कथा * मिनू शहाणे

मला वाटत होतं की नीरज समोरच्या खिडकीतल्या त्याच्या त्या ठराविक जागी उभा आहे. आता तो हात हलवून माझं लक्ष त्याच्याकडे वेधून घेईल. तेवढ्यात मागून माझ्या खांद्यावर कुणाचा तरी स्पर्श झाला तशी मी दचकले.

‘‘वन्स, तुम्ही इथं काय करताय? सगळे लोक ब्रेकफास्टसाठी तुमची वाट बघताहेत...आणि जावईबापूंची नजर तर तुम्हालाच शोधते आहे,’’ वहिनीनं माझी चेष्टा करत म्हटलं.

सगळेच आनंदात हसत बोलत ब्रेकफास्ट घेत होते. पण मला मात्र काहीच आवडत नव्हतं. मी उगीच काही तरी चिवडत बसले होते.

‘‘मेघा, अगं तू काहीच खात नाहीएस? सूनबाई अगं, मेघाला गरम पुरी वाढ बरं?’’ आईनं वहिनीला हुकूमच दिला.

‘‘नको, मला काहीच नकोय. झालंय माझं.’’ मी ताडकन् उठले.

प्रदीप दादा माझ्याकडे रोखून बघत होता. मलाही त्याचा खूप राग आला होता. माझा आनंद हिरावून घेण्याचा त्याला काय अधिकार होता? पण यावेळी गप्प बसणंच श्रेयस्कर होतं. आईबाबांनाही बहुधा माझ्या मन:स्थितीची कल्पना आली होती. माझं नीरजवर खूप खूप प्रेम होतं. त्याच्याशी लग्न करून संसार थाटायची स्वप्नं मी बघत होते. पण या सगळ्यांशी मिळून माझं लग्न अशा माणसाशी लावून दिलं, ज्याला मी कधी पूर्वी बघितलंही नव्हतं अन् ओळखतही नव्हते.

‘‘आई, मी माझ्या खोलीत पडतेय थोडा वेळ.’’ मी आईला म्हटलं अन् जाण्यासाठी वळले, तेवढ्यात आई म्हणाली, ‘‘मेघा, ज्यूस घेतेस का? काहीच खाल्लं नाहीएस तू...’’

‘‘नको, मला भूक नाहीए...’’ मी रागानं म्हणाले.

‘‘मेघा, सासरची माणसं कशी आहेत? तुला आवडतंय ना तिथं? आणि सार्थक, आमचे जावई? प्रेम करतात ना तुझ्यावर?’’

‘‘सगळं ठीकच आहे...’’ मी कोरडेपणाने उत्तरले. मनात तर इतका राग होता की म्हणावसं वाटलं, ‘तुमच्यापेक्षा खूपच चांगली माणसं आहेत ती.’

पुन्हा आईनं म्हटलं, ‘‘पोरी आता हेच तुझं घर आहे. सगळ्यांची मनं जिंकून घे, मिळून मिसळून रहा.’’

‘‘मायलेकींचं काय गूज चाललंय?’’ अचानक सार्थकनं तिथं येऊन विचारलं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...