* प्रतिनिधी
अनुराग कश्यप, रवि जाधव, सृजित मुखर्जी, नाग अश्विन, समुथिरकणी, लिजो जोस पेलिसेरी आणि हेमंत राव एकत्र येत आहेत भारतातील नव्या पिढीतील कथाकथनकारांना मार्गदर्शन व प्रकाशाचा झोत देण्यासाठी
संस्कृती, सर्जनशीलता आणि व्यापकतेवर आधारित भविष्योन्मुख कॉन्टेन्ट इकोसिस्टम उभारण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधिक बळकटी देत ‘Z’ तर्फे *झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट* – या आपल्या प्रकारच्या अशा पहिल्याच, उद्योगांची व्याख्या करणाऱ्या संपूर्ण भारतभर राबवल्या जाणाऱ्या ओम्नीचॅनेल उपक्रमाच्या शुभारंभाची घोषणा करण्यात आली आहे. देशभरातील नवोदित चित्रपट निर्मिती प्रतिभेचा शोध घेऊन त्यांचे संगोपन करणे आणि त्यांची कला साजरी करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.
देशातील विविध क्षेत्रांमध्ये आपली वेगळी ओळख प्रस्थापित केलेले फिल्ममेकर्स एकाच राष्ट्रीय व्यासपीठावर एकत्र आणत, ही स्पर्धा भारतीय मनोरंजन क्षेत्रातील सर्वांत महत्त्वाकांक्षी बहुभाषिक कलागुण शोध उपक्रमांपैकी एक ठरत आहे. खरोखरच सर्वसमावेशक दृष्टीकोनातून राबवलेल्या या उपक्रमात *हिंदी* , *मराठी* , *बंगाली* , *तेलुगू,* *तामिळ* , *मल्याळम* आणि *कन्नड* अशा सात प्रमुख भाषांचा समावेश असून विविध सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि चित्रपट परंपरांतील कथाकथनकारांना ह्या उद्योगातील दिग्गजांच्या पाठबळासह राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
*झी शॉर्ट फिल्म कॉन्टेस्ट* च्या केंद्रस्थानी विविध चित्रपट उद्योगांतील कथाकथनाला नवी दिशा देणाऱ्या दिग्गज दिग्दर्शकांचे प्रभावी परीक्षक पॅनल आहे. या परीक्षकांमध्ये हिंदीतील *‘गँग्स ऑफ वासेपूर’* सारख्या धाडसी आणि वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या चित्रपटांसाठी ओळखले जाणारे *अनुराग कश्यप (हिंदी)* ; मराठीतील *‘नटरंग’* सारख्या सांस्कृतिकदृष्ट्या प्रभावी चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले *रवि जाधव (मराठी)* ; बंगालीतील *‘ऑटोग्राफ’* आणि *‘जातिश्वर’* सारख्या आशयघन चित्रपटांचे दिग्दर्शक *सृजित मुखर्जी (बंगाली)* ; तेलुगूतील *‘कल्की 2898 एडी’* सारख्या भव्य चित्रपटामागील द्रष्टे दिग्दर्शक *नाग अश्विन (तेलुगू)* ; सामाजिक विषयांवर आधारित परिणामकारक चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक *समुथिरकणी (तामिळ)* ; *‘जल्लिकट्टू’* सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवलेल्या, दृश्यदृष्ट्या धाडसी चित्रपटांचे दिग्दर्शक *लिजो जोस पेलिसेरी (मल्याळम)* ; तसेच *‘गोधी बन्ना साधारण मायकट्टू’* सारख्या भावनिक आणि सूक्ष्म कथाकथनासाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक *हेमंत राव (कन्नड)* यांचा समावेश आहे.





