मिश्किली * डॉ. सुरेश मोहन

शिक्षण संपलं. कॅम्पस सिलेक्शनमध्येच मला कोलकात्याला नामांकित कंपनीत छानशी नोकरी मिळाली. मी एका चांगल्या सोसायटीत टू. बी. एचके. फ्लॅट भाड्याने घेतला. नोकरीवर रूजू होताच आईबाबांनी एक मुलगी बघून माझ्यासाठी पसंतही केली. माझ्या संमतीसाठी त्यांनी मला गावी बोलावलं. फोटो दाखवला. मुलीची सर्व माहिती दिली अन् मुलगी बघायला मी रांचीला गेलो. तिथे एका छानशा रेस्टॉरंटमध्ये मी सलोनीला भेटलो. पनीर कटलेट, ग्रिल सॅण्डविच अन् कॉफी घेता घेता आम्ही एकमेकांशी मोकळेपणाने बोललो.

मी तिला म्हटलं, ‘‘मी फार खादाड आहे. मला झणझणीत, चटपटीत, चवीचं खायला आवडतं.’’

‘‘मलाही तुम्हाला काही सांगायचं आहे,’’ कमी बोलणाऱ्या सलोनीने प्रथमच एक सलग वाक्य उच्चारलं. आत्तापर्यंत मी बोलत होतो, ती फक्त ‘हं, हं, हूं, उँहू’ एवढंच करत होती.

‘‘बिनधास्त बोल...कुणावर प्रेम आहे? कुठे अफेयर आहे? काही प्रॉब्लेम आहे?’’ मी एकाच श्वासात अनेक प्रश्न विचारले. मला जरा काळजी पडली; कारण एव्हाना मी गोऱ्या, घाऱ्या, सडपातळ, नाजूक बांध्याच्या, स्टायलिश अन् जरा लाजाळू वृत्तीच्या सलोनीच्या प्रेमात पडलो होतो

‘‘स्वयंपाक येत नाही. कधीच केला नाहीए. आमच्या एकत्र कुटुंबात कायम कुक, खानसामे वगैरे स्वयंपाकाला असतात. मला फक्त खाता येतं,’’ खाली मान घालूनच ती उत्तरली. तिला बहुधा हसायला येत असावं; कारण माझी चलबिचल तिच्या लक्षात आली होती.

‘‘नो प्रॉब्लेम! आपण स्वयंपाकाला बाई ठेवूयात. तसंही, कोलकात्याच्या चिपचिप उकाड्यात स्वयंपाक आय मीन कुकिंग म्हणजे कटकटच असते. गोरी गोरी सलोनी उगीचच सावळी व्हायची,’’ मी विनोद केला. अफेयर वगैरे नाही म्हणताना मी खूपच रिलॅक्स झालो होतो. कोणत्याही किमतीवर सलोनी मला हवी होती.

माद्ब्रयाकडून सलोनीला अन् तिच्याकडून मला होकार मिळताच एका महिन्याच्या आत आमचं ‘शुभमंगल’ पार पडलं. सलोनी माझी ‘जानेमन’, ‘सुप्रिया’, ‘दुलहनिया’, ‘घरवाली’, ‘मिसेस’ अन् हृदयाची राणी बनून माझ्या आयुष्यात आली. आम्ही गोवा, मुंबई, माथेरानला हनीमून साजरा केला. सिनेमा बघितला. बोटिंग केलं, सूर्य न्याहाळला, घोड्यावर बसलो, स्ट्रॉबेरी आइस्क्रीम खाल्लं, रजा संपवून परत कोलकात्याला यायला निघालो तेव्हा सलोनीने म्हटलं, ‘‘कुकची व्यवस्था झाली की मी येते.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...