* मिनी सिंह

१९८१ मध्ये रिलीज झालेल्या ‘प्रेम गीत’ फिल्मच्या गाण्याची एक ओळ ‘न उम्र कि सीमा हो न जन्म का हो बंधन’ बॉलीवुड सिताऱ्यांवर एकदम चपखल बसते. सध्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मलाइका अरोरा आणि टॅक्टर अर्जुन कपूरच्या अफेअरची चर्चा आहे आणि यापेक्षा जास्त चर्चा त्यांच्यामधील एज गॅपची आहे. दोघांच्या वयात जवळपास अकरा वर्षांचे अंतर आहे आणि यामुळे त्यांना नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल व्हावे लागते.

एका इंटरव्यूमध्ये मलायका अरोराने सांगितले होते की आपण एका अशा समाजात राहतो, जिथे जर एका वयस्कर माणसाने एका तरुण मुलीसोबत रोमान्स केला तर लोक तो स्वीकारतात, परंतु जर एका जास्त वयाच्या महिलेने आपल्यापेक्षा कमी वयाच्या मुलावर प्रेम केले, तर लोक ते एक्सेप्ट करत नाहीत.

समाजात ही समजूत आहे की लग्नाच्या वेळी मुलीचे वय मुलापेक्षा कमी असायला हवे. कारण असे मानले जाते की पती हा घराचा प्रमुख असतो, तर त्याला अनुभवी आणि जास्त समजूतदार असायला हवे. भारतात सरकारकडून देखील लग्नाचे कायद्यानुसार वय मुलासाठी २१ आणि मुलीसाठी १८ ठेवले आहे.

परंतु बदलत्या काळानुसार प्रेम करण्याच्या पद्धतीतदेखील पुष्कळ बदल झालेला आहे आणि या सगळयाचे सगळयात मोठे उदाहरण आहे मुलांचे आपल्या वयापेक्षा मोठया मुलींकडे आकर्षित होणे. आता वयातील अंतराला दुर्लक्षित करून प्रेमाला आदराच्या भावनेने पाहिले जाऊ लागले आहे. मुले आपल्यापेक्षा वयाने लहान नाही, तर स्वत:पेक्षा मोठया मुलींना जास्त पसंत करू लागले आहेत.

पुरुष आणि स्त्रीमधील वयात या अंतराची रिलेशनशिप बनलेली पाहणे, आज सामान्य गोष्ट ठरत आहे. परंतु याचे काय कारण आहे? का वयासोबत जिथे सौंदर्य कमी होते तिथे काही सकारात्मक गोष्टीदेखील महिलांमध्ये वाढतात, ज्या पुरुष कदाचित नोटीस करतात, का मग अशा काय गोष्टी आहेत ज्या पुरुषाला मोठया वयाच्या महिलांकडे आकर्षित करतात? चला पाहूया...

काय म्हणतात सायकॉलॉजिस्ट

काही सायकॉलॉजिस्ट मानतात की ४५ ते ५० वर्षांच्या वयामध्ये त्यांच्यात सेक्सबद्दल उत्तेजन आणि समज वाढते आणि एखाद्या कमी वयाच्या महिलेच्या तुलनेत त्या पुरुषांना जास्त संतुष्ट करू शकतात. हेदेखील एक कारण आहे की पुरुष मॅच्युअर महिलांकडे आकर्षित होतात. तर कित्येक शोध सांगतात की जिथे पुरुष इंटीमेट होण्यात जास्त वेळ लावत नाहीत, तिथे महिलांना यासाठी वेळ हवा असतो.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...