कथा * डॉ. शिल्पा जैन सुराणा

‘‘शिवानी, माझे शर्ट कुठेय?’’ पुनीतने मोठयाने हाक मारत विचारले.

‘‘अरे तू पण ना...? हे काय, इथेच तर आहे... पलंगावर.’’ शिवानी खोलीत येत म्हणाली.

‘‘शर्ट तर फक्त बहाणा होता. तू इकडे ये ना. संपूर्ण दिवस काम करत असतेस.’’

शिवानीला आपल्या मिठीत ओढत पुनीत खटयाळपणे म्हणाला.

‘‘सोड ना, काय करतोस...? खुप कामं आहेत मला.’’ लटक्या रागात शिवानी म्हणाली.

‘‘अगं वहिनी...  सॉरी... सॉरी... चालूदे तुमचे... मी जाते.’’ दरवाजा उघडा असल्यामुळे पावनी सरळ आत आली होती. तिला पाहून दोघांनाही लाजल्यासारखे झाले.

‘‘अगं नाही, असे काहीच नाही. काही काम होते का पावनी?’’ शिवानीने आपल्या नणंदेला विचारले.

‘‘वहिनी, नवी कामवाली आली आहे. आई बोलावतेय तुला.’’ पावनीने सांगितले.

शिवानी या घरची सून नाही तर या घराचा आत्मा आहे. ती या घरात आली आणि अगरबत्तीच्या सुगंधाप्रमाणे प्रेमाचा सुगंध पसरवत घराशी एकरूप झाली. शिवानी आणि पुनीतच्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत. घरात पाऊल टाकताच एका जबाबदार गृहिणीप्रमाणे तिने घराची सर्व जबाबदारी घेतली. शिवानीच्या सासू-सासऱ्यांना तिचे कौतुक करताना शब्द अपुरे पडतात. पावनीलाही ती नणंद न मानता छोटया बहिणीप्रमाणे वागवते.

लग्नानंतर काहीच दिवसांनी शिवानीच्या सासूबाईंना पॅरालिसेस म्हणजे पक्षघाताचा झटका आला. त्यांचे अर्धे शरीर अधू झाले. मात्र शिवानीने केलेल्या सेवेमुळे सहा महिन्यांच्या आतच तिच्या सासूबाईंची तब्येत खूपच सुधारली. ती अगदी मुलीप्रमाणे सासूची काळजी घेत होती. सासूबाईही तिला आपली मुलगी मानायच्या. सासऱ्यांना मधुमेह होता. शिवानी त्यांचे औषध वेळेवर द्यायला विसरली, असा एकही दिवस गेला नव्हता. शिवानी या घराशी एकरूप झाली होती.

‘‘आई, उद्या शाळेत विज्ञानाचा प्रकल्प द्यायचाय. शिक्षकांनी सांगितले की, उद्या सर्वांना प्रकल्प पूर्ण करून द्यावाच लागेल.’’ विभोरने सांगितले.

‘‘अरे बापरे... पुन्हा प्रकल्प...? शिक्षक मुलांना अभ्यासाला लावतात की त्यांच्या पालकांना, हेच समजत नाही. कधी हा प्रकल्प तर कधी तो...’’ शिवानी वैतागली होती.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...