कथा * पौर्णिमा आरस

डिसेंबर महिन्याची किटी पार्टी रियाच्या घरी होती. हाउसी म्हणजे तंबोलाचा खेळ रंगात आला होता. शेवटचा नंबर अनाउन्स झाला अन् मालिनीची बॉटम लाइन पूर्ण झाली. पंचावन्न वर्षांची मालिनी त्या किटीतली सर्वात वयस्कर सदस्य होती. एरवी मालिनी किती उत्साहात असायची, पण आज बॉटम लाइन पूर्ण होऊनही ती विमनस्क बसून होती. सगळ्यांनी आपापसांत डोळ्यांनीच ‘काय झालंय?’ असं विचारलं अन् कुणालाच काही माहिती नसल्याने नकारार्थी माना हलवत त्यांनी ‘काही ठाऊक नाही,’ असंही सांगितलं.

किटीतली सर्वात लहान सभासद होती रिया. तिनेच शेवटी विचारलं, ‘‘मावशी, आज काय झालंय तुम्हाला? इतके नंबर कापले जाताहेत तरी तुम्ही अबोल, उदास का?’’

‘‘काही नाही गं!’’ उदास होऊन मालिनीने म्हटलं. अंजलीने आग्रहाने म्हटलं, ‘‘मावशी, काही तरी घडलंय नक्की. सांगा ना आम्हाला...’’

अनीता मालिनीची खास मैत्रीण होती. तिने विचारलं, ‘‘पवन बरा आहे ना?’’

‘‘बरा आहे की!’’ मालिनीने उत्तर दिलं, ‘‘चला, हा राउंड पूर्ण करूयात.’’

‘‘बरं तर, हा राउंड होऊन जाऊ दे,’’ इतरांनीही संमती दिली.

हाउसीचा पहिला राउंड संपला तेव्हा रियाने विचारलं, ‘‘न्यू ईयरचा काय कार्यक्रम ठरवलाय तुम्ही?’’

सुमन म्हणाली, ‘‘अजून काहीच ठरलेलं नाहीए. बघूयात, सोसायटीत काही कार्यक्रम असेल तर...’’

नीताचा नवरा विनोद सोसायटीच्या कमेटीचा सभासद होता. तिने म्हटलं, ‘‘विनोद सांगत होते यंदा आपली सोसायटी न्यू ईयरचा कोणताही कार्यक्रम करणार नाहीए. कारण कमिटी मेंबर्समध्ये काही मुद्दयांवर मतभेद आहेत?’’

सारिका वैतागून म्हणाली, ‘‘खरं तर आपल्या सोसायटीत किती छान कार्यक्रम व्हायचा. बाहेर जाण्याची गरजच वाटत नसे. बाहेर एक तर सर्व हॉटेल्समधून गर्दी भयंकर. तासन्तास ताटकळत उभं राहावं लागतं. शिवाय ते जेवण महाग किती पडतं? जा, खा अन् परत या. यात कसली आलीय मजा? सोसायटीचा कार्यक्रम खरंच छान असतो.’’

रियाने पुन्हा विचारलं, ‘‘मावशी, तुमचा काय बेत आहे? पवनकडे जाणार आहात का?’’

‘‘सांगणं अवघड आहे. अजून तरी काहीच ठरलेलं नाहीए.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...