कथा * सुमन बाजपेयी

‘‘पुरे गं तुझं...सत्यवचन अन् प्रामाणिकपणा हे अगदी पोकळ शब्द आहेत. प्रिंसिपल्स म्हणे...काय देतात ती प्रिन्सिपल्स ज्यांना आयुष्यात धाडस जमत नाही ना, तेच असे बुळबुळीत शब्द वापरून जगत राहतात. तत्त्व, खरेपणा, परिश्रम, घाम गाळणं हे सगळं करून तू तरी काय मोठं मिळवलंय आयुष्यात?’’ सुकांत जोरजोरात ओरडत होता. नीलाला त्या क्षणी आपण आरोपीच्या पिंजऱ्यात उभे आहोत असं वाटत होतं. तिच्या आयुष्याची, तिच्या व्यक्तिमत्त्वाची, तिच्या जीवन मूल्यांची लक्तरं करून वेशीवर टांगण्यात सुकांतला असूरी आनंद मिळत होता. तिचं वागणं कसं चूक आहे हे सिद्ध करण्याचं काम त्याला फार आवडत होतं.

‘‘तू ज्या कमिटमेंटबद्दल बोलतेस ती कमिटमेंट म्हणजे नेमकं काय असतं? आजच्या काळात असे शब्द म्हणजे पोकळ बुडबुडे ठरतात. कोण चिकटून बसतंय आपल्या शब्दांना? अगं सख्खे, अगदी आपलेही वेळ येते, तेव्हा शब्द फिरवतात अन् तू आपली कमिटमेंटला धरून बसतेस.’’

‘‘म्हणजे तुला असं म्हणायचंय की फक्त खोटेपणानं वागणारी, भ्रष्टाचारी, लबाड माणसंच आयुष्यात यशस्वी होतात?’’ सुकांतच्या एवढ्या भडिमारानंतरही नीला माघार घ्यायला तयार नव्हती. बालपणापासून झालेले संस्कार सहजी का आयुष्यातून नाहीसे होतात? अन् त्याला काय हक्क होता तिच्या विचारसरणीला धुडकावून लावण्याचा? या माणसाशी गेली २५ वर्षं ती संसार करतेय. सगळं काही तिनं त्याला समर्पित केलंय अन् तो तिच्या प्रामाणिकपणाला, निष्ठेला, सत्यवचनी असण्यालाच दूषणं देतोय? तिनं आयुष्यात काहीच मिळवलं नाही असं ठामपणे म्हणतोय? अर्थात् सुकांतच्या कनव्हिंसिंग कॅपॅसिटीबद्दल अन् गोष्टी मॅन्युपुलेट करण्याच्या क्षमतेबद्दल कुणाचंच दुमत होणार नाही...तर मग त्या क्षणी नीलालाही आपण हरलो, फेल्युअर ठरलो असं वाटलं तर त्यात गैर काहीच नव्हतं.

‘‘तू हा पोकळ आदर्शवाद न जपता सरळ थोडी आडमार्गानं गेली असतीस, वरिष्ठांचं लांगुलचालन केलं असतं तर आज करिअरमध्ये कुठल्या कुठं पोहोचली असतीस. तूच विचार कर, आज तू कुठं आहेस अन् तुझे ज्यूनिअर कुठच्या कुठं पोहोचलेत ते. तुझ्या योग्यतेचं काय लोणचं घालायचं का? तुझी योग्यता कुणाला समजलीय?’’ सुकांतचा चेहरा अगदी बिभत्स दिसू लागला होता. आज जणू नीलाचा अपमान करण्याचंच त्यानं ठरवलं होतं. स्वत:चा हलकटपणा जेव्हा लपवायचा असतो, तेव्हा दुसऱ्याच्या योग्यतेचे, सन्मानाचे वाभाडे काढणं हा अगदी सोपा मार्ग असतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...