कथा * गरिमा पंकज

‘‘काहीतरी नक्कीच होते आपल्या दोघांमध्ये... आजही तुला बघून मनाच्या तारा आपसूकच छेडल्या जातात...’ नेहाकडे पाहताच अमितच्या तोंडातून नकळतच शब्द बाहेर पडले. मोकळे सोडलेले केस, टपोरे डोळे, कपाळावर उभी टिकली आणि डोळयांत कितीतरी प्रश्न... आपल्या साडीचा पदर सावरत नेहाने वळून पाहिले आणि त्याचवेळी दोघांची नजरानजर झाली.

अमित एकटक तिला पाहतच राहिला. नेहाच्या नजरेनेही क्षणात त्याला ओळखले होते. अमितला काहीतरी बोलायचे होते, पण नेहाने स्वत:ला सावरले आणि आपले लक्ष दुसरीकडे वळवले.

अमितला असे वाटले की, क्षणभर मिळालेला आंनद दुसऱ्याच क्षणी हरपला. नेहाने नजर चोरत पुन्हा त्याच्याकडे पाहिले. अमित अजूनही तिच्याकडेच बघत होता.

‘‘हॅलो नेहा,’’ अमितला रहावले नाही. तो तिच्या जवळ गेला.

‘‘हॅलो, कसे आहात?’’ दबक्या आवाजात नेहाने विचारले.

‘‘जसे सोडून गेली होतीस,’’ अमितने उत्तर दिले. ते ऐकून नेहाने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले आणि हसत म्हणाली, ‘‘असे अजिबात वाटत नाही. थोडे जाड झाला आहात.’’

‘‘हो का?’’ असे म्हणत अमितही हसला.

दोघेही जवळपास ४ वर्षांनंतर एकमेकांना भेटले होते. ४ वर्षांपूर्वी असेच स्टेशनवर येऊन नेहाला गाडीत बसवून अमित तिच्यापासून वेगळा झाला होता. नेहा त्याच्या आयुष्यातून दूर जात होती. अमितला तिला थांबवायचे होते, पण दोघांचा स्वाभिमान आडवा आला. ती माहेरी जात होती. दोघांनाही माहीत होते की, ती कायमची जात आहे. पुन्हा परत येणार नाही. त्यानंतर २ महिन्यांच्या आतच घटस्फोटाची कागदपत्रे अमितला मिळाली. दीर्घ कायदेशीर कार्यवाहीनंतर दोघांच्या जीवनाचे मार्ग वेगळे झाले.

‘‘चहा घेणार की कॉफी?’’ मनात दाटून आलेल्या जुन्या आठवणींना आवर घालत अमितने विचारले.

‘‘हो, कॉफी घेईन. तुम्ही मात्र चहा घ्याल ना? पण मला कॉफीच प्यायला आवडेल.’’

‘‘हो, चालेल. लगेच घेऊन येतो.’’

नेहा कॉफी आणायला गेलेल्या पाठमोऱ्या अमितकडे बराच वेळ पाहत होती. घटस्फोटानंतर तिने लग्न केले होते, पण अमित अजूनही एकटाच राहत होता. नेहा त्याच्या मनात अजूनही कायम होती. नेहासोबतही असेच काहीसे घडले होते, पण लग्नानंतर सर्व बदलते. तसेच नेहालाही बदलावे लागले.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...