कथा * पूनम पांडे

‘‘कोणीतरी किती खरे सांगितले आहे की, जे नाते निर्माण व्हायचे असते ते जन्माला येतेच. नियतीमागे दडलेले रहस्य कोण समजून घेऊ शकले आहे? ती असा काही खेळ खेळते की, दोन अनोळखी व्यक्तींची एखाद्या वळणावर अगदी सहज भेट घडते.’’

ते दोघेही जवळपास महिनाभरापासून एकमेकांना ओळखत होते. रोज संध्याकाळी आपापल्या घरातून फिरण्यासाठी बाहेर पडत आणि पार्कमध्ये बसून गप्पा मारत.

आजही दोघांनी एकमेकांकडे पाहिले आणि हसतच एकमेकांना नमस्कार केला.

‘‘काय मग, आज सकाळपासूनच सर्व व्यवस्थित घडले ना?’’

रमाजींनी विचारले असता रमणजींनी होकारार्थी उत्तर दिले.

आणि त्यानंतर दोघांमध्ये त्या विषयाला धरून गप्पा सुरू झाल्या.

रमा त्यांच्यापेक्षा ५ वर्षांनी लहान होत्या. तरीही त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकून स्वत:चे मत मांडत असत.

रमणजींनी त्यांना सांगितले होते की, ते कुटुंबात खुश नाहीत. कारण सर्व स्वत:चाच विचार करतात. प्रत्येकाचे स्वत:चे असे वेगळे जग आहे आणि ते त्या जगामध्येच रमतात.

रमणजींचा स्वभावच असा होता की, जेव्हा ते गप्पा मारू लागत तेव्हा बाबा-बुवांसारखे बोलत. ते विचारत, रमाजी, ‘‘तुम्हाला माहीत आहे का? तेव्हा त्या लगेचच म्हणत, ‘नाही माहीत... नाही,’ जर माहीत आहे असे म्हटले तरी ते न हसता धीरगंभीरपणे स्वत:ला जे वाटत असे तेच बोलत, ‘‘या जगात पुण्याची दोनच फळे आहेत - एक म्हणजे तुम्हाला जे हवे असेल ते न मिळणे आणि दुसरे म्हणजे तुम्हाला जे हवे आहे ते मिळणे.’’

हे ऐकून रमाजी भरपूर हसायच्या. ते पाहून रमणजी आपल्या बोलण्याचा अर्थ अधिक स्पष्ट करीत सांगायचे की, ‘‘देवाच्या चरणी लीन होताच लाखमोलाचे समाधान मिळते. परमात्म्यात रमणाऱ्या मनाला आणि तीर्थक्षेत्री दान करणाऱ्यांना सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्याचे उत्तर मिळतेच.’’

‘‘आणि हो, रमाजी नीट ऐका, हे जे आयुष्य आहे ते कितीही मोठे असले तरी नास्तिक झाल्यास आणि त्या परमात्म्याला विसरल्यास छोटेही होऊ शकते.’’

हे सर्व ऐकल्यावर रमाजी आपले हसणे लपवत विचारायच्या, ‘‘हो का? मग तुमचा आश्रम कुठे आहे, जेथे दीक्षा घेता येईल?’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...