शरीराची दुर्गंधी आता नाही

– पारूल भटनागर

नेहा खूपच सुंदर होती व नेहमी युनिक स्टाईल परिधान करणे पसंत करायची, परंतु तरीदेखील तिच्या मैत्रिणी तिच्याजवळ जास्त वेळ बसणे टाळायच्या. ती मनातल्या मनात विचार करायची की मी तर सर्वांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनव्या स्टाईल परिधान करते, परंतु तरीदेखील सगळया माझ्यापासून पळ काढतात.

एक दिवस जेव्हा तिने वैतागून स्नेहाला याचे कारण विचारले, तेव्हा तिने म्हटले की तुझ्या शरीरातून खूप दुर्गंध येते, जी कोणीही सहन करणे अवघड आहे. त्यामुळे सगळेजण तुझ्यापासून दूर पळतात. तेव्हा कुठे नेहाच्या खरी समस्या लक्षात आली व तिने या समस्येच्या निराकरणाविषयी माहिती घेतली, जेणेकरून तिच्या शरीराची दुर्गंधी तिच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव कमी करणार नाही.

काय आहे शरीराची दुर्गंध

शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी शरीरातून घाम बाहेर पडतो. तसं बघता घामासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरतात. यात प्रमुख आहेत बॅक्टेरिया. यामुळेच नेहमी शरीरातून दुर्गंधी येते. बॅक्टेरिया अॅपोक्राईन ग्रंथीच्या उत्सर्जनातून विकसित होतात. हे अमिनो अॅसिडची निर्मिती करतात. परिणामी दुर्गंधीयुक्त गंध येतो.

दुर्गंध घालवण्यासाठीचे घरगुती उपाय

बेकिंग सोडा : हा त्वचेतून मॉईश्चर शोषून घेण्यासोबतच दुर्गंध दूर करतो. सोबतच हा बॅक्टेरिया नष्ट करून नैसर्गिक सुवासासारखे काम करतो.

कसे लावावे : एक चमचा बेकिंग सोडयामध्ये एक चमचा लिंबाचा रस    मिसळून तो काख व त्या जागी लावा, जिथे जास्त घाम येतो. नंतर थोडयावेळाने पाण्याने धुवावे. असे काही आठवडयांपर्यंत रोज करावे.

अॅपल साइडर विनेगर : हा बॅक्टेरियाशी लढण्यासाठी अतिशय अॅक्टिव्ह इन्ग्रीडियंट आहे. सोबतच हा त्वचेचा पीएच बॅलन्स संतुलित ठेवून शरीराची दुर्गंधी कमी करण्याचे काम करतो.

कसे लावावे : अॅपल साइडर विनेगरमध्ये कापसाचा बोळा घालून तो काखेमध्ये चोळावा. नंतर दोन ते तीन मिनिटांनी धुवावे. असे रोज दोन वेळा करावे.

लिंबाचा रस : याचा अॅसिडिक गुणधर्म त्वचेच्या पीएच लेवलला कमी करतो, ज्यामुळे दुर्गंध निर्मिती करणारा बॅक्टेरिया वाढू शकत नाही.

कसे लावावे : लिंबू कापून त्याचा एक भाग काखेवर चांगला रगडावा व नंतर ते धुवावे. ही प्रक्रिया रोज तोपर्यंत करावी, जोपर्यंत दुर्गंधी निघून जात नाही.

रोजमेरी : यात सुगंधाचा नैसर्गिक गुण असल्याकारणाने हा दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियाला नष्ट करण्याचे काम करतो.

कसे लावावे : चार कप गरम पाण्यात अर्धा कप वाळलेली रोज मेरीची पाने घालून दहा मिनिटे ठेवावे. नंतर हे पाण्यात घालून अंघोळ करावी. ही प्रक्रिया रोज केल्याने दुर्गंधी निघून जाईल.

टी ट्री ऑईल : टी ट्री ऑईलमध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने हे त्वचेत असणाऱ्या बॅक्टेरियांना नष्ट करण्याचे काम करते.

कसे लावावे : दोन चमचे पाण्यात दोन थेंब ऑइल घालून काखेवर लावावे. तुम्ही या मिश्रणाला स्प्रे बॉटलमध्येदेखील भरून ठेवू शकता. यामुळे शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका होते.

या गोष्टींचीदेखील विशेष काळजी घ्यावी

* जेव्हा तुम्ही शॉवर घ्याल, तेव्हा प्रयत्न करा की एक वेळेस कोमट पाण्यानेदेखील अंघोळ करावी, कारण हे आपल्या त्वचेत लपलेल्या बॅक्टेरियांना नष्ट करण्याचे काम करते.

* नॅचरल फायबरचे कपडे परिधान करावेत, कारण यात हवा खेळती राहते, ज्याने घाम साठत नाही.

* एका संशोधनानुसार लसूण, कढीलिंब वा अन्य मसाले तुमच्या घामाचा वास वाढवू शकतात. त्यामुळे मसालेदार न खाण्याचे पथ्य पाळावे.

* आपल्या काखेतील केस वेळोवेळी साफ करत रहावेत, कारण केस असल्याने घाम शोषण्याची प्रक्रिया मंदावते, ज्याने शरीरातून दुर्गंधी येते.

* रोज आपली काख अँटी बॅक्टेरियल साबणाने स्वच्छ करावी, कारण यामुळे बॅक्टेरियाच्या संख्येत घट होते व शरीरातून दुर्गंधी येत नाही.

* जेव्हा तुम्ही अंघोळ कराल, तेव्हा आपल्या शरीराला चांगल्या रीतीने पूसा, विशेषत: त्याजागी जिथे सर्वात जास्त घाम साठतो.

* उन्हाळयात जास्त घाम आल्याकारणाने कपडे लवकर ओले होतात, जे जास्त वेळ घातल्याने दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे ते बदलावेत.

* आवडीचा सुवास असणाऱ्या परफ्युम्सना आपल्या पर्सनॅलिटीचा भाग जरूर बनवा. यामुळे शरीराच्या दुर्गंधीपासून सुटका तर होईलच, तुम्हालाही ताजेतवाने वाटेल.

हनिमून सिस्टाइटिस किडनीसाठी धोकादायक

– डॉ. विपिन त्यागी, कंसल्टंट युरोलॉजिस्ट अॅन्ड रोबोटिक सर्जन,  गंगाराम हॉस्पिटल, नवी दिल्ली

ज्या महिला नियमित लैंगिक संबंध ठेवतात, त्यांच्या ब्लॅडरमध्ये मोठ्या संख्येने बॅक्टेरिया जातात. सतत लैंगिक संबंध ठेवून झालेल्या संसर्गाला हनिमून सिस्टाइटिस म्हटले जाते.

युरिनरी ट्रॅक्ट संसर्ग यूटीआय, युरेथरा (मूत्रनळी) ब्लॅडर (मूत्राशय), युरेटर्स (मूत्रवाहिनी) आणि किडनी (मूत्रपिंड) यांच्या संसर्गाला म्हणतात. हे शरीराचे ते भाग आहेत, ज्यांमधून मूत्र शरीराबाहेर येते. युटीआयमध्ये मूत्रमार्गाचा कुठलाही भाग बाधित होऊ शकतो. यूरिनरी ट्रॅक्टचा संसर्ग जितक्या वर असेल तितकाच तो गंभीर असतो. यानुसार यूटीआयचे अपर आणि लोअर असे वर्गीकरण केले आहे. यूटीआय संक्रमण गंभीर होऊन डीहायडे्रशन, सेप्सिस, किडनी फेल्युअरचे कारण बनू शकते.

या संसर्गाचा धोका अशा महिलांमध्ये जास्त असतो :

* ज्या गर्भनिरोधक म्हणून डायफ्राम किंवा स्पर्मिसीडलचा वापर करतात.

* ज्यांच्या यूरिनरी ट्रॅक्टमध्ये बाधा निर्माण होते जसे की मूतखडा होणे.

* एखाद्या आरोग्याशी संबंधित समस्येमुळे ब्लॅडर पूर्णपणे रिकामे होत नाही. उदाहरणार्थ स्पायनल कॉर्ड इंजुरी.

* ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल. एड्स, डायबिटिज, अवयव प्रत्यारोपण करून घेणारे रूग्ण आणि असे रूग्ण ज्यांच्यामध्ये कर्करोगाच्या उपचारासाठी केमोथेरपी केली गेली असेल अशांचा समावेश आहे.

* वयस्क लोक आणि मुलांमध्येही याचा धोका निर्माण होऊ शकतो, कारण ते त्यांचे गुप्त अवयव व्यवस्थित स्वच्छ करू शकत नाहीत.

महिलाच अधिक बळी का पडतात

* महिलांमध्ये युरेथराची लांबी पुरूषांच्या तुलनेत कमी असते. यामुळे बॅक्टेरिया तिथे सहज पोहचतात.

* महिलांमध्ये युरेथरा गुदमार्गाच्या जास्त जवळ असते. यामुळे गुदमार्गातील बॅक्टेरिया युरेथरापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते. लैंगिक संबंधादरम्यान बॅक्टेरिया युरेथरामध्ये पोहोचण्याची शक्यता अधिक असते.

* गर्भनिरोधक म्हणून डायफ्राम वापरल्याने युरेथरावर दबाव येतो. यामुळे ब्लॅडरमधील मूत्र पूर्णपणे रिकामे होत नाही. जेव्हा ब्लॅडरमध्ये थोडे मूत्र शिल्लक राहते, तेव्हा त्यामध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊ लागतात आणि संसर्गाचा धोका वाढतो.

* मेनोपॉजनंतर यूटीआय संसर्गाचा धोका वाढतो. कारण अॅस्ट्रोजन हार्मोन्सची कमी झाल्यामुळे व्हजायना युरेथरा आणि ब्लॅडरच्या खालच्या भागातील पेशी पातळ आणि कमकुवत होतात.

या तुलनेत पुरूषांमध्ये युटीआयचा धोका कमी असतो. कारण त्यांचा युरेथरा लांब असतो आणि विरोध करण्यासाठी बनणारे द्रव्य बॅक्टेरियाशी लढण्यास सक्षम असतात.

युटीआय थांबवण्यासाठी काही टीप्स

* बऱ्याच प्रमाणात पाणी किंवा द्रव्य पदार्थ घ्यावेत. यामुळे तुम्ही जितक्या वेळा लघवी कराल, बॅक्टेरिया शरीरातून बाहेर फेकले जातील.

* लघवी कधीही थांबवू नये.

* मलमूत्र विसर्जन केल्यानंतर पुढून मागच्या बाजूने धुवावे, मागून पुढच्या बाजूने धुवू नये. यामुळे गुदमार्गाजवळील बॅक्टेरिया व्हजायना आणि युरेथरापर्यंत पोहोचण्याची शक्यता कमी होईल.

* लैंगिक संबंध झाल्यानंतर गुप्त अंग धुवून स्वच्छ करावे व लघवी करावी म्हणजे बॅक्टेरिया शरीरातून बाहेर निघून जातील.

* जर डायफ्रामच संसर्गाचे कारण असेल तर गर्भनिरोधक म्हणून इतर साधनांचा वापर करावा.

* कोणाही प्रौढ व्यक्तीमध्ये किंवा मुलांमध्ये ही युरेनरी ट्रॅक्ट संसर्गाशी लक्षणे आढळली तर लक्षणे दिसल्याच्या २४ तासांच्या आत डॉक्टरांना भेटा.

* डॉक्टरांनी अॅण्टीबायोटिकचा कोर्स दिल्यास तो पूर्ण करा व बरे वाटत असले तरीही उपाचार सुरू ठेवा.

* कॉफी आणि अल्कोहोलचे सेवन करू नये. यामुळे ब्लॅटरला त्रास होतो.

* धुम्रपानही करू नये. यामुळेही ब्लॅडरला हानी निर्माण होते.

उपचार

प्रोस्टेट बरे करण्यासाठी अनेक उपचार उपलब्ध आहेत. यात औषधे, थेरेपी आणि सर्जरीचा समावेश होतो. कोणते उपचार योग्य ठरतील हे अनेक गोष्टींवर अवलबूंन असते. जसे की प्रोटेस्टचा आकार काय आहे, रूग्णांचं वय, रूग्णांचं पूर्ण शरीर स्वास्थ तसेच लक्षणे किती गंभीर आहेत इ.

जर लक्षणे अधिक गंभीर नसतील तर काही दिवस उपचार न करता लक्षणांवर नजर ठेवावी. काही लोकांमधील याची लक्षणे आपोआप निघून जातात.

औषधे : लक्षणे जास्त गंभीर नसतील तर औषधे घेणे हा सर्वोत्तम उपचार आहे. अल्फा ब्लॉकर हे औषध मूत्राशयावरील भागातील स्नायू आणि त्या तंतूंना आराम मिळवून देते, ज्यामुळे मूत्र विसर्जन सोपे होते. ५-अल्फा रिडक्टस इनहिबिटर्स औषध हार्मोन्स परिवर्तन थांबवून प्रोस्टेस्ट संकूचित करते. जर ही दोन्ही औषधे वेगवेगळी उपयोगी ठरली नाहीत तर डॉक्टर दोन्हीही एकत्र घेण्याचा सल्ला देतात.

मिनिमली इनवेसिव सर्जरी : जर लक्षणे मध्यमपासून ते गंभीर आहेत आणि औषधांनी बरे होणार नाहीत, शिवाय मूत्रमार्गातही अडचणी आहेत वा मूतखडा आहे. लघवीवाटे रक्त जाते आहे किंवा किडनीशी संबंधित समस्या असेल तर डॉक्टर सर्जरी करण्याचा सल्ला देऊ शकतात. सर्जरी करून प्रोस्टेस्टचा बाहेरील भाग काढून टाकला जातो.

लेजर थेरपी : हाय एनर्जी लेजर अतिविकसित प्रोस्टेस्ट पेशींना नष्ट करते. लेजर थेरपी केल्यानंतर लवकर आरामही मिळतो आणि याचे साईड इफेक्टही कमी होतात.

अॅण्टीबायोटिक्स : अॅण्टीबायोटिक्सद्वारे यूटीआयचा उपचार केला जातो. कोणते औषध किती काळ दिले जाईल हे रूग्णाच्या आरोग्यावर व ससंर्ग किती गंभीर आहे यावर अवलंबून आहे. जर संक्रमण गंभीर असेल तर अॅण्टीबायोटिक दिले जाते.

सेक्श्युअल लाइफ स्पाइनल इंजरीनंतरचं…

– डॉ. एच.एस. छाबडा, इंडियन स्पाइनल इंजरीज सेंटरमध्ये स्पाइन सर्विचे प्रमुख आणि मेडिकल डायरेक्टर

स्पाइनल इंजरी कोणाच्याही आयुष्याची त्रासदायक घटना असू शकते. यामुळे व्यक्ती एकप्रकारे लकवाग्रस्त होऊ शकते. इंजरी जर मानेत असेल तर यामुळे टेट्राप्लेजिया होऊ शकतं. इंजरी जर मानेच्या खाली असेल तर यामुळे पाराप्लेजिया म्हणजेच दोन्ही पाय आणि इंजरीने खालच्या शरीरात लकवा होऊ शकतो. केंद्रीय स्नायुतंत्राचा भाग असल्यामुळे स्पाइनल कॉर्डवरच संपूर्ण शरीर अवलंबून असतं. इंजरीने लैंगिक सक्रियतादेखील प्रभावी होऊ शकते. स्पाइनल कॉर्ड इंजरी उंचावरून खाली पडल्याने, रस्ते अपघात, हिंसा वा खेळांच्या घटनांमुळेदेखील होऊ शकते. स्पाइनल कॉर्ड इंजरीच्या नॉनट्रोमेटिक कारणांमुळे स्पाइन आणि ट्यूमरचा टीबी यांसारख्या संसर्गाचा समावेश आहे.

लैंगिक सक्रियता महत्त्वाची

स्पाइनल इंजरीने पीडित व्यक्तिला यथासंभव आत्मनिर्भर बनविण्याचा प्रयत्न व्हायला हवा. भारतीय समाजाच्या एका मोठ्या वर्गात लैंगिक आरोग्यावर चर्चा करणं तसं वर्जित विषय मानला जातो, त्यामुळे या विषयावर लोक चर्चा करायला तसे संकोचतात आणि रुग्ण शांतपणे हे सर्व सहन करत राहातो. शिक्षा, ज्ञान आणि जागरूकतेच्या अभावामुळे लोक अशा रुग्णाच्या बाबतीत असा विचार करू लागतात की ते यौनेच्छा वा लैंगिक समस्येने पीडित आहेत. परंतु वास्तव हे आहे की सर्वसामान्य व्यक्तिप्रमाणेच स्पाइनल इंजरीने पीडित व्यक्तिसाठीदेखील लैंगिक सक्रियता तेवढीच गरजेची आहे.

साथीदाराचा अभाव

खरंतर, स्पाइन इंजरी इच्छाशक्तीवर परिणाम करत नाही. मात्र, एखाद्या व्यक्तिच्या लैंगिक गोष्टींवर नक्कीच परिणाम करते. अनेकदा असं जोडीदाराच्या अभावामुळेदेखील होतं. इतर बाबतीत मात्र हे मांसपेशींवर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यायामाच्या अभावामुळेदेखील होऊ शकतं. लैंगिक अनिच्छा लिंगाच्या आधारावरदेखील वेगवेगळी असू शकते. पुरुषाला जिथे उत्तेजनेच्या अभावामुळे त्रास होतो, तिथे स्त्रियांना साधारणपणे शिथिल जोडीदारामुळे थोडाफार त्रास होतो, खासकरून भारतीय समाजात. परंतु स्पाइनल इंजरीने पीडित व्यक्तिंच्या लैंगिक अनिच्छेला सेक्श्युअल रिहॅबिलिटेशन प्रोग्राम आणि निरंतर अभ्यासाने अधिक प्रमाणात दूर करता येऊ शकतं.

समस्येकडे दुर्लक्ष

अशा रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि लैंगिक गोष्टींबाबत त्यांच्याशी मोकळेपणाने बोलणं खूपच गरजेचं असतं. यामध्ये तंबाखू पूर्णपणे निषिध असायला हवा. शारीरिक हालचालींचा अभाव आणि वेदनेबरोबरच एससीआय रुग्ण आकर्षण, संबंध आणि प्रजननाची क्षमतासारख्या इतर कारणांवरूनदेखील चिंतित राहातात. काळाबरोबरच रुग्ण आपल्या नवजात शिशूसोबत जगणं शिकतात आणि बाकीच्या आयुष्याचादेखील स्वीकार करतात, मात्र आपल्या लैंगिक गरजांबाबत ते अनभिज्ञ राहातात. रुग्णाच्या शरीराच्या अशा हरविलेल्या गोष्टी बहाल करण्यासाठी मोठ्या रिहॅबिलिटेशन प्रोग्रामच्या दरम्यानदेखील लैंगिक समस्येकडे दुर्लक्षच केलं जातं.

स्वत:हून पुढाकार घेत नाहीत

एससीआयच्या प्रकरणात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांसाठी अनेकदा सेक्श्युअल पार्टनर बनणं अधिक सहजसोपं होतं. हे सर्व फक्त शारीरिक रचनेमुळे नाही तर सक्रियतेच्या स्तरावरदेखील शक्य होतं. भारतासारख्या रूढिवादी समाजात स्त्रियांकडून कामेच्छाची आशा करणं कठीण आहे. भारताच्या ९० टक्के स्त्रिया पॅसिव्ह सेक्श्युअल पार्टनर असतात ज्या स्वत:हून पुढाकार घेत नाहीत. म्हणूनच पुरुषांच्या तुलनेत त्यांच्यासाठी लैंगिक स्वास्थ पुन्हा मिळवणं अधिक सहजसोपं ठरतं आणि त्यांचं मुख्य लक्ष्य लैंगिक सक्रियता पुन्हा मिळवणं तसंच संभोग करण्याची क्षमता मिळवणं हेच असतं.

अडचणीवर उपाय

पुरुषांच्या बाबतीत अडचणी या उत्तेजनेचा अभाव आणि स्खलनशी संबंधित असतात. त्यांची उत्तेजनक्षमता आणि स्खलनमध्ये बदल होण्याव्यतिरिक्त कामोत्तेजनांचे लैंगिक समाधानदेखील एक असं क्षेत्र आहे जे एससीआयपीडित पुरुषांसाठी चिंतेचं कारण आहे. दुसरं चिंतेचं कारण म्हणजे स्पर्मच्या गुणवत्तेवर पडणारा प्रभाव आणि स्पर्म काउंटबाबतचा आहे. स्पाइनल इंजरीच्या प्रकरणात अनेकदा वियाग्रासारख्या औषधांनी उत्तेजनेची समस्या दूर केली जाऊ शकते. काही प्रकरणांत व्हॅक्यूम ट्यूमेसेंस कन्स्ट्रक्शन थेरेपी (वीटीसीटी) वा पॅनाइल प्रोस्थेसिससारख्या उपकरणांचीदेखील गरज पडू शकते.

गैरसमज

सेक्श्युअल काउन्सलिंग आणि मॅनेजमेंट विकासशील देशांमध्ये एससीआयच्या सर्वात उपेक्षित गोष्टींपैकी एक आहे. लेखकांच्या एका संशोधनानुसार आढळलंय की एससीआयने पीडित ६० टक्के रुग्णांनी आणि त्यांच्या ५६ टक्के जोडीदारांनी सेक्श्युअल काउन्सलिंग घेतलेलं नाही. ज्या गोष्टींकडे खूपच कमी लक्ष दिलं जातं, त्यापैकी एक आहे जागरूकता आणि सांस्कृतिक बदल. पती आणि पत्नींमध्ये लैंगिक संबंधाचा हेतू फक्त मुलांना जन्म देणं एवढंच मानलं जातं. सेक्सबाबत चर्चा करणं वाईट मानलं जातं. लैंगिक समस्या सर्वसामान्य झाल्या आहेत तसंच सेक्सकडे दुर्लक्ष, सेक्सबाबतच्या चुकीच्या धारणा आणि नकारात्मक विचारसरणीदेखील याची प्रमुख कारणं मानली जातात. पारंपरिक वर्जनादेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका साकारते. सेक्श्युआलिटीला प्रभावित करणाऱ्या इतर सामाजिक, पारंपरिक फॅक्टर्समध्ये लैंगिकसंबंधांची विचारसरणी, आईवडिलांबाबत आदर तसंच इतर कारणांचा समावेश आहे. सेक्सला वाईट समजलं जातं आणि पुरुष तसंच स्त्रियांसाठी वागणुकीचे दुहेरी मापदंड असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची अवस्था अधिक बिकट असते.

आत्मविश्वासाचा अभाव

एका संशोधनानुसार विकसित देशांच्या तुलनेत भारतासारख्या देशात स्पाइनल, कॉर्ड इंजरीने पीडित व्यक्तिंच्या लैंगिक गोष्टींची वारंवारता कमी असते. अनेक रुग्ण इंजरीच्या पूर्वीच्या तुलनेत आपल्या सेक्स लैंगिक आयुष्याकडे दुर्लक्ष करतात. हे कदाचित एससीआयच्या समस्या, इंजरीनंतर पार्टनरची असंतुष्टी, लैंगिक क्रीडेच्या दरम्यान जोडीदाराचं असहकार्य, आत्मविश्वासाचा अभाव तसंच अपर्याप्त सेक्श्युअल रिहॅबिलिटेशन कारणंदेखील असू शकतात. पाश्चिमात्य देशांतील प्रकरणांप्रमाणे खूपच कमी जोडीदार समाधानी असतात. पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया लैंगिक समाधानाच्या अभावाची तक्रार अधिक करतात. यामागे एक प्रचलित सांस्कृतिक मान्यता आहे की एखाद्या आजारी बाईशी लैंगिक संबंध ठेवणं नैतिकतेविरुद्ध आहे आणि यामुळे पुरुष जोडीदारालादेखील लागण होऊ शकते. भारतीय समाजात स्त्रियांची वाईट अवस्था, जोडीदारांची वेगळी विचारसरणी, पचनशक्ती इत्यादींची गडबड आणि वैयक्तिक आयुष्याचा अभावदेखील याची काही संभावित कारणं असू शकतात.

लैंगिक जीवनाला अंत नाही

स्पाइनल इंजरीला लैंगिक जीवनाचा शेवट मानू नये. यामुळे इंजरीपीडित व्यक्तिला आपल्या नवीन शरीरात लैंगिकसुखाचा स्वीकार करण्यात मदतीची गरज असते आणि अनेकदा त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज असते. परिवर्तित संवेदनशीलता, शारीरिक स्वीकृती वा मसल कंट्रोलसारखे फॅक्टर समजून घेतल्याने स्पाइनल इंजरी रुग्णाला निरामय कामजीवन बहाल करण्यात मदत मिळू शकते. त्याच्या सेक्श्युअल रिहॅबिलिटेशनसाठी मेडिकल प्रोफेशनल्सच्या मदतीची गरज असते. याबाबतीत जागरूकता वाढविण्याची गरज आहे. खासकरून भारतीय समाज तसंच प्रोफेशनल्समध्ये.

व्हल्वा कर्करोग काय आहे

सहसा स्त्रियांना कोणत्याही वयात इतर कर्करोग होऊ शकतात, परंतु व्हल्वा 60 आणि त्यापेक्षा जास्त असू शकतात. केवळ वृद्ध स्त्रिया तसेच तरूण स्त्रियादेखील यातून सुटल्या नाहीत. जरी व्हल्वा कर्करोग सामान्य नाही, परंतु अत्यंत गंभीर आहे, कारण तो स्त्रीच्या लैंगिक जीवनावर परिणाम करू शकतो. यामुळे लैंगिक वेदना अधिक कठीण होतात.

अंजनाच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. तिला योनीवर एक गाठ दिसली, परंतु परंत तिने जास्त लक्ष दिले नाही. पण दोन वर्षानंतर जेव्हा त्रास सुरू झाला तेव्हा तिने डॉक्टरला दाखवले. मग तिला समजले की तिला व्हल्वा कर्करोग आहे.

अंजना सांगते की कर्करोग सुरुवातीच्या अवस्थेत होता, म्हणून डॉक्टरांनी आठवड्यांसाठी रेडिएशन थेरपी दिली, तेथून त्वचेला जळजळ व फोड आले. त्यातून सावरण्यास महिने लागले. पण तरीही काही अडचणींचा सामना करावा लागतो. व्हल्वा कर्करोगाच्या उपचारानंतर सेक्स करण्यास खूप वेदना होत आहेत त्याच्यासमोर तुम्हाला प्रसूती वेदनादेखील कमी वाटू शकते.

व्हल्वा कर्करोग म्हणजे काय

या संदर्भात, डॉ.अनिता गुप्ता म्हणतात की योनीच्या बाहेरील ओठांना व्हल्वा म्हणतात जेव्हा यामध्ये कर्करोग असतो तेव्हा त्याला व्हल्वा कर्करोग म्हणतात. हा व्हल्वा कर्करोग मानवी पॅपिलोमा विषाणू आहे म्हणजे एचपीव्हीमुळे लैंगिक संबंधातून पसरणारे आजार असून तो कोणत्याही स्त्रीमध्ये लैंगिकरित्या कार्यरत असतो. तो पसरू शकतो. व्हल्वा कर्करोगामुळे लवकर लक्षणे उद्भवत नाहीत. सुरुवातीला फक्त पांढरा पॅच किंवा खाज सुटणे होते, ज्या स्त्रिया बुरशीजन्य संसर्गाने दुर्लक्ष करतात आणि नंतर अज्ञानामुळे त्यांचा त्रास वाढतो.

त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या म्हणण्यानुसार, यूएस मध्ये 2017 मध्ये व्हल्वा कर्करोगाच्या जवळपास 6 हजार रुग्णांची नोंद झाली. यामध्ये 1,150 महिला व्हल्वा कर्करोगाच्या टप्प्यावर पोहोचल्या हेत्या त्यावर उपचार शक्य नव्हते. वास्तविक या महिलांना कर्करोग असल्याची कल्पना नव्हती. तर कधी तर, जर आपल्याला खाज सुटणे, घसा, ढेकूळ, व्हल्वावर फुगवटा येणे किंवा योनीच्या आसपास किंवा भोव-यात व्हल्वाचा स्पर्श असल्यास पाण्याचे फोड असल्यास, लघवी करताना त्रास होत असल्यास या लक्षणांकडे दुलर्क्ष करू नका.

कसे हाताळायचे

व्हल्वा कर्करोगाचा उपचार करण्याचे बरेच मार्ग आहेत, परंतु ते कोणत्या प्रकारचे आणि कोणत्या टप्प्यावर अवलंबून असते, कोणता उपचार चांगला आहेः

रेडिएशन थेरपी : या प्रकारचे थेरपी उच्च उर्जा प्रकाशाचे उत्सर्जन करते, जे कर्करोगाच्या पेशी काढून टाकते. परंतु यामुळे आजूबाजूच्या त्वचेला मोठ्या प्रमाणात हानी होते.

केमोथेरपी: या थेरपीमध्ये एकतर औषध कर्करोग दूर करण्याचा प्रयत्न करते किंवा ती कर्करोगाच्या पेशी वाढण्यापासून थांबवते.

शस्त्रक्रियाः व्हल्वा कर्करोगाच्या उपचारांची मुख्य पद्धत म्हणजे शस्त्रक्रिया. या उपचाराचा उद्देश योनी रोखणे आहे. हा कर्करोग हानी पोहोचविल्याशिवाय काढले जाणे आवश्यक आहे, ज्यामध्ये लेसर शस्त्रक्रिया, ऑक्सिजन, त्वचेची कातडी व्हल्व्हेक्टॉमी, रॅडिकल व्हेल्व्हक्टॉमी इत्यादींचा समावेश आहे.

व्हल्वा मेलानोमा: यात गडद ठिपके दिसतात. या प्रकारचा कर्करोग शरीराच्या इतर भागात पसरतो. एक जोखीमदेखील आहे आणि या प्रक्रियेस मेटास्टेसिस म्हणतात आणि याचा परिणाम तरुण वयात स्त्रियांवर होतो.

डेनोकार्सीनोमा: हा कर्करोग ग्रंथी पेशी आणि त्याच्या स्क्वामस पेशीपासून सुरू होतो. कार्सिनोमापेक्षा फुफ्फुस आणि लिम्फ नोड्सपर्यंत पसरण्याची शक्यता जास्त आहे.

कार्सिनोमा रेपॉझ करा: हा स्क्वॅमस सेल कर्करोगाचा एक उपप्रकार आहे आणि हळू वाढणारा मस्सा आहे.

स्क्वॅमस सेल कार्सिलोनाः कर्करोगाच्या पेशींमध्ये होतो आणि हळूहळू पसरतो. हे बहुधा योनीच्या सभोवताल राहते, परंतु ते फुफ्फुस, यकृत किंवा हाडांमध्येदेखील पसरते. हा कर्करोगाचा सर्वात सामान्य प्रकार आहे.

सारकोमा: हा कर्करोग जीवघेणा आणि संयोजी ऊतक म्हणजे संयोजकासारखाच दुर्मिळ आहे.

थंड आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कारणे आणि प्रतिबंध

-गरिमा पंकज

डॉक्टर बिपिन कुमार दुबे, एचसीएमसीटी मनिपाल हॉस्पिटल, दिल्ली.

हिवाळा सुरू झाल्याबद्दल सामान्य लोकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही लोक थंड हवामानाचे स्वागत करतात तर काहींना हिवाळ्याच्या काळात फ्लू, श्वसन रोग, फ्रॉस्टबाइटची भीती असते. परंतु काळजी करण्यामागे आणखी एक कारण आहे ज्याबद्दल बरेच लोकांना माहितीही नसते. थंड हवामानात रक्तवाहिन्या आकुंचन होऊ शकतात, वाढत्या सहानुभूतीच्या स्वरुपामुळे हृदय गती वाढू शकते, रक्तदाब वाढतो आणि शरीरात रक्त जमण्याची शक्यतादेखील वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.

खरं तर, हिवाळ्यादरम्यान हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता सुमारे 33 टक्क्यांनी वाढते. हे सांगणे आवश्यक नाही की हिवाळ्यात उबदार राहण्यासाठी लोकांनी पुरेशी काळजी घेतली पाहिजे. सर्दीच्या या महिन्यांत वृद्धांना त्रास होऊ शकतो, सर्दीमुळे त्यांच्या शरीराचे तापमान नाटकीयरित्या हायपोथर्मिया होऊ शकते. जर शरीराचे तापमान 95 अंशांपेक्षा कमी झाले तर हायपोथर्मियामुळे हृदयाच्या स्नायूचे गंभीर नुकसान होऊ शकते. याव्यतिरिक्त, एनजाइनामुळे ग्रस्त रूग्णांना विशेषतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे कारण थंड हवामानात कोरोनरी रक्तवाहिन्यांमधे उबळ येऊ शकते ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. काही व्यक्तींना थंड हवामानात हृदयविकाराचा धोका जास्त असतो, ज्यात हृदयविकाराचा झटका, कोरोनरी हृदयरोग किंवा हृदयाची कमतरता, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, मधुमेह, धूम्रपान आणि सुस्ती यांचा समावेश आहे अशा जीवनशैलीचा मागील इतिहास आहे.

लक्षणे

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका जास्त असतो हे जाणून घेतल्यास हृदयविकाराचा झटका येणा-या लक्षणांची जाणीव ठेवणे व समजून घेणे शहाणपणाचे ठरेल. छातीत तीव्र वेदना किंवा अस्वस्थता सामान्यत: रेट्रोस्टर्नलपेक्षा वेगळी असते परंतु छातीच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला, खांद्यावर, मान किंवा खालच्या जबड्यात, जठरासंबंधी असू शकते, जी वरच्या अवयवापर्यंत पसरते.

मळमळ, उलट्या किंवा चक्कर येणे श्वास घेण्याशी संबंधित असू शकते; स्त्रियांना विशेषतः जागरूक रहावे लागेल कारण त्याची लक्षणे थोडी वेगळी दिसू शकतात. म्हणूनच, जरी त्यांना असामान्य लक्षणांचा अनुभव आला तरीही हे महत्वाचे आहे की ते कोणत्याही संभाव्य लक्षणांबद्दल नेहमी सतर्क असतात.

कारणं

जरी सर्दीमुळे सहानुभूतिशील यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत, परंतु त्यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन होतात, हृदयाचा वेग वाढतो, अशा प्रकारे हृदयावर रक्तदाब आणि वजन वाढतो. हृदयाच्या रक्तवाहिन्या संकुचित करण्याव्यतिरिक्त, हृदयाच्या स्नायूंमध्ये ऑक्सिजनची अतुलनीय मागणी आणि पुरवठा होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.

थंड हंगामात फायब्रिनोजेन, फॅक्टर, इत्यादी रक्ताच्या जाड होणा फट्स या घटकांच्या वाढीमुळे, रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या शक्यतेमुळे हृदय आणि खालच्या अवयवांच्या पेशींमध्ये गोठणे होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो. खोल शिरासंबंधी थ्रोम्बोसिस उद्भवते.

 

हिवाळ्यात, सामान्य सर्दी, फ्लू, न्यूमोनियाची वाढ होणारी घटना असते ज्यामुळे हृदयाच्या पात्रात एथेरोस्क्लेरोटिक प्लेक विस्कळीत होते, ज्यामुळे गठ्ठा होतो आणि हृदयविकाराचा झटका येतो.

याशिवाय हिवाळ्यामध्ये लोक जास्त तळलेले पदार्थ आणि मद्यपान करतात, जास्त धूम्रपान करतात आणि व्यायाम कमी करतात. या सर्व गोष्टी आपल्याला समजल्याशिवाय हृदयाचे नुकसान करतात.

प्रदूषण हा हृदयविकाराचा झटका आणि मेंदूच्या झटक्यासाठी आणखी एक जोखीम घटक आहे, ज्याबद्दल प्रत्येकजण जागरूक आहे. हिवाळ्यात, हवेतील धुके, निलंबित कणांच्या वाढीमुळे प्रदूषण अतिशय उच्च पातळीवर जाते, ज्यामुळे हृदय आणि फुफ्फुसाचा आजार आणि हृदयविकाराचा झटका येतो, विशेषत: प्रदूषित महानगरांमध्ये.

प्रतिबंध

निरोगी खा : एखाद्याने कमी चरबीयुक्त, कमी साखर, कमी-मीठ, उच्च-प्रथिने शिल्लक आहार घ्यावा, ज्यामध्ये फळे आणि भाज्या, फायबर समृद्ध धान्य, फॅटी फिश (सॅमन, सार्डिन), नट, शेंगदाणे आणि बियाणे. तसेच मद्यपान कमी करा, धूम्रपान करणे थांबवा.

सक्रिय रहा : बाह्य क्रियाकलाप टाळा आणि अत्यधिक थंड, घरातील व्यायाम, घरातील खेळ आणि योगामध्ये व्यायाम करणे तंदुरुस्त आणि निरोगी राहील.

पुरेशी झोप घ्या : चांगल्या आरोग्यासाठी 7 ते 8 तासांची झोप चांगली असते.

हवामानानुसार कपडे घालाः कोणत्याही किंमतीत कमी कपडे घालून लोकांनी घराबाहेर जाण्याचे टाळले पाहिजे. हायपोथर्मिया (कमी शरीराचे तापमान) टाळण्यासाठी लोकांनी भरपूर कपडे, विशेषत: कोट, टोपी, हातमोजे आणि भारी मोजे घालून स्वत: ला झाकून ठेवणेदेखील महत्वाचे आहे. डोक्यावरुन बरीच उष्णता सोडली जात असल्याने बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी स्कार्फ आणि / किंवा टोपी घालण्याची देखील शिफारस केली जाते.

वारंवार हात धुवा : हे सर्वज्ञात आहे की श्वसन संसर्गामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढू शकते. साबणाने आणि पाण्याने नियमितपणे हात धुवून एखाद्याने अशी परिस्थिती टाळली पाहिजे. याव्यतिरिक्त, ताप, व्हायरल खोकला किंवा शरीरावर वेदना यासारख्या फ्लूची लक्षणे लक्षात येण्यासारखी असल्यास फ्लूचे औषध घेण्यासाठी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सुदृढ आरोग्यासाठी स्वच्छता हाच मूलमंत्र

* मोनिका गुप्ता

बुहानच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना नामक रोगाने आता भारतासोबाबत इतर अनेक देशांमध्ये पाय पसरले आहे. हे इतके भयानक संक्रमण आहे कि हे एका व्यक्तिकडून दुसऱ्या व्यक्तिपर्यंत सहज पोहोचते. कोरोना संक्रमणापासून दूर राहायचे असेल तर सर्वात आवश्यक आहे ते हात चांगले धुणे. तसे पाहता लोक हात धुण्याकडे नेहमी दुर्लक्ष करतात. अनेक लोक तर हात धुणे याचा अर्थ  पाणी आणि साबण वाहू देणे असाच घेतात. म्हणजे बहुतांश लोकांना हात धुण्याची योग्य पद्धतच माहीत नाही. ज्यामुळे लोकांमध्ये संक्रमण आणि निरनिराळे आजार पसरत आहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ति वर्षानुवर्षे हे मानत आले आहेत की आजारांपासून दूर राहायचे असेल तर हात धुण्याची प्रक्रिया सर्वात महत्वाची आहे. एका शोधानुसार आपल्या देशातील ४० टक्के लोक जेवणाआधी हात धूत नाहीत. जर आपण हात धुण्याची प्रक्रिया प्रामाणिकपणे पाळली तर आपण अशा अनेक रोगांपासून दूर राहू शकतो. कोणत्याही आजाराशी लढण्याचे हात धुणे हे पहिले हत्यार आहे.

का आवश्यक असते हात धुणे

आपण दिवसभर जे काही काम करतो, त्यात आपल्या हातांची महत्वाची भूमिका असते. त्यामुळे हातांवर किटाणू असणे अतिशय सामान्य गोष्ट आहे. जेव्हा केव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी जातो, आपण लिफ्टचा वापर करतो. बटणांना स्पर्श करतो, मेट्रोमध्ये हॅण्डल, ऑफिसमध्ये दरवाजाला स्पर्श करणे, नळाची तोटी, रेलिंग इत्यादींना स्पर्श करत जातो. जर आपण आपले संक्रमित हात न धुता जेवण घेतले, कोणाशी हस्तांदोलन केले, घरात लहान मुलांसोबत खेळलो वा त्यांना काही खाऊ घातले तर हातावर असलेले किटाणू रोगजंतू बनून आपल्या लोकांपर्यंत सहज पोहोचतात.

कोरोनापासून दूर राहण्यासाठी अमेरिकेतील डॉक्टर्सनी ‘डोन्ट टच युअर फेस’ ही  मोहीम चालवली होती. या मोहिमेद्वारे डॉक्टरांना सांगायचे होते की कोविड -१९ पासून वाचण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे आपल्या चेहऱ्याला कमीतकमी हात लावा. जर आपण सतत चेहऱ्याला हात लावण्याची सवय सोडून दिली तर कोरोना व्हायरसचे संक्रमण पसरण्याची शक्यता कमी होते. एका संशोधनातून हे लक्षात आले की माणूस एका तासात जवळपास २३ वेळा आपल्या चेहऱ्याला स्पर्श करतो.

यासाठी जागतिक आरोग्य संघटना व रोग नियंत्रण व निवारण केंद्र सीडीसीने अनेक उपाय जाहीर करत लोकांना कोरोनापासून वाचण्याबाबत जरुरी सतर्कता बाळगण्याचा सल्ला दिला आहे. यात हात धुणे, मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे प्रमुख आहेत. याशिवाय चेहरा, डोळे, नाक, तोंड यांना हात न लावण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

यावर आयुस्पाईन हॉस्पिटलमधील सिनियर फिजिओथेरपिस्ट डॉ. सत्यम भास्कर यांच्याशी बोलत असता त्यांनी संगितले की हात कसे धुतले पाहिजे आणि किती वेळ धुतले पाहिजेत.

सॅनिटायझरपेक्षा जास्त चांगले आहे की तुम्ही साबणाने हात धुवा. कारण बाजारात जरुरी नाही की अल्कोहोल बेस्डच सॅनिटायझर असतील. लहान मुलं असो वा वयस्कर लोक सर्वानी कमीतकमी २० सेकंद हात धुवायला हवेत, वास्तविक तुम्ही हात धुण्याची योग्य पद्धत अवलंबली तर हात नीट स्वच्छ होतील आणि तुम्हाला २० सेकंड मोजावे लागणार नाहीत.

हात धुण्याच्या योग्य स्टेप्स

हातांना किटाणूंपासून दूर ठेवण्याच्या या ७ स्टेप्सचे अवश्य पालन करा.

स्टेप्स १ : हात धुण्यासाठी जंतूनाशक साबण वापरा. सर्वात आधी हात ओले करा आणि योग्य प्रमाणात साबण वापरा.

स्टेप्स २ : दोन्ही हातांचे तळवे चांगले चोळा.

स्टेप्स ३ : आता हातांना उलटया बाजूने स्वच्छ करा.

स्टेप्स ४ : आपली बोटे दुसऱ्या हाताच्या बोटांना जोडून स्वच्छ करा.

स्टेप्स ५ : आपली नखे चांगली स्वच्छ करा.

स्टेप्स ६ : आपला अंगठा आणि मनगटे चांगली चोळा.

स्टेप्स ७ : आता पाण्याने हात स्वच्छ धुवा.

जर तुम्ही बाहेर असाल जिथे हात धुण्यासाठी तुम्ही साबण अथवा पाणी वापरू शकत नसाल, अशावेळी तुम्ही अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर वापरू शकता. हॅन्ड सॅनिटायझरचा वापर करताना तुम्ही हे निश्चित करायला हवे की त्यात ६० टक्के अल्कोहोल असावे तरच हे तुम्हाला लाभदायक ठरेल.

मुलांना असे शिकवा हात धुणे

लहान मुलांची रोग प्रतिकार शक्ति कमी असते, ज्यामुळे त्यांच्यावर संक्रमण लवकर पसरते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का की मुलं लवकर लवकर आजारी का पडतात? वास्तविक मुलांचे अस्वच्छ हात त्यांच्या शरीरावर संक्रमण पसरवण्यास जबाबदार असतात. जर मुलाचे हात स्वच्छ नसतील तर त्याच हाताने तो जेवण घेईल, तेच हात डोळे आणि चेहऱ्याला लावेल. मुलाने हात धुणे केव्हा आवश्यक असते याबाबत पालकांना माहिती असायला हवी. हात धुणे किती महत्वाचे आहे हे मुलांना सांगणे अत्यंत आवश्यक आहे. जर मुलाला वेळेत हे शिकवले की कोणती वस्तू खराब आहे आणि अशा वस्तूला हात लावल्यास हात धुणे अत्यावश्यक असते तर मुलं व्हायरल इन्फेक्शन आणि इतर आजारांपासून वाचू शकतात.

सीडीसी च्या रिपोर्टनुसार ५ वर्षापेक्षा कमी वयाची मुलं दरवर्षी डायरिया आणि न्यूमोनियाचे भक्ष्य बनतात. डायरिया हा घाणीमुळे पसरणारा आजार आहे. त्यामुळे अशावेळी घर स्वच्छ ठेवणे व स्वत:ला स्वच्छ ठेवणे अतिशय गरजेचे आहे.

केव्हा मुलांनी हात धुवायला हवे

* वॉशरुम वापरल्यावर.

* शिंकताना, खोकताना व नाकात बोट

घातल्यास.

* खाण्याआधी व नंतर हात धुणे आवश्यक

आहे.

*  खेळल्यावर.

* द्य दुसऱ्याशी हात मिळवल्यास.

* पैशांना हात लावल्यास.

* बूट, चपलांना हात लावल्यास.

* वर्गात इतर कोणाचे साहित्य वापरल्यास.

* कोणत्याही जखमेला हात लावल्यास.

असे शिकवा आपल्या मुलाला हात धुणे

मुलांना हात धुणे शिकवायला आधी तर त्यांना इंग्रजीतील ही ६ अक्षरं एस, यु, एम, ए, एन, के हे पाठ करायला सांगा. आता याचा अर्थ त्यांना सांगा :

एस : एस चा अर्थ अगदी सोपा आहे – आधी हात सरळ बाजूने स्वच्छ करा.

यु : यु चा अर्थ आहे उलटा, आता हात उलटा करून धुवा.

एम : एम चा अर्थ मूठ. दोन्ही हात जोडा आणि त्याची मूठ  तयार करा आणि रगडा.

ए : ए म्हणजे अंगठा. अंगठा स्वच्छ करा.

एन : एन म्हणजे नखं. आता दोन्ही हाताची नखं साफ करा.

के : के म्हणजे कलाइ (मनगट) नखांनंतर मनगट चोळा.

इंग्रजीतील ही सहा अक्षरं तुमच्या मुलाला अगदी सहज हात धुवायला शिकवतील जे ते कधीच विसरणार नाहीत.

मधुमेह : नियंत्रण शक्य आहे

* डॉ. मीना छाबडा

असा अंदाज वर्तवला जात आहे की २०३० पर्यंत डायबिटीज मॅलिटस भारताच्या ७.९४ कोटी लोकांना प्रभावित करू शकतं, तर चीनमधील ४.२३ कोटी लोक आणि अमेरिकेतील ३.०३ कोटी लोक या रोगांच्या कचाट्यात सापडतील. अशी अनेक कारणे आहेत जे देशभरातील लोकांध्ये या रोगासाठी जबाबदार आहेत.

मधुमेहग्रस्त लोक मनामध्ये हा संशय घेऊन जगू लागतात की पुढे त्यांचे डोळे जातील किंवा त्यांचा पाय कापावा लागू शकतो वा किडनी फेल्यूअरमुळे त्यांचा मृत्यू होऊ शकतो.

तरुणांमध्ये वाढतं प्रकरण

भारतात २२ ते ३० वयोमर्यादा असलेल्या तरुणांची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. ज्यांच्यामध्ये भरपूर उर्जा आणि रचना करण्याची क्षमता आहे. पण तरुण ज्या जीवनपद्धतींचा अवलंब करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर अनेक रोगांचा वाईट प्रभाव पडू लागला आहे.

भारताला मधुमेहाची राजधानी म्हटलं जाऊ लागलं आहे. खरंतर अलीकडचे तरुण आरोग्यवर्धक नसलेल्या आहाराच्या सवयीमुळे लठ्ठपणाला बळी पडू लागले आहेत. जे डायबिटीज आणि इतर कार्डियोवॅस्क्युलर समस्यांचं मुख्य कारण आहे. पूर्वी हा रोग ४० ते ४५ वयोमर्यादा असलेल्या लोकांना व्हायचा, पण आता तर हा रोग २२ ते २५ वर्षांच्या तरुणांनाही होऊ लागला आहे.

संसर्गाचा धोका

जरासं कापल्यानेदखील त्वचेमध्ये होणाऱ्या भयंकर संसर्गाला सॅल्युलायटिस म्हटलं जातं. तुम्हाला जर मधुमेह असेल तर तुमच्या त्वचेच्या बाबतीत तुम्ही अधिक सावधगिरी बाळगा, कारण ब्लड ग्लूकोज लेव्हल जास्त असल्यास संसर्गाची अधिक असते.

सॅल्यूलायटिस एक गंभीर संसर्ग आहे, जो त्वचेच्या आतमध्ये पसरतो आणि त्वचा व त्याच्या अंतर्गत चरबीला प्रभावित करतो. लोक बऱ्याचदा सॅल्यूलायटिसला सॅल्यूलाइट समजतात. पण खरंतर दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सॅल्यूलायटिज चरबीच्या आतला थर डर्मीज आणि त्वचेच्या आतल्या टिश्यूचा एक जंतूसंसर्ग असतो तर सॅल्यूलाइट त्वचेच्या आतमध्ये चरबी साचल्यामुळे होतो, जे दिसायला संत्र्यांच्या सालीसारखं दिसतं. सॅल्यूलायटिसचा सर्वात मोठा अपाय म्हणजे हा योग्यवेळी योग्य उपचार न मिळाल्यास फार वेगाने पसरतो.

सॅल्यूलायटिसपासून संरक्षण

* त्वचेला अपाय करणारं कठिण आणि अधिक कार्य करणं टाळा. असं काम निवडा ज्याने तुम्हाला जास्त थकवा येणार नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्लड शुगरचा योग्य स्तर टिकवून ठेवा. ब्लड शुगर लेव्हल वाढण्याचा हा अर्थ आहे की शरीराची रोगप्रतिकारक शक्ती नक्कीच कमी असेल आणि अशावेळी जखम भरण्यास अडथळा येईल.

* कमी कार्बोहायडे्रट असलेल्या आहाराचं सेवन करा आणि फायबरयुक्त फळांचं भरपूर सेवन करा. तुम्ही आपल्यासोबत ग्लूकोज टेस्ट मीटर ठेवल्यानेदेखील तुम्हाला त्याच्या वृद्धिवर नजर ठेवण्यास मदत होईल.

*  तुम्ही जर सॅल्यूलायटिसच्या ज्ञात असलेल्या लहानात लहान रिस्क फॅक्टरच्या कचाट्यात असाल, तर दररोज आपल्या पायांवर नजर ठेवा. जखमेवरही पूर्ण लक्ष द्या. त्चचेची सूज, लालसरपण यासारख्या लक्षणांवरही लक्ष ठेवा.

* जखम नीट करण्यासाठी डॉक्टरांचाच सल्ला घ्या. लक्षात ठेवा नियंत्रित तपासणीच्या अभावात लहानशी जखमही सॅल्यूलायटिसच कारण ठरू शकते. जखम असलेला भाग चांगल्याप्रकारे स्वच्छ ठेवा जेणेकरून तिथे पाणी लागू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच जखमेवर ड्रेसिंग करा आणि प्रत्येक वेळेस स्वच्छ ड्रेसिंगचाच वापर करा.

असं केल्यास तुम्ही मधुमेह असूनसुद्धा सुदृढ व्यक्तिसारखं जीवन जगू शकता. जीवनपद्धतीत थोडासा बदल करून तुम्ही तुमची ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रित ठेवू शकता. ज्यामुळे तुम्हालाच स्वस्थ वाटेल.

११ अँटी एजिंग फूड

* नसीम

वयाच्या चाळीशीनंतर चेहरा आणि हातापायांवर पडणाऱ्या सुरकुत्या, डोळयांखालची काळी वर्तुळे, पांढरे केस, ढिले पडलेले शरीर, कामवासना कमी होणे, सांधेदुखी, अशक्तपणा, थकवा, तणाव तुम्हाला वेगाने वृद्धापकाळाकडे घेऊन जातात. अशावेळी वाढते वय रोखण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे लोशन आणि क्रीम वापरू लागता. एनर्जी ड्रिंक पिऊ लागता. व्हिटॅमिनच्या गोळया खाऊ लागता. तरीही वाढणारे वय थांबत नाही आणि त्याच्या खुणाही लपत नाहीत.

पण आता नवीन वर्ष…नवी सकाळ…नवा विचार… आणि स्वत:च स्वत:शी केलेला 2021चा नवा पहिला संकल्प की यावर्षी आपण वाढत्या वयाचा वेग नक्की थांबवू. होय, आम्ही मस्करी करीत नाही तर हे शक्य आहे. फक्त तुम्ही संकल्प करण्याची गरज आहे. वाढत्या वयाला रोखता येईल, पण कुठल्याही महाग क्रीम, लोशन किंवा एनर्जी टॉनिकने नाही तर, त्या गोष्टींनी ज्या तुमच्या किचनमध्ये नेहमीच असतात. या त्याच गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे आपले ऋषीमुनी निरोगी, आनंदी आणि १०० वर्षांहूनही अधिक दीर्घायुष्य जगत होते. होय, आम्ही अँटी एजिंग फूडबद्दलच बोलत आहोत.

आरोग्यासाठी खाण्याच्या निरोगी सवयींचा अवलंब करून त्याचा परिणाम यावर्षी तुम्ही तुमची त्वचा, शरीर आणि चेहऱ्यावर पाहू शकाल. नवीन वर्षात जर तुम्ही अँटी एजिंग फूडला आपलेसे केले तर आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही जास्त वय होऊनही सुंदर आणि तरुण दिसाल, शिवाय म्हातारपणातले रोग म्हणून समजल्या जाणाऱ्या अनेक आजारांपासूनही दूर राहाल.

1. अंडे : अंडयात व्हिटॅमिन ए, बी आणि ई असते, जे वाढत्या वयाचा वेग कमी करते. नियमित दोन अंडी खाल्ल्याने शरीरातील हानी पोहोचलेल्या पेशींना दुरुस्त करण्यासाठी पुरेशी चरबी आणि प्रथिने मिळतात. म्हणून, आजपासून नाश्ता करताना दोन अंडी नक्की खा.

2. सोया : सोयाबीन, सोया पीठ, सोया दूध आणि टोफूमध्ये कमी फॅट आणि कॅल्शियम असते. सोया उत्पादनांमुळे शरीर सुदृढ आणि निरोगी होते. शिवाय याच्या वापरामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा धोकाही कमी होतो.

3. डाळिंब : डाळिंब वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करून शरीराच्या डीएनएमध्ये ऑक्सिडेशन कमी करते. हे खाल्ल्याने तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार होते. दररोज एक डाळिंब खाल्ल्यास तुमच्या सौंदर्यात भर पडेल.

4. ग्रीन टी : ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे वृद्धत्वाचा प्रभाव कमी करतात. ही तुमची पाचक प्रणालीही निरोगी ठेवते, म्हणून जर तुम्हाला वयापेक्षा लहान दिसायचे असेल तर दिवसभरातून दोन कप ग्रीन टी नक्की प्या.

5. आंबट आणि पिवळी फळे : संत्री, मोसंबी, द्राक्षे, लिंबू ही अशी फळे आहेत, ज्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यातून बायोफ्लेव्होनॉइड्स आणि लायमोनीनही मिळते. हे दोन्ही घटक कर्करोगास कारणीभूत कार्सिनोजन्स उत्सर्जित करतात. सर्व लिंबूवर्गीय फळांमध्ये पुरेशा प्रमाणात अँटिऑक्सिडंटस असतात, म्हणून आजपासून यांचा आहारात समावेश करा. सकाळी लिंबूपाणी आणि दुपारच्या जेवणानंतर एक संत्र किंवा मोसंबी नक्की खा.

6. ब्लूबेरी : हे काहीसे महागडे फळ आहे, परंतु त्यात बरीच महत्त्वाची जीवनसत्त्वे आणि पॉलिफेनॉल आढळून येतात. ज्यामुळे वाढत्या वयाचा वेग मंदावतो, शिवाय कॅन्सर आणि मधुमेहासारखे आजारही होऊ शकत नाहीत. म्हणूनच दिवसभराच्या आहारात ब्लूबेरीचा अवश्य समावेश करा.

7. दही : दह्यात लाइव्ह बॅक्टेरिया असतात, जे पचनास मदत करतात. कॅल्शियमचा चांगला स्रोत असल्याने दही ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांना कमकुवत आणि पोकळ होण्यापासून रक्षण करते. सोबतच हे त्वचेला चमकदार आणि तरूण बनविण्यास मदत करते.

8. मोड आलेली कडधान्ये : ही खाल्ल्याने अनेक प्रकारच्या आजारांपासून संरक्षण होते. यात आढळणारे बीटा कॅरोटीन, आइसोथियोसायनेट्ससारखे घटक कॅन्सरपासून दूर ठेवतात. हे नियमित खाल्ल्याने माणूस आयुष्यभर तरूण आणि उत्साही दिसतो.

9. स्ट्रॉबेरी : स्ट्रॉबेरीत फायबर असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करते. यात मुबलक प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे वाढत्या वयाला थोपवून ठेवतात.

10. टोमॅटो आणि टरबूज : टोमॅटो आणि कलिंगड हे लाइकोपेनचे समृद्ध स्रोत आहेत. लाइकोपेन कॅन्सर होण्याची शक्यता कमी करते. टोमॅटोचा रस आणि कच्चे टोमॅटोदेखील प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत.

11. सुकामेवा : सुकामेवा किंवा नट्समध्ये आरोग्यवर्धक फॅट्स असतात. यामुळे इलास्टिन आणि कोलेजनचे फायदे मिळतात, जे त्वचेचा ओलावा टिकवून ठेवतात. मूठभर सुकामेवा रोज खाल्ल्याने शरीराला आवश्यक अँटिऑक्सिडंट्स मिळतात. यात भरपूर कॅलरी असते, त्यामुळेच सुकामेवा कमी खा असा सल्ला दिला जातो. दोन पिस्ता, चार बदाम, दोन काजू आणि एक अक्रोड हा दिवसाची सुरुवात करण्यासाठी उत्तम नाश्ता आहे.

मद्यपान बिघडवतेय महिलांचे स्वास्थ्य

* गरिमा पंकज

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाची एक महिला पायलट आणि क्रूच्या एक सदस्य यांना ‘प्रीफ्लाइट अल्कोहोल टेस्ट’मध्ये फेल झाल्यामुळे शिक्षा म्हणून ३ महिन्यासाठी ग्राउंड ड्युटीवर पाठवण्यात आले होते. हे प्रकरण डायरेक्टर जनरल

ऑफ सिव्हिल एव्हिएशनपर्यंत पोहोचले, कारण एअरक्राफ्ट रूल्सनुसार क्रू मेंबर्सना फ्लाइटच्या आधी १२ तास अल्कोहोल सेवनास परवानगी नाही.

याच प्रकारे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्लीच्या रोहिणी भागात राहणाऱ्या प्रीती नावाच्या एका ३६ वर्षीय महिलेने दारूच्या नशेत गाडीने ५ मजुरांना चिरडले होते. ही घटना सकाळी ११.३० ला घडली होती. प्रीती कारमध्ये एकटी होती. हरियाणा हायवेवर काम करणाऱ्या ५ मजुरांना तिने धडक दिली होती, ज्यातील २ जण तर जागच्या जागीच ठार झाले होते.

अशा कितीतरी घटना दररोज घडतच असतात, ज्यात दारूच्या नशेत महिला स्वत:चेच नुकसान करून घेतात. गोष्ट फक्त दुर्घटना आणि इमेज खराब होणे एवढीच मर्यादित नसून दारू पिण्याची किंमत अनेकदा त्यांना आपले सर्वस्व गमावूनही चुकवावी लागते.

सर्वसाधारणपणे जेव्हा दारू पिण्याची गोष्ट असते, तेव्हा भारतासकट सर्व दुनियेतील महिला पुरुषांवर आरोप करतात, परंतु सत्य हे आहे की महिलाही आता मोठया संख्येने या व्यसनाच्या शिकार होऊ लागल्या आहेत.

हल्लीच ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉर्पोरेशन अँड डेव्हलपमेंटद्वारे सादर केलेल्या ग्लोबल रिपोर्टमधून ही बाब समोर आली आहे की भारतात मद्य सेवनाचे प्रमाण गेल्या २० वर्षांत ५५ टक्क्यांनी वाढले आहे. मद्य सेवनाच्या दृष्टिकोनातून ४० देशांच्या सूचीत भारत तिसऱ्या स्थानावर आहे. महिलांमध्ये याचे प्रमाण वाढते आहे. सर्वेक्षणांनुसार गेल्या १० वर्षांत आपल्या देशातील मद्य सेवन करणाऱ्या महिलांची संख्या ही जवळ जवळ दुप्पट झाली आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या अलीकडच्याच रिपोर्टनुसार भारतात जवळ जवळ ११ टक्के महिला मद्यसेवन करतात.

सध्या परिस्थिती अशी आहे की काही महिला या दारूला प्रतिष्ठा आणि स्वतंत्रतेशी जोडतात. जर त्यांना दारू पिण्यापासून रोखले गेले तर त्या याला संकुचित रूढीवादी विचारसरणी आणि महिलांविषयी जाणूनबुजून केलेला कट आहे असे म्हणून तमाशा करतात. दारू पिऊन त्या स्वत:ला स्वतंत्र आणि आधुनिक समजू लागतात.

महिलांसाठी अधिक घातक असते दारू

मधाचे सेवन हे पुरुष आणि महिला या दोघांसाठीही घातकच असते, पण महिलांच्या शारीरिक रचनेमुळे पुरुषांच्या तुलनेत दारूमुळे महिलांचे अधिक नुकसान होते.

राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट अँड रिसर्च सेंटरच्या डॉक्टर इंदू अग्रवाल सांगतात की महिला या दारूच्या प्रभावाविषयी अधिक संवेदनशील असतात. योग्य प्रमाणात दारूचे सेवन करूनही महिलांच्या रक्तात त्याचा परिणाम पुरुषांच्या तुलनेत अधिक होतो. महिलांवर एकसमान ड्रिंक घेण्याचा प्रभाव हा पुरुषांच्या तुलनेत दुप्पट असतो. याची अनेक जैववैज्ञानिक कारणे आहेत :

शरीरातले फॅट : महिलांचे वजन हे पुरुषांच्या तुलनेत कमी असते आणि पुरुषांसमान वजन असलेल्या एका महिलेच्या शरीरात पाणी कमी आणि ज्यादा फॅटी टिश्यू असतात. जिथे पाणी दारूचे घनत्व घटवते, म्हणूनच महिलांच्या शरीरात दारूचे घनत्व अधिक काळपर्यंत आणि अधिक मात्रेत राहते.

एंजाइम : महिलांमध्ये एंजाइमचा स्तर कमी असतो. जो आमाशय आणि यकृतात दारूला मेटाबोलाइझ करू शकेल. परिणामी महिलांच्या रक्तात दारूचे प्रमाण वाढते.

हार्मोन : मासिकचक्राच्या वेळी हार्मोनमधील बदलांमुळे महिलांद्वारे अल्कोहोल मेटाबोलाइझ करण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो.

मद्य सेवनाचे परिणाम

मद्य सेवनाने शारीरिक स्वास्थ्यच नाही तर मानसिक आरोग्यही बिघडते. ज्याचा परिणाम व्यक्तिच्या वैयक्तिक तसेच प्रोफेशनल जीवनावरही होऊ लागतो.

शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम

लिव्हर डिसीज : जे लोक सतत जास्त प्रमाणात दारूचे सेवन करतात, त्यांना लिव्हरला सूज आणि लिव्हर सोरायसिस अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. जर यांचा वेळीच उपचार केला गेला नाही तर लिव्हर पूर्णपणे खराब होऊ शकते. ज्यामुळे तुमचे आयुष्य धोक्यात येते.

रक्तदाब वाढणे : दारूच्या सेवनाने रक्तदाब वाढतो. महिलांमध्ये दारूच्या सेवनामुळे होणाऱ्या रक्तदाबाचा धोका पुरुषांच्या दुप्पट असतो.

थकवा : जास्त प्रमाणात मद्य सेवन केल्याने व्हिटॅमिन बी १२ चे प्रमाण कमी होऊ लागते, ज्यामुळे थकवा येऊ लागतो. चक्कर येणे, गोंधळून जाणे अशा समस्या उद्भवू शकतात.

लठ्ठपणा : दारू शरीरातील लेप्टीनचा स्तर कमी करते. हा भूकेवर नियंत्रण करणारा हार्मोन आहे. याचा स्तर कमी झाल्याने भूक जास्त लागते, ज्यामुळे कॅलरीचा इनटेक अधिक होऊन लठ्ठपणा वाढतो. दारू प्यायल्यावर असे पदार्थ खायची इच्छा होते, ज्यात जास्त प्रमाणात कॅलरी असतात. यामुळे वजन वाढण्याचा धोका अधिकच वाढतो.

फोन मेनिया

* दीपिका

ही दिवसभरातील १५-१६ तास फोनवरच असता का? तसंच तुम्ही सकाळ होताच व्हाट्सऐप वा फेसबुक चेक करू लागता का? तुम्हाला सतत तुमच्या फोनची घंटी वाजतेय असं वाटत राहतं आणि जेव्हा तुम्ही फोन चेक करता तेव्हा फोन आलेला नसतो. जर तुम्हाला अशी सवय असेल तर ती लवकरात लवकर बदला, कारण तुम्ही जर असेच सोशल नेटवर्किंग साइट्सवर वेळ घालवत असाल तर तुम्हाला गंभीर आजार होऊ लागतात. उदाहणार्थ, तुम्ही जर फेसबुक, ट्व्टिर वा व्हॉटसऐपवर दिवसभर वेळ वाया घालवत असाल तर तुम्हाला डिप्रेशन, पाठदुखी, डोळ्यांचे त्रास इत्यादी समस्यांशी सामना करावा लागेल.

चला तुम्हाला सोशल नेटवर्किंगचे फायदे आणि नुकसान यांची ओळख करून देऊया :

प्रत्येक गोष्ट सहजसोपी

फेसबुक असो वा मग व्हॉटसऐप यामुळे लोक एकमेकांच्या खूपच जवळ आले आहेत. तुमचा एखादा मित्र वा नातेवाइक सातासमुद्रापलिकडे राहत असेल तर तुम्ही फेसबुक वा मग इतर नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधू शकता. चौकशी करू शकता. तुम्ही फ्रीमध्ये परदेशात राहणाऱ्यांशी गप्पा मारू शकता. जरा आठवा, जेव्हा परदेशात राहणाऱ्या एखाद्या नातेवाईकाशी बोलण्यासाठी ४० ते ५० रुपये प्रति मिनिट खर्च करावे लागत होते. परंतु आता सोशल नेटवर्किंगने प्रत्येक गोष्ट सहजसोपी झालीय.

नेटवर्किंग साइट्स बिनेसचा अड्डा

अलीकडे हा ट्रेण्ड खूपच पहायला मिळतोय. बिझनेसमन आपल्या प्रोडक्ट्सची डिटेल्स फेसबुकवर टाकतात वा फेसबुकवर स्वत:चं पेज बनवतात. एखाद्याला जर प्रोडक्ट्स आवडले तर ते खरेदी करतात, ज्याचा फायदा बिझनेसमनला मिळतो. सोशल नेटवर्किंग साइट्सचा जर विचारपूर्वक विचार केला तर यापासून मोठा फायदादेखील होऊ शकतो. मोठमोठ्या कंपन्या अलीकडे फेसबुक वा मग ट्विटरवर जाहिरातींच्या माध्यमातून बराच पैसा कमावत आहेत.

माहिती देण्याचं सर्वोत्तम व्यासपीठ

जर एखादी माहिती वा एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवू इच्छित असाल तर सोशल नेटवर्किंग तुमच्यासाठी सर्वोत्तम मंच ठरू शकतो. अलीकडे लोकांना आपली समस्या वा एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर ते सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकतात, ज्यामुळे गोष्ट वणव्यासारखी पसरते आणि त्यांना लोकांकडून त्वरित प्रतिक्रियादेखील मिळत राहतात.

केवळ फायदेशीर नाहीत या नेटवर्किंग साईट्स, यांचे काही तोटेदेखील आहेत. या, आता तुम्हाला सोशल नेटवर्किंग साइट्सने होणाऱ्या तोट्यांबद्दलही सांगतो.

प्रायव्हसी राहत नाही

अनेकदा लोक सकाळी उठताच फोनचा चेहरा पाहतात. दिवसभर फोनवर गप्पा मारूनदेखील रात्रीदेखील फोनवर असतात. कधी फेसबुक चेक करतात, तर कधी व्हॉट्सऐप. सोशल नेटवर्किंग साइट्सवर प्रायव्हसी अशी राहतच नाही. कोणीही,  कधीही आपल्याबद्दल सर्च करू शकतो. जसं की आपण काय करतो? कुठे राहतो? कोण कोण आपल्याजवळ आहे? हे योग्य आहे का? स्वत: विचार करा आणि ठरवा. नेटवर्किंग साइट्सवर एवढी माहिती टाकणं योग्य आहे का?

आजारपणाला आमंत्रण

एका रिसर्चनुसार सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करणारे कमीत कमी १६-१७ तास त्यातच घालवतात. रात्रीच्यावेळी अंधारात फोनवर चॅट करतात. कायम ऑनलाइन राहतात. कमीत कमी दर १०-१५ मिनिचांनी आपला फोन वारंवार चेक करतात, ज्यामुळे डोळे खराब होऊ शकतात. काळोखात जेव्हा फोनचा वापर केला जातो, तेव्हा आपली पाहण्याची क्षमता कमी होते. दिवसभर सिस्टमवर फेसबुक खोलून बसून राहिल्याने वा स्काइपवर व्हिडिओ चॅट करत राहिल्याने पाठीच्या कण्यात फरक पडतो. सतत फोनचा वापर करून डिप्रेशनदेखील येऊ शकतं.

वेळेचा अपव्यय

अनेकदा आपण आपलं महत्त्वाचं काम सोडून फोनवर मॅसेज चेक करायला लागतो. मॅसेज चेक करता करता केव्हा दीर्घकाळ चॅट होतं, ते समजतच नाही. यामुळे वेळेचा अपव्यय होतो. त्यामुळे फोनचा वापर कमी करा.

मुलं बिघडत चाललीत

पूर्वी मुलं आजीआजोबांसोबत वेळ घालवत असत. आपल्या मित्रांसोबत संध्याकाळी खेळत असत. परंतु आता मुलं स्वत:मध्येच गुंतून असतात. त्यांच्याकडे कोणासाठी वेळच नाहीए. आईवडिल हे यामागचं सर्वात मोठं कारण आहे. अगोदरच मुलांना सर्व गोष्टी उपलब्ध करून देतात.

लॅपटॉप, महागडे फोन मिळाल्यामुळे मुलं दिवसभर त्यामध्येच अडकून राहतात. फोन वा लॅपटॉपवर पोर्न मूव्हिज पाहू लागतात, ज्याचे दुष्परिणाम लवकरच आईवडिलांसमोर येऊ लागतात

कसा कराल योग्य वापर

* फोनचा वापर कमीत कमी करा.

* सतत ऑनलाइन राहू नका.

* प्रथम महत्त्वाची कामे करा.

* काल्पनिक मित्रांसोबत गप्पा मारण्यात

वेळ घालविण्याऐवजी स्वत:ला वेळ द्या.

* प्रत्येक गोष्ट फेसबुकवर टाकू नका.

* वैयक्तिक गोष्टी सोशल नेटवर्किंग

साइट्वरून दूरच ठेवा.

* वारंवार फोन चेक करू नका.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें