* डॉक्टर सागरिका अग्रवाल, स्त्रीरोगतज्ज्ञ, इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल, नवी दिल्ली
प्रश्न : मी २५ वर्षांची विवाहित महिला आहे. माझी काही स्वप्ने आहेत, त्यामुळे मला सध्या आई व्हायचे नाही. जर मला वयाच्या ३५-३६ व्या वर्षी आई व्हायचे असेल तर यात काही अडचण येऊ शकते का? काही लोक म्हणतात की या वयात आई होणे शक्य नाही. ते खरे आहे का?
उत्तर : वाढत्या वयानुसार अंडयांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कमी होऊ लागतात, त्यामुळे या वयात गर्भधारणा होणे कठीण होते. जर तुम्ही वयाच्या ३५ व्या वर्षी आई होण्याचा निर्णय घेतला असेल तर यात काही अडचण नाही. आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अशी अनेक तंत्रे उपलब्ध आहेत, ज्याद्वारे या वयातही गर्भधारणा करता येते. यासाठी तुम्ही आयव्हीएफची मदत घेऊ शकता.
तुम्ही अजून तरुण आहात, त्यामुळे तुमच्या अंडयांचा दर्जा चांगला असेल. तुम्ही तुमची निरोगी अंडी गोठवू शकता जे तुमच्यासाठी भविष्यात आई होण्यासाठी उपयुक्त ठरेल आणि आयव्हीएफ उपचारदेखील सहज पूर्ण होतील. गोठवलेले अंडे तुमच्या पतीच्या शुक्राणूमध्ये मिसळले जाईल आणि प्रथम गर्भ तयार केला जाईल आणि नंतर तो गर्भ तुमच्या गर्भाशयात रोपण केला जाईल. काही दिवसात तुम्हाला गर्भधारणेची चांगली बातमी मिळेल.
प्रश्न : मी ३५ वर्षांची आहे, माझ्या लग्नाला ८ वर्षे झाली आहेत, पण अजूनही गर्भधारणा होऊ शकलेली नाही. मला धूम्रपानाची ही सवय आहे. मी आई होऊ शकेन, असा काही मार्ग आहे का?
उत्तर : या वयात गर्भधारणा होण्यात समस्या येणे सामान्य आहे, परंतु याचे सर्वात मोठे कारण म्हणजे धूम्रपान. जर तुम्हाला आई व्हायचे असेल तर तुम्हाला धूम्रपान पूर्णपणे सोडून द्यावे लागेल. जर तुमचा पतीदेखील धूम्रपान करत असेल तर त्याला ही सवय सोडण्यास सांगा. तुमचे वय मोठे आहे, त्यामुळे लवकर गर्भधारणा होणे गरजेचे आहे, अन्यथा वाढत्या वयाबरोबर समस्या अजून वाढू शकते. यासाठी सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर उपचाराने फायदा होत नसेल तर तुम्ही आयव्हीएफ उपचाराची मदत घेऊ शकता.