मिश्किली * पारुल पारवे

‘‘प्रिया, कुठं आहेस तू? जरा चाखून बघ आणि सांग बरं, भाजी कशी झाली आहे?’’ सासूबाईंची अशी हाक ऐकली की माझी भीतिनं गाळण उडते. अगदी निर्मनुष्य रस्त्यावर एखाद्या जुनाट पडक्या हवेलीतून काही आवाज ऐकल्यावर एकट्या वाटसरूची कशी अवस्था होईल तशी माझी अवस्था होते. म्हणजे माझ्या सासूबाई चेटकिणीसारख्या भेसूर, विद्रूप वगैरे नाहीएत. त्या छान गोऱ्यापान, सुंदर, नीटनेटक्या, थोडक्यात म्हणजे सुनेला चॅलेंज देणाऱ्या मॉडर्न सासूबाई आहेत.

आता तुम्ही म्हणाल, मग एवढं घाबरण्याचं कारण काय? घाबरायला होतं त्यांच्या स्वयंपाकामुळे, होय स्वयंपाकामुळेच निसर्गानं त्यांना रूप, सौंदर्य भरभरून दिलं, पण स्वयंपाकाची कला अजिबातच दिली नाही. माहेरी सुंदर म्हणून खूप कौतुक झालं. स्वयंपाकघरात कधी पाय ठेवला नाही. स्वयंपाक कधी केलाच नाही. सासरी सौंदर्याचं कौतुक नव्हतं. झपकन स्वयंपाक करावा लागला. पण त्यांनी काय शिजवलं अन् घरातल्यांनी काय खाल्लं याचा कधी ताळमेळ बसला नाही.

घरातली पुरूष मंडळी उगीच वाद घालत बसली नाहीत. त्यांनी घरातल्या जेवणाचा अनादर करायचा नाही म्हणून पहिलं वाढलेलं जेमतेम संपवून हात धुण्याचा मार्ग निवडला...मग उदर भरण्यासाठी बाहेर हॉटेल्स, रेस्टॉरंट, टपऱ्या, धाबे असं खूप काही असतंच, पण घरात अजून एक सदस्य आहे ज्यांना सासूबाईंचं रूप काय, रांधणं काय, काहीच आवडलं नाही. या म्हणजे माझ्या दुसऱ्या सासूबाई. नाही नाही गैरसमज नको. माझे सासरे खूपच सज्जन आहेत. त्यांचं एकच लग्न झालंय. या दुसऱ्या सासूबाई म्हणजे माझ्या सासूबाईंच्या थोरल्या जाऊ. म्हणजे माझ्या सासूबाईच झाल्या ना! यांना माझ्या सासूचं पाककौशल्य अजिबात आवडत नाही. त्या म्हणतात, ‘‘कधी आपल्यासारख्या फक्क गोऱ्या भाज्या करते, म्हणजे तिखट, हळद, मसाले काहीच न वापरता भाज्या करते तर कधी सूड उगवल्यासारख्या काळ्या ठिक्कर...म्हणजे भाज्या जाळून ठेवते...एकूण स्वयंपाक बेचवच!’’

आता या घरातली सध्या तरी मी एकुलती एक सून. त्यातून नाव प्रिया. मला सगळ्यांची प्रिय बनून राहणं भाग आहे. सुरूवातीला मी दोघींनाही खुश ठेवण्यासाठी त्या म्हणतील तसं करायची. परिणाम असा झाला की एकीचं ऐकलं की दुसरीला वाटे मी भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानांत गेलेय. एक माझा हात धरून तिच्याकडे ओढायची, दुसरी माझी पाय धरून तिच्याकडे ओढायची.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...