मिश्किली * दीपा पांडे

‘‘अरे मित्रा, तोंड पाडून का बसला आहेस? जा, मजा कर. तुझी प्रियतमा लवकरच तुझी जीवनसाथी होणार आहे. बघ, किती छान नशीब आहे तुझे,’’ रमेश जेव्हा मूडमध्ये असायचा तेव्हा लखनवी अंदाजात बोलायचा.

विजय उदास होऊन म्हणाला, ‘‘अजून तुझे लग्न ठरलेले नाही. म्हणूनच तू माझे दु:ख समजू शकत नाहीस.’’

‘‘म्हणजे? काय म्हणायचे आहे तुला? मला खरेच काही समजले नाही. मी तर असेच ऐकले होते की, प्रेम विवाह फिक्स करताना तोंडचे पाणी पळते. पण तुझा तर महिनाभरानंतर साखरपुडा आणि पुढच्या ६ महिन्यांत लग्न आहे...’’

तेवढयात विजयच्या मोबाईलवर मेसेज आला, ‘‘फ्री आहेस का?’’ विजय आपले बोलणे अर्धवट थांबवत उठून उभा राहिला.

विजय आणि रश्मी कॉलेजपासून एकमेकांना पसंत करीत होते. हे सर्व बीटेकच्या पहिल्या वर्षांपासूनच मित्रमैत्रिणींच्या लक्षात आले होते. त्या दोघांनीही हे लपविण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. विजय ब्राह्मण, तर रश्मी वैश्य कुटुंबातील होती. फेअरवेल पार्टीच्या दिवशी मित्रमैत्रिणींनी गंमत म्हणून त्यांचे खोटे लग्नही लावून दिले होते.

विजयने सर्वात आधी रश्मीची पोस्ट आणि तिच्या पगाराबाबत आपल्या घरच्यांना सांगितले. त्यानंतर तिची जात सांगितली. त्याची ही युक्ती कामाला आली. रश्मीचा पगार त्याच्यापेक्षा जास्त होता.

विजयचे वडील म्हणाले, ‘‘सध्या जातीपातीहूनही मोठी महागाई झाली आहे. हे चांगले आहे की, रश्मीचा पगार तसा बऱ्यापैकी आहे. बंगळुरुसारख्या महागडया शहरात तुम्हाला चांगल्या प्रकारे उदरनिर्वाह करता यावा यासाठी दोघांनी मिळून कमाविणे खूपच गरजेचे आहे. पण, तुझा प्रेम विवाह आहे. त्यामुळे आम्ही हुंडा मागू शकत नाही. म्हणूनच आम्ही विचारपूर्वक असा निर्णय घेतला आहे की, तुम्ही दोघांनी स्वत:च्या लग्नाचा खर्च स्वत:च करावा.’’

तिकडे रश्मीच्या आईनेही फोनवरून लगेचच निर्णय देऊन टाकला की, ‘‘जातीपातीबाहेर तुझे लग्न लावून देऊ, पण तुझ्या छोटया बहिणींच्या लग्नात हेच लोक जास्त हुंडा मागतील. म्हणूनच तू तुझ्या लग्नाचा खर्च स्वत: कर... ३-४ वर्षांची सेव्हिंग तुझ्याकडेच आहे. आम्ही तुझ्याकडून कधीच काही घेतले नाही.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सब्सक्राइब करें

डिजिटल + 24 प्रिंट मैगजीन

(1 साल)
USD79
 
सब्सक्राइब करें
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...