* आभा यादव
नवीन वर्ष येताच आपल्या सगळ्यांच्या मनात काही ना काही बदलण्याची इच्छा निर्माण होते. अशावेळी फॅशनच्या क्षेत्रात जेव्हा सौंदर्य निखारण्याची गोष्ट येते, तेव्हा आपण काहीही कसर सोडत नाही. मग ते स्किन ट्रीटमेंट असो वा हेअर ट्रीटमेंट. जर आपण हेअर ट्रीटमेंटचा विचार करत असाल, तर अलीकडे नवनवीन हेअर केमिकल ट्रीटमेंट उपलब्ध आहेत, ज्यामुळे केस अधिक ड्राय व डॅमेज होतात. खराब केसांना हेल्दी आणि शाईन बनवण्यासाठी तुम्ही हेअर ग्लॉस ट्रीटमेंट करू शकता. ही ट्रीटमेंट काय आहे आणि ती कधी करावी, हे सांगत आहेत नाइस अँड सलोनचे हेअर एक्स्पर्ट् सलीम:
काय आहे हेअर ग्लॉस ट्रीटमेंट
ही एक तात्पुरती ग्लॉसी ट्रीटमेंट आहे, जी कलर केलेल्या केसांच्या क्युटिकल्सना ग्लॉसी बनवण्याचे काम करते आणि केसांचा कोरडेपणा कमी करते. यामध्ये पेरॉक्साइड किंवा अमोनियाचा वापर केला जातो. हे केमिकल तुमच्या केसांच्या क्युटिकल्समध्ये मिसळले जाते, ज्यामुळे केसांमध्ये चमक येते. ज्या महिलांना केसांमध्ये शाइन आणायची आहे, त्यांच्यासाठी हेअर ग्लॉस हा एक उत्तम पर्याय आहे.
देई सॉफ्ट आणि शायनी हेअर
हेअर एक्स्पर्ट सलीम यांचे म्हणणे आहे की, अनेकदा असे दिसून येते की मुली फॅशनच्या नादात आपल्या केसांमध्ये वेगवेगळ्या स्टायलिंगसाठी हॉट स्टायलिंग टूल्सचा अधिक वापर करतात आणि हेअर ट्रीटमेंट घेत राहतात, परंतु हेअर ट्रीटमेंटनंतर योग्य काळजी घेत नाहीत. त्यामुळे केसांची चमक कमी होते आणि केस बारीक व निस्तेज दिसू लागतात. अशा परिस्थितीत आपण हेअर ग्लॉस ट्रीटमेंट करून घेऊ शकता. या ट्रीटमेंटमुळे केसांना सरळ आणि नैसर्गिक लुक मिळतो. तसेच केसांची हरवलेली चमक पुन्हा परत येते.
याव्यतिरिक्त, डाय केलेल्या केसांमध्ये एक्स्ट्रा शाईनला बॅलन्स करण्यासाठीही ही ट्रीटमेंट उपयुक्त ठरते. या ट्रीटमेंटमुळे स्प्लिट एंड्स, प्रीझि हेअर ना स्मूथ केल्यामुळे देखील दिलासा मिळतो.
किती प्रकारचे
हेअर ग्लॉसचे २ प्रकार असतात - एक टिंटेड आणि दुसरा क्लीयर टिंटेड हेअर ग्लॉस ट्रीटमेंट. ही ट्रीटमेंट केसांना सूक्ष्म रंगद्रव्य (कलर पिगमेंट) देते, ज्यामुळे केसांना नैसर्गिक ग्लॉसी लूक मिळतो. नैसर्गिक चमक देण्यासाठी हे इनग्रीडीएन्ट्सने समृद्ध क्लीयर ग्लॉसही आहे. बेहेनट्रीमोनियम क्लोराईड आणि एमोडिमेथिकोन हेअर ग्लॉसमध्ये दोन मुख्य घटक आहेत, जे केसांमध्ये चमक टिकवून ठेवतात.





