* प्रतिभा अग्निहोत्री
अनुराधाच्या सासूबाईंना अचानक हार्ट अटॅक आला. पती आनंदने त्वरित सोर्बीटेट गोळी आणायला सांगितल्यावर, अनुराधाने प्रत्येक ड्रॉवर खोलून बघितला परंतु टॅबलेट कुठेच मिळत नव्हती. प्रत्येकवेळी ती जेव्हा लागेल तेव्हा बघू, हा विचार करायची, परंतु आता जेव्हा गरज पडली तर... शेवटी त्वरित ती शेजाऱ्यांकडून टॅबलेट घेऊन आली आणि सासूबाईंना दिली. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी सांगितलं की वेळेवरती सोर्बीटेट दिल्यामुळे त्यांचा जीव वाचला नाही तर... तेव्हा अनुराधाला तिच्या निष्काळजीपणाचा खूप राग आला.
विपाशाचे सासू-सासरे दोघेही बराच काळापासून आजारी होते. त्यांना औषधं देण्याचं काम विपाशाच करत असे. एके दिवशी तिने तिच्या सासऱ्यांचं बीपीचं औषध तिच्या सासूबाईंना दिलं. गोळी खाताच सासूबाई बेशुद्ध होऊन जमिनीवर पडल्या, जेव्हा तिने बघितलं की सासऱ्यांच बीपीचे औषध तिने सासूबाईंना दिलंय, ज्या लो बीपीच्या पेशंट आहेत आणि हाय बीपीची गोळी खाल्ल्यामुळे त्यांचं बीपी अजूनच खाली गेलं, ज्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. तेव्हा ती त्यांना घाईघाईत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. तेव्हा मोठ्या मुश्किलीने त्यांचा जीव वाचला.
छोट्या छोट्या चुका
रचिताला तिच्या भावाच्या लग्नाला जाण्यासाठी बँक लॉकरमधून दागिने काढायचे होते परंतु दोन दिवसापासून लॉकरची चावी मिळत नव्हती. जेव्हा खूपच शोधाशोध केल्यावरती चावी मिळाली नाही तेव्हा तिने तिचे पती अमनला सांगितलं.
तेव्हा अमन म्हणाले, ‘‘गेल्यावेळी जेव्हा तू लॉकरसाठी गेली होतीस तेव्हा तुझी चावी हरवली होती आणि तू बँकेला त्याची सूचना देखील दिली होतीस. मग दुसरी चावी आणलीस की नाही.’’
आता बँकेत जायलादेखील वेळ नव्हता. शेवटी तिला लग्नात खरे दागिने असूनसुद्धा खोटे दागिने घालावे लागले.
आपल्या सर्वांनाच माहिती असतं की घरामध्ये फर्स्ट एड बॉक्स असणं किती गरजेचं आहे. गरीमानेदेखील बाजारातून सुंदरसा प्लास्टीक बॉक्स आणून फर्स्ट एड बॉक्स बनवला परंतु जेव्हा एके दिवशी तिच्या मुलाला लूज मोशन झाले तेव्हा त्याला तिने जी गोळी खायला दिली, ती गोळी खाल्लयामुळे तिच्या मुलाच्या शरीरावरती पूर्ण एलर्जी झाली. डॉक्टरांच्या मते एक्सपायरी डेटचं औषध दिल्यामुळे मुलाच्या शरीरावर अँटी रिएक्शन झाली होती.





