* नरेश साने

मथळा वाचून वाचकांनी दचकू नये हे संभाषण शृंगार रसातील नसून थोडं वेगळं आहे. भारतीय पतीपत्नीत दररोज घडणाऱ्या स्पेशल रोमँटिक संभाषणाची बातमी यातून मिळेल. जे विवाहित आहेत त्यांना समजण्याची गरजच नाही. हे त्यांच्या दैनंदिन आयुष्यात घडत असतं अन् जे भाग्यवान अजूनही अविवाहित आहेत त्यांच्यासाठी ही फुकटची ट्यूशन किंवा धडा आहे. पटलं तर शिका, मानसिकदृष्ट्या स्वत:ची तयारी करा किंवा आमच्या अनुभवाला पाचकळ विनोद समजून दुर्लक्ष करा. जे करायचं ते करा, तुमची मर्जी! आम्हाला काहीच टेन्शन नाहीए.

किस्सा ट्रेनमधला आहे. ट्रेन प्लॅटफॉर्मला लागता लागता आम्ही चपळाईनं जनरल बोगीत जागा पटकावली. पण या चपळाईला काही अर्थच नव्हता कारण डब्यात अजिबात गर्दीच नव्हती. माझ्या समोरच्या सीटवर विंडोजवळ एक नवयौवना बसली होती. तिच्या शेजारी एका मुलानं आपलं सामान रचून अख्खी बर्थ अडवली आहे. माझ्या शेजारीही एक कॉलेज युवती येऊन बसली आहे. ट्रेन हळूहळू सरकायला लागली आहे.

तेवढ्यात अचानक डब्यातल्या सगळ्याच प्रवासी मंडळींचे लक्ष त्या नवयौवनेकडे वेधलं जातं. कानाला मोबाइल लावून मोठ्या आवाजात अगदी स्टायलिशपणे ती बोलू लागली. तिचं बोलणं मजेशीर आहे. इतर कुणीच बोलत नसल्यामुळे तिचं बोलणं अधिकच जोरात ऐकायला येतंय. सगळ्यांचंच लक्ष तिच्याकडे आहे. ती मात्र बिनधास्त आहे. तुम्हीही ऐका ते संभाषण :

‘‘तुम्ही कुठं आहात? मी ही मागच्या जनरल बोगीतच आहे.’’

‘‘अहो सांगतेय ना, मागच्या डब्यात.’’

‘‘कोणत्या जगात वावरता हो?’’ युवती हसत हसत म्हणते, ‘‘मी गेटवरच उभी आहे. नीट बघाल तर दिसेन ना?’’ आम्ही सगळेच दचकलो. कारण ती जागेवर बसूनच बोलतेय. डब्याच्या दारात ती उभी नाहीए.

आता ट्रेननं वेग धरला. बोलणं सूरुच आहे. ‘‘आधी मला सांगा, तुम्ही आहात कुठं? स्टेशनवर आहात तर मला का दिसत नाही? कुणाच्यातरी सोबत असाल...ती कोण तुमची क्लोज फ्रेण्ड नक्कीच ती सोबत असणार... म्हणूनच तर बायकोला ओळख दाखवत नाहीए तुम्ही...’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...