मान्सून स्पेशल : तुमचे घर पावसाळ्यासाठी तयार आहे का?

* पूजा

पावसाची रिमझिम, ओल्या मातीचा मृदगंध आणि हिरवेगार गवत डोळयांचे पारणे फेडते आणि मनाला मोहून घेते. पण यासोबतच रस्त्यांवर खड्डयांमध्ये साचलेले पाणी चिखल आणि घाण आजारांनासुद्धा आमंत्रण देत असते. अशावेळी घर स्वच्छ ठेवणे अतिशय आवश्यक असते, कारण घर एक अशी जागा आहे, जिथे आपण सर्वात जास्त वेळ घालवतो आणि सहज बॅक्टेरियांच्या संपर्कात येऊन आजारी पडू शकतो, जर तुम्ही या ऋतूत आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवून पावसाचा पुरेपूर आनंद उपभोगू पाहात असाल तर या स्वच्छतेच्या टिप्सवर अवश्य लक्ष ठेवा :

अँटीबॅक्टेरिअल टाईल्स

घराला बॅक्टेरियापासून दूर ठेवायचे असेल तर अँटीबॅक्टेरियल टाईल्स लावून घ्या. या टाईल्स अँटीबॅक्टेरिअल टक्नोलॉजी वापरून बनवलेल्या असतात. या टाईल्स किटाणू नष्ट करतात व तुम्हाला किटाणूमुक्त वातावरण देतात.

जोडे बाहेर काढा

रस्त्यांवर असलेले चिखल शूज आणि चपलांवर लागून घरात येतात म्हणजे नकळत तुम्ही घाण आणि बॅक्टेरियासुद्धा आपल्यासोबत घेऊन येता. म्हणून हेच बरे की आपला शू रॅक घराच्या बाहेर ठेवा आणि तिथेच जोडे काढा आणि घाला. असे केल्याने घर अगदी साफ आणि किटाणूमुक्त राहील.

व्हेंटिलेशन अत्यंत आवश्यक

घरात असलेल्या आर्द्रतेचे प्रमाण कमी करण्यात व्हेंटीलेशन खूप महत्वाची भूमिका बजावते. घरात असलेल्या आर्द्रतेपासून दूर राहण्यासाठी योग्य व्हेंटीलेटर वा ह्युमिडीफायरमध्ये इन्व्हेस्ट करा. जेव्हा वातावरण निरभ्र असेल तेव्हा घराच्या खिडक्या उघडया ठेवा. स्वच्छ हवा आणि सूर्यप्रकाश आत येऊ द्या. असे केल्याने घरात किटाणूंची वाढ होणार नाही.

योग्य पडद्यांची निवड करा

वर्षा ऋतूत वजनदार आणि जाड पडद्यांची निवड चुकूनही करू नका, कारण या ऋतूत पडदे धुणे आणि नंतर सुकवणे अतिश वैतागवाणे असते. याशिवाय जाड पडदे लावल्याने खोलीत दमटपणाचा स्तर वाढतो, त्यामुळे पावसाळयात हलके आणि पारदर्शक पडदे वापरा, कारण हे लावल्याने जसा खोलीत आपला खाजगीपणा कायम राहतो तसाच सूर्यप्रकाशही सहज येतो. या पडद्यांमुळे खोलीत अतिशय हलकेपणा जाणवतो.

फर्निचर भिंतींपासून दूर ठेवा

वर्षा ऋतूमध्ये फर्निचर भिंतींपासून, खिडक्यांपासून आणि दारापासून दूर ठेवलेले बरे, कारण भिंतींना ओलं लागल्यास फर्निचर खराब होऊ शकते. म्हणून फर्निचर भिंतीलगत ठेवू नका, उलट २-३ इंच दूरच ठेवा. याशिवाय फर्निचर वेळोवेळी कोरडया कपडयाने पुसत राहा, वाटल्यास फर्निचर हलवून पहा. असे केल्याने फर्निचरसुद्धा सुरक्षित राहील आणि पावसाळयातील बॅक्टेरियासुद्धा घरात उत्पन्न होणार नाही.

लाकडाचे फर्निचर तेल लावून ठेवा वा वॅक्स करा

तुम्ही साधारणत: पाहिले असेल की पावसाळयात अनेकदा लाकडाच्या सामानावर ओलावा येतो, ज्यामुळे लाकडाच्या फटी आणि दरवाजे उघडत नाहीत, म्हणून यांना तेल किंवा वॅक्स लावा, जेणेकरून तुम्हाला काही त्रास होणार नाही.

दुरुस्ती करणे टाळा

या ऋतूत घराची कोणतीही दुरुस्ती अथवा पेंट करणे टाळा. कारण हवामानामुळे वातावरणात असलेला जास्त दमटपणा तुमचे काम बिघडवू शकते. या ऋतूत पेंट करवून घेतल्यास, तो लगेच सुकणार नाही आणि त्रास होईल तो वेगळाच.

मेणबत्ती पेटवा

पावसाळयात घरात एक विचित्र वास पसरलेला असतो. जो सहन करणे कठीण असते. म्हणून हा वास येऊ नये म्हणून घरात सुंगधित मेणबत्ती लावा, जेणेकरून घरातील वातावरण आनंदी राहील. मेणबत्ती कॉफीटेबल वा साईड टेबलवर ठेवा. संध्याकाळ होताच लावा आणि छान सुगंधाचा आनंद घ्या.

कलर थेरपी करते कमाल

पाऊस पडून गेल्यावर तापमानात घट येते. थोडा गारवा येतो. अशावेळी नक्कीच तुम्हाला आपल्या घरात थोडा उष्मांक हवा असे वाटू लागेल. यासाठी तुम्ही घरात उजळ रंगांचे कुशन्स आणि पांघरूण वापरा आणि या मोसमाचा आनंद घ्या.

मूल रडतंय का…

* डॉ. परिणीता तिवारी

लहान मूल अनेक कारणांमुळे रडत असतं. त्याच्यामध्ये इतकी क्षमता नसते की ते आपल्याला काय त्रास होतोय हे मोठ्यांना सांगू शकेल. म्हणूनच ‘रडणं’ हाच एकमेव उपाय दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी त्याच्याकडे असतो. सर्व आईवडिलांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा की त्यांचं बाळ का रडत आहे? त्याच्या रडण्याचं कारण काय आहे? त्याला काय सांगायचं आहे, कधीकधी हे समजून घेणं खूपच कठीण होतं. खासकरून जेव्हा प्रथमच कुणी जोडपं आईवडील झालेले असतात.

खरंतर ‘रडणं’ हा मुलाच्या जीवनाचा एक भागच असतो. लहान बाळ तर दिवसाला किमान दोन तास रडतं आणि हे प्रमाण दिवसागणिक वाढत जातं किंवा कमी कमी होत जातं. मूल जन्माला आल्यापासून ते पुढील सहा महिन्यांपर्यंत दिवसाला २-३ तास तरी हमखास ते रडत राहातं, मग तुम्ही त्याची कितीही काळजी घ्या. ६ महिन्यांनंतर मुलाचं रडणं कमी होऊन ते दिवसात फार तर एखादं तासच रडतं. हळूहळू आईला आपल्या बाळाच्या गरजा समजू लागतात तेव्हा ती बाळाच्या गरजा वेळीच पूर्ण करू लागते तेव्हा बाळाचं रडणं आणखीनच कमी होतं.

अनेक कारणं आहेत रडण्याची

भूक लागणे : जेव्हा बाळ रडू लागतं तेव्हा त्याला भूक लागली असावी ही गोष्ट सर्वप्रथम लक्षात येते, परंतु हळूहळू आई आपल्या बाळाची लक्षणं ओळखू लागते तेव्हा ती बाळाला रडण्याआधीच खायला देऊ लागते. जेव्हा बाळ भुकेलं असतं तेव्हा ते रडू लागतं, कुणाकडे जायलाही तयार नसतं, सतत तोंडामध्ये हात घालत राहातं.

डायपर खराब होणे : अनेक मुलं रडून हे सांगत असतात की त्यांचं डायपर बदलण्याची गरज आहे, तर काही मुलं अशीही असतात जी अस्वच्छ डायपरमध्येही राहातात. म्हणूनच वेळोवेळी डायपर तपासत राहा.

झोप येणं : नेहमी आपल्याला असं वाटतं की मुलं किती नशीबवान आहेत जी थकल्यावर किंवा झोप आल्यावर जेव्हा हवं तिथे झोपू शकतात. पण तसं नाहीए. मुलालादेखील झोपण्यासाठी आरामदायी आणि शांत जागेची गरज असते. जर असं झालं नाही तर मुलं रडू लागतात, त्रस्त होतात, चिडचिडी होतात आणि खासकरून जेव्हा ते फार थकलेले असतात.

कडेवर उचलून घेणं : लहान मुलाला आईवडिलांनी उचलून घेतलेलं खूप आवडतं. त्याला आई जेव्हा उचलून घेते तेव्हा ते खूपच आनंदित होते. मुलाला उचलून घेतलं की त्यांचं हसणं-खिदळणं ऐकू येतं, त्याच्या हृदयाची धडधड जवळून जाणवते. इतकंच काय, मूल आपल्या आईचा गंधदेखील ओळखू लागतो. लहान बाळांसाठी रडणं हे केवळ उचलून घेण्यासाठीचं कारण असतं.

पोटाचा त्रास : मूल रडण्याचं आणखी एक कारण पोटदुखीही होऊ शकतं. सर्वसाधारणपणे पोटाच्या त्रासामुळे मूल दिवसातून कमीत कमी ३ तास तरी रडतं आणि जर वेळेवर उपचार झाले नाहीत तर त्याचं रडणं अधिकच वाढतं. जर मुलाने खाल्ल्यानंतर त्वरित उलटी केली किंवा अधिकच ते रडू लागलं तर याचा अर्थ असा आहे की मुलाच्या पोटात दुखत आहे. अशावेळी मुलाला त्वरित डॉक्टरांकडे घेऊन जावं.

दुधाचं पचन होण्यासाठी : जर मुलाने दूध प्यायल्यानंतर लगेचच रडायला सुरुवात केली तर याचा अर्थ त्याला व्यवस्थितपणे दुधाचं पचन झालेलं नाही आणि त्याला ढेकर येण्याची गरज आहे. म्हणून मूल दूध प्यायलाबरोबर लगेचच त्याला झोपवू नका; कारण काही मुलं दुधासोबत हवाही पोटात घेतात. यामुळे पोटात दुखू लागतं आणि ती रडू लागतात.

खूप थंडी अथवा गरमी : काही वेळा मूल अधिक थंडी किंवा गरमीच्या त्रासानेही रडू लागतं. जेव्हा आई आपल्या मुलाचं डायपर बदलत असते किंवा स्वच्छ करत असते तेव्हा मुलाच्या रडण्याचं हेच कारण असतं.

एखादी लहानशी गोष्ट : मुलाला एखाद्या लहानशा गोष्टीचाही त्रास होऊ शकतो आणि आपल्याला ते सहजपणे लक्षातही येत नाही. उदा. केस, चकचकीत कपडे, आईने घातलेले दागिने, कपड्यांवर लावलेला स्टीकर किंवा टॅग इत्यादी. काही मुलं अधिक संवेदनशील असतात, त्यांच्या शरीरावर या गोष्टींचा वाईट प्रभाव पडतो.

दात येणं : जेव्हा मुलाला दात यायला सुरुवात होते तेव्हा ते खूप रडू लागतं; कारण त्यावेळेस मुलाला खूप वेदना होत असतात. तेव्हा मूल खूपच चिडचिडंदेखील होतं. जर तुमच्या मुलाला खूपच त्रास होत असेल आणि त्याला नेमकं काय होतंय हे कळत नसेल तर त्याच्या तोंडात हात घालून पाहा, कदाचित त्याचे दात येत असतील. सर्वसाधारणपणे ४ ते ७ महिन्यांच्या दरम्यान बाळाला पहिला दात यायला सुरुवात होते.

एक लहान मूल बऱ्याच गोष्टींनी घेरलेले असतं, जसं की लाइट, आवाज, बरीचशी लोक इत्यादी. लहान मुलाला सर्व काही एकसाथ हे कळत नसतं, म्हणूनही ते रडायला लागतं. त्याला आपल्या रडण्याद्वारे हे सांगायचं असतं की मला हे सर्व त्रासदायक होतंय. काही मुलं रडून इतरांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करू पाहातात. अशा मुलांना गप्प करण्याचा एकच उपाय असतो आणि तो म्हणजे त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ हसण्याखेळण्यात घालवावा, त्यांच्यासोबत खेळावं. याव्यतिरिक्त मुलाच्या रडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्याची तब्येत बिघडणं, हेदेखील असू शकतं. मुलाला कोणताही शारीरिक त्रास असेल तर तो स्वत:हून सांगू शकत नाही. उदाहरणच द्यायचं झाल्यास ताप, सर्दी, पोटदुखी याविषयी मुलाला स्वत:हून सांगता येत नाही. तापामुळे जेव्हा मूल रडू लागतं, तेव्हा त्याचं रडणं इतर सर्व कारणांमुळे रडण्यापेक्षा वेगळं असतं.

खरंतर मुलाला रडताना पाहून आईवडिलांनी आपला संयम सोडू नये. मूल का रडतंय, या गोष्टीची चिंता करत बसण्याऐवजी मुलाच्या रडण्याचं, त्याच्या त्रस्त होण्याचं कारण शोधावं. म्हणूनच अशावेळी मुलाला शांत करण्याचा प्रयत्न करायला हवा. अनेकदा मुलाच्या रडण्याचं कारण त्यांच्या मनात बसलेली भीतीही असते. आईवडिलांनी या सर्व गोष्टीही विशेष करून लक्षात घ्यायला हव्यात. त्यांनी मुलांच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न करावा.

युरोपचे अनोखे शहर – वियना

*प्रतिनिधी

युरोपचे अभिनव शहर वियनाने तसे फारसे बदल, परिवर्तन पाहिलेले नाही. तरीही सध्या ते युरोपमधील सर्वात आकर्षक व राहण्यायोग्य शहर आहे. शांत वातावरण, वाहतूककोंडीपासून मुक्त, ट्राम, रेल्वे आणि बसेसची वर्दळ असणारे हे शहर केव्हा, कुठे आणि कसे काम करते, हे कळतच नाही. ते मुंबई, दिल्लीसारखे सधन नाही, पण तरीही ४१५ चौरस किलोमीटरचा विस्तार असलेल्या या शहरात १७ लाख लोक राहतात. ही लोकसंख्या युरोपच्या मापदंडानुसार तशी जास्तच आहे. तरीही हे शहर सुनियोजित आणि आनंदी आहे.

उन्हाळयाच्या दिवसात या शहरात सुती कपडे घालून सहज फिरता येते आणि जुन्या तसेच नवीन ठिकाणांवर फेरफटका मारण्याची भरपूर मजा लुटता येऊ शकते.

डेन्यूब नदी किनारी वसलेले हे शहर आल्पस पर्वताच्या पायथ्याशी आहे आणि नेहमीच युरोपचे सर्वात लाडके शहर राहिले आहे. अनेक दशके तर हे शहर रोमन कॅथलिक पोपचे मुख्य शहर म्हणून ओळखले जात होते. १९१८ नंतर मात्र येथे समाजवादी विचारांचे वारे वाहू लागले आणि यात या शहराचा चेहरामोहराच बदलला.

एका सर्वसामान्य पर्यटकाला वियनाच्या सोशल हाऊसिंगची कल्पना करता येणार नाही. पण भांडवलशाही आणि धर्मनिरपेक्षतेचे हे अनोखे मिश्रण आहे. जिथे शहरातील खूप मोठी लोकसंख्या केवळ १० टक्क्यांत सुविधांनीयक्त घर बनवू शकते.

१९१८ च्या आसपास जेव्हा वियनाची सर्व सूत्रे सामजिक प्रजासत्ताकच्या हाती आली तेव्हा त्यांनी येथील रस्त्यांवर चांगली घरे बनवण्यास सुरुवात केली आणि आज ६२ टक्के लोक याच घरात राहतात. कुठल्याच रुपात ही घरे दिल्लीतील डीडीएचे फ्लॅट वाटत नाहीत, मुंबईतील चाळी वाटत नाहीत किंवा अहमदाबादमधील त्या वस्त्यांसारखीही दिसत नाहीत, ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून लपवण्यासाठी नरेंद्र मोदींनी तिथे भिंती बांधल्या होत्या.

आधुनिक शहर

अमेरिकेत देशभरातील फार तर एक टक्केच लोक राहण्यासाठी सोशल हाऊसिंगचा वापर करतात. भारतात तर ही परंपरा कधीही उदयास आलेली नाही. युरोपातील काही शहरांत ती आहे, पण वियनाइतकी स्वस्त आणि चांगली घरे कुठेच नाही. कदाचित ती पर्यटकांना आवडणार नाहीत, पण सोशल हाऊसिंग हेच वियनातील शांतता आणि सौंदर्यामागील खरे रहस्य आहे.

सोशल हाऊसिंग युरोपिय स्टँडर्ड असलेल्या गरीब आणि मध्यमवर्गीय दोघांसाठीही आहे. याचा बराचसा खर्च हा मिळणाऱ्या भाडयातूनच भागवला जातो. पण बराचसा पैसा इनकम टॅक्स, कार्पोरेट टॅक्स यातूनही मिळतो. याचा लाभ टॅक्स भरणाऱ्यांना लगेचच मिळतो कारण कमी भाडे असल्यामुळे वियना जगभरातील सर्वांनाच आकर्षित करते. आजही शहरातील लोकसंख्या वाढणे बंद झाल्यासारखी स्थिती असली तरी दरवर्षी १३ हजार घरे बांधण्यात येत आहेत आणि जुन्या घरांची सातत्याने डागडुजी करण्यात येत आहे.

वियनची सोशल हाऊसिंग इतर शहरांप्रमाणे एखाद्या खराब कोपऱ्यात नाही तर शहरात सर्वत्र आहे. प्रत्येक बिल्डिंग कॉम्पलेक्सवर एक नाव आहे जे सांगते की, ही घरे सोशल हाऊसिंगची आहेत. पण यांचा रंग उडालेला नाही किंवा खराब कपडे खिडकीतून डोकावताना दिसत नाहीत. याउलट स्वच्छ, मजबूत रस्ते, हिरव्यागार बागा, वृक्ष यामुळे हे कॉम्प्लेक्स खुलून दिसते. आतातर आर्किटेक्चरचे नवनवे प्रयोग होत आहेत आणि रंगीबेरंगी घरे मॉडर्न आर्टची झलक दाखवत आहेत.

सोशल हाऊसिंग बोर्डाचे अध्यक्ष कर्ट पुचींगर हे वय झाले असूनही बरेच तंदुरुस्त आहेत आणि त्यांना आपल्या शहरातील या कामगिरीवर गर्व असल्याचे दिसते. कारण तेच तर युरोपातील सर्वात मोठी गृहनिर्माण कंपनी वियना हाऊसिंग बोर्डचे कर्ताधर्ता आहेत. आजही ते पुढील अनेक वर्षांसाठीच्या योजना आखत आहेत आणि शहरात रिकाम्या होणाऱ्या जागा सोशल हाऊसिंगसाठी घेत आहेत.

मोठे आकर्षण

१८४० आणि १९१८ च्या दरम्यान वियनाची लोकसंख्या वाढून पाचपट जास्त झाली होती आणि गरिबांची अवस्था फारच वाईट होती. वाकडयातिकडया कशातरी बनवलेल्या डब्यासारख्या घरात राहण्यावाचून त्यांच्यासमोर पर्याय नव्हता. त्यांची अवस्था आपल्या मुंबईतील धारावीत राहणारऱ्या आणि दिल्लीतील गाझिपूरमध्ये राहणाऱ्यांपेक्षा खूपच बरी होती. तिथे समाजवादाचे वारे वाहू लागले होते. ह्युगो ब्रेटनर यांनी शहरातील वित्त विभागाचे प्रमुख या नात्याने सोशल हाऊसिंग टॅक्स लावला जो गरीब आणि श्रीमंत दोघांसाठी होता. १९३४ पर्यंत ३४८ ठिकाणी ६५ हजार फ्लॅट्स बनवण्यात आले त्यापैकी काहीमध्ये लोक आजही आरामात राहत आहेत.

आता सोशल हाऊसिंगमध्ये नवीन डिझाईन, छोटे कुटुंब आणि मुलांकडे जास्त लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. हे घर भाडयानेच मिळते, पण आपल्या विकास प्राधिकरणांच्या घरांप्रमाणे ते कमजोर आणि निकृष्ट दर्जाचे नाही. भाडे कमी आहे. जिथे पॅरिस एका सर्वसामान्य माणसाच्या उत्पन्नापैकी ४६ टक्के भाडयावर खर्च करते, म्यूनिख, जर्मनी ३६ टक्के, तिथे आस्ट्रीयाचे हे शहर वियनात २१ टक्केच खर्च करते.

या सोशल हाऊसिंगसाठी आजकाल फक्त १ टक्काच कर घेतला जातो. आता इथे याच फॉर्म्युल्यावर प्रायव्हेट कंपन्यांनाही घरे बनवण्याची परवानगी आहे.

सोशल हाऊसिंगद्वारे वियना म्यिझियममध्ये एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. १९१८ मध्ये जशा प्रकारे वियनामध्ये घरे बनवली जात ते तंत्रज्ञान अजूनही भारतात कमी वापरले जाते. लहान घरांसाठी तर ते वापरलेच जात नाही.

वियना प्रत्येक प्रकारच्या पर्यटकासाठी एक मोठे आकर्षण आहे. येथील एअरपोर्ट छोटेसे वाटत असले तरी दरवर्षी लोक येथून प्रवास करतात. एअरपोर्टपासून शहरातील रस्ते केवळ ३० मिनिटांच्या अंतरावर आहेत. जिथे असून नसल्यासारखेच स्टॉप आहेत.

हॉफबर्ग पॅलेस

५९ एकरात वसलेला १८ इमारतींचा हा महाल १२७५ पासून वियनाच्या प्रशासकांची बैठकीची व्यवस्था आहे. येथील इंपिरिअर अपार्टमेंट आणि सीसी म्युझियम पाहण्यासारखे आहेत.

बेल्वेडीमर पॅले

हे प्रत्येक पर्यटकासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. येथील कलाकृती, मूर्ती, हिरवेगार लॉन, झरे लक्ष वेधून घेतात. आता ही जागा पार्टीसाठीही दिली जाते. काही वर्षांपूर्वी एक भारतीय व्यावसायिक पार्थ जिंदाल आणि अनुश्रीचे लग्न मे २०१६ मध्ये इथेच झाले होते.

जायंट व्हील

वियनाचे जायंट फेरीज व्हील १८९६ पासून शहराची शान म्हणून ओळखले जाते.

ऑपेरा हाऊस

तसे तर युरोपच्या प्रत्येक शहरात एक ऑपेरा हाऊस आहे. पण वियनाच्या स्टेट ऑपेरा हाऊसचे वेगळेच वैशिष्टय आहे. यात २,२१० लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे आणि स्टेजवर १०० हून अधिक कलाकार उभे राहू शकतात.

वियना सिटी हॉल

१८८३ मध्ये बनवण्यात आलेल्या या हॉलमध्ये आजही कार्यालयांचे जाळे आहे. पण तिथे आपल्या महानगरपालिकेच्या कार्यलयासारखी वर्दळ नाही किंवा सिगारेट ओढणारे लोकही पहायला मिळत नाहीत. आता स्वच्छ कॉरिडॉरमधून नवीन मॉडर्न ऑफिसमध्ये जाता येते. आश्चर्य म्हणजे एक जुनी लिफ्ट आहे जी सतत सुरू असते. तिला दरवाजे नाहीत. ती एका बाजूने वर जाते आणि दुसऱ्या बाजूने खाली येते.

वियनात फिरणे खूपच सोपे आहे. बस आरामदायी आहेत आणि मेट्रो तसेच बसमध्ये एकदाच सिटी कार्ड, टुरिस्ट तिकीट घेऊन तुम्ही चेकिंगविनाच तिकिटाच्या वेळेत फिरू शकता. सतत तिकीट दाखवावे लागत नाही किंवा स्लॉट मशीनमध्ये टाकावे लागत नाही.

भारतीय पर्यटकांना जर भारतीय जेवण जेवण्याची इच्छा असेल तर कॉम्बे, करी इन सैल, डेमी टास, गोवा, गोविंदा, इंडिया गेट, इंडिया व्हिलेज, इंडस, जैयपूर पॅलेस, कोहिनूर, महल इंडिश, चमचमसारख्या ठिकाणी ते जाऊ शकतात.

वियनाच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये पंचतारांकित हॉटेल इंपिरिअल आहे. अमेरिकेच्या मॅरियेट चेनचा हिस्सा बनलेला इंपिरिअल हॉटेलचा इतिहास खूप जुना आहे. १८६३ मध्ये शाही खानदानासाठी बनवण्यात आलेल्या या घराला १८७३ मध्ये वियनात झालेल्या जागतिक प्रदर्शनासाठी हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यात आले होते. आतून पाहिल्यास भारतीय राजवाडयासारखा भास होतो. काही खोल्या वाकडयातिकडया असल्या तरी सुविधांनीयुक्त आणि सुंदर आहेत. पण हो, त्यांच्या ब्रेकफास्टचा मेन्यू खूपच छोटा आहे. भारतीय हॉटेल जे याच श्रेणीतील आहेत ते खूप छान ब्रेकफास्ट देतात.

४ स्टार नोकोटल, २ स्टार वियना एडलहौफ अपार्टमेंट्स, ४ स्टार हॉलिडे इन, ४ स्टार बेस्ट वेस्टर्न प्लस अमोडिया, ५ स्टार रैडीसन ब्लू इंडियन रेस्टॉरंटच्या जवळ आहे. स्वस्त हॉटेल दिवसाला ३,००० रुपयांपासून सुरू होतात. तर महागडे हॉटेल दिवसाला १० ते १५ हजारांपासून आहेत.

वियनापासून सैल्जबर्ग, डॅन्यू, बुडापिस्ट, प्राग इत्यादी ठिकाणीही जात येते. ही युरोपची खूपच मैत्रीपूर्ण, आकर्षक शहरे आहेत.

वियना सध्या भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर जेव्हा परदेशात जाण्याची संधी मिळेल तेव्हा तुमच्या यादीत वियनाचे नाव अवश्य असू द्या. वियना टुरिस्ट बोर्डचे प्रमुख इजबेला राइटेर यांनी सांगितले की, ६८ हजार ते ७० हजार भारतीय येथे दरवर्षी येतात आणि यात हनीमूनसाठी आलेल्यांपासून ते आजीआजोबांपर्यंत संपूर्ण कुटुंबही असते

फादर्स डे स्पेशल : पालकांचा पाल्यांच्या वैवाहिक जीवनावर प्रभाव

* राजलक्ष्मी त्रिपाठी

तुम्ही जेव्हा विवाह बंधनात बांधले जाता, तेव्हा जीवनात अनेक बदल होतात. आयुष्यात प्रेमासोबत जबाबदाऱ्यांचाही समावेश होतो. जेव्हा तुम्ही आपल्या जीवनसाथीसह त्याच्या कुटुंबालाही मनापासून स्वीकारता, तेव्हा तुमच्या जीवनात कधीही न संपणाऱ्या आनंदाचा प्रवेश होतो.

पती-पत्नीचे संबंध अधिक संवेदनशील असतात. ज्यात प्रेम-माया आणि एकमेकांच्या चांगल्या-वाईट गुणांना स्वीकारण्याची भावना असते. तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण तुमच्या संबंधांवर तुमच्या आई-वडिलांचा परस्पर संबंध कसा होता याचा कळत-नकळत परिणाम पडतो. सत्य तर हे आहे की तुमच्या व्यक्तित्वावर कुठे ना कुठे तुमच्या पालकांची छाप पडलेली असते. तसेच तुमच्या जीवनातील दृष्टीकोनांवर पालकांचा प्रभाव दिसून येतो.

अनेकदा नकळतपणे इच्छा नसतानाही तुम्ही तुमच्या पालकांकडून चूकीच्या सवयी शिकता, ज्यामुळे कळत-नकळतपणे तुमचे संबंध प्रभावित होतात.

जर तुमच्यामध्ये तुमच्या पालकांची अशी कोणती सवय असेल, ज्यामुळे जोडीदारासोबतच्या संबंधांमध्ये कटूता येत असेल तर ती सवय सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कधी प्रेम तर कधी तक्रार

रिलेशनशीप काउन्सिलर डॉ. निशा खन्ना यांच्या मते, पती-पत्नीचे नाते संवेदनशील असते. ज्यात प्रेमासह तक्रारीदेखील असतात. पण ही तक्रार जेव्हा गरजेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा दोघांच्या नातेसंबंधांमधील दरी वाढू लागते. खरं तर पती-पत्नी आपले संबंध अगदी तसेच बनवू पाहतात, जसे त्यांच्या आई-वडिलांचे होते. यामुळे दोघांच्यात संबंध दूरावू लागतात. जेव्हा पती-पत्नी एकमेकांवर आपली मते थोपू लागतात, त्यावेळी त्यांच्यातील प्रेम हळूहळू संपू लागते. मग ते शुल्लक गोष्टींवरून वाद घालू लागतात. सामान्यत: पत्नीची तक्रार असते की पती वेळ देऊ शकत नाही आणि पतीची तक्रार असते की ऑफिसमधून थकून घरी परतल्यावर पत्नी किटकिट करते.

पती-पत्नीमधील ही सवय सामान्यपणे त्यांच्या पालकांकडून आलेली असते. जर तुमच्या पालकांना आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्याची सवय असेल तर तुमच्या नकळत ही सवय तुमच्यात येते. सुखी दांपत्य जीवनासाठी हे खूप गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या साथीदाराला त्यांच्या चांगल्या-वाईट गुणांसह स्वीकारलं पाहिजे. प्रयत्न करा की तुमच्या जीवनात अशा नकारात्मक गोष्टी येऊ नयेत, ज्या तुमच्या पालकांच्या जीवनात होत्या.

ज्या दांपत्यांच्या पालकांची सवय साथीदाराला गृहीत धरण्याची असेल तर त्यांची मुलेदेखील त्यांच्या साथीदारासोबत तशाच प्रकारचा व्यवहार करतात आणि तसेच संबंध प्रस्थापित करतात. अशाप्रकारचा विचार परस्पर संबंध कधीच फुलू देत नाहीत.

खरं तर पती-पत्नी एकमेकांचे पूरक असतात. जेव्हा दोघे एकत्र येऊन चालतात, तेव्हा जीवनाची गाडी सहजपणे पुढे जाते. पण जेव्हा दोघांमध्ये तणाव वाढतो, तेव्हा संबंधांची गाठ सुटण्यास वेळ लागत नाही. आपले नाते सहजपणे पुढे नेण्यासाठी हे गरजेचे आहे की तुम्ही तुमच्या साथीदाराला गृहीत धरण्याची चूक करू नका. त्याला आपला मित्र, जोडीदार समजून आपले सुख-दु:ख वाटून घ्या.

आपलंच म्हणणं खरं ठरवू नका

जर तुमच्या पालकांना आपले म्हणणे बरोबर म्हणण्याची सवय असेल तर नक्कीच तुमच्यातही हा गुण आला असेल. आपण आपला हा विचार बदलण्याची गरज आहे. आजकाल पती-पत्नी एकमेकांसह मिळून काम करत आहेत. घर-कुटुंबाची जबाबदारी एकत्रितपणे पार पाडत आहेत. अशावेळी दोघांची मते महत्त्वाची असतात. यात जर तुम्हाला तुमचेच म्हणणे खरं ठरवण्याची सवय असेल तर ही सवय सोडून आपल्या साथीदाराचे म्हणणे ऐका. प्रत्येकवेळी तुम्हीच बरोबर असलं पाहिजे असं नाही. तुमचा साथीदार जो विचार करतो, जे सांगतो तेही बरोबर असू शकतं.

सामायिक जबाबदारी

सामान्यपणे बऱ्याच जणांचे पालन पोषण अशा वातावरणात होते, जिथे पती पैसे कमावून आणतो आणि पत्नी घरातील जबाबदाऱ्या सांभाळते. म्हणजेच वडील आईकडे पैसे सोपवून जबाबदाऱ्यांतून मुक्त होतात. मात्र गरज पडल्यास आई ने साठवलेले पैसे कोणताही विचार न करता लगेच वडिलांना देते.

जर तुमचा असाच विचार असेल तर, यात बदल केला पाहिजे. जर, बदलत्या जगात पती-पत्नी दोघेही काम करतात, अशावेळी गरजेचे आहे की दोघांनीही आपले संबंध मजबूत बनवण्यासाठी एकमेकांच्या जबाबदाऱ्यांमध्ये सहयोग दिला पाहिजे. यावेळी पतीने हा विचार करता कामा नये की हे घरचे काम फक्त पत्नीचे आहे. तर पत्नीने हा विचार करता कामा नये की घरखर्च चालवणे फक्त पतीचे काम आहे.

बदलते जग

जीवनसाथीच्या संबंधांमधील दृढतेसाठी पारंपरिक जुन्या गोष्टींतून बाहेर पडणं गरजेचे आहे. ज्याप्रकारे तुमची आई साडी नेसत होती, डोक्यावर पदर घेत होती तसंच तुमच्या पत्नीने करावं हे जरूरी नाही. तुमची आई मंदिरात जात असे, पूजा करत असे याचा अर्थ हा नाही की तुमची पत्नी असंच करेल. तिला तिच्या पद्धतीने जगण्याचं स्वातंत्र्य द्या. पत्नीलादेखील हे समजणं गरजेचं आहे की घरासंबंधित बाहेरच्या कामांची जबाबदारी फक्त पतीची नाही. हे गरजेचे नाही की तुमचे वडील बाहेरची सर्व कामे घरी बसून करतात तर तसंच तुमच्या पतीनेही करावं. बदलत्या जगानुसार आपली मानसिकता बदलली पाहिजे. मग तुम्ही तुमच्या संबंधांमध्ये प्रेमाचा ओलावा निर्माण होईल.

नको भांडण-तंटा

तुमचे पालक छोटया-छोटया गोष्टींवरून एकमेकांशी वाद घालायचे म्हणजे तुम्हीदेखील तुमच्या साथीदाराशी प्रत्येक गोष्टीवरून वाद घालत राहावं असं नाही.

खरं तर, तुम्ही एकमेकांच्या भावनांचा आदर राखला पाहिजे आणि एकमेकांचा सन्मान केला पाहिजे, जेणेकरून संबंध सुधारतील.

क्लालिटी लव्ह

जर तुमच्या मनात तुमच्या पालकांना पाहून काही विचारांनी घर केलं असेल की पालकत्व आल्यानंतर एकमेकांसोबत जवळीक साधणं चुकीचं आहे. तर तुम्ही हे विचार तुमच्या डोक्यातून बाहेर काढा.

सामान्यपणे आई बनल्यानंतर पत्नीचे पूर्ण लक्ष आपल्या बाळावर असते. ज्यामुळे बऱ्याचदा पती त्रासून जातो. पालक बनल्यानंतरही एकमेकांसोबत वेळ घालवा, फिरायला जा आणि छोटया गोष्टींमधून आपले प्रेम व्यक्त करा. यामुळे नक्कीच तुमचे संबंध मजबूत राहतील. मुलांची जबाबदारी एकत्रितपणे घ्या. हा विचार नका करू की बाळाची जबाबदारी फक्त आईची आहे.

या गोष्टींकडे लक्ष द्या

* जर तुमचे वडील तुमच्या आजोळच्या लोकांचा आदर करत नाहीत तर याचा अर्थ असा अजिबात नाही की तुम्ही तुमच्या पत्नीच्या कुटुंबाशी असा व्यवहार करावा. जर तुम्ही तुमच्या सासरच्यांना पूर्ण मान-सन्मान दिला तर पत्नीचं तुमच्याप्रति असलेलं प्रेम अधिक वाढेल आणि तीदेखील मनापासून तुमच्या कुटुंबाचा स्वीकार करेल आणि मान-सन्मान देईल.

* जर तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मोठ-मोठयाने ओरडण्याची सवय असेल तर ती सोडून द्या. घरात प्रेमपूर्ण वातावरणाची निर्मिती करा.

* कुटुंबाची जबाबदारी एकत्रितपणे निभावली पाहिजे.

* आपल्या साथीदाराला संपूर्ण स्पेस द्या.

* जर कोणत्या गोष्टीवरून तुमचे मन दुखावले असेल तर मोठ-मोठयाने एकमेकांशी भांडून वाद वाढवण्यापेक्षा गप्प बसा.

* सुखी दांपत्य जीवनासाठी एकमेकांवर चुका थोपवण्यापेक्षा एकमेकांच्या चुकांचा स्वीकार करण्याची वृत्ती ठेवा.

फादर्स डे स्पेशल : घर सांभाळणारा प्रेमळ पती

* गरिमा पंकज

सकाळचे आठ वाजले आहेत. घड्याळाचे काटे वेगाने पुढे सरकत आहेत. शाळेची बस कधीही येऊ शकते. घरातील वातावरण तणावपूर्ण आहे. तितक्यात मोठा मुलगा आतून बाबांना आवाज देतो कि त्याला शाळेचे मोजे सापडत नाहीत. इकडे बाबा ना-ना-चा पाढा वाचणाऱ्या चिमूरडीला नाश्ता भरवण्यात मग्न आहेत. त्यानंतर त्यांना मुलाचा लंचबॉक्स भरायचा आहे. मुलाला शाळेत पाठवून मुलीला अंघोळ घालायची आहे आणि घराची स्वच्छताही करायची आहे.

हे दृश्य आहे एका अशा घरातील, जिथे पत्नी नोकरी करते आणि पती घर सांभाळतो. अर्थात तो हाउस हसबंड आहे. ऐकायला थोडं विचित्र वाटतं हे, पण हे वास्तव आहे.

पुराणमतवादी आणि मागास मानसिकतेच्या भारतीय समाजामध्येही  पतींची अशी नवी जमात उदयास येत आहे. ते जेवण बनवू शकतात. मुलांना सांभाळू शकतात आणि घराची स्वच्छता, भांडीधुणी अशी घरगुती कामेही व्यवस्थित पार पाडू शकतात.

हे सामान्य भारतीय पुरूषांप्रमाणे विचार करत नाहीत. कुठल्याही कटकटीशिवाय बिछाना घालतात आणि मुलांचे नॅपीसुद्धा बदलतात. समाजातील हा पुरूष वर्ग पत्नीला समान दर्जा देतो आणि गरज भासल्यास घर आणि मुलांची जबाबदारी घेण्यासही तत्पर असतात.

तसे तर जुनाट मनुवादी भारतीय अजूनही अशा हाउस हसबंडना नालायक आणि पराभूत पुरूष समजतात. त्यांच्यामते घरकुटुंब, मुलांची काळजी घेणे ही नेहमीच स्त्रीची जबाबदारी असते आणि पुरूषांचे काम आहे बाहेरील जबाबदाऱ्या स्विकारणे आणि कमावून आणणे.

अलीकडेच हाउस हसबंड या संकल्पनेवर आधारित एक चित्रपट आला होता, ‘का एंड की’ करीना कपूर आणि अर्जुन कपूर अभिनीत या चित्रपटाचा मूळ विषय होता लिंग आधारित कार्यविभाजनाच्या विचारसरणावर टीका करत पतिपत्नींच्या कामाची अदलाबदली करणे.

लिंग समानतेचा काळ

हल्ली स्त्रीपुरूषांच्या समानतेच्या गप्पा रंगतात. मुलांबरोबरीनेच मुलीसुद्धा शिकून उच्चपदावर पोहोचत आहेत. त्यांची स्वत:ची स्वप्नं आहेत, स्वत:ची योग्यता आहे. या योग्यतेच्या बळावर ते उत्तम असा पगार मिळवत आहेत आणि अशात लग्नानंतर वर्किंग जोडप्यांना मूल होतं, तेव्हा अनेक जोडपी भावी समस्या आणि शक्यतांचा विचार करून कुणासाठी दोघांपैकी कुणासाठी नोकरी महत्त्वाची आहे हे समजून घेतात. अशाप्रकारे परस्पर संमतीने ते आर्थिक आणि घरगुती जबाबदाऱ्या विभाजित करून घेतात.

हा व्यवहार्य विचार गरजेचा आहे. जर पतिपत्नीची कमाई अधिक आहे. करिअरसाठी तिची स्वप्नं आकांक्षा जर जास्त प्रबळ असतील तर अशावेळी कमावते असण्याची भूमिका पत्नीने स्विकारली पाहिजे. पती पार्टटाइम किंवा घरातून काम करत कुटुंब व मुलांना सांभाळण्याचे काम करू शकतो. यामुळे मुलांना पाळणाघरात ठेवावं लागत नाही तसेच त्या पैशांचीही बचत होते, जे पाळणा घरात किंवा मोलकरणीला द्यावे लागतात.

हाउस हसबंडची भूमिका

हाउस हसबंड म्हणजे असे नाही की पती पूर्णपणे पत्निच्या कामावरच अवलंबून राहिल किंवा पूर्णपणे गुलाम बनून जाईल. तर घरातील काम व मुलांना सांभाळण्यासोबतच तो कमावूसुद्धा शकतो. हल्ली घरातून काम करण्याच्याही बऱ्याच संधी उपलब्ध असतात. आर्टिस्ट, रायटर हे त्यांचे काम घरीच व्यवस्थितरित्या करू शकतात. पार्टटाइम काम करणेही शक्य आहे.

सकारात्मक बदल

बराच काळ महिलांना गृहिणी बनवून सतावले गेले आहे. त्यांच्या स्वप्नांची अवहेलना करण्यात आली आहे. आता काळ बदलत आहे. एका पुरूषाने स्वत:च्या करिअरचा त्याग करून पत्नीला स्वत:ची स्वप्नं पूर्ण करू देण्याची संधी देणे समाजात वाढती समानता आणि सकारात्मक बदलाचा संदेश आहे.

एकमेकांप्रति आदर

जेव्हा पतिपत्नी कर्ते असण्याची पारंपरिक भूमिका आपसात बदलतात, तेव्हा ते एकमेकांचा अधिक सन्मान करतात. ते जोडिदाराच्या त्या जबाबदाऱ्या आणि कामाचा दबाव अनभवू शकतात, जो त्या भूमिकांसोबत येतो.

पुरूष एकदा का घरगुती काम आणि मुलांचे संगोपन करू लागतो तेव्हा आपोआपच त्याच्या मनात महिलांसाठी आदर वाढतो. महिलासुद्धा अशा पुरूषांना अधिक मान देतात, जे पत्नीच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी आपलं योगदान देतात आणि कुठलाही भेदभाव करत नाहीत.

जोखीमही कमी नाही

समाजाचे टोमणे : मागास आणि बुरसटलेल्या विचारसरणीचे लोक आजही हे स्विकारू शकत नाहीत की पुरूषाने घरात काम करावे व मुलांना सांभाळावे. अशा पुरूषांना बायकोचा गुलाम म्हटल्याशिवाय त्यांना राहवत नाही. स्वत: चेतन भगतनेही मान्य केले होते की त्यांनाही अशा प्रश्नांना तोंड द्यावे लागले, जे सामान्यत: अशा पुरूषांना ऐकावे लागतात. उदा ‘अच्छा तर तुमची पत्नी कमावते?’ ‘घरातील कामे करताना कसे वाटते तुम्हाला? इ.’

पुरूषाचा अहंकार दुखावणे : अनेकदा परिस्थितीमुळे किंवा वैयक्तिक असफलतेमुळे पुरूष जर हाउस हसबंड झालाच तर तो स्वत:ला कमकुवत आणि हीन समजू लागतो. त्याला असे वाटू लागते की त्याच्या कर्तव्यात (कमाई किंवा घर चालवणे) तो अयशस्वी होत आहे आणि पुरूषाने जे केले पाहिजे ते कार्य तो करत नाहीए.

मतभेद : स्त्री बाहेर जाऊन जेव्हा पैसे कमावते आणि पुरूष जेव्हा घरी राहतो, तेव्हा इतरही अनेक बाबी बदलतात. साधारणत: कमावणाऱ्यांच्या विचारांना प्राधान्य दिले जाते. त्याचाच आदेश घरात चालतो आणि अशावेळी स्त्रिया अशा बाबींवरही कंट्रोल करू लागतात, ज्यावर पुरूषांना अॅडजस्ट करणे कठिण असते.

सशक्त आणि पुरूषार्थावर विश्वास ठेवणारा पुरूष या बाबीकडे दुर्लक्ष करू शकतो की लोक त्याच्याबद्दल काय म्हणत आहेत. असे पुरूष आपल्या मनाचे ऐकतात, समाजाचे नाही.

स्त्रीपुरूष संसाराच्या गाडीची दोन चाके आहेत. आर्थिक आणि घरातील जबाबदाऱ्या त्या दोहोंमधील कुणी कुठली जबाबदारी घ्यायची आहे हे उभयतांनी आपसात ठरवायला हवे. समाजाने त्यात नाक खुपसणे चुकीचे आहे.

जेव्हा तुम्ही करता घरातून काम

* एनी अंकिता

वर्क फ्रॉम होम म्हणजे घरून काम करणे. हल्ली वर्क फ्रॉम होमची संकल्पना फार वेगाने विस्तारत आहे. कंपन्या फ्लेक्सिबल ऑप्शन्स देत आहेत, ज्यामुळे तुम्ही तुमच्या सोयीनुसार काम करू शकता. पण जेव्हा घरून काम करायचे असते, तेव्हा सर्वप्रथम एकच विचार आपल्या डोक्यात येतो की, मनात येईल तेव्हा, मनाप्रमाणे करायचे. मान्य की इथे तुम्हाला कोणाचीही रोकटोक नसते. पण इथेही काम करण्याचे काही शिष्टाचार असतात. जर तुम्ही ते पाळले नाहीत तर तुम्ही ताणमुक्त होऊन योग्य पद्धतीने कामच करू शकणार नाही.

जेव्हाही तुम्ही घरून काम कराल, तेव्हा कामाच्या बाबतीत हे शिष्टाचार जरूर पाळा :

वर्क शेड्युल जरुरी आहे : घरातून काम करताना आपण कोणतीही गोष्ट कुठेही लिहून ठेवतो आणि नंतर ती शोधण्यात नाहक आपला वेळ वाया घालवतो. यासाठी वर्क शेड्युल तयार करा, ज्यामुळे तुम्हाला कल्पना असेल की कोणते काम कधी संपवायचे आहे, कोणते काम तुम्ही पूर्ण केले आहे आणि कोणते काम आता पूर्ण करायचे आहे. असे केल्यामुळे तुम्ही कमी वेळेत अधिक काम करू शकता.

नियमित कामाचे तास : कधीही उठून कामाला सुरुवात केली असे करू नका, यामुळे तुमची तब्येत बिघडेल आणि कामावरही त्याचा परिणाम होईल. यामुळे कामासोबतच तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी कामाची वेळ निश्चित करा आणि त्यानुसार काम करा. असे केल्यामुळे तुम्ही योग्य रीतीने काम करून कुटुंबासोबत मौजही करू शकता.

शिस्तीचे पालन करा : काम करताना चॅटिंग किंवा फोनवर गप्पा मारणे हे टाळा. शिस्तीचे पालन करा, कारण जोपर्यंत तुम्ही शिस्त अंगी बाणवत नाही तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करू शकणार नाही तोवर ही गोष्ट तुमच्या मित्रपरिवार आणि नातलगांनाही सांगून ठेवा जेणेकरून ते तुम्ही फ्री असल्याचे समजून कामाच्या वेळेस येऊन डिस्टर्ब करणार नाहीत.

काम वेळेवर पूर्ण करा : काहीतरी बहाणे करून काम टाळू नका. असे केल्यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल. खरतर वेळेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा.

आपल्या क्षेत्रातल्या लोकांच्या संपर्कात राहा : तुम्ही घरून काम करता, तुम्हाला ऑफिसला जाण्याची गरज नाही, तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही लोकांना भेटणे सोडून दिले पाहिजे, उलट तुमच्या क्षेत्रातील लोकांच्या संपर्कात राहा जेणेकरून तुम्हाला त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळत राहील.

सेक्शुअली आयसोलेट राहण्याची वेळ

* विजय कुमार पांडे

सेक्समध्ये मोकळेपणा आवश्यक आहे. या भावना जितक्या तुम्ही मनात दाबून ठेवाल तितक्या त्या वर उसळून येतील. पण आता सेक्सही जपूनच करावे लागेल. सेक्ससाठी आधी स्वत:ला तयार करावे लागेल. सेक्सनंतरही तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे सेक्स आयसोलेशन. अनेकदा आपल्या देशात खाजगी अवयवांचा लोक विचारच करत नाहीत. आयसोलेशनचे महत्व ते समजून घेत नाहीत. त्यांचे याकडे लक्ष जात नाही, कारण लहानपणापासून हे शिकवलेलेच नसते पण आता काळ बदलतो आहे. अशावेळी तुम्ही सेक्शुअली आयसोलेट होणे फार गरजेचे आहे. संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीच्या विळख्यात सापडले आहे. सोशल डिस्टंसिंगवर भर दिला जात आहे. अशावेळी सेक्स करताना सुरक्षित कसे राहावे याकडे लक्ष द्यायची गरज आहे. जर मी सेक्स केले तर मला कोरोना होईल की काय? अशी शंका तुमच्या मनात कितीतरी वेळा आली असेल. पण लाजेमुळे वा भीतिमुळे तुम्ही हे विचारू शकला नसाल.

तर मग या, आम्ही तुम्हाला सांगतो की सेक्स करताना कसे सुरक्षित राहाल कोरोनापासून :

संबंधांवर परिणाम

जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल आणि एखाद्या व्यक्तीसोबत राहात असाल, तर थोडे अंतर ठेवून रहा. जर तुम्हा दोघांपैकी एकाला जरी कोरोनाची लक्षणं दिसत असतील तर स्वत:ला आयसोलेट करून घ्या. अशावेळी जोडीदाराने वाईट वाटून घेऊ नये. यामुळे दोघेही सुरक्षित राहतील. लक्षात ठेवा सेक्सचा आनंद तुम्ही तेव्हाच घेऊ शकाल जेव्हा तुम्ही सुरक्षित राहाल.

अंकुश ठेवणे गरजेचे

आता किस करताना तुम्ही विचार करायला हवा. आधी किस करणे प्रेमाची खूण मानली जात असे. पण आता हे एका भयानक आजाराचा मार्ग बनू शकतं. याचा अर्थ हा नाही की तुम्ही किस करूच नका. किस करा पण तो सांकेतिक असायला हवा. हो, जर तुमच्यात सर्दी खोकल्याची लक्षणं दिसत असतील आणि तुम्हाला माहीत असेल की नुकतेच तुम्ही कुणाला किस केले आहे, तर तुम्ही हे आपल्या जोडीदाराला सांगाया हवे. जर तुम्ही अशा कुणाला किस केले असेल ज्यात आता अशी लक्षणं दिसू लागली आहेत, तर तुम्ही स्वत:ला आयसोलेशनमध्ये ठेवायला हवे. जर तुम्ही कुणाच्या खाजगी अवयवांना स्पर्श केला असेल तर शक्यता आहे तुम्ही त्याला किससुद्धा केले असेल. तुम्हाला माहीत आहे की हा व्हायरस लाळेद्वारे पसरतो. त्यामुळे किस करणे जोखमीचे आहे. अशात ज्या जोडीदारासोबत तुम्ही राहात नसाल त्याच्याशी कोणतेही संबंध ठेवू नका.

चांगले सेक्स लाईफ जगा

या महामारीने लोकांना चांगले सेक्स लाईफ म्हणजे काय यावर विचार करायला भाग पाडले आहे. या आजारामुळेच लोक आज आयसोलेशनमध्ये आहेत आणि ते या संधी आणि दुराव्याचा फायदा उचलत आहेत. ते क्रिएटिव्ह झाले आहेत. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराला एकाच घरात आयसोलेशनमध्ये राहावे लागत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेऊ शकता. दूर रहा पण मनं जुळू द्या.

इंटरकोर्समध्ये दक्षता बाळगा

कोरोना कोणालाच ओळखत नाही. तो तर केवळ रस्ता शोधत असतो. इंटरकोर्समुळे कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन संभवू नये यासाठी तुम्हालाच सतर्क राहावे लागणार आहे. स्वच्छतेच्या काही गोष्टींना आपल्या सवयींमध्ये सामील करून घ्या. सेक्सजीवनात सेक्शुअल हायजिन तेवढेच अवश्य आहे जेवढे आपल्या दैनंदिन जीवनात. एका आरोग्य संपन्न सहजीवनाकरिता लैंगिक संबंधांपूर्वी व नंतर स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. अनेकदा लोक सेक्शुअल हायजिनकडे कमीच लक्ष देतात, ज्यामुळे युटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा धोका दोघांनाही संभवतो. म्हणून  स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यायला हवे. सेक्सनंतर दोघांनाही कितीही झोप येत असली तरी तुम्ही जर हायजिनकडे दुर्लक्ष करत असाल तर इन्फेक्शन व्हायचा धोका आणखीनच वाढू शकतो. इथे तुम्हाला याकडेही लक्ष द्यावे लागेल की तुम्हाला अथवा तुमच्या जोडीदाराला सर्दी खोकला तर झाला नाही ना. अशा वेळी तुम्हाला स्वत:ला आयसोलेट करावे लागेल, कारण थोडया मजेसाठी सगळे आयुष्य तर धोक्यात टाकू शकत नाही ना.

सेक्शुअल वॉशिंग

सेक्सच्या आधी आणि नंतर चांगले हात धुणे अत्यंत आवश्यक आहे, कारण बॅक्टेरिया आणि किटाणू साधारणत: आपल्या हाताद्वारेच पसरतात. सेक्स करताना अनेकदा आपण आपला वा आपल्या जोडीदाराचा जेनेटल पार्ट पेनिट्रेट करण्याकरिता हाताचा वापर करतो. अशावेळी जर आपले हात अस्वच्छ असतील तर बॅक्टेरिया संक्रमित व्हायची भीती असते. म्हणून इंटरकोर्सआधी व नंतर हात चांगले २० सेकंद चोळून धुवायला हवे. लैंगिक संबंधानंतर आपले गुप्तांगसुद्धा स्वच्छ करणे आवश्यक आहे.

संक्रमित गुप्तांग

सेक्सनंतर गुप्तांगांची स्वच्छता आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारचा बॅक्टेरिया संक्रमित होण्यापासून रोखण्यासाठी इंटरकोर्सनंतर पाण्याने गुप्तांग साफ करणे अत्यावश्यक आहे. पाण्यासोबत माईल्ड साबणही वापरू शकता. पण जर तुमची त्वचा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला जळजळ होऊ शकते. गुप्तांगाच्या स्वच्छतेसाठी फॅन्सी लोशन वा परफ्युम वापरण्याऐवजी कोमट पाण्याने धुवा. जोडीदारासोबत इंटरकोर्सनंतर जेव्हा तुम्ही बाथरूममध्ये खजगी अवयवांची स्वच्छता करायला जाल तेव्हा टॉयलेटला जायला विसरू नका. याचा उद्देश हा आहे की तुमचे ब्लॅडर रिकामे राहावे, कारण सेक्सदरम्यान एखादा बॅक्टेरिया तुमच्या युरेथापर्यंत पोहोचला असेल तर टॉयलेटद्वारे तो शरीराच्या बाहेर निघून जाईल. सेक्सनंतर एक ग्लास पाणी पिऊन मन शांत करा.

कंडोम एक बचाव आहे

कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देश लॉकडाऊनमध्ये आहेत. कंडोम बनवणाऱ्या अनेक कंपन्या यातुन सुटल्या नाही आहेत. त्यामुळे कंडोमचा पुरवठा कमी झाला आहे. जगात याचा तुटवडा भासू लागला आहे म्हणून हे बाजारात उपलब्ध नाहीए. जर तुम्हीसुद्धा या परिस्थितीतून जात असाल तर कामवासनेवर नियंत्रण ठेवा आपल्या जोडीदाराशी यावर मोकळेपणाने बोला. जर तुम्ही तुमच्या कामेच्छेवर नियंत्रण ठेऊ शकत नसाल तर अनेक मार्ग आहेत, जे तुम्हाला यावर नियंत्रण ठेवायला मदत करतील. एकदा का तुम्ही असे विचार करू लागलात तर कामेच्छा सातत्याने नियंत्रणात आणणे अशक्य होते. त्यामुळे असे विचार मनात येताच आपले मन दुसरीकडे वळवणे चांगले आहे. सेक्शुअल उर्जेला इतर कोणत्या क्रिएटिव्ह कामात लावा.

लठ्ठ पुरुष व महिलांनी दूरच राहावे

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका संशोधनात असे आढळून आले की ज्या पुरुषाचे वजन जास्त असते , ते जास्त सेक्स करतात. एंगलिया रस्किन युनिव्हर्सिटीच्या वैज्ञानिकांनी आणि संशोधकांनी ब्रिटनमधील ५,००० सेक्शुअली कार्यरत असलेल्या पुरुषांचे विश्लेषण केले आणि ते या निष्कर्षापर्यंत पोहोचले की लठ्ठ पुरुष बारीक पुरुषांपेक्षा जास्त सेक्स करतात. केवळ पुरुषच नाहीत तर महिलांमध्येसुद्धा असे आढळून आले. संशोधकांना असे आढळले की कमी वजन असलेल्या महिलांच्या तुलनेत जाड महिलांनी १६ पट जास्त सेक्स केले. कोरोनाच्या प्रकोपापासून सुरक्षित राहायचे असेल तर लठ्ठ लोकांनी सध्या सेक्सचा विचारा टाळावा.

वेस्ट मटेरियलपासून बनवा गार्डन

* सर्वेश चड्ढा, आर्किटेक्चर आणि इंटीरिअर डिझायनर

महानगरातली गर्दी आणि काँक्रिटच्या जंगलात बदलणाऱ्या शहरांमुळे घरात रंगबेरंगी फुले आणि हिरवाईने नटलेली सुंदर बाग असणे हे जणू एक स्वप्नच उरले आहे. पण जर तुमच्या घराला गच्ची आहे तर तुम्ही सहजपणे तुमचे स्वप्न साकार करू शकता. आणि तुमच्या गार्डनमध्ये बसून ताज्या हवेचा आनंद घेऊ शकता. वास्तविक टेरेस गार्डन म्हटले की लोक थोडे घाबरतात, कारण साधारणपणे त्यांना एक तर असे वाटत असते की टेरेस गार्डन खूप खर्चिक असते आणि दुसरे म्हणजे या गार्डनमुळे घरात ओलावा येण्याची शक्यता असते. परंतु आता असे नाही, असे अनेक पर्याय आहेत, ज्यामुळे घरात ओलावा येणे रोखता येते आणि अतिशय कमी खर्चात टेरेस गार्डन बनवता येते. जाणूया   कसे :

टाकाऊपासून सुरुवात

गच्चीचा योग्य उपयोग न करता आल्याने टेरेस गार्डन ही संकल्पना अस्तित्वात आली. घरातले निरुपयोगी सामान ठेवण्यासाठी सहसा गच्चीचा वापर केला जात असे. गच्चीचा योग्य वापर करण्याव्यतिरिक्त घरात ज्या टाकाऊ वस्तू आहेत, त्यांचाही वापर केला जाऊन एवढया मोठया जागेची स्पेस व्हॅल्यू आणि वापर दोन्ही शक्य होते.

आपल्या घरात प्लास्टिक, स्टील असे अनेक रिकामे कंटेनर असतात. त्यांचा उपयोग प्लांटर म्हणून करता येतो. किंवा जसे आम्ही बीयरच्या रिकाम्या बाटल्यांपासून फिचर वॉल बनवली आहे. यात लाइटही सोडता येते. घरात कधी सुतारकाम होते, तेव्हा लाकूड उरते. तेव्हा पाइन वुड जे वाळवीरोधक आणि जलरोधक आहे, त्याचाही वापर करता येतो. आर्टिफिशल प्लांट्सचाही वापर करता येतो. टेरेसवर टाकी, पाइप आदि गोष्टीही असतात. त्यांना कसे लपवता येईल, टेबल कसे सेट करता येईल यावर लक्ष दिले जाते. आम्ही टेरेस गार्डन अशा प्रकारे बनवतो की कमीत कमी खर्च येईल आणि जास्तीत जास्त लोक आपल्या छतावर हे बनवून घेऊ शकतील.

रोपे कशी असावीत आणि त्यांची देखभाल

टेरेस गार्डनमध्ये अशी रोपे लावली जातात, ज्यांना कमी पाणी लागते. अनेकदा लोक देखभाल खर्चाला घाबरून टेरेस गार्डन बनवत नाहीत. यासाठी आम्ही हे पाहिले की कोणती रोपे लावल्यास देखभाल खर्च कमी होईल. सुरुवातीस तुम्ही टेरेस गार्डनमध्ये बोगनविला लावू शकता. बोगनविला हे असे रोप आहे जे सर्व ऋतूत चालते. त्याला फुलेही येतात आणि त्याची देखभालही कमी करावी लागते. याव्यतिरिक्त बटन प्लांट्सचेही असेच आहे, पावसाच्या हंगामात ती आपोआप वाढतात. याला आठवडयातून २-३ दिवस पाणी घातले तरी पुरते. आजकाल लोक आपल्या गच्चीत भाज्याही लावू लागले आहेत. स्वत:ला व्यस्त ठेवण्यासाठी, आपला छंद जोपासण्यासाठी आपण ऑर्गेनिक (सेंद्रिय) शेती करू शकतो. कारण हल्ली सर्व प्रकारचे बी-बियाणे सहजपणे मिळतात. याची ऑनलाइन खरेदीही करता येते. तुम्ही तुमच्या छताच्या गच्चीवर मिरची, टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना इ. सहज लावू शकता.

प्रत्येक मोसमात ठेवा सुरक्षित

पावसाच्या प्रभावाला तुम्ही थांबवू शकत नाही. कारण पावसापासून रोपे झाकून ठेवून काहीच उपयोग नसतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे टेरेस गार्डनसाठी असे मटेरियल वापरले पाहिजे, जे मोसमाच्या हिशोबाने टिकाऊ असेल. रोपांवर सर्वात जास्त उष्णतेचा परिणाम होतो. म्हणून उन्हाळयात रोपांना सुरक्षित ठेवण्यासाठी बास्केट बॉल आणि क्रिकेट खेळण्यासाठी वापरले जाणारे नेट, ज्याला गार्डन नेट असे म्हटले जाते, जे बाजारात सहज उपलब्ध असते आणि स्वस्तही असते, ते ४ दांडयांच्या साहाय्याने टाकून रोपांना झाकता येते. यामुळे रोपांवर थेट ऊन पडत नाही. बांबूला बेस्ट मटेरियल मानले जाते. त्यामुळे गार्डनला नॅचरल लुक मिळतो. त्यावर ऊन आणि पावसाचा काही परिणामही होत नाही.

कमी खर्चात सुंदर गार्डन

अनेकदा असे होते की घराच्या छतावर खूप कमी जागा असते आणि त्या जागेस त्यांना गार्डनचे स्वरूप द्यायचे असते, पण त्यावरील संभावित खर्चामुळे लोक पाय मागे घेतात. परंतु आम्ही अशा प्रकारचे मटेरियल वापरतो जेणेकरून कमी खर्च येईल. आम्ही छतावरच्या लँडस्केपिंगमध्ये अशा गोष्टी वापरतो, ज्यामुळे खर्च तर कमी होईलच पण पुढे देखभाल खर्चही कमी होईल आणि लोक आपल्या टेरेस गार्डनचा शौक पूर्ण करू शकतील.

टेरेस गार्डन करताना जागा किती लहान किंवा मोठी आहे हे पाहिले जात नाही. जागेनुसार काम केले जाते. यात खूप जास्त खर्च किंवा देखभालीची गरज नसते. तसेच याची देखभाल करायला कोणाला ठेवायचीही गरज नसते. सकाळी आणि संध्याकाळी थोडासा वेळ जरी काढला तरी आपला गार्डनिंगचा छंद जोपासता येतो.

टेरेस गार्डन बनवताना या गोष्टींकडे लक्ष द्या

ओलाव्याकडे सर्वाधिक लक्ष ठेवावे लागते. गार्डन बनवताना लक्षात असू द्या की लीकेजची समस्या नसावी. कुंडयांमध्ये किंवा कंटेनर्समध्येही पाण्याची गळती कमीतकमी असावी, जेणेकरून ते पाणी छतावरून घरापर्यंत येऊ नये. तसेच छतावर जड सामान न ठेवण्याची दक्षताही घेतली पाहिजे, ज्यामुळे त्यावर ताण येईल. जे काही मटेरियल लावले आहे ते चांगले टिकेल असे असावे. जसे आम्ही बांबूचा वापर करतो. जी गोष्ट एकदम निरुपयोगी झाली आहे. आम्ही तिचा वापर करण्याचा प्रयत्न करत असतो. आम्ही क्लायंटच्या गरजेनुसार सर्व रचना करून देतो.

गार्डनची सजावट

जर छतावर एखादी भिंत असेल, तर तिला कोणता रंग द्यायचा, कोणता स्टोन लावायचा, फ्लोरिंग कसे ठेवायचे, प्लांट्स कसे असतील, प्लांटर कसे असतील आणि त्याचबरोबर लाइट्स कसे असतील आणि ते खराब न होणारे असतील या सर्व गोष्टींकडे लक्ष पुरवल्यास एक आकर्षक गार्डन बनवता येते.

ट्रान्स मेननादेखील येतात पीरियड्स

* मिनी सिंह

मासिक धर्माविषयी पुष्कळ काही लिहिले गेले आहे आणि हे देखील, की कसे पाच सहा दिवस स्त्रियांसाठी किती कष्टदायी असतात. परंतु जर आम्ही सांगितले की फक्त महिलाच नाही तर पुरुषांनादेखील पीरियड्स येतात, त्यांच्यासाठीदेखील हे पाच सहा दिवस खूप कष्टदायक असतात, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, हो ना? पण हे सत्य आहे.

अठरा वर्षाच्या एका मुलाची छाती एकदम सपाट. पुष्कळ खेळणारा, पळणारा, परंतु एक दिवस अचानक त्याला पिरियड सुरू झाले आणि त्याची ओळख बदलली. तो समजून गेला की आता तो एक मुलगा नाही, तर मुलगी बनला आहे. वास्तविक तो एक ट्रान्सजेंडर झाला होता. त्याला वाटत होते की जणू काही त्याचे जग उजाड झाले आहे. जेंडर आयडेंटिटी झगडणाऱ्या वॉशिंग्टनच्या केसने आत्महत्येचादेखील प्रयत्न केला. आता तो पिरियड एक्टिविस्ट आहे. केस लोकांना सांगतो की महिलांशिवाय ट्रांसजेंडर लोकांनादेखील पीरियड्स येतात आणि हे एखाद्या भयानक स्वप्नपेक्षा कमी नाही.

पीरियड्स फक्त मुली किंवा महिलांनाच येत नाहीत तर कित्येक ट्रान्सजेंडरदेखील ब्लीड करतात. हे अत्यंत वेदनादायक आहे, परंतु जर ही मुलगी नाही तर आणखीनच मोठी समस्या उभी राहते. सगळयात मोठी समस्या तर ही आहे की आपले दु:ख हे कुणासोबत वाटू शकत नाहीत आणि दुसरी ही कि सुरक्षित पद्धतीने पॅड किंवा टेम्पोन बदलणे आहे. जर तुम्ही घराबाहेर आहात, तर फीमेल वॉशरूम वापरण्याची परवानगी नाही. तुम्ही महिलांना समजावू शकत नाही की तुम्हीदेखील या बाबतीत त्यांच्यासारखेच आहात.

हे पहिल्यांदा झाले जेव्हा एखाद्या मुलाला पीरियड्सची समस्या आली. केसने आपली समस्या मीडियावरदेखील शेअर केली. त्याने म्हटले, की सर्वांना ठाऊक आहे की मी एक ट्रान्सजेंडर आणि समलैंगिक आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचे, तर मी मध्येच कुठेतरी अडकलेलो आहे, ना इकडचा ना तिकडचा. कोणत्याही महिलेसारखे पिरियड येणे एखाद्या भीतीदायक स्वप्नापेक्षा कमी नाही. माझ्या शरीराने मला धोका दिला. पाच-सहा दिवसांपर्यंत राहणाऱ्या रक्ताच्या डागांनी मला एक अशी ओळख दिली, जी खरी नाहीए. दर महिन्याला जेव्हा पीरियड्स येतात मी त्याच दिवशी पुन्हा जगू लागतो. तेवढयाच दिवसांसाठी माझे जेंडर बदलले जाते. मी श्वास घेण्यासाठीदेखील संघर्ष करतो.

हे सांगते वेळी केसचे डोळे पाणावले. अशा प्रकारची कहाणी ऐकायला तर ठीक आहे, परंतु हे ज्यांना फेस करावे लागते त्यांच्यासाठी खूप कठीण आहे.

१९५९ मध्ये जेव्हा अलेक बटलर जन्मले, तेव्हा त्यांना मुलगी मानले गेले. पुरस्कार विजेता, फिल्म निर्माता आणि लेखक अलेकला एका मुलीच्या रूपात सांभाळले गेले होते.

बाराव्या वर्षी बटलरला लक्षात आले की की तो इंटर सेक्स आहे. म्हणजे अशी व्यक्ती जिचे शरीर हार्मोनल किंवा जेनेटिक सेक्सना पूर्ण पद्धतीने पुरुषाचे आहे आणि ना महिलेचे. याविषयी अलेक बटलर सांगतात, की जेव्हा त्यांना लक्षात आले, की त्यांना दाढी येणे आणि मासिक धर्म सर्व एकत्र सुरू झाले, तेव्हा त्यांच्यासाठी अत्यंत गोंधळलेली स्थिती होती. त्यांचे आई-वडीलदेखील हे पाहून गोंधळले. ते आलेकला डॉक्टरांकडे घेऊन गेले. वास्तविक कॅनडाच्या ज्या छोटया गावात ते वाढलेले होते. तिथे कोणाला ठाऊक नव्हते की इंटरसेक्सचा अर्थ काय आहे. एका डॉक्टरने तर इथपर्यंत म्हटले, की त्यांनी तोपर्यंत आलेकला मानसिक रुग्णांच्या संस्थेत ठेवावे, जोपर्यंत ते मुलींसारखे कपडे घालणे आणि मेकअप करणे शिकत नाहीत. परंतु त्यांच्या आई वडिलांनी ही गोष्ट ऐकली नाही आणि अलेकला साथ देत म्हटले की ते तेच करतील जे अलेकला हवे आहे.

अलेकचे म्हणणे होते की ते मर्दानी दिसू इच्छित होते, पण त्यांच्यावर मुलगी बनण्याचा आणि मुलींसारखे दिसण्याचा दबाव टाकला जायचा. त्यांच्या शाळेतदेखील या गोष्टीसाठी त्यांना त्रास दिला जायचा, परंतु त्यांचा प्रयत्न हाच असायचा कि ते इतर मुलांसारखे दिसावेत. वास्तविक ते एका मुलीवर प्रेम करायचे आणि ही गोष्ट पसरावी असे त्यांना वाटत नव्हते. परंतु हे प्रकरण वाईट पद्धतीने पसरले आणि लोक त्यांना लेस्बिअन, लेजी, डाईक म्हणू लागले. वर्गात त्यांना अशा चिठ्ठया पाठवल्या जायच्या, ज्यात लिहिलेले असायचे, की तू आत्महत्या का करत नाहीस.

समजण्याच्या पलीकडे आहे या ट्रान्सजेंडरची कहाणी

अमेरिकेत राहणाऱ्या वायली पिंसनने आपले मूल सहा महिन्यांचे झाल्यानंतर आपला अनुभव व्यक्त केला. २८ वर्षीय वायली पिंसन अमेरिकेतील टेक्सास प्रांतात आपला पार्टनर स्टीफन ग्रेटसोबत राहतात. २१ वर्षांच्या वयात त्यांनी मुलीपासून मुलगा बनण्याच्या प्रक्रियेची सुरुवात केली होती. या दरम्यान त्यांचे पिरियड येणे बंद झाले होते.

डॉक्टरांनी त्यांना सावध केले की ते कधी आई बनू शकणार नाहीत. परंतु फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांना लक्षात आले की टेस्टोस्टेरोन थेरपीनंतरदेखील ते प्रेग्नेंट आहेत तेव्हा ते चकित झाले. सप्टेंबर २०१८ मध्ये वायलीने सिझेरियनद्वारे एका मुलाला जन्म दिला. जेव्हा मुलगा सहा महिन्यांचा झाला तेव्हा त्यांनी आपले अनुभव समाजासमोर ठेवले. वायलीचे म्हणणे होते, की क्वचितच कुणी गर्भवती पुरुष पाहिला असेल. जेव्हा ते रस्त्यांवरून जायचे तेव्हा लोक म्हणायचे, की ते कधी पुरुष होऊ शकणार नाहीत, कारण पुरुष कधी मुलांना जन्म देत नाहीत. आजूबाजूला राहणारे लोकदेखील त्यांच्यासोबत वाईट वर्तणूक करायचे, परंतु वायलीला या गोष्टीने काही फरक पडत नव्हता. ते म्हणतात, की मुलाच्या आनंदापुढे सगळे त्रास आणि वाईट वर्तणूक काहीच महत्वाचे नाही.

कित्येक ट्रान्सजेंडर स्वत:ला पुरुष मानतात. त्यांनादेखील पीरियड्स येतात. मागच्याच वर्षी ऐकण्यात आले की एक ट्रान्सजेंडर आई बनला. त्याची एक गर्लफ्रेंडदेखील आहे, परंतु त्याने मुल जन्माला घालणं हे निवडले.

पुरुषांची पीरियड्सवाली गोष्ट काही नवीन नाही, तर खूप जुनी आहे. असे कित्येक ट्रान्स पुरुष आहेत ज्यांना पीरियड्स येतात, पण ते स्वत:ला पुरुष मानतात. परंतु त्यांचे काही बायोलॉजिकल फीचर्स स्त्रियांचे असतात. एकूणच तुम्ही स्त्री आहात की पुरुष ही तुमची चॉईस आहे. पर्सनल आयडेंटिटीची गोष्ट आहे.

काय असतो ट्रान्सजेंडर पुरुष किंवा ट्रान्समॅन

ट्रान्सजेंडर पुरुष आणि नॉन बायनरी लोकांनादेखील मासिकधर्म येतो. ट्रान्स मेन ते लोक असतात जे जन्म तर घेतात पुरुष म्हणून, परंतु त्यांची शारीरिक बनावट (गुप्तांग) पाहता जन्मानंतर डॉक्टर त्यांना महिला म्हणून घोषित करतात. सर्वसाधारणपणे ट्रान्स मेन आपले जेंडर त्या हिशोबाने ऑपरेशन करून बदलून घेतात, जसे त्यांना दाखवायचे आहे.

नॉन बारीयन लोक कोण असतात : काही लोक पूर्ण पद्धतीने ना तर महिला असतात ना तर पुरुष. असे लोक नॉन बायनरी श्रेणीमध्ये येतात. शारीरिक जडणघडणीचीची गोष्ट करू तर कित्येक वेळा अशा लोकांचे गुप्तांग स्त्री आणि पुरुष दोघांची मिळतेजुळते असतात.

कोणाला होतो मासिक धर्म : ट्रान्स मेन आणि नॉन बायनरी लोकांनादेखील पीरियड्स त्याच प्रकारे येतात, जसे महिलांना. काही बाबतीत ते महिलांसारखे ब्लीड करत नाहीत, पण जाणीव तशाच प्रकारची होते. पीरियड्सदरम्यान जसे महिलांचा मूड बदलतो, तसेच यांचादेखील बदलतो. सूज येणे, पीरियड्सदरम्यान कंबर आणि ओटीपोटात वेदना इत्यादी तक्रारी त्यांनादेखील होतात.

पीरियड्सबाबत आजदेखील महिला खुलेपणाने बोलण्यास कचरतात. आजदेखील त्यांना वाटते की या गोष्टीमुळे लोक त्यांना घृणास्पद नजरेने पाहतील.

विचार करा, जर समाज महिलांना होणाऱ्या मासिक धर्माला सहजतेने घेऊ शकलेला नाही, तर ट्रान्स लोकांसाठी या मुद्दयावर उघडपणे बोलणे सोपे असेल का?

मासिक धर्म आजदेखील भारतात एक सोशल टॅबू मानला जातो. आजदेखील या विषयावर चर्चा करण्यात मुली लाजतात. मासिक धर्माशी जोडलेल्या गोष्टींसाठी आजदेखील मुली घरातील वेगळा कोपरा शोधण्याचा प्रयत्न करतात. समाजाच्या नजरेत महिलांच्या शरीरातून होणाऱ्या स्त्रावांला अशुद्ध मानले जाते.

तर दुसऱ्या बाजूला मासिक धर्म समय निघणाऱ्या रक्तवाल्या देवीला लोक पूजण्यासाठी तिच्या दरबारात रांगा लावून उभे राहतात. पीरियड्स ना इथपर्यंत कलंकित केलेले आहे आहे की कित्येक महिला मासिक धर्मामुळे आपल्या अधिकारांपासून वंचित राहतात.

सगळयात मोठी गोष्ट तर ही आहे की लोकांच्या नजरेत मासिक धर्माला फक्त स्त्रीयांशी जोडले गेलेले आहे आणि ते या शब्दाला कुणासोबत जोडणे ऐकू शकत नाहीत, परंतु ट्रान्स लोकांनी घेऊन कसे समोर यावे?

भारतात सुरुवातीला लोक मानतच नव्हते की ट्रान्सजेंडर मनुष्य असतात. ते तर या गोष्टीला अफवा म्हणायचे. ट्रान्स पुरुषांसाठी हे एक सामाजिक लाजेच्या गोष्टीसारखे झाले आहे, जे ते समाजापासून लपवून इच्छितात, कारण त्यांना ठाऊक आहे की समाज त्यांना आपले म्हणणार नाही, तर चेष्टा करेल, त्यांना घृणास्पद नजरेने पाहिल.

एका ट्रान्स फॅट संस्थेच्या म्हणण्यानुसार ३६ टक्के नॉन बायनरी लोक आरोग्य केंद्रात जायला घाबरतात, कारण त्यांना भीती असते की त्यांच्यासोबत भेदभाव होईल आणि लोकांना जर त्यांची पीरियड्सवाली गोष्ट कळली तर त्यांच्यासोबत आणखी भेदभाव होईल. कित्येक ट्रान्स पुरुषांना डिस्फोरियासारख्या आजारातून बरे केले गेले आहे. या आजारात त्यांना असे वाटते की ते पुरुष आहेत पण महिलांच्या रूपात कैद आहेत. त्यांचे हावभाव पुरुषांसारखे असतात पण आतून त्यांना वाटत राहते की ते स्त्री आहेत.

लोकांचे म्हणणे आहे : मासिक धर्म त्यांना पुष्कळ थकतो, मनदेखील विचलित होऊ लागते. हे अशामुळे होते, कारण त्यांची बॉडी त्यांच्या जेंडरशी मॅच करत नाही. काही ट्रान्स पुरुष तर ठीक तरी आहेत पण काही तर आपल्या गर्भाशयामुळे हैराण असतात. त्यांना अडचण होते असे गायनॅकॉलॉजिस्ट शोधण्यात, जे त्यांना युटेरस आणि ब्लीडिंगपासून सुटका मिळवून देतील.

अशाच यांच्या अडचणी कमी नाहीत रोजच्या जीवनात आणखी एक अडचण एका अडचणीचा यांना सामना करावा लागतो आणि ती आहे मेल वॉशरूममध्ये आपले पॅड चेंज करणे. असे पूर्वी होत असेल, परंतु त्याकाळीदेखील ट्रान्स पुरुष आणि मासिक धर्मासंबंधी कोणती चर्चा केली गेली नसेल, परंतु अजूनदेखील लोकांनी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेले आहे.

तज्ञांच्या मते ट्रान्सजेंडर एका साधारण माणसासारखेच असतात. एका सामान्य माणसाची जितकी अंगे असतात अगदी  तेवढीच अंगे ट्रान्सजेंडरची असतात. फरक फक्त इतकाच असतो की त्यांच्यात विरुद्ध  लिंग म्हणजेच महिलांसारखे विचार आणि स्वभाव असतो. म्हणजेच बाहेरून ते पूर्णपणे पुरुष असतील परंतु आतून त्यांच्या भावना महिलांसारख्या असतील. जर त्यांची इच्छा असेल तर ते आपले सेक्स चेंज करु शकतात.

आधुनिकता आणि लिंगभेद

लिंग भेद फक्त भारतातच नाही तर जगभरातला मोठा मुद्दा आहे, परंतु लिंग निश्चिती आणि आणि लैंगिक कल यांच्यातील फरक समजणे गरजेचे आहे. कित्येक वेळा तर आई-वडीलदेखील स्वत: जाणत नाहीत की त्यांच्या मुलाचे लिंग काय आहे. काही लोक ट्रान्सजेंडर असतात, परंतु ते त्या रुपाने ओळखले जात नाहीत, ज्या लिंगासोबत त्यांचा जन्म झालेला असतो.

ट्रांसजेंडर एक जटील शब्द आहे, ज्याचा अर्थ बराच काही होऊ शकतो. एक ट्रान्स महिला ती असते जी पुरुषाच्या रूपात जन्म घेते, परंतु महिलेच्या रूपात तिला ओळखले जाते, महिला ट्रान्सजेंडर म्हटले जाते. एक ट्रान्स पुरुष तो असतो जो महिलेचा रूपात जन्म घेतो, परंतु पुरुषाच्या रूपात ओळखला जातो, त्यालादेखील ट्रान्सजेंडर म्हणतात. त्यामुळे कोणीही अशी व्यक्ती जी पूर्ण तऱ्हेने ना पुरुष आहे आणि ना ही महिला, तिला तिसऱ्या लिंगाच्या रूपात मान्यता दिली गेली आहे. दोघांकडे आकर्षित होऊ शकतात.

ट्रान्सजेंडरच्या अडचणी

* शाळेत कोणतीही वेगळी व्यवस्था नाही. या कारणामुळे लहानपणापासूनच शाळा सोडावी लागते.

* कित्येकवेळा तर शहरदेखील सोडावे लागते.

* घरून बाहेर पडतेवेळी अश्लील कॉमेंट्स आणि छेडछाडीचा बळी व्हावे लागते.

* राहण्यासाठी भाडयाने घर कोणी देत नाही.

* सरकारी आणि प्रायव्हेट नोकरीमध्ये काही प्राधान्य नाही.

समाजात ट्रान्सजेंडर यांविषयी जागरूकता नसणे एप्रिल २०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने ट्रान्सजेंडरना तिसऱ्या लिंगाची मान्यता तर दिली परंतु या व्यतिरिक्त त्यांच्या सामाजिक स्थितीमध्ये जास्त बदल झालेला नाही अजून आणखी सुधारणेची गरज आहे.

फोनवरील फसवणूक टाळण्यासाठी काय कराव

* नीरज कुमार मिश्रा

‘‘हॅलो…नमस्कार. मी स्टेट बँक ऑफ इंडियातून बँक मॅनेजर प्रभाकर बोलत आहे. आपण आपले एटीएम कार्ड सत्यापित करा, अन्यथा ते अवरोधित केले जाईल.’’

निशा शिकलेली होती, पण अचानक हा फोन आला आणि जेव्हा कॉलरने स्वत:ला स्टेट बँकेचा मॅनेजर म्हणून सांगितले जाते तेव्हा तिने असा विचार केला की हा फोन वास्तविक मॅनेजरचा आहे आणि मग निशाने फोन करणाऱ्याला आपला १६ अंकी एटीएम कार्ड नंबर तसेच कार्डच्या मागील बाजूस लिहिलेला सीव्हीव्ही नंबरही सांगितला.

तो बनावट कॉलर इतक्या चतुराईने बोलत होता की निशाला काय भानगड आहे हे समजू शकले नाही आणि जेव्हा कॉलर मधेच इंग्रजीत बोलला तेव्हा तर तिला खात्रीच पटली की हा प्रभाकर बँकेचा मॅनेजरच आहे.

बोलण्याच्या जाळयात अडकवून त्याने निशाच्या मोबाइलवर आलेला ओटीपी (वन टाइम पासवर्ड)सुद्धा विचारला.

संध्याकाळी निशाने जेव्हा तिच्या बँकेचा ताळेबंद तपासला तेव्हा त्यातून ८० हजार रुपयांची खरेदी झालेली होती.

शाखेत जाऊन मॅनेजरकडे तक्रार केली, पोलिसांतही तक्रार केली, पण प्रत्येकाकडून हेच उत्तर आले की खरेदी तुमच्या कार्डवरूनच केली गेली आहे, त्यामुळे आम्ही काहीही करू शकत नाही.

शिक्षित ठग

यास बँकिंग फसवणूक म्हणा की ओटीपी फसवणूक म्हणा, परंतु यात ग्राहकच फसवणुकीचा बळी ठरत आहेत. हे ठग काही मिनिटातच आमची कष्टाने मिळवलेली संपत्ती लुबाडत आहेत.

हे ऑनलाइन ठग सुशिक्षित आहेत, इंग्रजी बोलणारे आहेत आणि तंत्रज्ञानाविषयीदेखील माहितगार आहेत. ते इंटरनेटच्या बऱ्याच स्रोतांकडून आमचे नाव आणि नंबर जाणून घेतात आणि नंतर कॉल करून आमच्याकडून आवश्यक माहिती गोळा करतात व आमचे पैसे लुबाडतात.

आज इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगमुळे फसवणूक करणे सोपे झाले आहे. असे फोन मुख्यत: लँडलाईन नंबरवरुन येतात जेणेकरून कोणालाही संशयास्पद वाटू नये, आज प्रत्येक व्यक्ती कॅशलेस होऊ इच्छित आहे, म्हणून तो आपल्या मोबाइलमध्येच आपल्या खात्याशी संबंधित सर्व तपशील ठेवतो आणि स्मार्टफोनमधून त्याचे सर्व कार्य करू इच्छितो. त्याला बँकेत जाऊन लाईनमध्ये उभे राहण्याची गरज वाटत नाही.

अशा परिस्थितीत, जेव्हा आपल्याला असा कॉल येतो की आपली लॉटरी निघाली आहे किंवा खाते बंद केले जाऊ शकते तेव्हा आपण सहजपणे कॉलरला सर्व माहिती देता.

करोडपती बनवण्याचा दगा

अशीच एक नवीन फसवणूकही समोर आली आहे. हे ठग तुम्हाला कॉल करतात आणि म्हणतात की ‘कौन बनेगा करोडपती’च्या वतीने तुम्हाला एक कार देण्यात येत आहे. फक्त या कारचे पेपर बनविण्याकरिता तुम्हाला पैसे द्यावे लागतील. जर आपण खूष होऊन होय म्हटलत तर मग हे ठग आपल्याला कार्डाचा तपशील विचारतील आणि पैसे उडवून नेतील.

त्याचप्रमाणे नीरजजी आणि त्यांचा मुलगा यांना एका जुन्या जीप कार विक्रीसाठी असलेल्या साइटवर कारची जाहिरात दिसली आणि त्या मालकाच्या फोन नंबरवर संपर्क साधला तर तथाकथित कार मालकाने त्यांना गाडी बघणे व तपासणीसाठी त्याच शहरातील एका ठिकाणी बोलावले.

जेव्हा नीरजजी आपल्या मुलासमवेत कार बघायला गेले, तेव्हा त्यांना गाडी आवडली आणि मग दोन्ही पक्षांनी निश्चित तारखेला करार करण्याचा निर्णय घेतला.

जेव्हा ते कारचा सौदा झालेल्या ठिकाणी पोहोचले तेव्हा गाडी किंवा कार मालक तेथे नव्हते आणि कार विक्रेत्याचा फोन नंबरही बंद येत होता.

या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनीही सहकार्य केले नाही, उलट नीरजजी शिक्षित असूनही अशी चूक केल्याचा चुकीचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.

आपल्याला या सर्व घटनांमधून हेच शिकायला मिळते की आपण कुठल्याही परिस्थितीत कोणासही एटीएम कार्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर, पासवर्ड किंवा ओटीपी सांगू नये. जर आपल्या फोनवर असे कॉल वारंवार येत असतील तर आपण पोलिसांकडे जावे आणि लेखी तक्रार करावी. तंत्रज्ञान आपला मार्ग सुलभ करते परंतु जागरूक न राहिल्यामुळे आपल्याला तोटाही सहन करावा लागू शकतो.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें