* आल्प्स ब्युटी क्लिनिकच्या संस्थापक, संचालिका डॉ. भारती तनेजा द्वारे
माझे वय २४ आहे. माझ्या चेहऱ्यावर अनेक लहान तीळ आहेत. यामुळे चेहरा खराब दिसतो. तीळ कायमचे बरे होऊ शकतात का?
तुमच्या चेहऱ्यावर असलेले तीळ कोणत्याही चांगल्या कॉस्मेटिक क्लिनिकमध्ये काढले जाऊ शकतात. यासाठी विशेष प्रकारची शस्त्रक्रिया करावी लागते. ते काढून टाकल्यानंतर होमिओपॅथीची औषधे घेतल्यास खूप फायदा होतो. तसे तीळ होण्याची अनेक कारणं आहेत. अनेक वेळा बाहेर जास्त वेळ उन्हात राहिल्याने चेहऱ्यावर तीळ येतात.
हे टाळण्यासाठी तुम्ही बाहेर जाताना सनस्क्रीन जरूर लावा, ही समस्या हार्मोनल असंतुलनामुळेदेखील होते. हे तपासण्यासाठी चांगल्या एंडोक्राइनोलॉजिस्टशी संपर्क साधा.
मी ३१ वर्षांची आहे. माझ्याकडे वेळ खूप कमी असतो. यामुळे मी माझ्या त्वचेची काळजी घेऊ शकत नाही. माझी त्वचा कोरडी आणि खराब होणार नाही यासाठी मला कमी वेळात जास्त फायदे देणारा स्किन केअर रूटीन सांगा?
उन्हात बाहेर जाण्यापूर्वी एसपीएफ ३० असलेले सनस्क्रीन वापरा. डीप स्वच्छतेसाठी दररोज सकाळी उठून चेहरा स्क्रब करा. घरी स्क्रब बनवण्यासाठी १ चमचा मुलतानी माती, अर्धा चमचे चंदन पावडर आणि काही खसखसीचे दाणे दुधात किंवा गुलाब पाण्यात मिसळून पेस्ट बनवा आणि याने आपला चेहरा हलक्या हाताने स्क्रब करा.
या स्क्रबमुळे डेड स्किन निघून जाईल. रात्री चेहरा स्वच्छ केल्यानंतर तुम्ही एएचए क्रीमदेखील वापरू शकता.
माझी मुलगी १९ वर्षांची आहे. काही महिन्यांपूर्वी तिने केसांचे पमिंग केले आणि आता त्यामुळे केस गळत आहेत. कृपया माझ्या समस्येवर उपाय सुचवा?
पमिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे केस कोरडे होतात, पण ते गळण्याचा पमिंगशी काहीही संबंध नाही. या समस्येच्या मुळापर्यंत जाण्यासाठी, तुमच्या मुलीची रक्त तपासणी करा आणि डॉक्टरांनी सांगितलेली औषधे घ्या.
खाण्यासाठी प्रथिनेयुक्त अन्न घ्या. जर तुम्ही मांसाहारी असाल तर अंडी, मासे घ्या आणि शाकाहारी असाल तर डाळी, अंकुरलेले धान्य घ्या. केसांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी हा पॅक बनवा. यासाठी एक केळी मिक्सरमध्ये मॅश करा, त्यानंतर त्यात ३ चमचे दूध, मध आणि ऑलिव्ह ऑईल मिसळा आणि केसांना लावा. काही तासांनी केस साध्या पाण्याने धुवा. हे लक्षात ठेवा की या पॅकनंतर केस शॅम्पूने लगेच नाही तर १ किंवा २ दिवसांनी धुवावेत.