कहानी के बाकी भाग पढ़ने के लिए यहां क्लिक करें

दीर्घ कथा * सीमा खापरे

पूर्व भाग :

शाळकरी वयातच सुमाची भेट वसंतशी झाली. ती त्याच्या प्रेमात होती. तिला वसंतशी लग्न करायचं होतं. वसंत मात्र सातत्याने तो विषय टाळत होता. शेवटी वसंतच्या घरच्यांच्या विरोधात जाऊन सुमा व वसंतचं लग्न झालं. सुमाला एक मुलगीही झाली अन् वसंतने आपलं खरं रूप दाखवायला सुरूवात केली. सुमाला जेव्हा समजलं की त्याला आधीच्या लग्नाची बायको व मुलंही आहेत, तेव्हा ती त्याच्यापासून वेगळी झाली.

- आता पुढे वाचा...

आकाशपाताळ एक करणं म्हणजे काय याचा प्रत्यय सुमाला वसंतशी लग्न करताना आला होता. लग्न फार म्हणजे फारच साधेपणाने झालं. वसंतकडून कुणी दोघंतिघं अन् हेमाताई, रमण भावोजी अन् विलियम...लग्नसमारंभाचा उत्साह नाही की पाहुण्यांची वर्दळ, चेष्टामस्करी नाही. पण सुमा मात्र खूप आनंदात होती. जे हवं ते मिळवलं होतं तिने. रमण भावोजींनी गावातच तिला एक घर घेऊन दिलं. हेमाताईने घरासाठी लागणारं सगळं सामान आणलं. घर मांडून दिलं. शिवाय बराचसा पैसा तिच्या अकांउटला टाकला होता. वसंत तरीही नाराजच होता. ताई भावोजींसमोर काही बोलला नाही. ते गेल्यावर मात्र त्याने मनातला सगळा राग काढला.

त्याच्या मते तिच्या लोकांचा वसंतवर विश्वास नाही म्हणूनच त्यांनी घर, सामान, वगैरे सर्व सुमाच्या नावे केलं होतं. त्याचं हे रूप बघून ती चकित झाली. हतबद्ध झाली. हेमाताईने त्यांच्या हनीमूनसाठी उटीची तिकिटं अन् हॉटेलचं बुकिंगसुद्धा करून ठेवलं होतं. वसंत संतापून बोलला, ‘‘आता आमचा हनीमूनही तुझ्या बहिणीच्या इच्छेप्रमाणे होणार का?’’

‘‘मग तू ठरव दुसरी कुठली जागा?’’ तिने त्याला प्रेमाने म्हटलं.

‘‘बघूया...’’ वसंतने टाळलंच. हनीमून झाला नाही. लग्नानंतर दोन महिन्यांतच वसंतने धंद्यासाठी हवे आहे म्हणून तिच्या अकाउंटमधून दोन लाख रूपये तिला काढायला लावले. सुमा बघत होती, वसंतला लग्नाविषयी अजिबात आस्था नव्हती. नवी नवरी, तिची नव्हाळी या बाबतीत तो अगदीच रूक्षपणे वावरत होता. बायकोकडे चक्क दुर्लक्षच करत होता. तिला फार एकाकी अन् उदास वाटायचं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...