* प्रतिनिधी

चणाडाळ टाकून कारलं

काय लागेल

* २५० ग्रॅम छोटी कारली

* अर्धा कप चणाडाळ

* अर्धा छोटा चमचा हळद पावडर

* २ छोटे चमचे धने पावडर

* अर्धा छोटा चमचा लाल तिखट

* १ छोटा चमचा बडीशेप पावडर

* १ छोटा चमचा गरम मसाला

* १ तमालपत्र

* १ मसाला वेलची

* २ लवंग

* ४ काळी मिरी

* १ मोठा चमचा टोमॅटो प्युरी

* १ छोटा चमचा जिरे

* अर्धा कप कांदा बारीक चिरलेला

* १ छोटा चमचा आलं व लसूण पेस्ट

* रिफाइंड तेल

* थोडीशी कोथिंबीर चिरलेली

* मीठ चवीपुरतं.

कसं कराल

कारली वरून खरवडून गोल गोल कापून थोडसं मीठ व हळद लावून अर्धा तास ठेवा. चणाडाळदेखील अर्धा तास भिजत ठेवा. कारली अर्ध्या तासानंतर पाण्याने स्वच्छ धुऊन व फडक्याने कोरडी करून घ्या. गरम तेलामध्ये डीप फ्राय करा. एका प्रेशर पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून सर्व खडे मसाल्यांना फोडणी देऊन चणाडाळ टाका. हळद व मीठ टाका. पाणी चणाडाळी एवढंच टाका. एक शिट्टी द्या. जेव्हा कुकर थंड होईल तेव्हा प्रेशर पॅन खोला. सर्व मसाले व टोमॅटो प्युरीदेखील टाका. जेव्हा डाळीतील पाणी सुकेल तेव्हा त्यामध्ये फ्राय केलेले कारल्याचे काप टाका. १ मिनिटं अजून आचेवर ठेवा. नंतर गरम गरम कारलं डाळ सर्व्हिंग बाऊलमध्ये टाका. कोथिंबीरने सजवून खायला सर्व्ह करा.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...