या उत्सवामध्ये नात्यांना द्या नवे रंग

* शिखा जैन

उत्सव आयुष्य आनंदी आणि नाती मजबूत बनवण्यात महत्त्वाची भूमिका निभावतात. ते जगण्यात उत्साह आणि उल्हासाचा रंग भरतात. इतकेच नाही तर नटण्यासजण्याची, नवे नवे पदार्थ चाखण्याचीही संधी देतात.

उत्सव सणांमुळे नातेवाईकांच्या भेटीगाठी होतात. नात्यांमध्ये आलेला दुरावासुद्धा या सेलिब्रेशनमुळे दूर होतो. चला मग, या उत्सवांमध्ये जुने मित्र आणि नातेवाईकांपासून नात्यांची नवी सुरूवात करू, जेणेकरून जीवनात फक्त आणि फक्त आनंद आणि प्रेम मिळत राहील.

नात्यांचे महत्त्व

नाती सुगंधी फुलांप्रमाणे असतात, जी आपल्या आयुष्यात टवटवी आणि आनंद भरतात. नाती नसतील तर कुठलाही आनंद व्यक्त करण्याला आणि साजरा करण्याला काही अर्थच उरणार नाही. दु:ख असो की आनंद जोपर्यंत ते आपल्या जिवाभावाच्या माणसासोबत शेअर करत नाही तोवर त्याचे महत्त्व कळत नाही. आपल्या भल्याबुऱ्या काळात आपल्याला सांभाळणारी आणि ही जाणीव निर्माण करून देणारी नातीच तर असतात जी सांगततात की आपण एकटे नाहीत आणि आपल्यासोबत प्रत्येक क्षणी आहेत. आणि हेच कारण आहे की सणावारांच्यावेळी त्यांची कमतरता जाणवते. म्हणून नाती इतकी मजबूत बनवा की प्रत्येक सण उत्साहाने सोबत साजरे कराल.

नातेवाईकांशी संबंध वाढवण्यासाठी सण उत्सव हा उत्तम पर्याय : कधी कोणाला कशा प्रकारे मदतीची गरज भासेल सांगता येत नाही. गरज भासल्यास मित्र आणि नातेवाईकांकडूनच मदतीची अपेक्षा करता येऊ शकते. पण असे तेव्हाच होऊ शकते, जेव्हा त्यांच्याशी आपले संबंध चांगले असतील. मग यावेळी त्यांना आपलेसे करण्यासाठी तुम्हीच पहिले पाऊल उचलावे.

यासाठी सणांच्या दिवशी त्यांच्या घरी मिठाई आणि गिफ्ट घेऊन जा. तुम्ही सणाच्या दिवशी गेलात तर त्यांच्या मनातील कटुता कमी होऊन ते ही झाले गेले विसरून एका नव्या नात्याची सुरूवात करतील.

नात्यांना नवे रूप द्या : आयुष्याच्या गदारोळात अडकल्यामुळे काही नाती मागे राहून जातात. इच्छा असूनही आपण त्यांना जवळ आणू शकत नाही. त्यांच्याशी आपले काही शत्रुत्त्व नसते. उलट संबंध चांगलेच होते, पण तरी ते जवळ नसतात.

आशाचं म्हणणं आहे, ‘‘माझ्या सासरी माझ्या पतीच्या मावशीची मुलगी दिर्घ काळापर्यंत आपल्या शहरात राहिली. तेव्हा प्रत्येक सणाला तिच्या कुटुंबासोबत भेटीगाठी करून एकत्र येऊन सण साजरे करण्याची सवय होती. पण काही वर्षांनंतरच ते दुसऱ्या शहरात राहायला गेले आणि आम्हीही आमच्या व्यापात गुंतलो. अशाप्रकारे सणवार येत जात राहिले. जेणेकरून आम्हा सर्वांनाच जुन्या आठवणींचे स्मरण करता येईल.’’

ही आहे बदल करण्याची संधी : एकत्र कुटुंबात आपल्या माणसांसोबत सण साजरे केल्याने आनंद द्विगुणित होतो. जिथे आजोबा दिवे आणायचे, काका मुलांसाठी फटाके आणायचे, तर आजी, ताई, काकू, आई सर्वजणी मिळून तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ बनवत असत. सर्वत्र आनंदाचे मोहमयी वातावरण असे. आपण आपले बालपण अशाच काहीशाप्रकारे जगलो आहे. पण तुम्हाला असे नाही वाटत की आता आपल्या मुलांनीही आपल्या बालपणीसारखी मौज अनुभवावी?

असे करणे ही काही अवघड बाब नाही. तुम्ही तुमच्या गावी एखादा फोन तर करून पाहा. तिथे तुमच्या स्वागताची तयारी तुम्ही फोन ठेवण्याआधीपासून सुरू होईल. जर तुमचे भाऊ दुसऱ्या शहरात राहत असतील तर त्यांनाही बोलवा. जर गावी संपर्क झाला नाही तरी यावेळी सण एकत्र सजरे करा. विश्वास ठेवा यासाठी तुमचे नातेवाईक कधीही नाही म्हणणार नाहीत.

भेटवस्तू असावी काही विशेष : जर आईवडिलांसाठी काही भेटवस्तू घ्यायची असेल तर त्यांचे वय लक्षात घेता एखादे मसाजर, शुगर टेस्ट करण्याचे मशिन, बीपी मशीन, एखादे हेल्थ पॅकेज इ. अशाच प्रकारे भावंडांसाठीही त्याच्या आवडीच्या भेटवस्तू घ्याव्यात. पैसे खर्च होतील हा विचार करू नका, उलट तुमचे बजेट बनवा आणि त्याप्रमाणे खर्च करा. सणांमध्ये सर्वचजण एकमेकांना भेटवस्तू देतात. यामुळे संबंध दृढ होतात.

सोबतीने जत्रा पाहायला जा : हे गरजेचे नाही की सण आहे तर घरीच भेटले पाहिजे. तुम्ही एखाद्या अशा जागेची निवड करू शकता जी सर्वांना जवळ पडेल. तिथे भेटण्याचा कार्यक्रम ठरवा. उत्सवांमध्ये अशा जत्रा, फनफेअर खूप असतात. तिथेही भेटू शकता. मुलंही तिथे छान मजा करतील.

पूल पार्टी करू शकता : जर तुम्हाला असे वाटत असेल की इतक्या लोकांना घरी बोलावून जेवणाची वगैरे व्यवस्था करणे अवघड होईल तर तुम्ही पुल पार्टीही करू शकता. सर्व नातावाईकांनी आपापल्या घरून एक एक पदार्थ बनवून आणावा आणि एकत्र येऊन खूप मजा करावी.

मित्रमैत्रिणींना भेटायला जावे : फोनवर सणांच्या शुभेच्छा देण्यापेक्षा स्वत: जाऊन एखादी भेटवस्तू देणे सर्वात चांगले म्हणून तुमचे जे मित्रमैत्रिणींनी, नातेवाईक दूर असतील त्यांना भेटायला जावे. सणांच्या एक-दोन आठवडे आधीही जाऊ शकता, कारण सणांच्या दिवसात बाहेर पडणे तुम्हाला कठीण जाऊ शकते आणि त्यांनाही सणासुदीच्या दिवसात तुम्हांला वेळ देणे शक्य होणार नाही.

उत्सवांमध्ये नाती दृढ करण्यासाठी काही टीप्स

* जर तुम्ही बऱ्याच कालावधीपासून आपल्या घरी गेला नसाल तर या उत्सवाला जरूर जा आणि आपल्या भावाबहिणींनाही घरी यायला सांगा. सर्व परिवार एकत्रित सण साजरा करेल, तेव्हा जवळीकता वाढेल आणि प्रेमही, सोबतच तुमच्या मुलांनाही नाती समजू शकतील.

* जर खूप दिवस झाले असतील ते मनात काही द्वेष, अढी ठेवू नका. काहींना अशी सवय असते, त्यामुळे लोक त्यांना आमंत्रित करण्यास धजावत नाहीत.

* जर सर्वजण एकत्र जमले असतील तेव्हा नकारात्मक बोलू नका. सणांच्या आनंदात चांगले सकारात्मक बोलावे. एखाद्यावर टिका करून वातावरण खराब करू नका.

* पूर्वी ताटात घरी बनवलेल्या मिठाया सजवून ठेवल्या जायच्या, छानशा विणलेल्या सुंदर रूमालाने झाकल्या जात व ताटे आपल्या शेजारी दिले जायची.

* सर्व नातवाईकांनी एकत्र बसून जुन्या आठवणींना उजाळा द्यावा. जमल्यास तुमच्या नातेवाईकांना काही जुनी छायाचित्रे फोटो फ्रेम करून याप्रसंगी द्या. सर्वजण जुन्या आठवणींमध्ये रमून जातील.

* सरप्राइज पार्टी द्या. ज्यात सर्व बहिणभाऊ आणि मित्रांना सहभागी करा. दिवाळी, नाताळ, न्यू ईअर वगैरे पार्टी करू शकता.

टीप : सण साजरा करण्याच्या विधिंमध्ये ज्या विकृत पद्धती आल्या आहेत, जसे की नशा करणे, जुगार खेळणे, धार्मिक उन्माद निर्माण करणे, ध्वनि प्रदूषण, वायू प्रदूषण अशा बाबी संपुष्टात आणल्या पाहिजेत. सणउत्सव त्यांच्या मूळ भावनेने साजरे करा म्हणजे सुखशांतीमध्ये वृद्धी होईल.

तर लैंगिक संबंधात रस असेल

* डॉ. अनूप धीर, अपोलो हॉस्पिटल, नवी दिल्ली

जर तुमची पार्टनर बऱ्याच काळापासून सेक्ससाठी नाही म्हणत असेल तर ही चिंतेची बाब असू शकते. हे शक्य आहे की आपली जोडीदार सेक्सबद्दल झिडकाव नसल्याच्या समस्येशी झगडत असेल. त्याला महिला लैंगिक अक्षमतादेखील म्हणतात. सहवासाच्या वेळी जोडीदारास सहकार्य न  करणाऱ्या व्यक्तिस परिभाषित करण्यासाठी हा शब्द वापरला जातो. स्त्रियांमध्ये एफएसडी म्हणजे फिमेल सेक्सुअल डिसफंक्शन असण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की सेक्स दरम्यान वेदना किंवा मानसिक कारणे. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घेणे फार महत्वाचे आहे.

खाली या समस्येची मुख्य कारणे आहेत :

मानसशास्त्रीय कारणे : सेक्स पुरुषांसाठी एक शारीरिक मुद्दा असू शकतो, परंतु स्त्रियांसाठी हा एक भावनिक मुद्दा आहे. भूतकाळातील वाईट अनुभवांमुळे काही स्त्रिया भावनिकरीत्या खचतात. मानसिक समस्या किंवा औदासिन्य हे सध्याच्या वाईट अनुभवांचे कारण असू शकते.

पराकाष्टेपर्यंत पोहोचण्यास असमर्थ : एफएसडीच्या दुसऱ्या भागास अॅनोर्गेस्मीया म्हणतात. ही स्थिती तेव्हा उद्भवते जेव्हा एखाद्या व्यक्तिस पराकाष्ठा नसते किंवा मग तो कधीही यापर्यंत पोहोचू शकला नसेल. पराकाष्टेपर्यंत पोहोचण्यात असमर्थतादेखील एक वैद्यकीय अट आहे, लैंगिक संबंधात कमी रस असणे आणि भावनोत्कटतेपर्यंत पोहोचण्याची असमर्थता दोन्ही बाबी गंभीर आहेत.

असे यामुळे होते, कारण स्त्रिया फोरप्ले अधिक पसंत करतात. जर तसे झाले नाही तर मग पराकाष्ठेपर्यंत पोहोचणे अवघड आहे. याचा उपचार मानसोपचाराद्वारे केला जाऊ शकतो. महिलांना त्यांच्या नात्यात सेक्सनिगडीत समस्या असतात. जर आपल्यालाही अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत असेल तर आपण लवकरात लवकर अॅन्ड्रोलॉजिस्टला भेटले पाहिजे जेणेकरून समस्येचा संबंधांवर परिणाम होणार नाही.

फीमेल सेक्सुअल डिसफंक्शन उपाय आणि उपचार : एफएसडी उपचारासाठी घरगुती उपायांबद्दल सांगायचे झाल्यास तर प्रत्यक्षात ते फारसे प्रभावी नाही. मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारच्या फीमेल व्हीयग्रा उपलब्ध आहेत, परंतु त्या सहसा इच्छित निकाल देत नाहीत. लेसरद्वारे महिला योनीतून कायाकल्प करण्याचा प्रयत्न करू शकतात. आपण इच्छित असल्यास, प्लेटलेट रिच प्लाझम (पीआरपी) थेरपीदेखील अवलंबू शकतात. या भागात रक्ताभिसरण सुधारण्यासाठी योनीमार्गाजवळ इंजेक्शन दिले जाते. हे ओशआउट म्हणून ओळखले जाते.

बहुतेक स्त्रिया, विशेषत: जेव्हा वयस्क होतात तेंव्हा त्यांना लैंगिक समागमापूर्वी अधिक फोरप्लेची आवश्यकता असते, बहुतेक स्त्रियांना योनिमार्गाच्या समागमादरम्यान जास्त आनंद येत नाही. त्यांनी स्वत:ला लैंगिक समागम करण्यास सक्षम होण्यासाठी त्यांच्या लैंगिक अवयवांना कुरवाळण्यास जोडीदारास सांगितले पाहिजे. हस्तमैथुन किंवा तोंडावाटे समागम करून लैंगिक क्रियाकलाप केला जाऊ शकतो.

लिव्ह इन रिलेशन, जेव्हा होईल ब्रेकअप

* आरती प्रियदर्शिनी

राखी काही दिवसांपासून खूपच तणावात दिसत होती. ऑफिसमधील कामात तिचे लक्ष लागत नव्हते. तिचे पद जबाबदारीचे होते. अशावेळी बॉसने तिच्यावर चिडणे स्वाभाविक होते.

तिची सहकारी नीलिमाला याचे वाईट वाटले. एक दिवस जेवणाच्या सुट्टीत तिने राखीच्या मनातले जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि राखीने मन मोकळे केले.

‘‘नीलिमा, मी आणि मिहीर वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतो. लग्नासाठी मी आईवडिलांनाही तयार केले होते. मात्र आता तो या नात्याला कंटाळला आहे. त्याला स्पेस हवीय. काही आठवडयांपासून आम्ही एकाच छताखाली पण अनोळखी असल्यासारखे राहतोय. तीन दिवसांपासून तर तो मला भेटलाही नाही. मेसेज नाही, कॉल नाही, रिप्लायच देत नाही,’’ असे सांगून ती ढसाढसा रडू लागली.

नीलिमाने तिला मनमोकळेपणे रडू दिले. त्यानंतर स्वत:च्या घरी घेऊन गेली. नीलिमा आईवडील आणि भाऊ-वहिनीसोबत राहत होती. राखीला एका कुटुंबाचा भावनिक आधार मिळाला आणि मैत्रिणीचा पाठिंबा. यामुळे तिचे मनोबल वाढले आणि ती पुढील आयुष्य हसतमुखाने जगू शकली.

राखीसारख्या कितीतरी मुलींना सहजीवन किंवा लिव्ह इन रिलेशनशिपने  मोहजालात अडकवले आहे, यातून बाहेर पडताना त्या पूर्णपणे कोलमडून जातात आणि हाती लागतो तो केवळ हताशपणा, मानसिक निराशा.

काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता दिली होती, तेव्हा तरुणाई आनंदित झाली. जणू मोकळे आकाश आणि स्वच्छंद विहारासाठी त्यांना सोनेरी पंख गवसले होते. परंतु आता या नात्यातील स्वच्छंदीपणा अनेकांना घायाळ करत आहे. यात महिला, मुली अधिक आहेत.

नॅन्सीसोबत तर खूपच वाईट घडले. प्रकाशसोबतच्या ६ महिनांच्या सहजीवनानंतर अचानक एका अपघातात त्याचा मृत्यू झाला. या दु:खातून ती कशीबशी बाहेर पडत नाही तोच आपण आई होणार असून गर्भपाताची वेळही निघून गेल्याचे तिला समजते. हताशपणे ती आत्महत्येचे चुकीचे पाऊल उचलते आणि मागे सोडून जाते ते आपले दु:खी कुटुंब व त्यांची अनमोल स्वप्नं जी कधीकाळी त्यांनी नॅन्सीसाठी पाहिली होती.

महानगरात अशी कितीतरी उदाहरणं दिसतील. आता प्रश्न असा आहे की लग्नसंस्था हे बंधन आणि लिव्ह इन स्वातंत्र्य आहे तर मुलींना इतका त्रास का सहन करावा लागतोय? याचे उत्तर आहे समाजाची दुतोंडी मानसिकता.

भारतीय महिलांसाठी सामाजिक आणि भावनात्मक स्तरावरही संबंध तोडणे अजूनही सोपे नाही. पुरुष असे संबंध तोडून लग्नही करतात आणि समाज ते स्वीकारतेही, पण तोच समाज महिलांच्या चारित्र्यावर बोट ठेवतो.

अशा परिस्थितीत आपण काही गोष्टींचे पालन करून सुखी जीवन जगू शकतो. लिव्ह इनचे नाते तुटल्यानंतर पळपुटेपणा पत्करण्यापेक्षा हा आपला अनुभव समजून त्यातून धडा घ्या. हे खरे आहे की महिलांसाठी जोडीदाराचा सहवास विसरणे आणि भविष्यातील संघर्षाचा सामना करणे सोपे नाही. परंतु जीवन प्रवाही आहे. म्हणूनच यातून बाहेर पडण्यासाठी गरज आहे ती या नात्याशी जोडल्या गेलेल्या काही पैलूंचा सारासार विचार करण्याची.

स्वत:ला कामात गुंतवून ठेवा : तुम्ही नोकरी करत असाल तर स्वत:ला कामात गुंतवून ठेवणे थोडेसे सोपे आहे. आपल्या कामावरील टार्गेटवर लक्ष केंद्रित करा. जोडीदाराला आपलेसे कसे करावे, याचा सतत विचार करू नका कारण त्याने पूर्ण मानसिक तयारीनिशीच तुम्हाला सोडून दिले आहे. त्यामुळे तो परत येणार नाही.

नोकरी न करणाऱ्या मुलींनी जास्तीतजास्त वेळ कुटुंबासोबत घालवावा स्वत:मधील एखाद्या कलेला विकसीत करा. ती सर्व कामे करा जी यापूर्वी वेळ कमी असल्यामुळे तुम्ही करू शकला नाहीत. कधीतरी आपल्या भावनांना कागदावर शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करा. मनातील वेदना काहीशी कमी होईल.

लोक तर बोलणारच : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेताना तुम्ही लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले असेल. लोग काय म्हणतील, याची पर्वा केली नसेल. मग आताही तसेच करा. शांतपणे त्यांच्या नकारात्मक बोलण्याकडे दुर्लक्ष करा. आपली बाजू मांडण्याचा किंवा आपणच कसे बरोबर आहोत, हे पटवून देण्याचा प्रयत्न करू नका, कारण तुम्ही कुठलाही गुन्हा केलेला नाही.

न्यूनगंड बाळगू नका : तुम्ही केवळ मैत्रीच्या एका नात्यापासून वेगळे झाला आहात. तेव्हा स्वत:ला घटस्फोटीत समजू नका. तुम्ही कुठला गुन्हा केलेला नाही. यौनशुचितेच्या तराजूवरही स्वत:ला तोलू नका. शारीरिक संबंध ठेवणे एक नैसर्गिक क्रिया आहे. त्याचा न्यूनगंड बाळगू नका. जोडीदारासोबत घालवलेल्या सुखद क्षणांनाच जीवनात स्थान द्या. त्याच्याबद्दल मनात द्वेष नसावा. समोरासमोर आल्यानंतरही ओरडू नका, टोमणे मारू नका तर मैत्रीपूर्ण वागा.

कायदा तुमच्यासोबत आहे : तुम्ही दीर्घ काळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल आणि तुम्हाला मूल असेल आणि तरीही तुमचा जोडीदार तुमच्या मर्जीशिवाय तुम्हाला सोडू इच्छित असेल तर तुम्ही कायद्याचा आधार घेऊ शकता. सर्वोच्च न्यायालयाने २०१० मध्ये असा निकाल दिला आहे की लिव्ह इनमुळे जन्माला आलेले मूल अनावरस समजता येणार नाही. तुम्ही सीआरपीसीच्या कलम १२५ अंतर्गत मुलांच्या उदरनिर्वाहासाठी पोटगी देण्याची याचिका दाखल करू शकता. कारण दीर्घ काळपर्यंत लिव्ह इनच्या नात्यात राहिल्याने तुम्हाला कायदेशीरपणे पत्नीचा दर्जा मिळतो.

जोडीदाराने मारहाण किंवा जबरदस्ती केल्यासही तुम्ही न्यायालयात घरगुती हिंसा कायद्याअंतर्गत न्याय आणि उदरनिवार्हासाठी पोटगी मागू शकता. किंवा हिंदू अॅडॉप्शन अँड मेंटनन्स अॅक्टच्या कलम १८ अंतर्गतही याचिका दाखल करू शकता.

भावी जीवनसाथीपासून काही लपवू नका : तुटलेल्या नात्याच्या दु:खातून बाहेर पडण्यासाठी लग्न चांगला पर्याय आहे. पण लग्नापूर्वी भावी जीवनसाथीला आपल्या लिव्ह इन रिलेशनशिपबाबत नक्की सांगा. सोबतच त्याला असा विश्वास द्या की तुम्ही जुने नाते नव्या नात्याआड येऊ देणार नाही.

पुरुषांनीही लक्ष द्या : सहजीवनातून वेगळे होण्याचा परिणाम सर्वाधिक मुलींनाच सहन करावा लागतो हे मान्य, पण संवेदनशील पुरुषांवरही याचा परिणाम होतो हे नाकारता येणार नाही.

जयंतच्या पार्टनरने त्याला सोडल्यानंतर त्याच्यावर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. खूप समस्यांचा सामना केल्यानंतर तो यातून सुटू शकला.

दिल्ली उच्च न्यायालयाने अशा प्रकरणांत पोलिसांना बलात्काराऐवजी विश्वासघाताचा (क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट) खटला दाखल करून तपासाचे आदेश दिले आहेत, जेणेकरून पुरुषांनाही न्याय मिळेल.

तरीही वाढतोय ट्रेंड घटस्फोटाचा

* मोनिका अग्रवाल

लग्न झाल्यापासून नेहा पती रॉकीला इतर कुणासोबत कुठेही जाऊ देत नसे. रॉकीने कुणाशीही बोललेले तिला आवडत नसे. ती नाराज होत असे. माझ्यावर संशय का घेतेस, असे रॉकीने विचारल्यावर माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे ती हळवी होऊन सांगत असे.

काही कालावधी लोटल्यानंतर तर अशी परिस्थिती निर्माण झाली की नेहा रोज दर दहा मिनिटांनी रॉकीच्या ऑफिसमध्ये फोन करून तो काय करतोय याची विचारपूस करू लागली. कधी घरी येताना माझ्यासाठी माझ्या आवडीचे काहीतरी खरेदी करून आण, असे सांगू लागली. मात्र जेव्हा तो तिच्यासाठी काहीतरी खरेदी करून आणत असे तेव्हा तुझ्यासोबत खरेदीसाठी कोण गेली होती, असे ती संशयाने विचारत असे. काही दिवसांनंतर तर ती सर्व काम सोडून रॉकी काय करतोय, कुठे जातोय, याच्यावरच बारकाईने लक्ष ठेवू लागली. तिच्या अशा संशयी वृत्तीमुळे रॉकीसोबतच त्याचे कुटुंबही त्रासून गेले.

रॉकीचे कामातील लक्ष उडाले. त्याने चांगला जम बसवलेल्या व्यवसायालाही याची आर्थिक झळ बसली. तो आपल्या मित्र परिवारापासून दूर होत गेला होता. नेहाच्या अशा संशयी वागण्यामुळे रॉकी घराबोहर जाऊन नातेवाईकांनाही भेटू शकत नव्हता. संशय आणि होणारे वाद यामुळे दोन कुटुंबातील प्रेमळ नात्याची वीण उसवत गेली. रॉकीने नेहाला सोडून दिले. हे कसले प्रेम जे नेहाच्या अतिसंवेदनशील स्वभावामुळे संशयाच्या अग्निकुंडात स्वाहा झाले आणि जन्मोजन्मासाठी बांधलेली लग्नगाठ कायमची सुटली.

नव्या नात्यातील गुंता

संशोधनानुसार जेव्हा दोन जीव एकत्र येऊन नव्या नात्याची सुरुवात करतात, तेव्हा प्रारंभी एकमेकांना समजून घेण्यात त्यांना बरीच कसरत करावी लागते. यात अपयश आले तर भविष्यात घटस्फोटाची शक्यता निर्माण होते. मात्र, अनेक वर्षे एकत्र संसार केल्यानंतर वाढत्या वयात घटस्फोट घेणे मनाला पटत नाही.

मनमिळावू स्वभावाचा राघव हा एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता. घरी त्याच्या लग्नाची बोलणी सुरू झाली, तेव्हा मंजिरी त्याला तितकीशी आवडली नव्हती. मात्र घरच्यांच्या आनंदासाठी त्याने लग्नाला होकार दिला. घरच्यांनी त्याच्यासाठी देखणी, कुटुंबवत्सल मुलगी पसंत केली होती जेणेकरून ती राघवच्या प्रत्येक सुख-दु:खात त्याला प्रेमळ साथ देईल.

मंजिरीला इतरांशी बोलायला आवडत असे. मात्र राघवने इतर कुणाला भेटलेले, बोललेले तिला खटकत असे. राघव हसला तर एवढया मोठयाने का हसतोस, असे विचारायची. त्याची सहज एखाद्या मुलीशी नजरानजर झाली तरी त्या मुलीला पाहून तू लाळ का घोटतोस, असे विचारायची.

राघव मित्रांसोबत गेला की थोडयाच वेळात मंजिरी त्याला फोन करायची. की गप्पा मारून आणि चहाचे घोट घेऊन समाधान झाले नाही, म्हणून अजून घरी आला नाहीस का?

राघव घरी आल्यानंतर ती त्याच्याशी भांडायची. या रोजच्या भांडणाला कंटाळून अखेर राघवने मित्र, नातेवाईकांना भेटणे, त्यांच्याशी बोलणे सोडून दिले. घरून कामावर जायचा आणि आल्यावर खोलीत डांबून घ्यायचा. मंजिरी तासन्तास टीव्ही पाहण्यात मग्न असायची. हळूहळू राघव दारूच्या आहारी गेला. पण तरीही मंजिरी त्याला साथ द्यायची सोडून त्याला सुनवायची की तू नाटक करतोस. मित्रांना भेटण्यासाठी बहाणा बनवतोस.

एके दिवशी तर हद्दच झाली. कुटुंबातील सर्वजण गप्पा मारत बसले होते. तेव्हा मंजिरी घरात हिट मारू लागली. हे पाहताच राघव ओरडला आणि म्हणाला काय मूर्ख बाई आहे, सर्वांचा जीव घेणार आहेस का? तिच्यावर मात्र त्याच्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही.

राघवने मंजिरीचा स्वभाव बदलण्याचा बराच प्रयत्न केला. शेवटी काहीच पर्याय न उरल्याने तिच्याशी बोलणे बंद केले. त्याला आता तिच्यासोबत संसार करायचा नव्हता. पण समाज काय म्हणेल? मूल झाल्यावर सर्व ठीक होईल, अशी दरवेळेस आईवडील त्याची समजूत काढत असत.

दिवस कसेबसे जात होते. पाहता पाहता लग्नालाही बरीच वर्षे झाली. मुले झाली. मात्र कालौघात परिस्थिती अधिकच बिघडली. स्वत:चा स्वभाव बदलण्याचा किंवा कुटुंबाचे मन जिंकण्याचा प्रयत्न मंजिरीने कधीच केला नाही. ती कधी सासूला दोष द्यायची तर कधी सासऱ्यांना शिव्या घालायची. एवढेच नव्हे तर मुलांनाही मारायची. एखाद्या नातेवाईक महिलेने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला तर राघवसोबत तिचे अनैतिक संबंध आहेत, असा आरोप करत तिच्याच चारिर्त्यावर संशय घ्यायची.

परिस्थिती हळूहळू इतकी चिघळली की यातून बाहेर पडण्याचा कोणताच मार्ग दिसेनासा झाला. मंजिरीच्या माहेरचेही तिला समजावण्याऐवजी तिच्या सासरच्या मंडळींनाच दोष देत. हार मानून मुलींच्यी आणि बहिणींच्या सल्ल्याने राघव मंजिरीला कायमचे तिच्या माहेरी सोडून आला. आता दोघेही न्यायालयाचे उंबरठे झिजवत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

कुटुंब न्यायालयात समुपदेशकाने त्यांच्या मुलींना (यातील एकीचे लग्न झाले आहे) जेव्हा तुम्हाला नेमके काय वाटते, असे विचारले त्यावेळी आईने कधीच घरी परत येऊ नये. तिने वडिलांना समजून घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. ती गेल्यापासून घरात शांतता आहे, असे त्यांनी सांगितले.

आता या परिस्थितीचे कारण काय? एका सर्वेक्षणातील अहवालात यासंदर्भात आश्चर्यचकीत करणाऱ्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. घटस्फोट घेण्यामागील एक कारण म्हणजे लहरी, सनकी स्वभाव. मग ती गरजेपेक्षा अति प्रेमाची सनक असो किंवा अति रागाची, ती वाईटच. प्रत्यक्षात जोडीदारापैकी एक जेव्हा दुसऱ्यावर प्रेम करतो त्यावेळी त्याच्याकडूनही त्याला त्याच निखळ प्रेमाची अपेक्षा असते. हे प्रेम त्याला मिळाले नाही तर मात्र नाते अडचणीत येते. अहवालानुसार अशी स्थिती दोघांसाठीही घातक असते. कारण आपल्यात काहीच कमतरता नाही, आपला जोडीदारच आपल्याशी जुळवून घेत नाही असे एकाला वाटत असते तर, आपण लग्न करून उगाचच फसलो असे दुसऱ्याला वाटत असते. अशावेळी दोघेही काहीतरी नव्याचा शोध घेऊ लागतात.

वय झाल्यानंतर घटस्फोट कशासाठी?

प्रसिद्ध लेखक कोएलो यांचे असे म्हणणे आहे की जर निरोप घेण्याचे धाडस नसेल तर जीवन आपली झोळी संधींनी भरूनही ते आपल्याला कधीच आनंदी ठेवू शकत नाही. त्यांचे हे म्हणणे घटस्फोटितांना तंतोतंत लागू होते.

भारतासारख्या देशात गेल्या १२ वर्षांत घटस्फोटांचेप्रमाण दुपटीने वाढले आहे. अखेरीस परिपक्व किंवा उतार वयात घटस्फोट घेण्याचे नेमके कारण काय?

लेखक जेनिफरचं म्हणणं आहे, ‘घटस्फोटाचा अर्थ म्हणजे जीवनाचा अंत नाही. वैवाहिक जीवन जगताना सतत समस्यांचा सामना करावा लागत असेल तर अशा वैवाहिक जीवन जगण्याला काय अर्थ आहे? घटस्फोट घेतला म्हणून कोणाचे जीवन संपत नाही. आरोग्य तर तेव्हा बिघडते जेव्हा आपण अपयशी वैवाहिक जीवन नाईलाजाने जगत असतो.’

२५ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोटाच्या दिशेने

संसारातील २५ वर्षांनंतर जोडीदाराशी विभक्त झाल्यावर कोणतीही जबाबदारी सतावत नाही. लग्न करून त्यांच्या मुलांनी संसार थाटलेला असतो. आपल्या मर्जीनुसार जीवन जगण्याची त्यांची वेळ त्यांची असते. जोडीदाराची कटकट नसते. प्रत्येक क्षण निश्चिंतपणे जगता येतो आणि याच क्षणांची प्रदीर्घ काळ वाट पाहणारे उतार वयातही कुठलाही संकोच न बाळगता घटस्फोट घेतात.

कुटुंब न्यायालयाचे समुपदेशक सिन्हांचं म्हणणं आहे की नातेसंबंधात कटूता निर्माण झाली आणि नाते चिघळू लागले की अशावेळी विलग होणे अधिक योग्य ठरते. त्यांच्या मते त्यांचा एक मित्र आणि त्याची दोन मुलं आहेत. मात्र पतीपत्नी विलग राहत असूनही कोणतेही वादंग न करता मुलांचं पालनपोषण उत्तमरित्या करत आहेत. मुलंही खुश आहेत.

इंटरनेटमुळे संबंध तुटतात

*नसीम अन्सारी कोचर

रितूच्या घरी पार्टी होती. 20-25 लोकांना बोलावले. पार्टीसाठी दोन कारणे होती, पहिली पतीला पदोन्नती मिळाली आणि दुसरी मुलगा पीएमटीमध्ये निवडला गेला. रितूने काही शेजारी, काही जवळचे नातेवाईक, काही मित्र आणि मुलाच्या मित्रांना पार्टीसाठी आमंत्रित केले होते.

प्रत्येकजण ठरलेल्या वेळी उपस्थित होता, पण अलीकडे गोंगाट, विनोद किंवा बोलण्याऐवजी एक विचित्र शांतता होती. बहुतेक लोक त्यांच्या मोबाईलमध्ये व्यस्त होते. आत आला, यजमानाला नमस्कार करून नमस्कार केला आणि मग एका कोपऱ्यात धरलेल्या मोबाईलवर डोळे घालून बसला. पूर्वी जमलेले रितूचे मित्रही गदारोळ निर्माण करायचे, खट्याळपणा, तक्रारी, टोमणे, हास्य थांबत नव्हते.

ते एकमेकांची साडी, दागिने यावर नजर ठेवायचे, पण आता ते डोळेही मोबाईलमध्येच अडकले आहेत. काही व्हिडिओ पाहत आहेत, काही यूट्यूब तर काही फोनवर बोलण्यात व्यस्त आहेत.

एका कोपऱ्यात, मुलाचे दोन मित्र एकमेकांशेजारी डोके ठेवून मोबाईलवर फुटबॉल सामना पाहत आहेत. राजकारणात रस असणारे डिबेट शोमध्ये मग्न असतात, मग कोणीतरी बातमी बुलेटिन बघत असते. जणू कोणाकडे वेळ नाही आणि आपापसात संभाषणाची गरज नाही. वास्तवाच्या जगापासून दूर, प्रत्येकजण आभासी जगाच्या मनोरंजनात मग्न आहे.

बदलती जीवनशैली

पूर्वी दुपारचे जेवण तयार करून आणि चौकात पॅकिंग केल्यानंतर गृहिणी शेजारी बसायच्या. ते एकमेकांचे दु:ख सांगायचे. हिवाळ्यात जिथे जिथे पाहाल तिथे 5-6 महिलांचा मेळा असायचा. नवीन विणकाम डिझाईन्स शिकवले गेले. चर्चेत नवीन पाककृती शिकल्या. लोणचे, मुरब्बा, पापड एकत्र बनवले जायचे. पण आता दुपारचे जेवण शिजवल्यानंतर गृहिणी शेजारीसुद्धा येत नाही. फक्त मोबाईल घ्या आणि बसा.

व्हॉट्सअॅप, फेसबुक, यूट्यूबमध्ये आयुष्याचे मौल्यवान क्षण एकटे कसे घालवत आहेत. स्मार्ट फोन आणि इंटरनेटमुळे घरातील सदस्यांमध्ये शांतता निर्माण झाली आहे. त्याच्या मोकळ्या वेळेत कोणीही कोणाशी बोलत नाही, पण त्याचा मोबाईल घेऊन तो खाली बसतो. चहाच्या जेवणाच्या टेबलवर आणि आमच्या मोबाईलवर फक्त आम्हीच आहोत. आजूबाजूला कोण बसले आहे याची आम्हाला पर्वा नाही.

मुलगा संध्याकाळी ऑफिसमधून घरी येत नाही आणि आईबरोबर बसत नाही. त्याचा संपूर्ण दिवस कसा गेला ते विचारत नाही. त्याने काय केले? ऑफिसमध्ये त्याचा दिवस कसा होता हे सांगत नाही. तो येतो आणि लॅपटॉप उघडतो आणि खाली बसतो.

नात्यांमध्ये गोडवा नाही

सून आता सासूला विचारत नाही की अशा लोणच्यामध्ये कोणते मसाले वापरले जातात. आता लोणचे बनवण्याच्या सर्व पद्धती यूट्यूबवर उपलब्ध आहेत. सासूचे अनुभव मागे राहिले आहेत. लोणच्याच्या आंबटपणामुळे अनेक सून नात्यांमध्ये विरघळणाऱ्या गोडवापासून वंचित राहतात.

होय, आजकाल आपल्या सर्वांची ही स्थिती आहे. वेळ किंवा विश्रांती नाही कारण जीवनाने मिळवलेली गती त्याला धीमा करणे शक्य नाही. या वेगाच्या दरम्यान, आम्हाला मिळालेले काही क्षणदेखील काढून टाकले गेले कारण एक गोष्ट नेहमी आपल्या हातात, आमच्या खोल्यांमध्ये आणि जेवणाच्या टेबलांवर टिकून असते आणि ती म्हणजे इंटरनेट.

मात्र, इंटरनेट हे वरदानापेक्षा कमी नाही. आजकाल, सर्व काम यावर अवलंबून आहे. जिथे ते थांबले, असे वाटते की श्वास थांबला आहे. कधी महत्त्वाचा मेल पाठवावा लागतो, कधी स्टेटस किंवा चित्र सोशल साईटवर अपडेट करावे लागते. कधीकधी आपल्याला व्हॉट्सअॅप कॉल करावा लागतो, कधीकधी आपल्याला व्हिडिओ पहावा लागतो.

जिथे इंटरनेटशिवाय जगणे कठीण झाले आहे, तिथे हे इंटरनेट आमचे वैयक्तिक क्षण आमच्याकडून हिसकावून घेत आहे. आमच्यापासून आमच्या फुरसतीचे क्षण काढून घेणे, आपल्या नातेसंबंधांवर परिणाम करणे, प्रियजनांमधील अंतर वाढवणे. यामुळे एक प्रचंड दळणवळण अंतर निर्माण होत आहे.

फुरसतीचे क्षण हिसकावून घेतले आहेत

कार्यालय असो किंवा शालेय महाविद्यालय, त्याच्या शिफ्टच्या समाप्तीनंतर जो काही वेळ असायचा तो तो आपल्या प्रियजनांसोबत, आपल्या प्रियजनांमध्ये घालवायचा. आजचा दिवस कसा होता, कोण काय बोलले, कोणासोबत काय घडले, आम्ही घरातल्या सगळ्या गोष्टी प्रियजनांसोबत शेअर करायचो, ज्यामुळे आमचा ताण सुटला. पण आता, जेव्हा आपल्याला वेळ मिळतो, आपल्या प्रियजनांशी बोलणे किंवा त्यांच्यासोबत वेळ घालवणे देखील वेळेचा अपव्यय वाटतो. डिजिटल जगात काय चालले आहे हे पाहण्यासाठी आम्ही शक्य तितक्या लवकर आपला मोबाईल किंवा लॅपटॉप हस्तगत करतो.

कुठेतरी कोणीही आपल्यापेक्षा जास्त लोकप्रिय झालेला नाही, कुठेतरी कोणाच्या चित्राला आमच्या चित्रापेक्षा जास्त कमेंट्स किंवा लाइक्स मिळाल्या नाहीत, आम्ही या फेऱ्यांमध्ये आपला वेळ वाया घालवत आहोत आणि जर असे झाले तर आम्ही स्पर्धा करू पण खाली या. आम्ही प्रयत्नांमध्ये सामील होतो आणि मग असा स्फोट घडवून आणतो, जेणेकरून लोक या डिजिटल जगात आमचे अधिक अनुसरण करू शकतील.

आमचे वैयक्तिक संबंध कितीही दूर असले, तरी आम्ही त्यांना दुरूस्त करण्याइतके लक्ष देत नाही जितके आपण डिजिटल जगात नातेसंबंध जपण्यासाठी करतो.

ऑफलाइन मोड कालबाह्य आहे

आजकाल आपण ऑनलाईन मोडवर जास्त जगतो, ऑफलाईन मोड कालबाह्य झाल्यासारखे झाले आहे.

हे खरे आहे की इंटरनेटमुळे, आम्ही सोशल साइट्सशी कनेक्ट होऊ शकलो आणि त्यांच्याद्वारे आम्ही आमच्या जुन्या मित्र आणि नातेवाईकांशी पुन्हा कनेक्ट होऊ शकलो, परंतु कुठेतरी हे देखील हे खरे आहे की या सर्वांच्या दरम्यान, आम्ही वैयक्तिक संबंध आणि विश्रांतीचे क्षण गमावले आहेत.

तुम्हाला क्वचितच आठवत असेल की तुम्ही शेवटची वेळ कधी बसली होती आणि तुमच्या आईबरोबर चहा प्यायला होता आणि फक्त इथे आणि तिथे किंवा तुमच्या लहान भावंडांशी बोलला होता तुम्हाला क्वचितच आठवत असेल की तुम्ही शेवटची वेळ कधी आईसोबत बसली होती आणि फक्त इथे आणि तिथे चहा पिताना बोलत होता किंवा जेव्हा तुम्ही बाजारातून भाजी आणायला गेला होता तेव्हा तुमच्या लहान भावंडांसोबत असे चालत असता?

तुम्ही मोबाईलशिवाय तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत जेवणाच्या टेबलावर कधी बसलात?

आपल्या मुलाला घोडा म्हणून हसवण्याची मजा कदाचित या पिढीच्या व पुढील पिढीच्या वडिलांनाही माहित नसेल.

आजकाल केवळ वडीलच नाही तर आईसुद्धा इंटरनेटच्या ओझ्याखाली दबल्या गेल्या आहेत. नोकरी करणाऱ्या स्त्रियांना त्यांच्या घरी वेळ घालवणे आणि कुटुंबासोबत फुरसत घालवणे अशक्य झाले आहे.

युवक पूर्णपणे इंटरनेटच्या पकडात आहेत आणि त्यांना तिथून बाहेर पडायचेही नाही. आजकाल ज्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन नाही किंवा जे लोक सोशल साइट्सवर नाहीत, लोक त्यांच्यावर हसतात आणि त्यांना कालबाह्य आणि कंटाळवाणे समजतात.

इंटरनेट आरोग्यासाठी विष बनते

डॉक्टरांच्या मते, सोशल साइट्सवर जास्त वेळ घालवणे हे एक प्रकारचे व्यसन आहे. हे व्यसन मेंदूच्या त्या भागाला सक्रिय करते, जे कोकेनसारख्या ड्रगचे व्यसन असताना उद्भवते.

‘युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन’च्या अभ्यासानुसार, जे लोक सोशल साइट्सवर जास्त वेळ घालवतात त्यांना अधिक एकटेपणा आणि उदासीनता वाटते कारण ते जितके जास्त ऑनलाईन संवाद साधतात तितके लोकांशी त्यांचा समोरासमोर संपर्क कमी होतो.

इंटरनेटचा जास्त वापर करणाऱ्यांमध्ये तणाव, निराशा, नैराश्य आणि चिडचिडेपणा येऊ लागतो. त्यांची झोपही विस्कळीत झाली आहे. ते अधिक थकले आहेत.

या सगळ्या दरम्यान, सेल्फी ही देखील एक क्रेझ बनली आहे, ज्यामुळे बहुतेक मृत्यू भारतातच होऊ लागले आहेत.

जरी लोक कुटुंबासह सहलीसाठी गेले असले तरी ते ठिकाणाचा आनंद घेण्यापेक्षा चित्रे क्लिक करण्यासाठी पार्श्वभूमी शोधण्यात जास्त वेळ घालवतात. एकमेकांसोबत दर्जेदार वेळ घालवण्याऐवजी, प्रत्येकाचे लक्ष सेल्फी क्लिक करण्यावर केंद्रित आहे, यामुळे हे विश्रांतीचे क्षण निघून जातात आणि आम्हाला वाटते की इतका प्रवास करूनही आपण निवांत वाटत नाही.

जर आपण चित्रपट पाहायला गेलो किंवा डिनरला गेलो, तर आपले लक्ष सोशल साईट्सच्या चेकइनवर जास्त राहते.

सार्वजनिक ठिकाणी सुद्धा, लोक आता एकमेकांना पाहून हसत नाहीत कारण प्रत्येकाच्या नजरा त्यांच्या मोबाईलवर आहेत. वाटेत किंवा माळ मध्ये चालत असताना, जिथे तुम्ही बघाल तिथे तुम्हाला फक्त लोकांच्या गळ्यातील ताई दिसतील. यामुळे अनेक अपघातही होतात.

इंटरनेट गुन्हेगारी वाढत आहे

इंटरनेटमुळे सायबर गुन्हे इतके वाढले आहेत की आता प्रत्येक जिल्ह्यात सायबर सेल उभारणे आवश्यक झाले आहे. मुले, महिला, वृद्ध हे सायबर गुन्ह्यांना सर्वाधिक असुरक्षित असतात.

आजकाल इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ सहज दिसू शकतात. तुमचे वय कितीही असो, तुमच्या हातात स्मार्ट फोन असल्यास तुम्ही पॉर्न व्हिडिओ पाहू शकता. इंटरनेटच्या घटत्या दरांमुळे या साइट्सची मागणी वाढली आहे. अशा साइट्सचा मुलांवर वाईट परिणाम होत असताना, वडीलही त्यांच्या लैंगिक आणि वैयक्तिक आयुष्याला धोका देतात कारण ते त्यांना बळी पडतात. हे व्यसन असे दिसते की ते त्यांच्या जोडीदाराकडून वास्तविक जीवनात देखील समान अपेक्षा करू लागतात, परंतु हे व्हिडिओ कसे बनतात हे त्यांना माहित नसते. यामध्ये चुकीची माहिती दिली आहे, जी वैयक्तिक जीवनात वापरणे शक्य नाही.

अनेकदा विवाहबाह्य संबंधही ऑनलाईन होऊ लागले आहेत. गप्पा मारण्याची संस्कृती लोकांना इतकी आवडते की ते आपल्या जोडीदाराची फसवणूक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. यामुळे संबंध तुटत आहेत, अंतर वाढत आहेत.

काही मुली अधिक पैसे कमवण्याच्या शोधात चुकीच्या साइट्सच्या भ्रमात अडकतात. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून अशी कामे केली जातात, ज्यातून त्यांना बाहेर पडणे शक्य नसते.

इंटरनेट बँकिंग फसवणुकीची प्रकरणेही आता सामान्य झाली आहेत. तुमची बँक माहिती जाणून घेतल्यानंतर, गुन्हेगार तुमच्या खात्यातून सर्व पैसे त्याच्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करतो आणि तुम्ही बघत राहता. या सर्व गोष्टींमुळे हे स्पष्ट होते की इंटरनेट सुविधेऐवजी समस्या अधिक बनली आहे. त्याने आमच्यापासून आपले संबंध, आपली सुरक्षा, विश्रांतीचे क्षण काढून टाकले आणि प्रियजनांमध्ये आम्हाला एकटे केले.

प्रेम आणि बेडरूम

* रूचि सिंह

दांपत्य जीवनात प्रेमाचे रंग भरण्यासाठी बेडरूमची महत्त्वाची भूमिका असते असे मनोविकार तज्ज्ञ डॉ. दिनेश तसेच डॉ. कुंदरा यांचे म्हणणे आहे. विश्रांती घेण्यासाठी पतिपत्नी नेहमीच बेडरूमची निवड करतात. म्हणूनच अधेमधे बेडरूममध्ये थोडा बदल करून रोमँटिक आयुष्य दिर्घकाळपर्यंत टिकवता येऊ शकते.

भिंतीचे रंग : बेडरूममधील भिंतीच्या रंगाचेही स्वत:चे असे एक वेगळे स्थान आहे. प्रेमाचा रंग अधिकच गहिरा करण्यासाठी फिकट गुलाबी, आकाशी, फिकट हिरवा अशा रंगांचा वापर करावा. कारण रंगही बोलके असतात. प्रणयात प्रेमाची उधळण करतात हे रंग.

आकर्षक छायाचित्रं लावावीत : छान, सुंदर व रोमँटिक छायाचित्र बेडरूममध्ये लावावीत. बीभत्स, उर्जाहिन, वाघ, धावते घोडे इ.ची छायाचित्रं लावू नयेत. पक्षी, हंस, गुलाबाची फुले अशाप्रकारची छायाचित्रं लावावीत. अशा प्रकारची छायाचित्रं तुमच्या जीवनात प्रेम व आनंद निर्माण करतील.

लाइट : प्रेमभावना जागृत करण्यासाठी प्रकाशाची मुख्य भूमिका असते. फिकट गुलाबी आकाशी रंगांच्या लाइट्सचा बेडरूममध्ये वापर करा, बेडरूममध्ये डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट लाइट्स पडली पाहिजेच. तसेच लॅम्पशेड, कॉर्नर लाइट याचाही उपयोग बेडरूममध्ये केला जाऊ शकतो. यामुळे बेडरूममध्ये मादकता व प्रेमाचा समावेश होतो. खोलीत जेवढा कमी प्रकाश तितकंच जास्त एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होतं.

सुवास : प्रेमभावना आणि प्रणय कायम ठेवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या सुंगधांचा वापर केला जाऊ शकतो. लवेंडर, मोगरा, चंदन वगैरे सुवासांनी पतीपत्नीमध्ये भावना जागृत होतात. खोलीत फुलदाणी व फुलांचे गुच्छ ठेवावेत. रोमान्स वाढवण्यासाठी अरोमा कॅन्डल लावाव्यात. सुवास मनुष्यामध्ये अनेक प्रकारचे भाव निर्माण करते. मेणबत्तीचा प्रकाश फक्त बेडरूमचं सौंदर्य वाढवत नाही तर रोमान्ससाठीही एकमेकांना उत्तेजित करतो.

बिछाना : मनात इच्छा निर्माण होण्यासाठी बिछान्याचे खूपच योगदान आहे. मऊ गाद्या नसाव्यात. तसेच बेडचा त्रासदायक आवाज नसावा. चादरींचे रंग आणि मुलायमपणा दोन्ही प्रेम व प्रणय उत्तेजित करणारे असावेत.

फळे : द्राक्षे, केळी, स्ट्रॉबेरी, सफरंचद, चीकू, इ. फळांचा सुवास मादक असतो. जर तुम्ही अशी फळे ठेवत असाल व खात ही असाल तर याचा परिणाम तुमच्या रोमान्सवरही होतो.

बेडरूम सुसज्ज व टापटीप ठेवावे : प्रेम करण्यासाठी तसेच व्यक्त करण्यासाठी बागबगिचा, समुद्र किनारा, मोकळे आकाश इ. गोष्टी प्रेमी जीवांना आकर्षित करतात. म्हणून बेडरूमही तसा दिसावा म्हणून प्रयत्न करावा. हलक्या रंगांचे पडदे लावावेत. मंद प्रकाश योजना खोलीत करावी म्हणजे तुमचे मन अधिकाधिक रोमँटिक होईल.

बेडरूमला रोमँटिक लुक द्या : तुमच्या बेडरूममध्ये आर्टिफिशीअल कारंजी, रोपटी वा चित्र लावावी. पलंग, सोफा, कपाट यांच्या जागा बदलत राहाव्यात म्हणजे तुमच्या जोडिदाराला तुमची खोली जुनाट वाटणार नाही. प्रेम, प्रणय यांचे बेडरूमशी घट्ट नाते असते, जे आयुष्यात नाविन्य आणते.

विवाहपूर्व समुपदेशनाचे फायदे

* प्रतिनिधी

आजकाल नात्यामधील संतुलन आणि एकमेकांप्रती धैर्य, भावना संपत चाललेली आहे. यामुळेच विवाहानंतर पती-पत्नी एकमेकांना समजून न घेता छोटया-छोटया गोष्टींवरून वाद घालू लागतात. यावरुन पुढे हे वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतात. अशावेळी नात्यात अंतरंगता आणि अतूटता कायम राखण्यासाठी लग्नापूर्वी समुपदेश करुन घेणे गरजेचे आहे.

विवाह समुपदेशकांकडून नवविवाहित किंवा विवोहच्छूक जोडपी आपल्या समस्यांचे तसेच शंकाचे निराकरण करून घेऊ शकतात. अनेकदा क्षुल्लक गोष्टींवरून नात्यात वितुष्ट निर्माण होते. याचे कारण लग्नापूर्वी त्यांना नाते निभावण्याचे प्रशिक्षण देण्यात आलेले नसते.

मानसशास्त्रज्ञ डॉ. सपना नागगौडा यांचे म्हणणे आहे की, ‘‘विवाहपूर्व समुपदेशन हे स्वीकारवृत्ती विकसित करायला शिकवते. नात्यांमधील संबंध, गरजा, विस्तार, मर्यादा, तडजोड इत्यादींसाठी मनाची पूर्वतयारी करणे. समुपदेशनाने भविष्यातील अनेक संकटांना टाळता येते. परंतु आजही आपल्या समाजात पत्रिकेलाच महत्त्व दिले जाते. पण विवाहपूर्व समुपदेशनाद्वारे प्रत्यक्षात त्या व्यक्तिसह आयुष्यभर जोडीदार म्हणून आपण राहू शकतो का हे ठरवता येते. तुमच्या जोडीदाराच्या संपूर्ण आयुष्याची ब्ल्यू-प्रिंटच तुमच्यासमोर सादर केली जाते. काहीवेळा गरजेनुसार कौटुंबिक समुपदेशनही केले जाते. लग्न यशस्वी होण्यासाठी संवाद साधणे हेच महत्त्वाचे आहे.’’

विवाह समुपदेशन हे स्वथ्य आणि नाते या दोन गोष्टींशी जोडलेले असतात. समुपदेशनादरम्यान वैवाहिक जीवनात सामान्यपणे येणाऱ्या अडचणींना कसे सामोरे जावे, अडचणींतून बाहेर येण्याचे उपाय, विवाह यशस्वी बनवण्याची माहिती दिली जाते. नात्यांसंबंधीचे समुपदेशन नवविवाहितांला नव्या वातावरणात जुळून घेण्यासाठी उपयुक्त ठरते.

समुपदेशनाचे फायदे

लग्नाला संदर्भात मुलगी-मुलगा दोघांच्याही मनात शारीरिक संबंधांव्यतिरिक्त नाते निभावण्याविषयी अनेक प्रश्न असतात. पण या प्रश्नांची उत्तरे मित्र-मंडळींकडे वा कुटुंबाकडे नसतात. अशावेळी विवाह समुपदेशक हीच अशी व्यक्ती असते, जी आपल्या शंकांचे निरसन करू शकते. विवाह समुपदेशनामुळे ज्या गोष्टींवर बोलायला दोघांना संकोच वाटतो, त्या गोष्टींवर ते मोकळेपणाने बोलू लागतात. मग दोघांमध्येही चांगला संवाद प्रस्थापित होतो.

विवाह हे जीवनातील असे एक वळण आहे, ज्यामुळे तुमची जीवनशैली पूर्णत:  बदलून जाते. विवाहापूर्वीच्या समुपदेशनामुळे विवाह बंधनात अडकणाऱ्या जोडप्यांना येणाऱ्या नव्या जीवनशैलीला समजून त्यानुसार स्वत:ला नव्या वातावरणात समरस होण्यास मदत मिळते.

विवाहानंतर प्रत्यक्षात तुम्ही प्रेमी युगुल न राहाता पति-पत्नी बनता. घरातील नव्या जबाबदाऱ्यांमध्ये होणाऱ्या चुकांचे एकमेकांवर खापर फोडणे आणि आरोप-प्रत्यारोप करणे यांमुळे नातेसंबंधांना तडा जातो. अशावेळी जबाबदाऱ्यां समजून घेणे आणि त्या व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठीच समुपदेशनाची आवश्यकता असते. समुपदेशनातून विवाहसंबंधित बाबी लक्षात घेतल्यामुळे एकमेकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या जास्त चांगल्याप्रकारे समजू लागतात.

विवाह समुपदेशक हे विवाहीत जोडप्यांना मदत करतात कारण वर्तमानाबरोबरच भविष्यातील गोष्टी जसे की कुटुंब नियोजन, सासरच्या मंडळींसोबतच्या नातेबंधातील नियोजन, अर्थ नियोजन इ. बाबत योजना आखून त्यांच्या नात्यात फक्त प्रेमच नाही तर व्यवहारीक विचारही आणतात.

विवाह समुपदेशक जोडप्यांशी फक्त सकारात्मक गोष्टींवरच नव्हे तर ते अशा गोष्टींवर बोलतात, ज्यावर ते बोलू इच्छित नाहीत वा संकोचतात, याउलट लग्न करण्यापूर्वी हे जाणून घेणे गरजेचे आहे की तुम्ही खरेच एकमेकांसाठी बनलेले आहात का? तुम्ही भावनिक, शारीरिक आणि आर्थिकदृष्टया एकमेकांना साथ देऊ शकता का? तुमच्या नात्यासंबंधी दोघांचेही विचार सारखे आहेत का? या प्रश्नांच्या उत्तरावरून तुम्ही समजू शकता की तुम्ही खरंच लग्नाला तयार आहात की नाही.

कशी ओळखाल वाढत्या दुराव्याची चाहूल

*गरिमा पंकज 

अलीकडेच इकॉनॉमिस्ट सुरज जेकॉब आणि अँथ्रोपोलॉजिस्ट श्रीपर्णा चट्टोपाध्याय यांनी केलेल्या अभ्यासानुसार भारतात जवळपास १४ लाख लोक घटस्फोटीत आहेत. हे एकूण लोकसंख्येच्या ०.११ टक्के आहे आणि विवाहित लोकसंख्येच्या साधारण ०.२४ टक्के आहे. आश्चर्याची गोष्ट ही आहे की वेगळे झालेल्या लोकांची संख्या घटस्फोटीतांपेक्षा ३ पट जास्त आहे. पुरुषांच्या तुलनेत घटस्फोटीत आणि पतिपासून वेगळया राहणाऱ्या महिलांची संख्या कितीतरी जास्त आहे. पुरुष अनेकदा दुसरा विवाह करतात उलट घटस्फोटीत महिला एकटया राहतात.

लव्हमॅरेज असो वा अरेंज्ड मॅरेज, अनेकदा परिस्थिती अशी निर्माण होते की सुरूवातीला एकमेकांवर अतिशय प्रेम करणारे पतिपत्नीसुद्धा दूर होतात. प्रेमाच्या धाग्यांनी बनलेले हे पतिपत्नीचे नाते जेव्हा अचानक तुटते, तेव्हा भावनिक दृष्टया हळवे असलेले स्त्री-पुरुष अत्यंत संतापलेले असतात. लक्षात घ्या की लग्नाच्या वेळी तुमचा जोडीदार जवळ असूनही दूर आहे असे जाणवते का? त्याच्या मिठीत असूनही तुम्हाला पूर्वीप्रमाणे प्रेमाची जाणीव होत नाही? जोडीदार कारणं सांगून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे का? जर असे असेल तर सांभाळा आणि तयार राहा कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला. तुम्ही दोघेही लक्षात ठेवा काही अशा गोष्टी आहेत, ज्या तुमचं नातं कमकुवत होत असल्याकडे इशारा करत आहेत :

जवळ असूनही एकमेकांसोबत नाहीत

ऑफिसमधून आल्यावर तुम्ही भले एकाच खोलीत बसले असाल, पण एक व्यक्ती आपल्या लॅपटॉप वा कम्प्युटरवर आणि दुसरा टीव्ही वा मोबाईलमध्ये व्यस्त असेल, पार्टीत सोबत गेले असाल, पण एकजण या कोपऱ्यात तर दुसरा दुसऱ्या कोपऱ्यात मित्रांसोबत व्यस्त असेल तर याचाच अर्थ एकत्र एखाद्या कार्याचा आनंद घेण्याएवजी आपापल्या जगात व्यस्त राहू लागला असाल तर हा तुमच्या वाढत्या दुराव्याचा परिणाम आहे.

भांडणे सोडून दिले आहे

जर तुम्ही एकमेकांशी भांडणे सोडून दिले आहे तर हेसुद्धा वाढत्या दुराव्याचे लक्षण आहे. जर भांडणानंतर तुम्ही दोघे त्या विषयावर काहीच चर्चा करत नसाल वा जोडीदाराचे म्हणणे ऐकून घ्यायला तयार नसाल तर असे वर्तन नाते तुटण्याकडे इशारा करते. अनेकदा जोडप्यांमध्ये होणारे भांडण त्यांच्यातील जवळीक वाढवायचे काम करते. पण असे तेव्हा होते, जेव्हा दोघे भांडणाच्या मुळापर्यंत पोहोचतात आणि एकमेकांची बाजू ऐकून आणि समजून घेऊन मनातील कलूषित भाव दूर करण्याचा प्रयत्न करतात. पण अशा प्रकारचा प्रयत्न केला जात नसेल तर समजून घ्या की वेगळे व्हायची वेळ आली आहे.

अनेक कारणं आहेत मन तुटण्याची

अमेरिकेतील कपल थेरपिस्ट कॅरी कोल सांगतात की काही गोष्टी नात्यात दरी निर्माण आणण्यासाठी पुरेशा असतात, जसे नेहमी आपल्या जोडीदारावर टीका करणे, त्याला सुनावत राहणे, वाईट शब्दप्रयोग करणे वा स्वत:ला सुपीरियर दाखवण्याचा प्रयत्न करणे. एखाद्या वादात मोकळेपणाने बोलण्याऐवजी बोलणे बंद करणे इत्यादी. जर तुम्हीही एकमेकांशी असे वर्तन करत असाल तर तुमच्यातही दुरावा निर्माण झाला आहे असं समजा.

मनाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करत आहात

अनेकदा आपण आपल्या मनाचा आवाज ऐकत नाही. हा आवाज अत्यंत मंद आणि शांत असतो, जो बाह्य जगाच्या कोलाहलात दुर्लक्षित होतो. अनेकदा मन सांगत राहते की आता मी आपल्या जोडीदारावर प्रेम करत नाही किंवा तो माझ्यापासून दूर गेला आहे. पण तर्काच्या अभावामुळे आपण याकडे लक्ष देत नाही आणि वास्तवापासून दूर पळत राहतो. पण नंतर कळते की तुमच्या मनाचा आवाज बरोबर होता आणि तुमचा जोडीदार खरेच दूर गेला आहे.

जोडीदाराचे नियंत्रण असहनीय

जर दोघांपैकी एका जोडीदाराला दुसऱ्याच्या नियंत्रणात राहणे घुसमटल्यासारखे वाटत असेल आणि सतत सांगूनही त्याचे म्हणणे ऐकले जात नसेल तर त्याला स्वत:लाच पराभूत झाल्यासारखे वाटते. असे नातेसंबंध फार काळ टिकत नाहीत.

बॉडी लँग्वेजमध्ये बदल

जेव्हा तुम्ही एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असता वा प्रेम करत असता तेव्हा रात्रंदिवस त्यालाच बघू आणि अनुभवू इच्छिता. पण जेव्हा कोणी तुमचे मन दुखावते किंवा त्याच्या मनात आपल्यासाठी प्रेम उरत नाही तेव्हा त्याचा सामना करणे वा त्याच्या डोळयाला डोळा भिडवणेसुद्धा टाळतो. प्रेमात माणूस जवळ जाण्याची आणि बोलण्याची कारणं शोधत असतो, पण दुरावा वाढल्यास एकमेकांपासून दूर जाण्याचे कारण शोधायला लागतो. जे जोडपे भावनिकरित्या जोडलेले असते त्यांची शारीरिक भाषा वेगळीच असते. जसे की नकळत एकमेकांसमोर मस्तक डोकवणे, गाणे गुणगुणणे, एकमेकांची काळजी घेणे आणि एकमेकांचे बोलणे लक्ष देऊन ऐकणे इत्यादी. पण जेव्हा नाते संपण्याच्या मार्गावर पोहोचते, तेव्हा ते बोलणे कमी आणि वाद जास्त करू लागतात. एकमेकांच्याजवळ बसण्याऐवजी समोरासमोर बसतात आणि एकमेकांची काळजी घेण्याऐवजी एकमेकांना टाळू लागतात.

डोळयाला डोळे भिडवणे कमी होते

तुम्हाला त्याच गोष्टी पाहायला आवडतात, ज्या तुम्ही पसंत करता. जाहीर आहे की प्रेमात नजरभेट होणे आणि तसेच बघत राहणे अनेकदा होत राहते. पण जेव्हा तुम्ही दोघे एकमेकांकडे बघताच नजर हटवता, डोळयाने बोलणे सोडता तेव्हा समजून जा की तुम्ही दोघे ब्रेकअपकडे जात आहात.

या बाबतीत १९७० मध्ये सोशल सायकोलॉजिस्ट जिक रुबीनने जोडप्यांमधील नेत्रपल्लवीच्या आधारे त्यांच्या नात्याची खोली मापण्याचा प्रयत्न केला. जोडीदारांना खोलीत एकटे सोडले, ज्या जोडीदारांमध्ये अतिशय प्रेम होते, ते बराच वेळ आपल्या जोडीदाराकडे पाहत आहेत असे आढळले, उलट कमी प्रेम असणाऱ्या जोडीदारांमध्ये असे बॉण्डिंग आढळले नाही.

अन्य कुणाशी भावनिक बंध जुळणे

जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदी नसाल तर तुमचे एखाद्या दुसऱ्या व्यक्तीशी भावनात्मक पातळीवर संबंध जुळतात आणि तुमचे अफेअर असण्याची संभावना वाढते. तसेही आजकालच्या तांत्रिक युगात ऑनलाईन फ्लर्टिंगसारखे पर्याय उपलब्ध आहेत आणि स्मार्ट फोन्स व मीडियमार्फत जोडीदाराला न सांगता एखाद्यासोबत सतत संबंध ठेवणे शक्य आहे.

जर तुम्हीसुद्धा अशा संबंधात फसले असाल आणि आपला आनंद साजरा करणे वा त्रास व्यक्त करण्यासाठी जोडीदाराऐवजी इतर कोणत्या माणसाचा खांदा शोधू लागला असाल तर समजून घ्या की या नात्याबाबत गंभीरतेने विचार करायची वेळ आली आहे.

इतरांमध्ये जास्त व्यस्त राहणे

अनेकदा आपण जोडीदाराबाबतच्या दुराव्याला दुसऱ्या कोणाशी जवळीक वाढवून कमी करू इच्छितो. विशेषत: स्त्रिया जर आपल्या रिलेशनशीपमध्ये आनंदी नसतील तर हे दु:ख विसरण्यासाठी त्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतरांच्या आयुष्यात सुरु असलेल्या प्रश्नांमध्ये व्यस्त होतात.

एकमेकांशी शेअरिंग करायला काही नसतं

जर तुम्ही आयुष्यातील विशिष्ट क्षण आणि घटना वा प्रगतीशी निगडीत प्रसंग सर्वात आधी जोडीदारासोबत नाही तर इतर कोणासोबत शेअर करू लागला आहात आणि जोडीदारासोबत घरातील काम वा मुलांच्या गोष्टींशिवाय बाकी काही तुमच्याकडे उरलेच नाही तर समजून जा की तुम्ही एकमेकांपासून दूर होत आहात.

उत्तम प्रतीचा वेळ घालवायची इच्छा नाही

जर तुम्ही जोडीदारासोबत बऱ्याच काळापासून एकत्र रोमँटिक चित्रपट बघायला, आवडत्या ठिकाणी डिनर करायला, समुद्रकिनाऱ्यावर बसून वेळ घालवण्याची योजना टाळत असाल, आणि जर तुम्ही दोघेही आपला जोडीदार येण्याची उत्कंठेने वाट पाहत नसाल आणि तो आल्यावरही तुम्ही वेगवेगळया खोलीत व्यस्त राहत असाल तर समजू की नात्यातील आकर्षण तुमच्यासाठी कमी होत चालले आहे.

एकमेकांच्या बोलण्याकडे कमी लक्ष देणे

चांगल्या नात्यासाठी एकमेकांचे बोलणे ऐकणे आणि त्याकडे लक्ष देणे सर्वात आवश्यक असते, पण जेव्हा तुम्हाला असे वाटू लागते की कितीही बोललो तरी  काहीही बदल होणार नाही तर हे नाते कमकुवत होण्याचे लक्षण आहे, कारण नाते बळकट असण्यासाठी एकमेकांना समजून घेणे आणि ऐकणे आवश्यक असते. यामुळे नाराजी आणि राग लगेच दूर होते.

भविष्याचे स्वप्न जोडीदाराविना

जर अनेकदा तुम्ही आपल्या उज्वल भविष्याच्या स्वप्नात जोडीदाराला त्याची जागा देऊ शकत नसाल तर याचा अर्थ तुमच्यातील भावनिक दुरावा वाढत आहे.

विश्वासाची कमतररता

सायकेलॉजिस्ट जॉन गॉटमॅनला जवळपास ४ दशकपर्यंत केलेल्या अभ्यासात असे आढळले की जी जोडपी दीर्घ काळ नाते निभावत आहेत, ते ८६ टक्के काळ एकमेकांत गुंतलेले असतात. असे ना केवळ प्रेमामुळे तर एकमेकांवरील विश्वासामुळेही होत असते. ते गंभीर मुद्दयांवर एकमेकांचे मत जाणून घेण्याचा आणि मदत घेण्याचा प्रयत्न करतात. पण जर संबंध कमकुवत असतील तर विश्वासही तुटू लागतो.

अर्धवट वरवरचे हास्य

जर तुम्ही दीर्घ काळ एकमेकांकडे बघून हसणे वा थट्टामस्करी करणे विसरला असाल, तर समजा की तुमचे नाते तुटणार आहे. सहज आणि आपुलकीचे हास्य नात्याच्या प्रगल्भतेचा पुरावा असते. एकमेकांशी कोणत्याही अटीविना प्रेम करणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य अगदी सहज उमटते.

मतभेद जेव्हा वादाचे स्वरूप घेते

आपल्या जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीबाबत मतभेद असणे स्वाभाविक असते, पण हे मतभेद जेव्हा सामान्य न राहता अनेकदा भांडणाच्या स्वरूपात संपू लागते आणि दोघांमध्ये कोणीच नमते घेण्यास तयार नसते, तेव्हा समजून जावे की नाते आता टिकू शकत नाही.

जेव्हा दोघांनी प्रयत्न करणे सोडून दिले असेल तर

तुमचे नाते कितीही सहज का असेना, तुम्ही नेहमीच यात सुधारणा आणण्याचा प्रयत्न करायला हवा. चूक झाली तर लगेच क्षमा मागणे, जोडीदाराला सरप्राईज देणे, आपली चांगली बाजू समोर आणणे आणि लहानसहान गोष्टींमध्ये आपल्या जोडीदाराचे मन जिंकण्याचा प्रयत्न करणे यासारख्या गोष्टींमुळे नाती तुटत नाहीत. जर तुमच्या जोडीदाराने असे प्रयत्न करणे सोडून दिले आणि नेहमी त्यांच्याच चुकांवर लक्ष केंद्रित करणे सुरु केले असेल तर समजून जा की तो तुमच्यापासून दूर जात आहे.

स्तुती करणे बंद करणे

बळकट नात्यासाठी वेळोवेळी एकमेकांची स्तुती करणे अतिशय मह्त्वाचे असते. जेव्हा तुम्ही दोघे एकमेकांना ग्राह्य धरू लागता, एकमेकांची स्तुती करणे बंद करता तेव्हा हळूहळू दोघांमध्ये तक्रारी वाढू लागतात, ज्या तुम्हाला ब्रेकअपकडे घेऊन जातात.

जॉन गॉटमॅनने २० वर्षं २०० जोडप्यांवर केलेल्या अभ्यासाच्या आधारे एक निष्कर्ष काढला आहे की कोणत्याही नात्याचे यश जोडप्यांच्या आपसातील वाद आणि भांडण सुंदर पद्धतीने सोडवण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. कधीच न भांडणे सुंदर नात्याची ओळख नसते तर परत एक होणे नात्याला आणखी बळकट आणि सखोल बनवते. पण जेव्हा नात्यात इतका दुरावा येतो की परत एक होणे अशक्य असते, नात्यात राहून कोंडमारा होतो, तेव्हा तर गोडव्याने हे नाते संपवणेच उत्तम.

का आकर्षित करीत आहेत पुरूषांना मोठ्या वयाच्या महिला

* मिनी सिंह

१९८१ मध्ये रिलीज झालेल्या ‘प्रेम गीत’ फिल्मच्या गाण्याची एक ओळ ‘न उम्र कि सीमा हो न जन्म का हो बंधन’ बॉलीवुड सिताऱ्यांवर एकदम चपखल बसते. सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मलाइका अरोरा आणि टॅक्टर अर्जुन कपूरच्या अफेअरची चर्चा आहे आणि यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्यामधील एज गॅपची आहे. दोघांच्या वयात जवळपास अकरा वर्षांचे अंतर आहे आणि यामुळे त्यांना नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागते.

एका इंटरव्यूमध्ये मलायका अरोराने सांगितले होते की आपण एका अशा समाजात राहतो, जिथे जर एका वयस्कर माणसाने एका तरुण मुलीसोबत रोमान्स केला तर लोक तो स्वीकारतात, परंतु जर एका जास्त वयाच्या महिलेने आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलावर प्रेम केले, तर लोक ते एक्सेप्ट करत नाहीत.

समाजात ही समजूत आहे की लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलापेक्षा कमी असायला हवे. कारण असे मानले जाते की पती हा घराचा प्रमुख असतो, तर त्याला अनुभवी आणि जास्त समजूतदार असायला हवे. भारतात सरकारकडून देखील लग्नाचे कायद्यानुसार वय मुलासाठी २१ आणि मुलीसाठी १८ ठेवले आहे.

परंतु बदलत्या काळानुसार प्रेम करण्याच्या पद्धतीतदेखील पुष्कळ बदल झालेला आहे आणि या सगळयाचे सगळयात मोठे उदाहरण आहे मुलांचे आपल्या वयापेक्षा मोठया मुलींकडे आकर्षित होणे. आता वयातील अंतराला दुर्लक्षित करून प्रेमाला आदराच्या भावनेने पाहिले जाऊ लागले आहे. मुले आपल्यापेक्षा वयाने लहान नाही, तर स्वत:पेक्षा मोठया मुलींना जास्त पसंत करू लागले आहेत.

पुरुष आणि स्त्रीमधील वयात या अंतराची रिलेशनशिप बनलेली पाहणे, आज सामान्य गोष्ट ठरत आहे. परंतु याचे काय कारण आहे? का वयासोबत जिथे सौंदर्य कमी होते तिथे काही सकारात्मक गोष्टीदेखील महिलांमध्ये वाढतात, ज्या पुरुष कदाचित नोटीस करतात, का मग अशा काय गोष्टी आहेत ज्या पुरुषाला मोठया वयाच्या महिलांकडे आकर्षित करतात? चला पाहूया…

काय म्हणतात सायकॉलॉजिस्ट

काही सायकॉलॉजिस्ट मानतात की ४५ ते ५० वर्षांच्या वयामध्ये त्यांच्यात सेक्सबद्दल उत्तेजन आणि समज वाढते आणि एखाद्या कमी वयाच्या महिलेच्या तुलनेत त्या पुरुषांना जास्त संतुष्ट करू शकतात. हेदेखील एक कारण आहे की पुरुष मॅच्युअर महिलांकडे आकर्षित होतात. तर कित्येक शोध सांगतात की जिथे पुरुष इंटीमेट होण्यात जास्त वेळ लावत नाहीत, तिथे महिलांना यासाठी वेळ हवा असतो.

महिलादेखील आपल्यापेक्षा कमी वयाच्या पुरुषांकडे अट्रॅक्ट होतात, कारण ते अधिक ऊर्जायुक्त असतात. याशिवाय सेक्शुअल प्रेझेन्टेशन महिलांना पुष्कळ चांगले जमते. सोबतच त्या फिजिकल आणि इमोशनल दोन्ही भावना व्यक्त करतात. त्यामुळे पुरुष – महिलांच्या वयाचे हे कॉम्बिनेशन पर्फेक्ट म्हटले जाऊ लागले आहे. आणखीदेखील पुष्कळ कारणे आहेत, ज्यामुळे पुरुषांना मोठया वयाच्या महिला आवडू लागल्या आहेत, जसे

आत्मविश्वास : मोठया वयाच्या महिला स्वत:ला खूप चांगल्या पद्धतीने समजतात. त्यादेखील निर्णय बालिशपणाने नाही तर खूप विचार करून घेतात. त्या स्वत: पुष्कळ मर्यादेपर्यंत मॅनेज्ड असतात. त्यांना ठाऊक असते की त्यांनी आपल्या आयुष्याकडून काय अपेक्षा ठेवाव्यात आणि काय नाही. त्या आत्मविश्वासू असतात आणि यामुळे पुरुषांना मॅच्युअर महिला जास्त आकर्षित करतात.

जबाबदार : काळ आणि अनुभवासोबत मॅच्युअर महिला जिथे आपल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडणे शिकतात, तिथेच त्या कठीण काळाचा सामनादेखील खूप चांगल्या पद्धतीने करू शकतात. कित्येक बाबतीत त्या फक्त आपल्या अनुभवाची मदत घेत नाहीत, तर गरज पडल्यावर त्यांचे उपायदेखील शोधतात, ज्यामुळे कित्येक जागी पुरुष त्यांच्यासोबत रिलॅक्स फील करतात.

अशा महिला आपल्या करिअरबाबत पुष्कळ सेट होतात. आपल्या जीवनाला आणखी उत्तम बनवण्यासाठी पुरुषांना अशाच जबाबदार सोबतीची गरज असते, जी प्रत्येक मार्गावर त्यांच्यासोबत खांद्याला खांदा मिळवून चालेल.

स्वतंत्र : तरुणी आणि किशोरींपेक्षा एकदम वेगळे विचार ठेवणाऱ्या मोठया वयाच्या महिला मानसिकरीत्या स्वतंत्र असतात. पुष्कळदा मोठया वयाच्या महिला कमावत्या असतात आणि पूर्ण तऱ्हेने आत्मनिर्भर असतात. त्यामुळे गरज पडल्यावर त्या आपल्या साथीदाराला आर्थिक स्वरूपात सपोर्टदेखील करतात.

प्रामाणिक : प्रेम संबंधांमध्ये आदर आणि स्पेस दोघांचेही वेगळे महत्त्व आहे आणि मोठया वयाच्या महिला ही गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने समजतात. त्या आपल्या नात्याविषयी खूप प्रामाणिक असतात. सोबतच आपल्या साथीदाराच्या भावनादेखील समजतात, परंतु जर त्या आपल्या साथीदाराला विषयी प्रामाणिक आहेत, तर त्यांचीदेखील इच्छा असते की त्यांचा साथीदारानेदेखील त्यांच्याप्रती प्रामाणिक रहावे.

अनुभवी : मोठया वयाच्या महिला अनुभवी असतात, कारण त्यांनी आपल्या जीवनात पुष्कळ काही अनुभवलेले असते. त्यामुळे जीवनात येणाऱ्या अडचणींसाठी त्या सज्ज असतात.

बोलण्याची रीत : मोठया वयाच्या महिलांचे वागणे ‘क्षणात एक क्षणात एक’ असे नसते. त्या कोणतीही गोष्ट नीट समजून उमजून आणि आणि व्यवस्थित रीतीने करतात.

सेक्स : लाजण्याऐवजी मोठया वयाच्या महिला सेक्सच्या दरम्यान आपल्या पार्टनरला पूर्ण रीतीने सपोर्ट करतात. त्या स्पष्ट पद्धतीने सांगतात की त्यांना आपल्या पार्टनरकडून काय अपेक्षा आहेत, जे पुरुषांना खूप आवडते.

थोडासा ब्रेक घेऊन तर पाहा…

* मदन कोथुनियां

नातेबंधात स्पेस तितकीच जरूरी आहे जितकं जगण्यासाठी ऑक्सिजन. जसं की जर वातवरणातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं तर घुसमट जाणवते, अगदी त्याचप्रकारे नातेसंबंधातही स्पेस नसेल तर प्रेमाचा ओलावा हरवू लागतो. जर आपल्या सर्वात गोजिऱ्या नात्याची वीण आयुष्यभर बळकट ठेवू इच्छित असाल तर तुम्हालाही आपल्या बेटर हाफला द्यावा लागेल एक छोटासा ब्रेक.

त्यांचा स्वभाव समजून घ्या, परंतु त्यांची साथ सोडू नका. या ब्रेकनंतर जेव्हा ते परतून तुमच्याकडे येतील, तेव्हा तुमचं हे मिलन हमखास चमत्कारिक असेल. त्यात आपसुकच पूर्वीची टवटवी तुम्ही अनुभवाल. निश्चितच ब्रेकनंतर तुमच्या नात्यात कित्येक पटींनी अधिक गोडवा अन् उत्साह असेल.

‘‘एक वेळ अशी आली होती, जेव्हा आम्हा दोघांना वाटू लागलं की आमचं नातं आता दिर्घकाळ टिकणार नाही, परंतु आज एकमेकांचं मोल आम्हाला कळून चुकलंय, ही कमाल आहे एका छोट्याशा ब्रेकची,’’ असं सांगताना करूणा शर्मांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता.

तुम्ही हे ऐकलं की नाही ठाऊक नाही, परंतु सच्च्या आणि दिर्घकालीन मिलनाकरता दुरावा खूप जरूरी आहे. जर तुमच्या नात्यात कधी ब्रेक लागला नाही, तर निश्चितच तुम्ही त्याचं महत्त्व गमवाल. आजच्या तरुण पिढीला रिलेशनशिपमध्ये थोडीशी स्पेस आणि एक छोटासा ब्रेक हवा असतो. अनेकांनी याचा अनुभव घेतला तेव्हा त्यांना पटलं की काही काळ विलग होऊन पुन्हा एकत्र येणं सुखदायक असतं.

लिव इन रिलेशनशिप, सहजासहजी मिळणारं प्रेम यामुळेच ही नवी पद्धत आता रूढ होऊ लागली आहे. याबद्दल जाणून घेऊ अशाच काही लोकांकडून, ज्यांना जीवनात अशाच एका ब्रेकची गरज होती :

५ महिन्यांचा तो खडतर काळ

जयपूर येथे राहणारी स्मिता सांगते, ‘‘आमच्या नात्याला तब्बल ५ वर्षं पूर्ण झाली. या ५ वर्षांत अंदाजे ५ महिन्यांचा एक दिर्घ अंतराळ आला. जवळपास ३ वर्षं सातत्याने आम्ही प्रेमात ओतप्रोत समरस झालो होतो. सुरूवातीला एकमेकांमध्ये कधीच काही कमतरता जाणवली नाही, परंतु एक वेळ अशीही आली की या नात्यात जीव घुसमटू लागला. एखाद्याला जेव्हा तुम्ही खूप जास्त ओळखू लागता, तेव्हाही समस्या उभ्या राहू लागतात. ज्या गोष्टींकडे पूर्वी सहज दुर्लक्ष करत होतो, त्याच आता अगडबंब वाटू लागल्या होत्या.’’

‘‘अखेरीस तेच झालं, ज्याची भीती होती. परस्पर संमतीने आम्ही या नात्यातून माघार घ्यायचा निर्णय घेतला. दोघांनी शब्द दिला की आता कधी फोन, कोणताही संदेश आणि कुणाच्याही माध्यमातून संपर्क साधायचा नाही आणि घडलंही तसंच. मीसुद्धा माझ्या दुनियेत व्यस्त झाले आणि तेसुद्धा. कधी त्यांची आठवण झाली, तरी मी कधी व्यक्त झाले नाही.

‘‘तब्बल ५ महिन्यांनी मनस्थिती बदलली आणि त्यांची उणिव जाणवू लागली. त्यांच्याशी कधीही न बोलण्याचं वचन दिलं होतं, परंतु माझी नजर पुन्हा त्यांचा शोध घेऊ लागली. निसर्गाने साथ दिली आणि आम्ही पुन्हा एकत्र आलो, परंतु यावेळेस कायमस्वरूपी. इतक्या मोठ्या दुराव्यानंतर एक गोष्ट सिद्ध झाली होती की नातं भले कोणंतही असो, त्यात थोडी स्पेस जरूर असावी.’’

रबरबॅन्ड थिअरी

नात्यातील ही गुंतागुत समजून घ्यायची असेल तर तुम्ही रबरबॅन्ड थिअरी समजून घेणं जरूरी आहे. जॉन ग्रे यांचं पुस्तक ‘मेन्स आर फ्रॉम मार्स अॅन्ड विमन आर फ्रॉम व्हिनस’ स्त्रीपुरुष नातं समजून घेत त्यात सुधारणा करण्यासाठी एक उत्तम पुस्तक आहे. यात स्पष्टपणे पुरुषाची मनोवस्था सांगत त्याची तुलना एका रबरबॅन्डशी केली आहे.

पुरुषांचा हा स्वाभाविक स्वभाव आहे की ते एखाद्या स्त्रीच्या पूर्ण निकट आल्यानंतर काही काळाने दूर जाऊ लागतात. मग भले स्त्री कितीही प्रेम करत असेल. असं होणं स्वाभाविक आहे. आपलं स्वातंत्र्य आणि अस्तित्त्व शोधण्यासाठी ते असं करतात. परंतु हेसुद्धा सत्य आहे की जेव्हा ते पूर्णपणे दूर जातात, तेव्हा ते परतूनही येतात. जेव्हा ते परतून येतात, तेव्हा त्यांचं प्रेम आणि आपल्या जोडीदाराप्रति आस्था अनेक पटींनी वाढलेली असते. स्त्रिया बुहतेकदा त्यांच्या या स्वभावापासून अनभिज्ञ असल्याने त्यांची साथ सोडून देतात.

जाणूनबुजून घेतला ब्रेक

नीरस होणाऱ्या नात्यात पुन्हा पूर्वीची उमेद जागृत करण्यासाठी काही जोडपी जाणूनबुजून ब्रेक घेऊ लागली आहेत. ते जाणून घेऊ इच्छितात की ते खरोखर परस्परांशिवाय राहू शकत नाहीत का? त्यांच्यात खरोखर प्रेम आहे की केवळ आकर्षण? त्यांना वाटू लागलं आहे की दुरावा हाच तो मार्ग आहे, जो त्यांना आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवेल.

एमबीए स्टुडन्ट विकास शर्मा सांगतात, ‘‘जर आपण दररोज डाळ खाल्ली, तर एक दिवस नक्कीच असा येईल, जेव्हा डाळ खाताना तिटकारा येईल. आपण ज्याप्रमाणे रोज एकाच चवीचं जेवू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे दररोज एकाच पॅटर्नचं जीवनही जगू शकत नाही. कुणी तुमच्यापासून कायमचं दूर जाणार त्यापेक्षा त्याला काही दिवसांसाठी स्वत:हून दूर करणं अधिक योग्य आहे.

‘‘मी निशावर जिवापाड प्रेम करतो, जेव्हा तिने मला होकार दिला नव्हता, तेव्हा मी तिला मिळवण्यासाठी काहीही करू शकत होतो, परंतु जेव्हा तिने मला होकार दिला तेव्हा हळूहळू तिच्याप्रतिची ओढ कमी होऊ लागली. तिची प्रत्येक गोष्ट आता माझ्यासाठी तितकीशी महत्त्वाची नव्हती. कारण मला ठाऊक होतं की ती माझ्यावर प्रेम करते आणि मला सोडून कुठेही जाणार नाही. आपल्या या वागणुकीने मी स्वत: हैराण झालो होतो. आपल्या प्रेमाच्या हरवलेल्या जाणीवा पुन्हा परत मिळवण्यासाठी मी निशासोबत एक छोटासा ब्रेकअप केला. ती त्यावेळी खूप रडली. परंतु मी माझ्या मनावर दगड ठेवून तिला स्वत:पासून दूर केलं. सुरूवातीला तिचे फोनही उचलेले नाहीत.

‘‘जवळपास वर्षभरानंतर आम्ही विलग झालो त्याच दिवसापासून माझ्या मनात तिच्याप्रति पुन्हा प्रेम आणि ओढ जाणवू लागली. माझ्याकडे तिचा जो नंबर होता, तो तिने बदलला होता. तिची काहीच खबर नव्हती, परंतु आता माझ्यावर जिवापाड प्रेम करणारी निशा माझ्या जीवनात पुन्हा परतावी असं वाटत होतं. तिच्या मित्रमैत्रीणींना भेटून तिच्या घरचा फोननंबर मिळवला. कदाचित त्यावेळेस ती मला दगाबाज प्रियकर समजत होती, त्यामुळे फोनवर यायलाही ती तयार झाली नाही. आटोकाट प्रयत्न केल्यावर तिची पुन्हा भेट झाली. जेव्हा मी दूर जाण्याचं कारण सांगितलं, तेव्हा रडवेल्या नजरेनं एक टक माझ्याकडे पाहात राहिली. मी तिच्या एका होकारासाठी पुन्हा व्याकूळ झालो होतो. त्यादिवशी मला समजलं की जर हा ब्रेकअप झाला नसता तर आम्ही कधी प्रेमातील गहनता समजू शकलो नसतो.’’

आम्हीसुद्धा याचा अवलंब करतो

विशाल आणि कविताचा प्रेमविवाह झाला. दोघांचं प्रोफेशन समान होतं, शिवाय त्यांचे विचारही सारखे होते. ते सांगतात, ‘‘बहुतेकदा लोक आम्हाला सांगतात की प्रेमाचा उत्साह काही काळात ओसरतो. पूर्वीसारखा उत्साह आणि प्रेम त्यांच्या नात्यात राहत नाही. आम्हाला ठाऊक आहे की आम्हाला आपलं प्रेम दिर्घकाळ जिवंत राखण्यासाठी काय करायचं आहे. प्रेमातील ओलावा टिकवण्यासाठी आम्ही एकमेकांना स्पेस आणि स्वातंत्र्य दिलं पाहिजे. सतत दोघांनी एकत्र असावं ही अपेक्षा बाळगणं योग्य नाही.’’

विशाल सांगतात, ‘‘मी माझ्या पत्नीला तिच्या मित्रमैत्रीणींसोबत आणि कुटुंबासोबत वेळ व्यतित करण्याची मुभा देतो. या कालावधीत मी तिला अजिबात फोन करत नाही. तीसुद्धा मला सतत प्रश्न विचारत नाही. हे करताना आम्ही एकमेकांची सातत्याने काळजी घेतो. जेव्हा आम्ही आमच्या एकांतात राहण्याच्या मूडमधून बाहेर पडून एकत्र येतो, तेव्हा आपोआप आमच्या प्रेमभावनेत चैतन्य संचारलेलं असतं.’’

थोडीशी स्पेस आवश्यक

राजस्थान युनिव्हर्सिटी जयपूरमधील समाजशास्त्राच्या प्राध्यापिका अंजली सांगतात, ‘‘कामाच्या थकव्यानंतर छान झोप येते. चांगल्या झोपेमुळे स्वप्नंही चांगली पडतात. नातीसुद्धा अशाचप्रकारची गोड स्वप्नं आहेत, जी समाधानी असल्यावरच पडतात. परंतु हे तेव्हा घडतं, जेव्हा आपण नाती जगतो. ब्रेक घेण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही साथिदाराला पूर्णत: विसरून जावं, तर एकांतात विचार करावा की या नातेबंधातून तुम्ही काय प्राप्त केलं आणि सोबतच हेसुद्धा की तुम्ही समोरच्या व्यक्तिला कितपत देऊ केलं? दोन्ही पारड्यांचा समतोल तपासून पाहा आणि विचार करा की जर समतोल साधणं शक्य होत नसेल तर त्यामागचं कारण काय आहे?

‘‘तुमच्यापासून दूर राहून तुमच्या जोडीदारालाही ती स्पेस मिळू शकेल, जेव्हा ते विचार करतील की तुमचं त्यांच्या आयुष्यात किती महत्त्व आहे. कायम त्यांना तुम्ही स्वत:मध्येच गुंतवून ठेवलंत तर तुमच्याबद्दल विचार करण्याची स्पेसही तुम्ही त्यांच्याकडून हिरावून घ्याल आणि ही स्पेस छोट्याशा ब्रेकने त्यांना मिळू शकेल. जरूरी नाही की हा ब्रेक दिर्घकालीन असावा, परंतु इतका जरूर असावा की तुमचं स्मरण केवळ जबाबदारीच्या रूपात होऊ नये तर स्मरणात इतकी तीव्रता असावी की त्यांनी तुमच्या ओढीने परतून यावं.’’

लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही की प्रत्येक पतीपत्नीमध्ये भांडणाचं महत्त्वाचं कारण असुरक्षितता आणि इगो असतं. जर तुम्ही आपल्या पार्टनरला योग्य स्पेस दिली, तर त्याच्या मनात कोणत्याही प्रकारची असुरक्षिततेची भावना उरणार नाही आणि तुम्हालाही ती जाणवणार नाही. तुम्ही दोघांनी प्रेमाने एकमेकांसोबत राहावं, थट्टामस्करी करावी, परंतु संशयाच्या घेऱ्यात अडकून प्रश्नांची सरबत्ती करू नये. कोणत्याही नातेसंबंधात स्पेस दिल्याने विश्वास अधिकच वाढतो. इतकंच नव्हे, तुमचा जोडीदार तुमच्याशी अधिक मोकळेपणाने बोलू शकतो. सोबतच यामुळे तुम्हा दोघांमध्ये प्रेमाचा ओलावा वाढतो. अशावेळी पतीपत्नीने वैयक्तिक स्पेसची काळजी घेतली पाहिजे.

असं असूनही नातेसंबंधात योग्य ताळमेळ बसत नसेल तेव्हा एकमेकांपासून काही काळ विलग होण्याचा प्रयत्न करावा वा दोन आठवड्यांसाठी एकमेकांना संपर्क न साधण्याबाबत परस्पर संमती घ्यावी आणि हे निश्चित केल्यावर स्पष्ट करावं की तुम्ही आत्ताही एकमेकांसोबतच आहात आणि आपलं नातं या कालावधीदरम्यान विशेष राहिल. यानंतर एकत्र वेळ व्यतित करू नका वा एकमेकांना मेसेज पाठवू नका. एकमेकांशी फोनवर बातचित करू नका. हा दुरावा तुमच्यासाठी हे जाणून घेण्यास सहाय्यक ठरेल की तुम्ही या नात्याला किती महत्त्व देता.

हे सुरूवातीला अवघड नक्कीच वाटू शकतं. परंतु जेव्हा तुम्हाला आपल्या जीवनात आपल्या पार्टनरशिवाय बरं वाटतं, तेव्हा कदाचित ब्रेक घेणं अधिक योग्य ठरेल. तुमचं नातं अधिक मजबूत बनवणारा हा उत्तम पर्याय आहे असं म्हणता येईल. आता जर सुरूवातीच्या काही दिवसात ब्रेकअपमध्ये आनंद जाणवला, मात्र त्यानंतर तुम्हाला आपल्या जोडिदारीची उणीव भासू लागती तर तुम्ही पुढाकार घेऊन नातेसंबंध सुधारण्याच्या दृष्टिने प्रयत्न करायला हवेत.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें