* नसीम

वयाच्या चाळीशीनंतर चेहरा आणि हातापायांवर पडणाऱ्या सुरकुत्या, डोळयांखालची काळी वर्तुळे, पांढरे केस, ढिले पडलेले शरीर, कामवासना कमी होणे, सांधेदुखी, अशक्तपणा, थकवा, तणाव तुम्हाला वेगाने वृद्धापकाळाकडे घेऊन जातात. अशावेळी वाढते वय रोखण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे लोशन आणि क्रीम वापरू लागता. एनर्जी ड्रिंक पिऊ लागता. व्हिटॅमिनच्या गोळया खाऊ लागता. तरीही वाढणारे वय थांबत नाही आणि त्याच्या खुणाही लपत नाहीत.

पण आता नवीन वर्ष...नवी सकाळ...नवा विचार... आणि स्वत:च स्वत:शी केलेला 2021चा नवा पहिला संकल्प की यावर्षी आपण वाढत्या वयाचा वेग नक्की थांबवू. होय, आम्ही मस्करी करीत नाही तर हे शक्य आहे. फक्त तुम्ही संकल्प करण्याची गरज आहे. वाढत्या वयाला रोखता येईल, पण कुठल्याही महाग क्रीम, लोशन किंवा एनर्जी टॉनिकने नाही तर, त्या गोष्टींनी ज्या तुमच्या किचनमध्ये नेहमीच असतात. या त्याच गोष्टी आहेत ज्यांच्यामुळे आपले ऋषीमुनी निरोगी, आनंदी आणि १०० वर्षांहूनही अधिक दीर्घायुष्य जगत होते. होय, आम्ही अँटी एजिंग फूडबद्दलच बोलत आहोत.

आरोग्यासाठी खाण्याच्या निरोगी सवयींचा अवलंब करून त्याचा परिणाम यावर्षी तुम्ही तुमची त्वचा, शरीर आणि चेहऱ्यावर पाहू शकाल. नवीन वर्षात जर तुम्ही अँटी एजिंग फूडला आपलेसे केले तर आम्ही तुम्हाला वचन देतो की तुम्ही जास्त वय होऊनही सुंदर आणि तरुण दिसाल, शिवाय म्हातारपणातले रोग म्हणून समजल्या जाणाऱ्या अनेक आजारांपासूनही दूर राहाल.

1. अंडे : अंडयात व्हिटॅमिन ए, बी आणि ई असते, जे वाढत्या वयाचा वेग कमी करते. नियमित दोन अंडी खाल्ल्याने शरीरातील हानी पोहोचलेल्या पेशींना दुरुस्त करण्यासाठी पुरेशी चरबी आणि प्रथिने मिळतात. म्हणून, आजपासून नाश्ता करताना दोन अंडी नक्की खा.

2. सोया : सोयाबीन, सोया पीठ, सोया दूध आणि टोफूमध्ये कमी फॅट आणि कॅल्शियम असते. सोया उत्पादनांमुळे शरीर सुदृढ आणि निरोगी होते. शिवाय याच्या वापरामुळे अनेक प्रकारचे कर्करोग होण्याचा धोकाही कमी होतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...