* सुशील यादव

‘‘अहो, काय झालेय? तुम्ही पूर्वीसारखे नाही राहिलात,’’ एका वाक्यात सौभाग्यवतीने प्रस्ताव मांडला.

सरकार कोसळणार, अशी अपेक्षा आम्ही करू लागलो.

‘‘वेडे, अगं ४० वर्षांनंतर तुला असे वाटलेच कसे?’’

‘‘मी विकासाची कितीतरी कामं केली. तू मात्र सर्व चुलीत टाकलीस ना?’’

‘‘काय कमी आहे तुझ्या सरकारात?’’

‘‘त्यानंतर आम्ही आमच्या सरकारची म्हणजे आमची बाजू मांडू. मग समजून जा की, धावणाऱ्या गाडीचे चाक अचानक थांबेल.’’

आम्ही असा सूचक इशारा देऊनही ती अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करते. यावेळीही तिने तसेच केले असते, पण आम्ही जरा भावनांमध्ये वाहून थोडे जास्तच बोललो होतो. त्यामुळे या प्रकरणात आम्ही दाम्पत्य जीवनातील शांतता भंग केली होती.

आम्हाला माहीत होते की, आमचे हृदय पाझरले तर सौभाग्यवतीचा राग पेटून उठेल.

तिला शांत करण्याचा प्रयत्न म्हणून आम्ही म्हणालो, ‘‘सेवानिवृत्तीपूर्वी आम्ही कमवायचो. बैलासारखे कामावरून थेट घरी यायचो. येताना आमच्यासोबत कितीतरी समस्या कामावरून घरी येऊन आदळण्याच्या प्रयत्नात असायच्या त्यांना आम्ही कसेबसे रोखून धरायचो. आताही आम्ही तुझ्या आज्ञेबाहेर नाही. मग तुम्ही पूर्वीसारखे नाही राहिलात, असे तू कसे म्हणू शकतेस?’’

‘‘चल, निदान आधीचे चांगले गुण तरी सांग. अवगुण नंतर ऐकून ठरवू की, नेमके काय बदलले आहे? आज लग्नाच्या ४० वर्षांनंतर तू विरोधी पक्षासारखे खूप मोठे तोंड उघडलेस.’’

‘‘जेव्हा हनिमूनला गेलो होतो तेव्हा तुम्ही माझ्या मागे-पुढे करून सर्व कामं स्वत:च करत होता. बॅगा घेणे, हॉटेलमध्ये काही मागवण्यापूर्वी माझी आवड विचारणे, शॉपिंग मॉलमधून मी केलेल्या खरेदीचे भरभरून कौतुक करणे, वेणू, तुझी पसंत खूपच सुंदर आहे, असे कौतुकाने बोलणे... मी भारावून जायचे. तुम्ही असेही म्हणायचात की, तुझी निवड उत्तम आहे.’’

‘‘म्हणूनच तर आमची निवड केलीत ना?’’

‘‘सगळे पुरुष लग्न झाल्यावर सुरुवातीला असेच वागतात का?’’

आम्ही म्हटले, ‘‘वेणू, काही वर्षांपूर्वी कुठेतरी वाचले होते, जेव्हा नवरा नवी गाडी घेतो तेव्हा त्या गाडीत पत्नीला बसवताना स्वत: दरवाजा उघडतो. ते पाहून लोक २ निष्कर्ष काढतात. एकतर गाडी नवीन असेल किंवा बायको नवी नवरी असेल.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...