मिश्किली * संतोष शेणवी

काही सिनेमा नट्यांना कुत्र्यांसमवेत फोटो काढून ते छापायची फार हौस असते. असे डॉगी किंवा पपी सोबतचे त्यांचे फोटो बघितले की सौ. उसासे टाकते.

‘‘माझ्याकडेही असाच एखादा छकुला, गब्दुल्ला डॉगी असता तर...’’ ती स्वत:शी पुटपुटते...‘‘मग मी ही असाच झोकात सेल्फी काढून घेतला असता. त्याला घेऊन रोज वॉकिंगला गेले असते, मैत्रीणींवर इंप्रेशन मारलं असतं.’’

एकदा ऑफिसातून घरी पोहोचलो, तेव्हा सौ.च्या मैत्रिणीची पार्टी चालू होती. सौ. सांगत होती, ‘‘अगं काय सांगू? हल्ली तर डॉगींचाच काळ आहे, म्हणजे सध्या ना तिच फॅशन आहे. एकाहून एक सरस देशी, विदेशी कुत्रे मिळताहेत...मलाही असा एखादा डॉगी मिळाला तर किती मज्जा येईल. डॉगीचीही एक वेगळीच ऐट असते हं!’’

त्यावर तिच्या (मूर्ख) सख्यांनीही आपापल्या कुवतीप्रमाणे तिला सल्ले दिले, आपली मतं सांगितली. थोड्याच वेळात त्या निघून गेल्या. सौ. बेडरूममध्ये जाऊन रडत बसली. रडताना ती माझा उद्धार करतच होती.

‘‘कुठल्या दरिद्री माणसाशी लग्न झालंय माझं...एक कुत्रा नाही खरेदी करता येत त्याला. नशिबच फुटकं आहे माझं. लग्नापूर्वी किती स्वप्नं बघितली होती मी...ऐटीत मी चालतेय...सोबत झोकात चालणारा डॉगी आहे.’’

मनातल्या मनात मी म्हटलं, ‘‘अरेच्चा, मी कुणा डॉगीपेक्षा कमी आहे की काय? लग्न झाल्यापासून सतत सौ.च्याच अवतीभोवती घुटमळतो, घोटाळतो आहे. प्रामाणिकपणे, अगदी इमाने इतबारे मी तिचाच आहोत. तरीही शेवटी एकदा ऑफिसला रजा टाकून मी कुत्रा ऊर्फ डॉगी शोधायला निघालो.’’

सगळ्यात आधी मी डॉगी विकणाऱ्यांचा शोध घेतला. त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळवली. तेव्हा समजलं डॉगीच्या किंमती हजारोंमध्ये (हजारो रूपयात) असतात. शिवाय त्यांचा आहारही त्यांच्या डाएट चार्ट प्रमाणे असतो. (भलेही तुम्ही उपाशी राहा.) शिवाय त्यांना वेळोवेळी इजेक्शन वगैरे द्यावी लागतात. डॉगीचा स्पेशल डॉक्टरांकडून ‘चेकअप’ करवून घ्यावा लागतो. तुम्ही उन्हाळ्यानं बेजार, हैराण व्हा किंवा थंडीत कुडकुडत बसा. डॉगीसाठी घरात कूलर आणि हिटर हवाच हवा. ही विलायती कुत्री, सॉरी, डॉगी तशीही नाजूक असतात. जरा दुर्लक्ष झालं तरी ती लगेच कोमेजतात म्हणे.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...