* रूचि सिंह
दांपत्य जीवनात प्रेमाचे रंग भरण्यासाठी बेडरूमची महत्त्वाची भूमिका असते असे मनोविकार तज्ज्ञ डॉ. दिनेश तसेच डॉ. कुंदरा यांचे म्हणणे आहे. विश्रांती घेण्यासाठी पतिपत्नी नेहमीच बेडरूमची निवड करतात. म्हणूनच अधेमधे बेडरूममध्ये थोडा बदल करून रोमँटिक आयुष्य दिर्घकाळपर्यंत टिकवता येऊ शकते.
भिंतीचे रंग : बेडरूममधील भिंतीच्या रंगाचेही स्वत:चे असे एक वेगळे स्थान आहे. प्रेमाचा रंग अधिकच गहिरा करण्यासाठी फिकट गुलाबी, आकाशी, फिकट हिरवा अशा रंगांचा वापर करावा. कारण रंगही बोलके असतात. प्रणयात प्रेमाची उधळण करतात हे रंग.
आकर्षक छायाचित्रं लावावीत : छान, सुंदर व रोमँटिक छायाचित्र बेडरूममध्ये लावावीत. बीभत्स, उर्जाहिन, वाघ, धावते घोडे इ.ची छायाचित्रं लावू नयेत. पक्षी, हंस, गुलाबाची फुले अशाप्रकारची छायाचित्रं लावावीत. अशा प्रकारची छायाचित्रं तुमच्या जीवनात प्रेम व आनंद निर्माण करतील.
लाइट : प्रेमभावना जागृत करण्यासाठी प्रकाशाची मुख्य भूमिका असते. फिकट गुलाबी आकाशी रंगांच्या लाइट्सचा बेडरूममध्ये वापर करा, बेडरूममध्ये डायरेक्ट नाही तर इनडायरेक्ट लाइट्स पडली पाहिजेच. तसेच लॅम्पशेड, कॉर्नर लाइट याचाही उपयोग बेडरूममध्ये केला जाऊ शकतो. यामुळे बेडरूममध्ये मादकता व प्रेमाचा समावेश होतो. खोलीत जेवढा कमी प्रकाश तितकंच जास्त एकमेकांबद्दल आकर्षण निर्माण होतं.
सुवास : प्रेमभावना आणि प्रणय कायम ठेवण्यासाठी तऱ्हेतऱ्हेच्या सुंगधांचा वापर केला जाऊ शकतो. लवेंडर, मोगरा, चंदन वगैरे सुवासांनी पतीपत्नीमध्ये भावना जागृत होतात. खोलीत फुलदाणी व फुलांचे गुच्छ ठेवावेत. रोमान्स वाढवण्यासाठी अरोमा कॅन्डल लावाव्यात. सुवास मनुष्यामध्ये अनेक प्रकारचे भाव निर्माण करते. मेणबत्तीचा प्रकाश फक्त बेडरूमचं सौंदर्य वाढवत नाही तर रोमान्ससाठीही एकमेकांना उत्तेजित करतो.
बिछाना : मनात इच्छा निर्माण होण्यासाठी बिछान्याचे खूपच योगदान आहे. मऊ गाद्या नसाव्यात. तसेच बेडचा त्रासदायक आवाज नसावा. चादरींचे रंग आणि मुलायमपणा दोन्ही प्रेम व प्रणय उत्तेजित करणारे असावेत.
फळे : द्राक्षे, केळी, स्ट्रॉबेरी, सफरंचद, चीकू, इ. फळांचा सुवास मादक असतो. जर तुम्ही अशी फळे ठेवत असाल व खात ही असाल तर याचा परिणाम तुमच्या रोमान्सवरही होतो.