* डॉ. कपिल अग्रवाल, संचालक, हॅबिलिट सेंटर फॉर बॅरिएट्रिक आणि
लॅपरोस्कोपिक शस्त्रक्रिया
प्रश्न : मी ३२ वर्षांची आहे आणि माझे वजन १०८ किलो आहे. मी डायटिंग आणि व्यायामाद्वारे वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करते, पण फारसा फरक पडत नाही. बाजारात उपलब्ध असलेली वजन कमी करणारी औषधे आणि सप्लिमेंट्स घेणे सुरक्षित आहे का आणि ते प्रभावी आहेत का?
उत्तर : वजन कमी करण्यासाठी औषधे आणि पूरक आहारांचा वापर केला जाऊ शकतो. त्याचा प्रभाव असतो पण तो फार कमी काळ टिकतो. तुम्ही औषध घेणे बंद करताच, वजन पुन्हा वाढू लागते. दुसरे म्हणजे वजनात फक्त ५ ते १० टक्केच फरक पडतो.
ही औषधे आणि सप्लिमेंट्स फक्त काही जास्त वजन असलेल्या सामान्य लोकांवरच प्रभावी असल्याचे सिद्ध होते. हे मेंदूतील सेरोटोनिन रिसेप्टर २ सक्रिय करते. या रिसेप्टरच्या सक्रियतेमुळे भूक कमी होते आणि थोडेसे अन्न खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते. खूप लठ्ठ असलेल्या लोकांवर या औषधाचा कोणताही परिणाम होत नाही. तुम्हाला हे समजून घेणे आवश्यक आहे की जर तुम्हाला लठ्ठपणाची अनुवांशिक पूर्वस्थिती असेल, तर तुमच्याकडे शस्त्रक्रिया आणि नियमित संतुलित आहार व व्यायामच पर्याय आहे.
प्रश्न : मी ४० वर्षांचा आहे. बऱ्याच दिवसांपासून मला माझे ओटीपोट आणि मांडीच्यामध्ये सूज येत आहे. हळूहळू त्यात वाढ होत आहे. मी डॉक्टरांना दाखवल्यावर त्यांनी हर्नियाची तक्रार सांगितली आणि ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. मला ऑपरेशनची भीती वाटते याला दुसरा पर्याय आहे का?
उत्तर : हर्निया रोगावर शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आहे. इतर कोणत्याही औषधाने तो बरा होऊ शकत नाही. आजकाल हर्नियाची शस्त्रक्रिया लॅपरोस्कोपीद्वारे ही केली जाते. यामध्ये घाबरण्यासारखे काही नाही कारण शस्त्रक्रिया फक्त ३ छोटी छिद्र्रे करून केली जाते. रुग्णाला २४ तासांच्या आत रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जातो. म्हणून कोणतीही भीती किंवा शंका न बाळगता आपण एखाद्या सक्षम सर्जनकडून आपली शस्त्रक्रिया करून घ्यावी.