवश्यक आहे की आपण त्यांची काळजी घेता आणि त्यांच्यावर प्रेम करता. यामुळे फारकतिची समस्या येत नाही. आपण जरी जास्त काही नाही तरी एवढे तर करूच शकता एक छोटेसे  प्रेमपत्र जोडीदाराच्या पर्समध्ये हळूच ठेवणे किंवा दिवसभराच्या कामानंतर त्यांच्या खांद्यांना प्रेमाने मसाज देणे. त्यांचा वाढदिवस किंवा आपल्या लग्नाचा वाढदिवस विशेष बनवा. कधी-कधी त्यांना सरप्राईज द्या. अशा छोटया-छोटया घटना आपल्याला त्यांच्याजवळ नेतात.

आपासातील विवाद अधिक चांगल्याप्रकारे हाताळा : नवरा-बायकोत विवाद होणे खूप स्वाभाविक आहे आणि यापासून कोणी वाचू शकत नाहीत. पण नात्यांची बळकटी या गोष्टीवर अवलंबून असते की आपण हे कशाप्रकारे हाताळतो. आपल्या जोडीदाराबरोबर नेहमी सभ्य आणि सौम्य व्यवहार करणाऱ्यांचे नातेसंबंध लवकर तुटत नाहीत. भांडण किंवा वाद-विवादादरम्यान ओरडणे, अपशब्द बोलणे किंवा मारहाण करणे, नात्यांमध्ये विष कालवण्यासारखे आहे. अशा गोष्टी मनुष्य कधीही विसरत नाही आणि  त्यामुळे वैवाहिक जीवनावर याचा अनिष्ट प्रभाव पडतो.

एका अभ्यासात या गोष्टीचा खुलासा केला आहे की कशाप्रकारे फायटिंग स्टाईल आपल्या वैवाहिक जीवनाला प्रभावित करते. लग्नाच्या १० वर्षांनंतर असे कपल्स की ज्यांनी फारकत घेतली आहे आणि तसे कपल्स की जे आपल्या जीवनसाथीबरोबर आनंदाने जीवन जगत आहेत. या दोहोंमध्ये जो सगळयात महत्त्वाचा फरक आढळून आला तो म्हणजे परस्पर म्हणजे लग्नानंतरच्या एक वर्षात त्यांचे परस्परांतील विवाद आणि भांडणे हाताळण्याची पद्धत. ते कपल्स ज्यांनी लग्नाच्या सुरूवातीच्या काळात आपल्या जीवनसाथीबरोबर वेळोवेळी क्रोध आणि नकारात्मक पद्धतीने वर्तन केले त्यांचा डिवोर्स १० वर्षाच्या आतच झाला.

संवादाचा विषय विस्तृत असावा : पती-पत्नीमध्ये संवादाचा विषय घरगुती मुद्दयांव्यतिरिक्त असायला हवा. नेहमी कपल्स म्हणतात की आम्ही तर आपसात बोलत असतो, संवादाची काहीही कमी नाहीए. पण जरा लक्ष्य द्या की आपण काय बोलत असता, नेहमी घर आणि मुलांशी संबंधित बोलणेच पुरेसे नसते. आनंदी जोडपे ते असते, जे आपसात आपली स्वप्नं, आशा, भीती, आनंद आणि यश सर्वावर बोलतात. एकमेकांना समजण्याचा प्रयत्न करतात. कुठल्याही वयात आणि कधीही रोमँटिक होणे ते जाणतात.

चांगल्या प्रसंगाना सेलिब्रेट करा : ‘जनरल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजी’मध्ये प्रकाशित एका शोधानुसार चांगल्या प्रसंगांमध्ये पार्टनरचे साथ देणे चांगलेच आहे, पण त्याहीपेक्षा गरजेचे आहे की दु:ख, समस्या आणि अडचणीच्या वेळी आपल्या जीवनसाथीबरोबर उभे राहणे. पूर्व अमेरिकी राष्ट्रपती बिल क्लिंटनवर मोनिका लेविंस्कीने जेव्हा लैंगिक शोषणाचा आरोप लावला, तेव्हा त्यावेळीसुद्धा हिलरी क्लिंटनने आपल्या पतिची साथ सोडली नाही. त्या दिवसांतील दिलेल्या साथीमुळे दोघांचे नाते अजून बळकट केले.

रिस्क घ्यायला घाबरू नये : पती-पत्नीच्यामध्ये जर नाविन्य, विविधता आणि विस्मयकारक गोष्टी घडत असतील तर नात्यात ताजेपणा आणि सामर्थ्य टिकून राहते. एकसाथ मिळून नवीन-नवीन एक्साइटमेंट्सने भरलेल्या अॅक्टिव्हीटिजमध्ये सहभागी व्हावे, नवीन-नवीन स्थळी फिरायला जावे, रोमांचक प्रवासाची मजा घ्यावी, लाँग ड्राईव्हवर जावे, एक-दुसऱ्याला खाणे-पिणे, फिरणे, हसणे, मस्ती करणे आणि समजून घेण्याचे विकल्प द्यावेत. कधी नात्यामध्ये कंटाळवाणेपणा आणि औदासीन्य येऊ देऊ नये.

केवळ प्रेम पुरेसे नाही : आपण जीवनात आपल्या प्रत्येक प्रकारच्या कमिटमेंटसाठी पूर्ण वेळ देतो. ट्रेनिंग्स घेतो, जेणेकरून आपण त्याला चांगल्याप्रकारे पुढे घेऊन जाऊ शकू. ज्याप्रकारे खेळाडू खेळाच्या टिप्स शिकतात, वकिल पुस्तके वाचतात, आर्टिस्ट वर्कशॉप्स करतात अगदी त्याचप्रकारे लग्नाला यशस्वी बनवण्यासाठी आपण काही ना काही नवीन शिकायला आणि करायला तयार राहायला हवे. फक्त आपल्या जोडीदाराशी प्रेम करणेच पुरेसे नाही तर त्या प्रेमाची जाणीव करून देणे आणि त्यामुळे मिळणारा आनंद सेलिब्रेट करणेही गरजेचे आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितल्यास अशाप्रकारचे नवीन-नवीन अनुभव शरीरात डोपामिन सिस्टमला अॅक्टिवेट करतात. ज्यामुळे आपला मेंदू लग्नाच्या सुरूवातीच्या वर्षात अनुभव होणाऱ्या रोमँटिक क्षणांना जगण्याचा प्रयत्न करतो. एकमेकांना पॉजिटीव्ह गोष्टी बोलणे, प्रशंसा करणे आणि सोबत राहणे नात्यात बळकटी आणते.

नणंद भावजयीचं नातं थट्टामस्करीचं

* मोनिका अग्रवाल

बहुतेकदा असं दिसून येतं की नणंदेचं वर्चस्व असल्याने भावजयीवर अत्याचार होतात. नणंद मग ती माहेरी राहात असो की सासरी, ती आपल्या वाहिनीविरुद्ध आपल्या आईचे कान भरत असते. भावाला भडकवत राहते. याचं कारण हे आहे की बहीण भावावर आपला पूर्ण अधिकार आहे असं मानते आणि आपला गर्व आणि अहंकार गाजवू पहाते. जर भाऊ दूरदर्शी नसेल तर बहिणीच्या बोलण्यात येतो आणि मग त्याची पत्नी अत्याचाराची शिकार होते.

नणंद-भावजयीच्या या भांडणांमागे काय कारण आहे याबद्दल कधी कोणी विचार केला आहे का? जर तुम्ही हे कारण शोधाल तर तुम्हाला उत्तर मिळेल ‘मीपणा.’ जोपर्यंत हा तुमच्यात असेल तोपर्यंत तुम्ही कोणाबरोबर आपल्या नात्याची गाडी फार दूरवर घेऊन जाऊ शकत नाही.

अलीकडचीच एक घटना आहे. ज्यात लखनौस्थित एका कुटुंबात नणंद आणि भावजय यांच्यात लहान सहान गोष्टींवरून भांडण व्हायचं. नणंदेला जेव्हा सहन झालं नाही तेव्हा तिने भावजयीशी झालेल्या भांडणावरून एक कट रचला.

अचानक तिच्या भावाला एका अनोळखी नंबरवरून फोन येऊ लागले. त्याने विचारल्यावर पलीकडून तो सांगायचा की तो त्याच्या बायकोचा प्रेमी बोलतो आहे. प्रकरण इतकं चिघळलं की लग्नाच्या ४ महिन्यातच घटस्फोटाची वेळ आली. २ महिन्यांपासून ही विवाहिता आपल्या माहेरी आहे. या विवाहितेने महिला हेल्प लाईनकडे मदत मागितली. तपास सुरु होताच नणंदेने रचलेला कट समोर आला.

क्षुल्लक कारणं पण वाद मोठा : नणंद-भावजय यांची भांडणं काही क्षुल्लक कारणांवरून होतात. जसे लग्नाआधी घरातल्या प्रत्येक वस्तूवर नणंदेचा अधिकार असतो, परंतु लग्नानंतर परिस्थिती बदलत जाते. आता नणंद घरात पाहुणी होते आणि भावजय मालकीण. अशात प्रत्येक लहान सहान गोष्टीत नणंदेचा हस्तक्षेप भावजयीला सहन होत नाही. बस्स, इथूनच सुरुवात होते या नात्यातील कडवटपणाला.

हे एक सार्वभौमिक सत्य आहे की आपल्याला कधी ना कधी आपले हक्क दुसऱ्याकडे सोपवावे लागतात. आपण नेहमी मालक बनून राहिलो तर आपण कधीच कोणाचं प्रेम आणि विश्वास मिळवू शकणार नाही. आपली थोडीशी नम्रता आणि अधिकारांची विभागणी आपल्या नात्याला माधुर्य आणू शकते.

प्राथमिकता बदलते : बहीण होण्याच्या नात्याने तुम्हाला ही गोष्ट समजून घ्यावी लागेल की लग्नानंतर भावाच्या जबाबदाऱ्या आणि प्राथमिकतासुद्धा बदलतात. स्वत:ला भावनात्मक रूपात परावलंबी होऊ देऊ नका, उलट दोघांचं नातं बळकट करायला मदत करा. नणंद आणि भावजयीला हे समजायला हवं की एखाद्या व्यक्तिसाठी पत्नी आणि बहिण दोघीही आवश्यक असतात. म्हणून त्या व्यक्तीवर दोघींपैकी एकीची निवड करण्याचा दबाव आणू नका.

प्रभुत्व : हे खरं आहे की नव्या घरात प्रत्येक भावजयीला वाटतं की तिला स्वातंत्र्य असावं आणि तिला तिच्या मर्जीने काम करता यावं. उलट नणंदेला वाटतं की जर आधी तिचं म्हणणं ऐकलं जायचं, तसंच आताही भावाच्या लग्नानंतरही व्हावं. जर या घरात नेहमी तिचं ऐकलं जात होतं तर आताही तिचंच ऐकायला हवं. परंतु दोघीना समजायला हवं की काळाप्रमाणे परिस्थिती बदलत जाते.

समवयस्क असणे : भावजय आणि नणंद दोघींचं वय साधारण सारखं असतं. दोघींना समजायला हवं की त्यांच्यामुळे त्यांच्या भावाला किंवा पतीला त्रास होऊ नये. समवयस्क असल्याने दोघींमध्ये नेहमी भांडण होत असतं. नणंद भावजयीच्या नात्याला मैत्रीच्या नात्यात बदलायचा प्रयत्न करा. मतभेद झाले तर दोघीनी शांत राहावं. प्रयत्न करा की भांडण वाढण्याआधीच मिटेल.

नाती जोडण्याआधी आपण त्याच्या दूरगामी परिणामांचाही विचार करायला हवा, कारण आपल्याला खूप लांब रस्ता पार करायचा आहे. नाती ही तयार करत तोडायची वस्तू नाही. ही तर आजन्म निभावण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्यभर हे निभावयाचे आहेत तर प्रेमाच्या अमृताने शत्रुत्वाचं विष नाहीसं का करू नये.

रिजेक्शनचा सामना करा काही असा

* गरिमा पंकज

प्रत्येक व्यक्तीला जीवनात अनेकदा रिजेक्शन म्हणजेच नकाराचा सामना करावा लागतो. कारण काहीही असू शकते. कधी चांगल्या शाळा-महाविद्यालयात प्रवेश न मिळणे, कधी परीक्षेत चांगले गुण न मिळणे, कधी नोकरीत अपयश किंवा प्रेमभंग. अशा अनेक प्रकारचे रिजेक्शन व्यक्तीला आयुष्यातील विविध टप्प्यांवर सहन करावे लागू शकते.

जरा या घटनांकडे पहा :

जुलै ०४, २०१९

एकतर्फी प्रेमात वेडया झालेल्या तरुणाचा तरुणीवर हल्ला आणि त्यानंतर आत्महत्या.

पानीपतमध्ये एका तरुणाने एकतर्फी प्रेमात अपयश आल्याने तरुणीवर चाकूहल्ला करून तिला जखमी केले. त्यानंतर आत्महत्या केली. तरुण (राहुल) व तरुणीमध्ये प्रेमसंबंध होते. त्यानंतर तरुणीने आपल्या कुटुंबाच्या सल्ल्यानुसार राहुलसोबतचे संबंध तोडले. यामुळे नाराज झालेल्या राहुलने तरुणीला मारहाण केली. २५ मे, २०१९ ला तरुणीने राहुलची पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यानंतर दोघांमधील वाद सामंजस्याने मिटला. पण राहुलने बदला घ्यायचे ठरवले होते.

४ जुलैच्या सकाळी तरुणी आपल्या २ मैत्रिणींसोबत बागेत फिरायला गेली होती. राहुलही तेथे आला आणि त्याने ब्लेडने तरुणीच्या गळयावर वार केले. ती रस्त्यावर कोसळली. बागेत आलेल्या लोकांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने त्याच ब्लेडने स्वत:च्या गळयावर वार करून आत्महत्या केली.

एप्रिल ३०, २०२०, नवी दिल्ली

जेईई मेनच्या परीक्षेत नापास झाल्याने विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

जेईई मेन २०१९च्या परीक्षेत अपयश आल्याने तेलंगणातील एका १७ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. स्वत:वर गोळी झाडली. या परीक्षेत सुमारे १२ लाख उमेदवार सहभागी झाले होते.

मृत मुलाचे नाव सोहेल होते. तो जेईई मेन परीक्षेसोबतच तेलंगणा स्टेट इंटरमीडिएट परीक्षेतही नापास झाला होता. सोहेलने वडिलांच्या पिस्तूलमधून घरातच स्वत:वर गोळी झाडली. त्याचे वडील निवृत्त सैनिक आहेत. सोहेलने इंजिनीअरिंगमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आकाश कोचिंग इन्स्टिट्यूटमधून अभ्यास केला होता. पण परीक्षेत यशस्वी होऊ शकला नाही. नापास झाल्याने वडील त्याला ओरडले. निराश झाल्याने तसेच वडील ओरडल्याने त्याने स्वत:वर गोळी झाडली.

अनेकदा रिजेक्शनमुळे व्यक्ती खूपच जास्त मानसिक तणावाखाली येऊन एवढी निराश होते की आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग निवडते.

सत्य तर हेच आहे की आपण सर्व कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर रिजेक्शनचे शिकार झालेले असतो किंवा होत असतो. आज ज्यांना आपण यशाच्या शिखरावर पाहतो त्यांनीही कधीतरी रिजेक्शनचा सामना केलेला असतो. अशी कोणती यशस्वी व्यक्ती आहे जिने कधीच अपयश किंवा तिरस्काराचा सामना केलेला नाही? सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दिकीचेच उदाहरण घ्या. सिनेक्षेत्रात येण्यासाठी त्यांना अथक परिश्रम करावे लागले. दिसायला बरा चेहरा नसल्याने त्यांना अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला.

अमिताभ बच्चन यांचा आवाज रेडिओसाठी अपात्र ठरला होता. त्यांना रेडिओ स्टेशनवर रिजेक्ट केले होते. अशाच प्रकारे प्रतिभावंत गायक कैलाश खेर यांचा आवाज सुरुवातीला चित्रपटातील गाण्यांसाठी योग्य नसल्याचे सांगण्यात आले. मोहम्मद रफी यांनाही अनेक रात्री स्टेशनवर काढाव्या लागल्या. अब्राहम लिंकन यांच्यापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोहियाजी यांच्यापर्यंत प्रत्येकानेच रिजेक्शनचा सामना केला आणि आपला संघर्ष सुरूच ठेवला.

जोहान्स हौसोफोर प्रिंसटोन हे युनिर्व्हसिटीत मानसशास्त्र आणि पब्लिक अफेअर्सचे (सार्वजनिक व्यवहार) प्राध्यापक आहेत. त्यांनी स्वत:च्या पदरी पडलेल्या अपयशाची तुलना मिळालेल्या यशाशी केली. त्यांचा ‘सीवी’ आणि त्यातील अपयशाची बरीच चर्चा झाली.

जिया जियांग एक मोटिव्हेशनल स्पीकर आणि रिजेक्शन थेरपी वेबसाईटचे मालकही आहेत. त्यांनी रिजेक्शनंतरचे १०० दिवस आणि अन्य अनुभवांच्या आधारे ‘हाऊ टू बीट फिअर एंड बिकम इनव्हिजिबल’ या नावाचे पुस्तक लिहिले.

यासंदर्भात क्वीन ब्रिगेडच्या संस्थापिका हिना एस. खेरा यांनी मांडलेल्या मतानुससार, आपल्या मनाला काही अशा प्रकारे समजवा :

स्वत:लाच प्रश्न विचारा : सर्वात आधी स्वत:ला विचारा की, तुम्हाला ती गोष्ट का हवी होती? जसे की, नोकरी, नाते, प्रेम, चांगले गुण इत्यादी. याचे कुठे ना कुठे तुम्हाला असेच उत्तर मिळेल की, त्यामुळे समाजात तुमची स्थिती उत्तम झाली असती. तुम्ही स्वत:ला सिद्ध करू शकला असता. असे उत्तर मिळाल्यानंतर विचार करा की, स्वत:ला सिद्ध न करू शकल्यामुळे स्वत:चाच जीव घेणे योग्य आहे का? हा मुर्खपणा ठरणार नाही का? म्हणूनच तणावात राहणे बंद करा आणि यश मिळवण्यासाठी आणखी जोमाने तयारीला लागा.

स्वत:ला त्रास करुन घेऊ नका : जीवनात चढउतार येतच राहतात. जीवनातील एखाद्या वळणावर आपल्याला रिजेक्ट केले म्हणून त्याचा दुष्परिणाम आपल्या जीवनावर पडू देऊ नका. आपण हे समजून घेतले पाहिजे की, ती गोष्ट आपल्यासाठी नव्हतीच. नकारात्मक विचार आणि कमीपणाची भावना मनात निर्माण होऊ देऊ नका. यामुळे तुम्ही दु:खी होऊन नैराश्यग्रस्त होऊ शकता.

परिस्थितीकडे वेगळया नजरेतून पहा : तुम्ही हे पाहण्याचा प्रयत्न करा की, तुम्हाला जे हवे होते त्यासाठी तुम्हाला रिजेक्ट करणे ही तुमच्यासाठी चांगली गोष्ट ठरू शकते. कदाचित तुम्हाला ती नोकरी मिळाली नाही किंवा तुमचे नाते तुटले याचा अर्थ तुम्ही वास्तविक जीवनात काहीतरी वेगळे आणि अधिक चांगले मिळवण्यासाठी लायक आहात.

स्वत:वर नियंत्रण ठेवा : सर्वसाधारणपणे आपल्याला जे हवे आहे ते मिळत नसेल तर ते मिळवण्यासाठी आपण चुकीच्या मार्गावरून जाण्याचा प्रयत्न करतो. नव्याने नियोजन करू लागतो किंवा कटकारस्थान करू लागतो. त्यावेळी डोक्यात फक्त एवढाच विचार असतो की, काहीही करुन ती गोष्ट मिळवायचीच आहे.

अपयशातून मिळते प्रेरणा : यशाप्रमाणेच अपयश हादेखील जीवनातील महत्त्वाचा घटक आहे. जेव्हा आपण खूप जास्त निराश होतो तेव्हा असा विचार करतो की, हे सर्व आपल्या बाबतीतच घडले आहे. पण असे मुळीच नसते. तुम्ही इतरांच्या आयुष्यात डोकावून पहा. जे लोक तुमच्यापेक्षा जास्त आनंदात असतात त्यांच्याशी बोलल्यानंतर  लक्षात येईल की, त्यांनी त्यासाठी किती कष्ट केले आहेत.

रिजेक्शन आपल्याला जास्त रचनात्मक, ऊर्जावान बनवते आणि मोठया कॅनव्हासवर काम करण्याची प्रेरणा देते. ज्यांनी अपयश अनुभवले आहे आणि जे रिजेक्शन कायम लक्षात ठेवतात ते नेहमीच दुसऱ्याचा मान ठेवून त्यांना मदत करतात. दुसऱ्यांना दु:ख सांगण्यापेक्षा त्यांचे दु:ख समजून घेतात. सर्व ठीक होईल, असे सांगून त्यांना धीर देतात. मुळात प्रत्येक गोष्टीत काहीतरी सकारात्मक शोधल्यामुळेच नकारात्मकतेपासून वाचणे शक्य होते.

दाम्पत्य जीवनात याला असावी नो एंट्री

* ललिता गोयल

संशयाच्या रोगाला इलाज नाही. जर का याच्या फेऱ्यात खासकरून पतीपत्नीपैकी कुणी एक अडकले तर तो त्यांना हैवान बनवू शकतो. अशीच एक घटना अलीकडेच हैदराबादमध्ये पाहायला मिळाली, जिथे एका महिलेने आपल्या पतीला अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयामुळे अशी शिक्षा दिली ज्याची वेदना तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की या ३० वर्षीय महिलेने पतीशी झालेल्या वादात चाकूने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे पतीला गंभीर जखमा झाल्या.

असेच एक प्रकरण दिल्लीच्या निहाल विहार परिसरातसुद्धा घडले, जिथे पतिनेच आपल्या पत्नीची मर्डर केली. पकडले गेल्यावर त्या पतिने पोलिसांना सर्व काही सांगितले. त्याने स्पष्ट केले की त्याचा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. दोघांचे लव्ह मॅरेज होते, पण पतिला सतत वाटायचे की आपल्या पत्नीची अनेक मुलांसोबत मैत्री आहे आणि याच गोष्टीवरून त्यांच्यात सतत वादविवाद होत आले.

तुटणारी कुटुंबं आणि विखुरणारी नाती

संशयामुळे न जाणो कित्येक हसती खेळती कुटुंबं बरबाद झाली आहेत. दाम्पत्य जीवन जे विश्वासाच्या आधारावर टिकलेले असते, त्यात संशयाची चाहूल विष कालवते. हल्ली अनैतिक संबंधांच्या संशयावरून लाइफपार्टनरवर हल्ला, हत्या करण्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. एकत्र कुटुंब पध्दती विखुरणे हे याचे कारण आहे असे मानसशास्त्रज्ञ मत मांडतात.

खरंतर एकत्र कुटुंब पद्धतीत जेव्हा पती आणि पत्नीत भांडणे होत, तेव्हा घरातील मोठी माणसे सामोपचाराने बातचीत करून ती भांडणे सोडवत असत किंवा मग मोठयांच्या उपस्थितित त्यांचे भांडण उग्र रूप धारण करू शकत नसे. मात्र आज पती पत्नी एकटे राहतात, त्यामुळे भांडण झाल्यावर ते एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात. इथे त्यांच्यामध्ये उभी राहिलेली संशयाची भिंत तोडायला कुणीही नसते.

अशात संशय अधिकच बळावल्यामुळे पतीपत्नीचे नाते शेवटच्या घटका मोजू लागते. वर्तमान लाइफस्टाइलमध्ये पती आणि पत्नी दोघेही नोकरदार असतात. ते दिवसातले ८ ते १० तास घराबाहेर असतात आणि ते विरुद्ध लिंगीय व्यक्तींसोबत कामाच्या निमित्ताने सहवासात असतात. हाच सहवास हे दोघांमधील संशयाचे कारण बनते. अशावेळी पतीपत्नी दोघांनी विश्वास ठेवायला हवा.

बिझी लाइफस्टाइल

लग्नानंतर जिथे वैवाहिक नाते टिकवून ठेवणे ही जशी पतीपत्नीची जबाबदारी असते, त्याचप्रमाणे हे नाते संपुष्टात आणण्यासही ही दोघचं कारणीभूत असतात. लग्नानंतर काही वर्षांनी जेव्हा दोघेही आपल्या रुटीन लाइफमध्ये बोअर होतात आणि आपल्या जबाबदाऱ्या झटकण्यासाठी तिसऱ्या व्यक्तिकडे आकर्षित होतात, म्हणजेच एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ठेवतात, तेव्हा वैवाहिक नात्याचा अंत हा संशयापासून सुरू होऊन एकमेकांना शारीरिक नुकसान पोहोचवणे ते हत्येपर्यंत पोहोचतो.

अनेकदा तर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्यामुळे जेव्हा पतिपत्नी जीवनातील समस्या सोडवण्यास अक्षम ठरतात, तेव्हा त्यांच्यात खटके उडू लागतात. आणि यासाठी ते बाहेरच्या संबंधांना जबाबदार धरतात. त्यांच्या डोक्यात संशय उत्पन्न होऊ लागतो. हळूहळू हा संशय बळावू लागतो आणि भांडण वाढत जाते.

जर का त्यांना कोणी समजावले तर संशय आणि सगळया समस्या संपुष्टात येऊ शकतात, परंतु एकल परिवारात त्यांना समजावणारे कोणी नसते. यामुळे परिस्थिती मारझोडीपासून हत्येपर्यंत जाऊन पोहोचते.

तू फक्त माझा/माझी आहेस असा विचार

लाइफपार्टनरविषयी जास्तच पझेसिव्ह राहणे हेसुद्धा संशयाचे मोठे कारण असते. आजच्या काळात जिथे स्त्री आणि पुरुष हे ऑफिसमध्ये मोठमोठया जबाबदाऱ्या सांभाळत असतात, अशीवेळी त्यांच्यात सलगी होणे स्वाभाविक असते. मग पती किंवा पत्नी हे जेव्हा एकमेकांना दुसऱ्या व्यक्तिसोबत सलगी करताना पाहतात, तेव्हा त्यांच्या मनात संशय उत्पन्न होतो. त्यांना हे सहनच होत नाही की त्यांचा लाइफपार्टनर ज्याच्यावर ते मनापासून प्रेम करतात, तो कुणा बाहेरच्या व्यक्तिसोबत सलगी करत आहेत. कारण ते त्यांच्यावर फक्त आपला अधिकार आहे असे समजत असतात.

अशाप्रकारची विचारसरणी नात्यांमध्ये कटुता आणते. पती किंवा पत्नी जेव्हा फोनवर कुणा दुसऱ्या महिलेचा किंवा पुरुषाचा मेसेज किंवा कॉल पाहतात, तेव्हा त्यांना संशय येऊ लागतो. भले वास्तव वेगळेच असो. पण संशयाचे बीज दोघांच्या संबंधात फूट पाडते, ज्याचा अंत हा मारहाण किंवा मग हत्या अशा घटनांत होतो.

हेरगिरीची माध्यमे बनणारे अॅप्स

पती पत्नीच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी स्मार्टफोनही काही कमी जबाबदार नाही. सोशल मिडियाने जिथे वैवाहिक जोडीदारांच्या विवाहबाह्य संबंधांना खतपाणी घातले आहे तिथे या स्मार्टफोनमध्ये असेही अॅप्स आहेत, जे पती आणि पत्नी यांना एकमेकांवर हेरगिरी करण्याची पूर्ण संधी देतात.

या अॅप्सद्वारे पती किंवा पत्नी हे आपला लाइफपार्टनर त्यांच्याव्यतिरिक्त सर्वाधिक कोणाशी बोलतात. म्हणजेच हल्ली कोणत्या व्यक्तिशी त्याची जवळीक वाढत आहे. त्यांच्यात काय गप्पा होतात, ते कोणत्या प्रकारच्या इमेज किंवा व्हिडिओ शेअर करतात. थोडक्यात लाइफपार्टनरच्या फोनवर कंट्रोल करण्याचीही पूर्ण व्यवस्था आहे. हे अॅप्स लाइफपार्टनरच्या प्रत्येक अॅक्टिव्हिटीवर नजर ठेवण्याची पूर्ण संधी देतात. या अॅप्सच्या मदतीने लाइफपार्टनरचा फोन पूर्णपणे तुमच्या ताब्यात येऊ शकतो.

आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की या टेक्निकचा सदुपयोग तुम्ही आपसातल्या नात्यात जवळीक आणण्यासाठी की दुरावा वाढवण्यासाठी?

कोरोना या ७ गोष्टींकडे द्या लक्ष

* प्राची भारद्वाज

कोरोनाचा कहर संपूर्ण जगावर झाला आहे. जवळपास सर्वच देश याच्या फेऱ्यात अडकले आहेत. लोक घरात नाईलाजाने बंदिस्त झाले आहेत. काय करणार? कोरोनापासून स्वत:चे रक्षण करणेही गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाता येणार नाही. साफसफाईकडे लक्ष द्यायचे आहे आणि संसर्गापासून दूर रहायचे आहे. अशावेळी काय होईल, जेव्हा पतीपत्नी किंवा लिवइन जोडप्याला एका घरात पूर्ण वेळ सोबत रहावे लागेल? कशी असेल ती परिस्थिती जिथे पतीपत्नीला जबरस्तीने एकमेकांसमोर रहावे लागेल? लक्षात घ्या, हा हनिमून नाही. संशोधनानुसार असा निष्कर्ष निघाला आहे की, अशा परिस्थितीत लोकांना प्रचंड हताशा, कंटाळा, एकाकीपण, राग आणि तणावासारख्या भावनांचा सामना करावा लागतो.

जगभरात पतीपत्नीवर केलेल्या विनोदांची कमी नाही. सर्वांना माहिती आहे की, भलेही हे नाते जीवनभराचे असले तरी थोडासा स्वत:साठी वेळ प्रत्येकालाच हवा असतो. म्हणून हेच चांगले असते की, पतीने सकाळी कामाला जावे, पत्नी गृहिणी असेल किंवा नोकरीला जात असेल आणि रात्री उशिरा दोघे एकमेकांना भेटत असतील. यामुळे दोघांना आपापले जीवन जगता येते. शिवाय भेटल्यानंतर कितीतरी नवीन गोष्टी सांगण्यासारख्या असतात, ज्या या नात्यात नव्याने गोडवा आणतात. पण कोरोनामुळे अशी गोड हवेची झळूकही हरवून गेली आहे. ज्या जोडप्यांच्या घरी मुले आहेत तिथे लक्ष दुसऱ्या गोष्टीत वळवणारे इतरही सदस्य आहेत. पण ज्या जोडप्यांना मुले नाहीत तिथे एकमेकांशिवाय दुसरे असणारच कोण?

अशावेळी तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे :

  1. दिनक्रम बिघडू देऊ नका

जेव्हा आपल्या सर्वांसमोर घरात राहण्यावाचून पर्याय उरलेला नाही, अशावेळी आळशीपणाने प्रत्येक काम टाळू नका. ज्याप्रमाणे यापूर्वी सकाळी उठत होता, तसेच उठा. अंघोळ करुन तयार व्हा. त्यानंतर घरातील कामे उरका. ऑफिसची वेळ होईल तेव्हा जागा निश्चित करून तेथे टेबल आणि खुर्ची घेऊन बसा. लक्षात ठेवा, कोरोनामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर खूपच वाईट परिणाम होत आहे. म्हणूनच आपले काम प्रामाणिकपणे करा.

  1. घरातली कामे आपापसात वाटून घ्या
  • या काळात घरकाम करणाऱ्या महिला, ड्रायव्हर, कार धुणारे, स्वयंपाकी सर्वांनाच सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे आता घरातली सर्व कामे आपल्यालाच करायची आहेत. अशावेळी कोणा एकावर सर्व कामांची जबाबदारी अली तर त्याची चिडचिड होणे स्वाभाविक आहे. अशी वेळ येऊ नये म्हणून घरातल्या कामांची एक यादीच तयार करा. आपली क्षमता आणि आवडीनुसार कामाचे वाटप करा. जसे की, भांडी पतीने घासली तर साफसफाई पत्नीने करावी. जेवण पत्नीने बनवले तर सर्व पुसून घेणे, वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुणे, ही कामे पतीने करावीत.
  1. जवळ येऊ नका, दूरही जाऊ नका
  • आज परिस्थिती अशी आहे की, जवळही जाता येत नाही आणि फार दूरही राहता येणार नाही. एकाच घरात एकत्र बंद झाल्यामुळे तरुण जोडप्यांमध्ये एकमेकांप्रती शारीरिक आकर्षण निर्माण होणे स्वाभाविक आहे. जेव्हा तरुण पती किंवा पत्नी समोर असते तेव्हा मनावर नियंत्रण ठेवणे कठीण असते. पण सोबतच या गोष्टींकडेही लक्ष द्यायला हवे की, कोरोना विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला होतो. म्हणूनच जर जवळ आलात तर त्यानंतर स्वत:च्या स्वच्छतेकडे लक्ष द्या. अंघोळ करा. तसे तर शॉवरखालीही तुम्ही एकमेकांजवळ येण्याच्या संधीचा फायदा घेऊ शकता. म्हणजे प्रेम आणि स्वछता दोन्ही साधता येईल. पण एकत्र राहिल्यामुळे फक्त प्रेम फुलेल, असेही अजिबात नाही. याचे दुष्परिणामही होऊ शकतात.
  1. ओव्हर एक्सपोजरचा धोका
  • सतत सोबत राहिल्यामुळे तरुण जोडप्यात केवळ प्रेमच बहरेल असे नाही तर मतभेदही वाढू शकतात. आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोना काळात एकमेकांसोबत राहण्यावाचून पर्याय नसलेल्या जोडप्यांवर घटस्फोटाची वेळ आली आहे. चीनचा दक्षिण-पश्चिम भाग सिशुआनमध्ये 24 फेब्रुवारीनंतर ३०० हून अधिक घटस्फोटाचे अर्ज आले आहेत. दक्षिण चीनमधील फुजीआन प्रांतात तर एका दिवसात घटस्फोटाच्या १० अर्जांवर सुनावणी ठेवण्यात आली. असे यामुळे होत आहे की, तरुण जोडपी गरजेपेक्षा जास्त वेळ नाईलाजाने एकमेकांसोबत घालवत आहेत. त्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्यामुळे गरजेपेक्षा जास्त काळसोबत राहून अनेकदा त्यांच्यात वाद होतात आणि शेवटी स्वत:चा अहंकार, राग किंवा जिद्दी स्वभावामुळे ते घटस्फोटाचा निर्णय घेतात.
  1. घरात राहूनही अंतर ठेवणे आहे शक्य
  • स्वत:साठी थोडा वेळ असायला हवा असे प्रत्येकालाच वाटते. आपली स्पेस, आपला वेळ. पण सतत सोबत राहिल्यामुळे जोडीदाराची नजर सर्वकाळ आपल्यावरच खिळून राहिल्यासारखे वाटते. हे टाळण्यासाठी तुम्हाला दोघांची स्वत:साठीची वेळ आणि जागा ठरवून घ्यायला हवी. तुम्ही दोघेही वर्किंग असाल तर सोबत असूनही एकमेकांपासून थोडे अंतर सहज ठेवू शकता. शिवाय एकमेकांचा कंटाळा येणार नाही.
  1. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून
  • अनेकदा तुमच्या मनात काहीतरी वेगळे असते पण प्रत्यक्षात त्यापेक्षा वेगळे वागण्याची कारणे अनेक असतात. जसे की, तुम्हाला राग आला कारण तुमच्या जोडीदाराने त्याची भांडी धुतली नाहीत. जेव्हा की तुम्ही नुकतेच किचन स्वच्छ करून आला असाल. प्रत्यक्षात तुमच्या रागावण्यामागचे खरे कारण असे असते की, तुमच्या जोडीदाराने तुम्हाला होणार त्रास आणि तुमच्या मेहनतीकडे दुर्लक्ष केले.

 मानसशास्त्रज्ञ डॉक्टर प्रियांका सांगतात की, तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी बोलायला हवे आणि तुमच्या रागामागचे जे खरे कारण आहे ते सांगायला हवे.

जेव्हा तुम्हाला वाटेल की, तुमच्या दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून भांडण होऊ शकेल अशावेळी खोलीतून बाहेर जा. कुठले तरी दुसरे काम करायला घ्या, जेणेकरून भांडणाचा विषय तुमच्या डोक्यातून निघून जाईल. सतत सोबत राहिल्यामुळे असेही होऊ शकते की, तुम्हाला तुमच्या जोडोदारामधील थोडे जास्तीच दोष दिसू लागतील. पण तुम्हाला स्वत:वर लक्ष द्यायचे आहे. सकारात्मक रहायचे आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत घालवलेले चांगले क्षण, चांगल्या गोष्टी आठवा. त्याच्यातील केवळ चांगल्याच गोष्टी शोधून काढण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्हाला त्यांच्या काही त्रासदायक सवयींकडे दुर्लक्ष करावे लागेल.

  1. क्वॉलिटी टाइम घालवा
  • ही वेळ केवळ अडचणींची आहे असे मुळीच नाही. तुम्ही दोघे मिळून या क्षणांना सोनेरी क्षण बनवू शकता. त्यासाठी आपल्या जोडीदारासोबत आवडीची पुस्तके वाचा. जुने चित्रपट पहा. आवडीचे गेम खेळा. चित्र काढा. सोबतच व्यायाम करून स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्या. पण या गोष्टीकडे लक्ष द्या की, एकमेकांच्या इतकेही जवळ येऊ नका की, कंटाळा येऊ लागेल. बाहेरच्या जगासोबचे संबंध तोडू नका. तुम्ही घराबाहेर पडू शकत नसाल म्हणून काय झाले, व्हर्च्युअल वर्ल्ड तर आहेच. त्याच्याद्वारे तुमचे मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, शेजाऱ्यांशी कायम संवाद साधा. सोशल मीडियावरही काही वेळ घालवता येऊ शकेल.

संपत्तीची वाटणी कायद्यापेक्षा संस्कार मोठे

* सुधा कसेरा

मोबाइलची रिंग वाजताच दीपा स्क्रीनवर आपल्या मोठया बहिणीचा फोटो पाहून समजून गेली की, नक्कीच काहीतरी महत्त्वाचे असणार, कारण ती कधीच निरर्थक गप्पा मारायला फोन करत नसे.

तिने सांगितले की, ‘‘तुला माहिती आहे का? बिहारमधील वडिलांची सर्व जमीन दोन्ही भावांनी मिळून, तुझी आणि माझी सही स्वत:च करुन कवडीमोल किंमतीने विकली. मला आपल्या एका हितचिंतकाने फोन करुन ही माहिती दिली.’’

हे ऐकून दीपा सुन्न झाली. वडिलांच्या चितेची आग थंड होण्याआधीच भावांनी हे असे पाऊल उचलले, जणू ते त्यांच्या मरणाचीच वाट पाहत होते. वडिलांनी ती जागा स्वत:हून विकली असती तर सर्वांना समान वाटा मिळाला असता, पण अचानक अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी दीपाला बऱ्याचदा सांगितले होते की, कुटुंबात फक्त तिलाच आर्थिक चणचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे जमिनीच्या पैशांतून तिला खूप फायदा होईल. ही घटना अपवाद नसून प्रत्येक घराची कथा आहे.

वडिलोपार्जित मालमत्तेवर हक्क

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. बहुतांश घरातील पुरुष वडिलोपार्जित व्यवसाय करायचे. त्यामुळेच बहिणींच्या लग्नात त्यांना हुंडा म्हणून वडिलोपार्जित संपत्तीतील काही भाग देत असत. लग्नानंतरही त्यांच्या प्रत्येक सुखदु:खात ते सहभागी व्हायचे आणि शक्य तितकी त्यांना मदत करायचे. एखाद्या महिलेला तिच्या सासरच्यांनी सोडून दिले किंवा वैधव्य आले तरी भाऊ किंवा वडील तिला सर्वतोपरी मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य समजत असत.

ते आईवडिलांबाबत असलेली आपली जबाबदारीही पार पाडत असत. दुसरीकडे लग्नानंतर मुलगी पूर्णपणे सासरची होऊन जात असे. पण, कालौघात जग आणि लोकांच्या विचारसरणीतही प्रचंड बदल झाला. आता वडिलोपार्जित व्यवसाय सोडून तरुण इतर शहरांमध्ये काम करण्यासाठी जाऊ लागले आहेत. एकत्र कुटुंब पद्धती ही त्रिकोणी कुटुंबात परिवर्तीत झाली असून प्रत्येक कुटुंब स्वतंत्रपणे राहू लागले आहे. यामुळे त्यांचा वैयक्तिक खर्चही खूप वाढला आहे.

महिला स्वावलंबी झाल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलला आहे. मुली या भावांच्या खांद्याला खांदा लावून आईवडिलांची जबाबदारी घ्यायाला पुढे सरसावतात. आता हुंडयाची प्रथा कायदेशीररित्या अमान्य आहे. स्वावलंबी असल्याने मुलीही वडिलांकडून हुंडा घेण्यास विरोध करतात. हे सर्व पाहता वडिलोपार्जित मालमत्तेत त्यांनाही हक्क मिळणे आवश्यक झाले आहे.

समान हक्क

१९५६ चा कायदा ‘हिंदू वारसा हक्क सुधारणा दुरुस्ती’ अस्तित्त्वात आल्यानंतर विवाहित महिलांना माहेरच्या वडिलोपार्जित मालमत्तेत पुरुषांच्या बरोबरीनेच समान हक्क बहाल केला. परंतु तो प्रभावी ठरला नाही. ९ सप्टेंबर २००५ पासून, हिंदू उत्तराधिकार अधिनियमाअंतर्गत नवीन नियमांनुसार, महिला आणि पुरुष दोघांचाही वडिलोपार्जित मालमत्तेवर समान हक्क आहे.

आता प्रश्न असा निर्माण होतो की, कायदा अस्तित्वात आला, पण प्रत्यक्ष व्यवहारातही तो कुटुंबीयांनी आचरणात आणला आहे का? तर याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. एखाद्या बहीण किंवा मुलीने स्वत:हून वडिलांच्या मालमत्तेच्या वाटणीत सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली तर पुरुषांना ते आवडत नाही. ते तिचे हक्क अमान्य करतात. तिने नेहमीच त्यांच्यासमोर हात पसरावे असे त्यांना वाटत असते आणि अशावेळी तिची मदत करुन त्यांना समाजात कौतुकास पात्र ठरायचे असते.

ते बहिणीला मालमत्तेतील समान वाटेकरी मानण्याऐवजी केवळ आपल्या दयेस पात्र मानून स्वत:चे मोठेपण सुरक्षित ठेवण्यातच धन्यता मानतात. जणू ती त्या घरात जन्मलेलीच नसते. लग्न होताच माहेरच्या घरावरील तिचे सर्व अधिकारही संपुष्टात येतात आणि माहेरचे तिला स्वत:ला परके समजण्यास भाग पाडतात. ही एकप्रकारे तिच्या हक्काची विडंबना आहे.

विस्कटणारी नाती

‘स्त्री-पुरुषांत वडिलोपार्जित मालमत्तेचे समान वाटप’ या कायाद्यामुळे कुटुंबातील नात्यात बरीच कटुता आली आहे. यात दुमत नाही की जे काम पुरुष पूर्वी आपली नैतिक जबाबदारी समजून करीत होते तेच आता कायद्याच्या भीतीपोटीही करायला तयार नाहीत. पुरुषप्रधान देशातील पुरुषांच्या शतकानुशतके चालत आलेल्या मानसिकतेत कासवाच्या चालीने बदल होत आहे.

आताही पुरुष आपल्या आईवडिलांसाठी आर्थिक किंवा शारीरिक रुपात काहीही करीत नसतील तरीही वडिलोपार्जित मालमत्तेवर ते त्यांचा संपूर्ण हक्क समजतात. तर, आयुष्यभर, मुलीने जबाबदारीने त्यांच्यासाठी खूप काही केले असली तरी तिने संपत्तीत वाटा मागताच किंवा आईवडिलांनी तिला तो स्वत:हून देण्याची तयारी दाखवताच भाऊ तिचा जीव घ्यायलाही मागेपुढे पाहत नाहीत. आपल्या हक्कांसाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावणे ही खूपच दूरची गोष्ट आहे, असे अनेकींच्या तोंडातून दररोज ऐकायला मिळते.

बहिणींना वाटा मिळणे हा अपवाद आहे. अनेकदा भाऊ भावालाच वाटा द्यायला तयार नसतो. संधी मिळताच मालमत्ता नावावर करायला मागेपुढे पाहत नाही. यामुळे आयुष्यभरासाठी एकमेकांसोबतचा संबंध तुटला तरी त्यांना फरक पडत नाही.

मानसिकतेत बदल

बहिणींची वर्षानुवर्षे चालत आलेली मानसिकताही याला कारणीभूत आहे. लग्नानंतर अनेक बहिणी सासरच्या सणसभारंभांमध्ये प्रथापरंपरेनुसार भावांकडून मोठी रक्कम उकळू इच्छितात आणि संपत्तीतही वाटा मागतात. प्रत्यक्षात भावांपेक्षा त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच चांगली असते. संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर असा निष्कर्ष निघतो की, कायदा बनवण्यापेक्षा हे जास्त गरजेचे आहे की, आईवडिलांनी जिवंतपणीच मृत्युपत्र करुन त्यांच्या मालमत्तेची वाटणी करावी, जेणेकरुन त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील कोणताही सदस्य त्यांच्या मालमत्तेवर अवैध कब्जा करू शकणार नाही.

कालौघात पुरुष आणि स्त्रीच्या मानसिकतेत बदल व्हायला हवा. पैशांपेक्षा नातेसंबंधांना अधिक महत्त्व  देऊन नैतिकतेच्या आधारावर वडिलोपार्जित मालमत्तेची वाटणी व्हायाला हवी. आणि यासाठी आईवडिलांनी आपल्या मुलांमध्ये एकमेकांसाठी निर्माण केलेली प्रेमाची भावना आणि पैशांपेक्षा नात्यांना अधिक महत्त्व देणारे केलेले संस्कारच जास्तीत जास्त कुटुंब विभक्त होण्यापासून रोखण्यासाठी आणि समस्येचे निरसन करण्यासाठी सक्षम आहेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें