Holi 2023 : होळी पार्टीसाठी 10 टिप्स

* प्रतिभा अग्निहोत्री

होळीच्या दिवशी, मुले सकाळपासूनच धमाका सुरू करतात आणि प्रौढदेखील उत्साहाने भरलेले दिसतात, सणांच्या दिवशी कुटुंब आणि मित्रांसोबत पार्टी केल्याने सण अधिक रंगतदार होतो. कोणताही खास प्रसंग असो, सर्वात जास्त त्रास आम्हा महिलांना होतो, कारण त्यांचा जास्त वेळ स्वयंपाकघरात जातो, त्यामुळे त्यांना पार्टी एन्जॉय करता येत नाही, पण काही गोष्टींची काळजी घेतली तर तुम्हालाही होळी पार्टीचा आनंद घेऊ शकता.

1- होळीच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी परिधान केलेले कपडे अगोदरच धुवा आणि दाबा जेणेकरून तुम्हाला होळीच्या दिवशी काळजी करण्याची गरज नाही.

2- रंग, गुलाल, अबीर, पिचकारी इत्यादी एकाच ठिकाणी ठेवा आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना कळवा जेणेकरून त्यांच्या प्रश्नांपासून दूर राहून इतर कामांवर लक्ष केंद्रित करता येईल.

3- घराबाहेर पाण्याची व्यवस्था करण्याबरोबरच मुलांना वारंवार घरात न येण्याच्या सक्त सूचना द्या म्हणजे घर घाण होण्यापासून वाचेल.

4- सोफे, दिवाण इत्यादींचे कव्हर्स काढा किंवा जुनी कव्हर लावा जेणेकरून ते रंगांपासून सुरक्षित राहतील, शक्य असल्यास पाहुण्यांना बसण्यासाठी प्लास्टिकच्या खुर्च्या वापरा.

5 घरी येणा-या पाहुण्यांसाठी नाश्ता ट्रेमध्ये ठेवावा आणि कागदाने झाकून ठेवा, शक्य असल्यास डिस्पोजेबल प्लेट्स आणि वाटी वापरा.

6- थंडई, शरबत, लस्सी, ताक किंवा मॉकटेल जे काही पेय तुम्हाला पाहुण्यांना द्यायचे आहे ते तयार करा, पाहुण्यांच्या संख्येनुसार डिस्पोजेबल ग्लासेसमध्ये ठेवा आणि चांदीच्या फॉइलने किंवा क्लिंग फिल्मने झाकून ठेवा आणि फ्रीजमध्ये ठेवा.

7 ताज्या नाश्त्याऐवजी गुजिया, मथरी, शकरपारे, शेव, कोरडे बेसन कचोरी, समोसे, दही बडा या कोरड्या नाश्त्याला प्राधान्य द्या जेणेकरुन पाहुणे आल्यावर काळजी करावी लागणार नाही.

8- तुम्ही वाळवंटातील चवीनुसार कुल्फी, आईस्क्रीम, रबडी इत्यादींना प्राधान्य द्यावे, तसेच त्यांना सर्व्हिंग बाऊलमध्ये ठेवावे आणि चांदीच्या पन्नीने झाकून ठेवावे जेणेकरून तुम्हाला पार्टीच्या मध्यभागी काळजी करण्याची गरज नाही.

9- जर तुम्हाला पाहुण्यांना प्रभावित करायचे असेल तर बीटरूट, पालक, हिरवी धणे इत्यादी वापरून बटाट्याची भरलेली इडली, पनीर भरलेले अप्पे किंवा टोमॅटो शेव इत्यादी बनवा. तुम्ही ते आधीच तयार करून ठेवू शकता.

10- कचोऱ्या, समोसे, आलू बोंडा, पॅटीस इत्यादी मोठ्या आचेवर तळून घ्या आणि पाहुणे आल्यावर एकदा गरम तेलात टाका आणि बटर पेपरवर काढा, गरम नाश्ताही मिळेल.

विनाकारण सल्ला देऊ नका

* प्रीता जैन

सूची स्वत:साठी बाजारात एक ड्रेस घेत होती. अचानक तिला मागून कोणीतरी हाक मारली. सूचीने मागे वळून बघितलं तर ती रीमा होती. रीमाला तिथे पाहून तिचा मूड ऑफ झाला. कारण तिला माहीत होतं की, आता ती जबरदस्ती तिला योग्य ड्रेस निवडण्याच्या टीप्स देऊ लागेल, जसं काही तिला स्वत:ला खूप फॅशनची माहिती आहे. हा कसा घेतला, आता तर हा ट्रेंडमध्येच नाही आहे. वगैरे गोष्टी सांगून सांगून डोकं खाईल. ठीक आहे, मैत्री तर आहे, तर तोंडावरती नकारदेखील देऊ शकत नाही.

काळजी घे, ट्रेनमध्ये खाण्यापिण्याचं सामान व्यवस्थित ठेव १-२ पाण्याच्या बाटल्यादेखील ठेव, कुठेही स्टेशनवर उतरू नकोस, दिल्लीला आपण भेटूच, अजिबात काळजी करू नकोस.

हे सल्ले एखाद्या लहान मुलासाठी नसून ४५ वर्षांच्या विनीतासाठी होते. जी आपल्या माहेरी एकटी जात होती. मोठा भाऊ त्याच्याकडून तिच्या भल्यासाठीच सांगत होता, परंतु विनिताला हे ऐकून कधी हसू यायचं की कसं ते लहान मुलाप्रमाणे सतत समजावत राहतात, तर कधी कधी तिला कंटाळादेखील यायचा, मुलं असतात तेव्हा तर ती तिच्याकडे बघून हसू लागतात व नंतर पती तिला गरीब समजूनदेखील समजावून लागत.

ही गोष्ट फक्त एका दिवसाची नव्हती तर दररोजची होती. जेव्हा देखील दादा वा वहिनीचा फोन येतो तेव्हा इकडेतिकडच्या गोष्टी न करता ते विनिताला समजावत राहात की असं कर, तसंच  करू नकोस, ते तिकडे जाऊ नकोस, हे सामान हे खरेदी करू नकोस वगैरे वगैरे.

अशा प्रकारे दीपाची मोठी जाऊबाई रीनाजी तिच्यापेक्षा १-२ वर्षाने मोठी होती तीदेखील मुलांच्या संगोपनाबद्दल सांगत राहायची केवळ आजच नाही तर जेव्हादेखील तिचा फोन यायचा तेव्हा कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून सल्ले देत राहायची की सकाळी लवकर उठ, नाश्ता वा खाण्यात हेच बनव, घर अशाच पद्धतीने सजव, हे काम असं केलं जातं, हे काम तसंच केलं जातं, सर्वांसोबत असंच वाग तसंच वाग वगैरे वगैरे.

हे योग्य नाही

सुरुवातीला विनिता ऐकत राहायची परंतु आता तिलादेखील वाटू लागलं की आपण तर समवयस्क आहोत. तर इकडच्या तिकडच्या शिक्षण वा मनोरंजनाबद्दल बोलायचं झालं तर जास्त चांगलं किंवा असं होऊ शकतं का? विनिता ऐकत राहायची आणि जाऊ सुनवत राहायची. विनिता ऐकत राहायची ती कधीच सांगू शकत नव्हती वा तिच्या बोलण्यावरून आभासच व्हायचा नाही की तीदेखील एक गृहिणी व स्त्री आहे, जिला आपल्या जबाबदाऱ्या निभावणं खूप चांगल्या प्रकारे कदाचित तिच्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे.

असं फक्त विनिताच नाही तर आपल्या बाबतीतदेखील अनेकदा होतच असतं. अनेकदा लहानपणापासून ते अगदी मोठं होईपर्यंत कोणी ना कोणी, काही ना काही सुनवतच असतं आणि हळूहळू आपण ऐकण्यासाठी म्हणून ऐकत राहतो असं म्हणतो तसं आपण मांडू लावून ऐकू लागतो. जसं दाखवतो की आपल्याला आपण अगदी मन लावून ऐकत आहे. म्हणून प्रत्येक जण आपल्याला काही समजतच नाही असं मानून स्वताचा सल्ला वारंवार देऊ लागतो आणि अनेकदा होतच राहतं.

परंतु हे अजिबात योग्य नाही आहे, प्रत्येक वेळी कोणाला ना कोणाला सल्ला देत राहणं आणि प्रत्येक वेळी त्यांच ऐकणं हे योग्य नाही आहे. आयुष्य आहे तर ते जगण्यासाठी प्रत्येक व्यक्ती आपल्या कुवतीनुसार काम करतच राहतात. अनेक लोक वयाबरोबरच एवढे समजूतदार आणि परिपक्व होत जातात की आपली कामं कशी करायची आणि कोणावरती ही विनाकारण अवलंबून रहायच नाही हे त्यांना माहितच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही कामाबद्दल जाणून घेणं व एखादी माहिती द्यायची असेल तेव्हा इतर व्यक्तींना आवर्जून विचारायला हवं व त्यांचा सल्ला घ्यायला हवा. अशाप्रकारे स्वत:कडूनदेखील दुसऱ्या व्यक्तींना विनाकारण हे करता तेव्हाच सल्ला द्यायला हवा. जेव्हा समोरचा स्वत:हून मागायला येईल गरजेनुसार सल्ला देण्याची गरज असेल.

योग्य सल्ला

सल्ला देणाऱ्यापेक्षा तो सल्ला ऐकणाऱ्या व्यक्तीची चूक आहे. जे दुसऱ्यांना ऐकवत राहतात व अशा प्रकारचे वागत राहतात जसं काही समोरच्याला काही कळतच नाही. आम्ही हेदेखील नाही सांगत आहे की इतर व्यक्तींचा सल्ला ऐकायला व मानायला नको. उलट सांगण्याचं तात्पर्य हे आहे की असा सल्ला माना जो वास्तवात मानण्यालायक आहे, त्यामुळे तुमचं दररोज आयुष्य वा मग जीवनात नवीन दिशा मिळेल व ऐकल्यामुळे वा त्यावर अंमल केल्यामुळे मानसिक समाधान मिळण्याची शक्यता असेल, अन्यथा ‘ना’ ऐकण्याची तसंच ‘ना’ बोलण्याची सवय स्वत:मध्ये विकसित करणं खूप गरजेचं आहे.

प्रत्येक व्यक्तीचं वागणं व सवय वेगवेगळी असू शकते. काहींना व्यवस्थित, तर काही आपल्या व्यक्ती त्याच्या विकासात बाधकदेखील होऊ शकतात. उदाहरणासाठी जर आपण आपापसात समजून घेतलं नाही आणि इतरांना गरजेपेक्षा जास्त आपल्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करू लागतात तेव्हा प्रभावहीन व श्रेष्ठ ही व्यक्तित्व होऊन जातात. स्वत:ची ओळख करून ठेवू लागतात.

आयुष्यात बरंच काही आपण समजतच मोठे होत राहतो. अनुभव व वेळ सर्वांना जगरहाटी शिकवते. तरीदेखील आईवडील व आपल्यापेक्षा मोठयांचा सल्ला तसेच त्यांनी सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित ऐकून त्यावर अंमल करायला हवं. समवयस्क फक्त दोन ते चार वर्षापेक्षा मोठयांचं योग्य मानले जात नाही. यामुळे तुमच्या व्यक्ती तुमचं व्यक्तिमत्त्व प्रभावहीन होऊ शकतो. त्यामुळे विनाकारण सल्ला व टोका टोकिपासून वाचा आणि स्वत:चं व्यक्तिमत्त्व आकर्षक व प्रभावशाली बनवा.

तर नेहमीच राहील २ बहिणींमध्ये प्रेम

* गरिमा पंकज

अरे वा, या गुलाबी मिडीमध्ये आपली अमिता राजकन्येसारखी गोंडस दिसते,’’ आईशी बोलताना वडिलांनी सांगितले आणि नमिता उदास झाली.

त्याच डिझाईनची पिवळी मिडी तिने न घालता हातातच ठेवली. तिला माहीत होते की, असे कपडे तिला शोभत नाहीत, याउलट कुठलाही पेहेराव तिच्या बहिणीला चांगला दिसतो. आपल्या मोठया बहिणीची स्तुती ऐकून तिला वाईट वाटत नसे, पण या गोष्टीचे दु:ख व्हायचे की, तिचे आईवडील नेहमीच फक्त अमिताचे कौतुक करायचे.

नमिता आणि अमिता दोघी बहिणी होत्या. थोरली अमिता खूप सुंदर होती आणि हेच कारण होते की, ज्यामुळे नमिताला अनेकदा स्वत:मध्ये काहीतरी कमतरता असल्याची, न्यूनगंडाची भावना सतावायची. ती सावळी होती. आईवडील सतत मोठया मुलीचे कौतुक करायचे.

अमिता सुंदर असल्यामुळे तिचे व्यक्तिमत्त्व अधिकच खुलून दिसायचे. तिचा आत्मविश्वासही वाढला होता. ती लहानपणापासून बडबडी होती. घरची कामेही पटापट करायची, याउलट नमिता सर्वांशी फार कमी बोलायची.

त्या दोघींमधील स्पर्धा कमी करण्याऐवजी आईवडिलांनी नकळत अमिता खूप सुंदर आहे, असे सतत बोलून ही स्पर्धा अधिकच वाढवली. अमिता सर्व नीटनेटकेपणे करते, तर नमिताला काहीच कळत नाही, असे ते म्हणायचे. याचा परिणाम असा झाला की, हळूहळू अमिताचा अहंकार बळावला आणि ती नमिताला हीन लेखू लागली.

घरातील अशा वागण्यामुळे नमिता तिच्याच विश्वात राहू लागली. तिला अभ्यास करून मोठया पदावर काम करायचे होते. आपण आपल्या बहिणीपेक्षा कमी नाही, हे सर्वांना दाखवून द्यायचे होते. त्यानंतर एक दिवस असा आला की, नमिता तिच्या मेहनतीच्या जोरावर खूप मोठी अधिकारी बनली आणि लोकांना तिच्या बोटावर नाचायला लावू लागली.

नमिताने दोघी बहिणींमधील स्पर्धेकडे सकारात्मकपणे पाहिले. त्यामुळेच ती जीवनात यशस्वी होऊ शकली, पण अनेकदा असेही होते की, याच स्पर्धेमुळे माणसाचे व्यक्तिमत्त्व आयुष्यभरासाठी गोठून जाते. लहानपणी गमावलेला आत्मविश्वास परत मिळवता येत नाही आणि माणूस या स्पर्धेत हरवून जातो.

बऱ्याचदा २ सख्ख्या बहिणींमध्येही एकमेकींविरोधात स्पर्धेची परिस्थिती निर्माण होते. विशेषत: हे अशा परिस्थितीत घडते जेव्हा पालक त्यांच्या मुलींचे संगोपन करताना जाणूनबुजून किंवा नकळतपणे त्यांच्याशी भेदभावपूर्वक वागतात. त्यांची एकमेकींशी तुलना करतात. यामागे अनेक कारणे असू शकतात.

कुठल्यातरी एका मुलीबद्दल विशेष ओढ असणे : बऱ्याचदा आईवडिलांसाठी ती मुलगी जास्त प्रिय ठरते जिच्या जन्मानंतर घरात काहीतरी चांगले घडते. जसे की, मुलीच्या पाठीवर मुलगा होणे, नोकरीत बढती किंवा एखाद्या मोठया संकटातून सुटका होणे. त्यांना वाटते की, मुलीमुळेच आपल्याला चांगले दिवस आले आहेत. त्यामुळे त्यांच्या नकळत ते त्या मुलीवर जास्त प्रेम करू लागतात.

कुठल्यातरी एका मुलीच्या व्यक्तिमत्त्वामुळे प्रभावित होणे : असे होऊ शकते की, एक मुलगी जास्त गुणी, जास्त सुंदर, जास्त हुशार असू शकते किंवा ती आकर्षक व्यक्तिमत्त्वाची असू शकते. याउलट दुसरी मुलगी दिसायला सर्वसाधारण आणि सामान्य व्यक्तिमत्त्वाची असू शकते. अशा वेळी आईवडील प्रत्येक बाबतीत गुणवान आणि सुंदर मुलीचे कौतुक करू लागतात.

बहिणींमधील ही स्पर्धा अनेकदा लहानपणापासूनच जन्माला येते. लहानपणी कधी दिसण्यावरून, कधी आईला कोण जास्त आवडते तर कधी कोणाचे कपडे, खेळणी जास्त चांगली आहेत, यासारख्या गोष्टी स्पर्धेचे कारण बनतात. मोठे झाल्यावर सासरचे लोक चांगले आहेत की वाईट, आर्थिक सुबत्ता, जोडीदार कसा आहे, अशा गोष्टींवरुनही मत्सर किंवा स्पर्धा निर्माण होते.

पालकांनी भेदभाव करू नये

पालकांकडून नकळत होत असलेल्या भेदभावामुळे बहिणी आपापसात स्पर्धा करू लागतात. एकमेकांबद्दल मत्सर आणि वैर वाढू लागतो. हा द्वेष स्पर्धेच्या रूपात येतो आणि स्वत:ला एकमेकांपेक्षा श्रेष्ठ सिद्ध करण्याची एकही संधी सोडत नाही.

याउलट सर्व मुलांना समान वागणूक दिली आणि कोणीही कोणापेक्षा कमी नाही हे लहानपणापासूनच त्यांच्या मनात बिंबवले तर त्यांच्यात अशी स्पर्धा निर्माण होत नाही. दोघींनाही सुरुवातीपासून समान संधी आणि समान प्रेम दिले तर स्पर्धा करण्याऐवजी त्या नेहमीच स्वत:पेक्षा बहिणीच्या आनंदाला अधिक महत्त्व देतील.

४० वर्षीय कमला सांगतात की, त्यांना २ मुली आहेत. मुलींचे वय अनुक्रमे ७ आणि ५ वर्षे आहे. छोटया-छोटया गोष्टींवरून त्या अनेकदा एकमेकींशी भांडतात. त्यांची नेहमी एकच तक्रार असते की, आई माझ्या बहिणीवर माझ्यापेक्षा जास्त प्रेम करते.

वास्तविक, दोन्ही मुलींमध्ये फक्त २ वर्षांचे अंतर आहे. साहजिकच लहान मुलगी जन्माला आली की, आई तिची काळजी घेण्यात व्यस्त असायची. यामुळे मोठया मुलीला आईचे लक्ष आणि प्रेम मिळू शकले नाही, जे तिच्यासाठी खूप महत्त्वाचे होते.

दोन मुलींमध्ये वयाचे अंतर एवढे कमी असताना दोघींकडे समान लक्ष देणे कठीण होते.

दररोज आपल्या मांडीवर बसून आपल्या मोठया मुलाशी प्रेमाने बोलण्यास विसरू नका. त्यामुळे त्याला एकाकी वाटणार नाही.

स्पर्धेकडे सकारात्मक पद्धतीने पाहा

बहिणी, भावंडांची आपापसात स्पर्धा असणे चुकीचे नाही. अनेकदा माणसाची प्रगती किंवा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा स्पर्धेच्या भावनेमुळे होतो. एक बहीण अभ्यास, खेळ, स्वयंपाक किंवा इतर कोणत्याही बाबतीत पुढे असेल किंवा जास्त चपळ असेल तर दुसरी बहीण कुठेतरी न्यूनगंडाची शिकार होते.

नंतर प्रयत्न केल्यावर, ती करिअरसाठी दुसरे कोणते तरी क्षेत्र निवडते, पण ती नक्कीच पुढे जाऊन दाखवते. साहाजिकच तिच्या आयुष्याला योग्य दिशा लाभते. त्यामुळे स्पर्धेकडे नेहमी सकारात्मक पद्धतीने पाहाणे गरजेचे असते.

नात्याला ळ बसू देऊ नका

दोघी बहिणींमध्ये स्पर्धा असेल तर तुम्ही ती कशी हाताळता हे महत्त्वाचे ठरते. तुमचा तिच्याबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे, हे पाहा. स्पर्धा सकारात्मक पद्धतीने घ्या आणि तुमच्यातील नाते कधीही बिघडू देऊ नका. लक्षात ठेवा २ बहिणींचे नाते खूप खास असते.

जर तुमच्या बहिणीशी असलेले तूमचे नाते बिघडले असेल तर तुमच्या मनात राहणारी पोकळी कधीच भरून निघणार नाही, कारण बहिणीची जागा कधीच मित्र किंवा नातेवाईक घेऊ शकत नाही. बहीण ही बहीण असते. त्यामुळे नात्यात निर्माण होणाऱ्या या स्पर्धेला इतके महत्त्व कधीच देऊ नका की, त्यामुळे नाते दुखावले जाईल.

हट्टी मुलाला बनवा समंजस

* गरिमा पंकज

काही दिवसांपूर्वी आमच्या घरी पाहुणे आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा ६ वर्षांचा मुलगा नंदनही होता. त्याने हिवाळयाचे दिवस असतानादेखील आईस्क्रीम मागितले. मी नकार दिल्यावर त्याने रागाने डायनिंग टेबलवर ठेवलेल्या महागडया प्लेट्स तोडल्या आणि त्याच्या आईसमोर लोळण मारून आईस्क्रीमचा हट्ट करू लागला. त्याचे ते वागणे मला आवडले नाही. माझे मूल असते तर मी कधीच त्याला धोपटले असते, पण तो पाहुणा होता म्हणून मी गप्प बसले. मला आश्चर्य तर तेव्हा वाटले, जेव्हा त्याच्या या तोडफोडीला एक खोडसाळपणा समजून त्याची आई हसत राहिली.

अचानक माझ्या तोंडून निघाले की, मुलाला एवढी मोकळीक देऊ नये की, तो त्याच्या हट्टीपणामुळे तोडफोड करेल किंवा दुसऱ्यांसमोर लाजवेल.

तेव्हा माझे नातेवाईक प्रेमाने मुलाला कुशीत घेत म्हणाली, ‘‘काही हरकत नाही ताई, माझ्या एकुलत्या एक मुलाने काही तोडले तर काय झाले? आम्ही तुमच्या घरी या प्लेट्स पाठवून देऊ. त्याचे वडील त्यांच्या लाडक्या मुलासाठीच तर कमावतात.’’

तिचे बोलणे ऐकून मी समजून गेले की, मुलाच्या हट्टीपणाला जबाबदार मुलगा नाही तर त्याचे पालकच आहेत, ज्यांनी त्याला एवढे डोक्यावर बसवून ठेवले आहे. खरेतर आपल्या समाजात असेही आईवडील आहेत, ज्यांना त्यांच्या मुलांशिवाय कोणीही प्रिय नाही. चूक त्यांच्या मुलाची असली तरी त्यासाठी ते आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि कुटुंबीयांशीदेखील भांडण करतात. जेव्हा पालक त्यांच्या पाल्याची प्रत्येक योग्य-अयोग्य मागणी पूर्ण करतात, तेव्हा त्याचा परिणाम असा होतो की ते मूल हट्टी बनते. मुलाला बिघडवण्यात आणि हट्टी बनवण्यात आईवडीलच जास्त जबाबदार असतात. खरेतर, हे एक प्रकारचे त्यांच्या संगोपणातील अपयशाचे निदर्शक आहे.

काळजी घ्या

येथे लक्ष देण्याजोगी बाब ही आहे की, लहानपणापासूनच हट्टी असणारी मुले भविष्यात त्यांचा स्वभाव बदलू शकत नाहीत. आईवडील लाडाकोडात त्यांचा हट्ट पूर्ण करतात, पण लोक त्यांना सहन करत नाहीत. अशी मुले मोठेपणी रागिष्ट आणि भांडखोर स्वभावाची होतात. म्हणूनच जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या मुलाचे भविष्य आनंदी राहावे आणि आयुष्यभर त्याचे वर्तन चांगले राहावे, तर तुम्ही त्याला हट्टीपणापासून रोखले पाहिजे.

मुलाला राग येईल या विचाराने पालक त्याची मागणी पूर्ण करतात. पण मग मुलाला तेच करायची सवय लागते. ते रडून किंवा नाराजी दाखवून त्याच्या मागण्या मान्य कशा करायच्या हे शिकते. समजा, तुम्ही बाजारातून चॉकलेट आणले. घरात ३ मुले आहेत. तुम्ही सर्वांना १-१ चॉकलेट देता, पण तुमचे मूल आणखी एक चॉकलेट मागू लागते, न मिळाल्यास रागाने एका कोपऱ्यात जाऊन बसते. तुम्ही त्याला खूश करण्यासाठी त्याचा हट्ट पूर्ण करता. अशावेळी मूल मनातल्या मनात हसते. कारण त्याने तुमची कमजोरी पकडलेली असते आणि स्वत:च्या मागण्या पूर्ण करण्याचे त्याला आयतेच शस्त्र मिळते. त्याला समजते की तुम्ही त्याला रडताना पाहू शकत नाही.

मुले हट्टी होण्याची कारणे

पालकांचे वर्तन : जर पालक मुलाबरोबर योग्य वर्तन करत नसतील आणि त्याच्यावर शब्दाशब्दाला डाफरत असतील तर ते हट्टी होऊ शकते. आईवडिलांचे मुलाशी असलेले नातेसंबंध त्याच्या मनावर परिणाम करतात. मुलाकडे दुर्लक्ष करणे आणि त्याच्या बोलण्याकडे लक्ष न देणे यामुळेही मूल हट्टी बनते. अशा स्थितीत पालकांचे लक्ष स्वत:कडे वेधण्यासाठी ते अशी कृत्ये करते. एवढेच नाही तर पालकांनी त्यांच्या मुलावर प्रमाणाच्या बाहेर प्रेम करण्यानेदेखील मूल हट्टी बनते.

वातावरण : लहान मुलांच्या हट्टीपणाचे कारण एखादी शारीरिक समस्या, भूक लागणे किंवा सर्वांचे लक्ष स्वत:कडे आकर्षित करणे हे असू शकते. पण मोठया मुलाच्या हट्टीपणामागे बऱ्याचदा कौटुंबिक वातावरण, जास्त लाडुकपणा, सततचे ओरडणे किंवा मग अभ्यासाचा अनावश्यक दबाव अशी कारणे असतात.

शारीरिक शोषण : कधीकधी काही मुलांना त्यांच्या आयुष्यात शारीरिक शोषणासारख्या अप्रिय घटनांना सामोरे जावे लागते, ज्याबद्दल त्यांच्या पालकांनादेखील माहिती नसते. अशा घटनांचा मुलांच्या मनावर खूप वाईट परिणाम होतो. अशी मुले लोकांपासून दूर जाऊ लागतात, चिडचिड करतात आणि पालकांचे म्हणणे ऐकण्यास नकार देऊ लागतात. ती प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट करतात किंवा मग गप्प बसतात.

ताण : मुलांना शाळा, मित्र किंवा घरातून मिळणारा ताणदेखील त्यांना हट्टी बनवतो. ते असे वागू लागतात की, त्यांना सांभाळणे कठीण होते.

गर्भधारणेदरम्यान धूम्रपान : कधीकधी मुलांच्या हट्टीपणामागे आईने गर्भधारणेनंतर सिगारेट ओढणे किंवा मद्यपान करणे हेही एक कारण ठरते.

पालकांनी काय केले पाहिजे

दिल्लीत राहणाऱ्या ३६ वर्षांच्या प्रिया गोयल सांगतात, ‘‘हल्लीच माझी एक मैत्रीण तिचा मुलगा प्रत्युषला घेऊन मला भेटायला माझ्या घरी आली. प्रत्युष दिवसभर माझ्या मुलीची सायकल चालवत होता. परत निघताना तो सायकलवर दटून बसला आणि ती त्याच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागला. त्याच्या आईने थोडे धमकावले आणि त्याला सांगितले की, त्याने तिचे म्हणणे ऐकले नाही तर त्याला त्यांच्या घरी पुन्हा नेणार नाही. मुलाने लगेच सायकल सोडली आणि आईच्या कुशीत येऊन बसला.’’

मूल हट्टी बनू नये म्हणून कधीकधी आपल्याला कठोर राहिले पाहिजे, लहानपणापासूनच मुलांना सवय लावा की, त्यांचा प्रत्येक हट्ट पूर्ण होणार नाही आणि जर त्यांनी ऐकले नाही, तर त्यांना ओरडाही पडू शकतो.

समजून घ्यावे लागेल हट्टी मुलांचे मानसशास्त्र

पालकांनी त्यांच्या मुलाला समजून घेणे महत्त्वाचे आहे. खरेतर, मुलाच्या मनात आधीच हा विचार आलेला असतो की, जर ते त्याच्या वडिलांबरोबर याबद्दल बोलले, तर त्यांचे उत्तर काय असेल आणि आईशी बोलले तर ती कशी प्रतिक्रिया देईल. मूल त्याच्या आधीच्या सर्व कृती आणि त्यांच्या परिणामांचा विचार करूनच नवीन कृती करते. अशा वेळी पालकांनीही मुलाला योग्य गोष्टी कशा शिकवायच्या याचा आधीच विचार करून प्रतिक्रिया दिली पाहिजे. सर्वसाधारणपणे मूल आईसमोर हट्ट करते किंवा मग पाहुण्यांसमोरही ते हट्ट करू लागते.

लक्षात ठेवा की, तुम्ही त्याच्या चुकीच्या गोष्टींवर जास्त ओरडू नका, विशेषत: दुसऱ्यांसमोर ओरडणे किंवा मारणे योग्य नाही, शेवटी त्याचीही इज्जत आहे. नाहीतर ते तुम्हाला त्रास देण्यासाठी ती गोष्ट पुन्हा करू शकते.

हट्टी मुलांना कसे सांभाळाल

येल युनिव्हर्सिटीच्या तज्ज्ञ सागरी गोंगाला यांच्या मते, हट्टी मुले अतिशय संवेदनशील असतात. तुम्ही त्यांच्याशी कसे वागता याबद्दल ती खूप संवेदनशील असतात. त्यामुळे तुमच्या बोलण्याचा टोन, देहबोली आणि शब्दांच्या वापराकडे लक्ष द्या. तुमच्याशी बोलताना जर त्यांना कम्फर्टेबल वाटत असेल, तर ती तुमच्याशी चांगली वागतील. परंतु त्यांना कम्फर्टेबल करण्यासाठी कधीकधी तुम्ही त्यांच्यासोबत फन अॅक्टिव्हीटीजमध्ये सहभागी व्हा.

त्यांचे ऐका आणि संवाद साधा

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या मुलाने तुमचे म्हणणे ऐकावे तर आधी तुम्ही त्याचे म्हणणे ऐका. लक्षात ठेवा की, एका हट्टी मुलाची विचारसरणी खूप पक्की असते. ते आपली बाजू मांडण्यासाठी युक्तिवाद करू इच्छिते. जर त्याला वाटले की, त्याचे म्हणणे ऐकले जात नाही, तर त्याचा हट्ट अजून वाढतो. जर मूल काही करण्यास नकार देत असेल, तर प्रथम ते असे का करत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. कदाचित, त्याचा हट्ट योग्य असू शकतो.

तुमच्या मुलांशी कनेक्ट राहा

तुमच्या मुलावर कोणतेही काम करण्यासाठी दबाव टाकू नका. जेव्हा तुम्ही मुलावर दबाव टाकता, तेव्हा अचानक त्याचा विरोध आणखी वाढतो आणि ते त्याला जे करायचे आहे तेच करते. सर्वात चांगले की, तुम्ही मुलाला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही मुलाला जाणीव करून द्याल की, तुम्ही त्याची काळजी करता, तुम्ही त्याचा विचार करता, त्याला जे हवे आहे ते पूर्ण करत आहात, तर मग तेही तुमचे म्हणणे ऐकेल.

त्याला पर्याय द्या

जर तुम्ही मुलाला सरळ नकार दिला की, त्याने हे करू नये किंवा तसे केल्यास त्याला शिक्षा मिळेल, तर ते त्या गोष्टीला विरोध करेल. याउलट जर तुम्ही त्याला समजावून सांगत पर्याय दिला तर ते तुमचे ऐकेल. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या मुलाला जर ९ वाजता झेपायला सांगितले तर ते सरळ नकार देईल. पण जर तुम्ही म्हणाल की, चल झोपायला जाऊ आणि आज तुला सिंहाची गोष्ट ऐकायची आहे की राजपुत्राची, सांग तुला कोणती गोष्ट ऐकायची आहे? अशा वेळेस मूल कधीही नकार देणार नाही, उलट तुमच्याजवळ आनंदाने झोपायला येईल.

योग्य उदाहरण समोर ठेवा

मूल जे पाहते तेच करते. त्यामुळे तुम्ही त्याला योग्य कौटुंबिक वातावरण देत आहात याची काळजी घ्यावी लागेल. जर तुम्ही घरातील वडिलधाऱ्यांवर एखाद्या गोष्टीवरून ओरडत असाल, तर तुमचे मूलदेखील तेच शिकेल. अशा परिस्थितीत तुम्हाला हट्टी मुलाला सांभाळण्यासाठी तुमच्या घरातील कौटुंबिक वातावरण असे ठेवावे लागेल की, ज्यामुळे त्याला समजेल की मोठयांचे म्हणणे ऐकले पाहिजे.

कौतुक करा

मुलांना फक्त ओरडणे आणि नियम-कायदे सांगण्याऐवजी चांगल्या कामांबद्दल त्यांचे कौतुकही करा. यामुळे त्यांचे मनोबळ वाढेल आणि ती हट्टी न बनता मेहनत करायला शिकतील. पाहुण्यांसमोर आणि इतरांसमोरही त्यांच्याबद्दल चांगले बोला. यामुळे त्यांना तुमच्याबद्दल आपुलकी वाटेल.

हट्ट पूर्ण करू नका : बऱ्याचदा हट्ट पूर्ण झाल्यामुळे मुले अधिकच हट्टी होतात. मुलांना याची जाणीव करून द्या की, त्यांचा हट्ट नेहमीच पूर्ण केला जाऊ शकत नाही. जर तुमचे मूल एखाद्या दुकानात किंवा इतर कोणाच्या तरी घरी जाऊन कोणत्यातरी खेळण्याची मागणी करत असेल आणि खेळणे न मिळाल्यास आरडाओरड करत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. यामुळे मुलाला हे समजेल की, त्याच्या हट्टीपणामुळे त्याला काहीही साध्य होणार नाही.

कधीकधी शिक्षाही करा

मुलांना शिस्तीत ठेवण्यासाठी नियम बनवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर त्यांनी काही चुकीचे केले किंवा हट्टीपणाने काही गैरवर्तन केले तर त्यांना शिक्षा करण्यास चुकू नका. तुम्ही त्यांना अगोदरच सांगा की, जर असे केले, तर त्याचे परिणाम भोगावे लागू शकतात. जसे की- समजा, मूल झोपेच्यावेळी टीव्ही पाहण्याचा हट्ट करत असेल तर त्याला समजले पाहिजे की, असे केल्याने त्याला बरेच दिवस टीव्हीवर त्याच्या आवडीचा कार्यक्रम बघायला मिळणार नाही. मुलाला शिक्षा करण्याचा अर्थ असा नाही की, तुम्ही त्याच्यावर ओरडावे किंवा त्याला मारहाण करावी, तर त्याला एखादी वस्तू किंवा सुविधेपासून वंचित ठेवूनही तुम्ही त्याला शिक्षा करू शकता.

चाइल्ड फ्री ट्रिप

* पूनम अहमद

मुंबईमध्ये राहणाऱ्या सुनीताची मुले नववीच्या वर्गात असताना ती आणि तिचा नवरा निलीन पुण्यात एका लग्नाला गेले होते. लग्नाला जाणे गरजेचे होते आणि त्यात मुलांची परीक्षा होती. बऱ्याच विचाराअंती पतिपत्नी मुलांची समजूत घातल्यानंतर कामवालीला सूचना देऊन २ रात्रींसाठी पुण्याला गेले.

ती म्हणते, ‘‘पहिल्यांदा तर माझ्या मनात याची चिंता वाटत होती की, आम्ही नसताना मुलांना काही अडचण भासू नये, आम्ही सोसायटीमध्येही नवीन होतो. मीही बरेच दिवस घरात राहून कंटाळले होते. याआधी कधी मुलांना एकटे सोडून गेलो नव्हतो. पण जेव्हा गेलो, तेव्हा आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ज्या गोष्टीची विनाकारण चिंता करत मी गेले होते, परंतु पहिल्याच रात्री मुलांशी बोलून इतका आनंद झाला, जेव्हा बघितले की दोघेही छानपणे आपापले काम करत आहेत, आमच्याशिवाय सर्व व्यवस्थित मॅनेज करत आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही. तेव्हा कुठे मी माझी पहिली चाइल्ड फ्री ट्रिप मनापासून एन्जॉय केली. त्यानंतर आम्ही दोघे बऱ्याच वेळा १-२ रात्रींसाठी बाहेर फिरायला गेलो, मुलांनीही हेच सांगितले की, आम्ही तर शाळा-कॉलेजमध्ये व्यस्त असतो, तुम्ही निर्धास्तपणे जाऊन येत जा.

‘‘मुले जेव्हा फ्री झाली तेव्हा त्यांच्यासोबत कधी फिरायला गेलो, नाहीतर आम्ही २-३ रात्रींच्या ट्रिपवरून आता १ आठवडयाच्या ट्रिपवर आलो आहोत आणि तसे वारंवार जात राहतो. काही दिवस एकमेकांच्या सहवासात स्वत:चा वेळ घालवून फ्रेश होऊन परत येतो. त्यामुळे मन आनंदी राहते.’’

आता तर कोरोनाकाळातील लॉकडाऊनमुळे कुटुंबातील वेळ जास्तीचा झाला होता. बऱ्याचशा लोकांवर वर्क फ्रॉम होमचा फार ताण होता, घरातील इतर सदस्यांच्या गरजा आणि मुलांचे ऑनलाइन वर्ग यामुळे पती-पत्नीला एकमेकांबरोबरचे मोकळे क्षण फार मुश्किलीने मिळत होते. दोघांवरही कामाचा भरपूर ताण होता. कदाचित हेच कारण आहे की, परिस्थिती सामान्य झाल्यावर पती-पत्नी एकमेकांसोबत चांगले क्षण घालवण्यासाठी मुलांशिवाय ट्रिपचे नियोजन करताना दिसले, जे कदाचित गरजेचेही झाले होते.

एक मजेशीर किस्सा

नीता तर तिचा एक मजेशीर किस्सा सांगताना म्हणते, ‘‘एकदा तिचा पती ऑफिसच्या काही मीटिंगसाठी दुसऱ्या शहरात जात होता. तिथे माझी एक खास मैत्रीण राहात होती, मलाही असे वाटले की मीसुद्धा त्याच्याबरोबर जाऊन तिला तिथे भेटून येईन. मला एकच मुलगा आहे, जो त्यावेळी आठवीमध्ये होता. त्याच्या मित्राची आई म्हणाली की, मुलाला त्यांच्याकडे सोडून मी जाऊ शकते.’’

‘‘मी एका रात्रीसाठी गेले. मुलाने त्याचा वेळ त्याच्या मित्राच्या घरी इतका एन्जॉय केला की, त्यानंतर कित्येक दिवस तो सांगत होता की आई, पुन्हा तुझ्या कोणत्या मैत्रिणीला भेटायला जाणार असशील तर मी राहीन. त्यानंतर   आम्ही पती-पत्नी जेव्हाही बाहेर गेलो, तेव्हा तो एकटा असताना कधी त्याच्या मित्रांना बोलवायचा, कधी त्यांच्या घरी जायचा. आम्हीही छोटे हनीमून साजरे करून यायचो आणि मुलगाही त्याचा वेळ छान एन्जॉय करायचा.’’

बऱ्याचशा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज प्रौढांना याप्रकारे वेळ घालवण्यासाठी बरेचसे पर्याय आणि ऑफर देत असतात. लक्झरी रिसॉर्टची संख्या वाढत चालली आहे. काही विमान कंपन्या तर छोटया मुलांपासून लांब बसण्यासाठी सीट निवडण्याचा पर्यायही देतात. चला तर या ट्रेंडबद्दल काही बोलू :

एकांतही आणि मज्जाही

मुलांशिवाय पती-पत्नीने एकटेच ट्रिपला जाणे ही काही नवीन गोष्ट नाही. ९०च्या दशकात कॅरेबियन सिंगल्स रिसॉर्टने ही कल्पना समोर आणली होती. हा ट्रेंड कोणालाही एका रुटीन जीवनातून एक वेगळी वैयक्तिक मोकळीक देतो. मग सनसेट क्रुजवर जाणे असो, तारांकित स्पा ट्रीटमेंट असो, यात कोणत्याही प्रकारची रोमांचकारी अॅक्टिव्हीटी प्लॅन केली जाऊ शकते.

आजकाल भारतात हा ट्रेंड अनेक कारणांमुळे प्रचलित आहे. व्यस्त जीवनशैली, मुलांची देखभाल आणि त्यांची कधीही न संपणारी कामे, तसेच अन्य जबाबदाऱ्या पार पाडतापाडता सद्यस्थितीत प्रौढ जोडपी एकमेकांसोबत वेळ घालवणे विसरून गेली आहेत किंवा इच्छा असूनही एकमेकांच्या सहवासात राहू शकत नाहीत. आजकाल दोघे जेव्हा अशा प्रकारचा प्लॅन बनवतात, तेव्हा त्यांना चांगल्या ठिकाणी एकांताची अपेक्षा असते.

वी टाइम एन्जॉय

भारतात बरीचशी जोडपी गोवा, जयपूर, कुर्ग आणि उत्तरेकडील हिल स्टेशन्सवर जाणे पसंत करतात. तसेच परदेशात जाण्यासाठी आजकाल कित्येक लोक थायलंड, मेक्सिको आणि सॅशेल्सला जाणे पसंद करत आहेत. एडल्ट्स ओन्ली हॉलिडेज पॅकेजमध्ये कँडल लाईट डिनर्स, स्कूबा डायव्हिंग, जंगल सफारी आणि रेन फॉरेस्टचा आनंद घेतला जाऊ शकतो. जोडीदार आता वी टाइम एन्जॉय करू इच्छितात आणि करतही आहेत.

घरबसल्या करा आयुष्य सुरक्षित

* पारूल भटनागर

कोविड-१९ ने आपल्याला बरेच काही शिकवले. विम्याचे महत्त्व आता पूर्वीपेक्षा जास्त वाढले आहे, कारण केव्हा, कधी आणि कोणावर संकट येईल, कुटुंबात कशाची गरज निर्माण होईल, हे सांगता येत नाही. अशावेळी आरोग्य आणि आयुष्याशी संबंधित कुठल्याही प्रकारचा विमा तुमच्यावर जास्त खर्चाचा भार पडू देत नाही, पण त्यासाठी तुम्ही वेळेवर विमा काढायला हवा, जेणेकरून तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला वेळेवर त्याचा फायदा घेता येईल. तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी घरबसल्याही विमा काढू शकता. तर चला, घरबसल्या विमा कसा काढायचा, हे जाणून घेऊया…

चांगला पर्याय

घरबसल्या तुम्हाला जो कोणता विमा काढायचा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती घेणे गरजेचे असते. ही सर्व माहिती तुमच्याकडे आधीच असेल तर तुम्ही थेट विमा कंपनीच्या साईटवरून विमा घेऊ शकता, पण जर तुम्हाला वेगवेगळया विमा कंपन्यांच्या ऑफर्स पाहून आणि त्यांची तुलना करून विमा काढायचा असेल तर अॅग्रीगेटर वेबसाईटद्वारे विमा खरेदी करण्याचा पर्याय तुम्ही निवडू शकता. यामुळे तुम्ही वेगवेगळया विमा कंपन्यांच्या पॉलिसीतील अटी, फायदे आणि प्रीमियमची तुलना करू शकता. साहजिकच पॉलिसी समजून घेऊन खरेदी करणे सोपे होते.

प्राथमिक माहिती गरजेची

तुम्ही थेट विमा कंपनीच्या साईटवर किंवा अॅग्रीगेटर वेबसाईटवर जा, पण तुम्हाला कुठलाही प्लॅन बघण्यासाठी, तो खरेदी करण्यासाठी त्याची प्राथमिक माहिती असणे गरजेचे असते. जसे की, टर्म इन्शुरन्स खरेदीसाठी तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल क्रमांकाची माहिती द्यावी लागते. सोबतच तुम्ही धूम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करता का? तुमचे वार्षिक उत्पन्न किती? इत्यादी माहिती नमूद करावी लागते. अशाच प्रकारे तुम्ही मार्केट लिंक्ड प्लॅन असणाऱ्या युलिप प्लॅनमध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुम्हाला उत्पन्न आणि जीवन सुरक्षा दोन्ही मिळेल. या प्लॅनसाठी तुम्हाला कंपनीने विचारलेली प्राथमिक माहिती भरावी लागते. त्यानंतर तुम्हाला सर्व विमा कंपन्यांचे प्लॅन दिसू लागतात. त्यातील सर्व माहिती व्यवस्थित वाचून तुम्ही तुमचे उत्पन्न आणि गरजेनुसार विमा खरेदी करू शकता.

खरेदीची प्रक्रिया

कोणती पॉलिसी खरेदी करायची आहे, याबद्दल ठाम निर्णय झाल्यास तुम्ही पॉलिसीच्या डाव्या बाजूच्या ऑनलाइनच्या पर्यायावर क्लिक करा. तेथे तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, शहर, नोकरी/व्यवसाय, पॅनकार्ड क्रमांक इत्यादी माहिती भरावी लागेल. तुम्हाला त्याच पेजवर पॉलिसी, प्रीमियम संबंधी सर्व माहिती मिळेल. ती योग्य वाटल्यास तुम्ही प्रोसिडच्या पर्यायावर क्लिक करू शकता. तेथे तुम्हाला अतिरिक्त माहिती जसे की, वारसांची माहिती, तुमचा निवासी पत्ता, ओळखीचा पुरावा इत्यादी प्रमाणपत्र अपलोड करावी लागतील. त्यानंतर प्रीमियम किती, हे तुम्हाला समजेल. त्यानुसार प्रीमियम मासिक भरायचा की वार्षिक, याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पेमेंटचा पर्याय येतो. तुम्ही कार्ड, नेटबँकिंग, यूपीआय किंवा ऑनलाइन वॉलेटने पेमेंट करू शकता. पैसे भरल्यानंतर त्या संदर्भातील मेसेज ग्राहकाला ईमेल आयडीवर पाठवला जातो. अनेकदा आरोग्य आणि टर्म इन्शुरन्समध्ये वैद्यकीय चाचणी करावी लागते, पण सध्या तुम्हाला कितीतरी चांगल्या पॉलिसी चाचणीशिवाय मिळू शकतात.

पडताळणी

कंपनीने तुमची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला पॉलिसी मिळते. पॉलिसीची कागदपत्रे आल्यानंतर तुम्ही ती नीट पाहून घ्या, जेणेकरून भविष्यात कुठलाच त्रास होणार नाही. यात असाही पर्याय असतो की, पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्हाला ती न आवडल्यास तुम्ही कंपनीच्या अटींनुसार दिलेल्या मुदतीत ती परत करू शकता. म्हणूनच घाबरू नका तर निशिचतपणे ऑनलाइन पॉलिसी खरेदी करा. पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुम्ही विश्वसनीय कंपनी एलआयसीच्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या अॅपच्या मदतीने तुमच्या गरजेनुसार वेगवेगळया प्रकारच्या पॉलिसी ऑनलाइन खरेदी करू शकता.

ऑनलाइन विमा पॉलिसी खरेदीचे फायदे

सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण असल्यामुळे घराबाहेर पडणे अनेकांना गरजेचे वाटत नाही. अशावेळी जीवन, मालमत्ता आणि आपल्या माणसांच्या सुरक्षेसाठी तुम्ही कुठल्याही कटकटीशिवाय घरबसल्या विमा घेऊ शकता. विमा पॉलिसी घेण्याचे अनेक फायदे आहेत जसे की –

* जेव्हा आपण बाजारात काहीतरी खरेदीसाठी जातो तेव्हा सर्वप्रथम बजेटकडे पाहातो. ऑनलाइन विमा खरेदी केल्यामुळे आपले बजेट बिघडत नाही, कारण ऑफलाइनच्या तुलनेत ऑनलाइन पॉलिसी स्वस्त मिळते. यामागचे कारण म्हणजे तुम्ही ती थेट विमा कंपनीकडून खरेदी करत असल्यामुळे कुणीही मध्यस्ती नसते.

* विमा कंपन्या आपल्या पॉलिसीची सर्व माहिती ऑनलाइन देतात. त्यामुळे ग्राहकांना ती समजून घेणे सोपे होते, शिवाय सर्वकाही स्पष्टपणे नमूद केलेले असते. याउलट ऑफलाइन एजंटवर अवलंबून राहिल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी पॉलिसी खरेदी केल्यानंतर समजतात. अनेकदा त्या आपल्याला अयोग्य वाटतात.

* ऑनलाइन पॉलिसी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे मत आपल्याला ऑनलाइन समजू शकते. विमा कंपनी कशी आहे, दावा दाखल करताना अडचणी येतात का? यासंदर्भातही स्पष्ट माहिती मिळते. ऑफलाइनमध्ये हे अवघड असते.

* ऑनलाइन अॅग्रीगेटर्स कंपनी ग्राहकांना ऑनलाइन प्लॅनशी तुलना करण्याची सुविधा उपलब्ध करून देतात. त्यामुळे योग्य प्लॅन निवडणे सोपे होते.

* ऑनलाइन विमा म्हणजे कागदोपत्री व्यवहाराशिवाय ऑनलाइन विनात्रासाची प्रक्रिया असते.

* ऑनलाइन पॉलिसी घेतल्यावर तुम्हाला मेलवर सॉफ्ट कॉपी मिळते. याउलट तुम्ही हार्ड कॉपीवर अवलंबून असाल तर ती हरवल्यास तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सुरक्षितपणे ऑनलाइन पेमेंट कसे कराल?

ऑनलाइन पेमेंट केल्यास आपले खाते हॅक तर होणार नाही ना, याची भीती अनेकांना वाटत असते. प्रत्यक्षात स्मार्टली सर्व गोष्टी लक्षात ठेवून ऑनलाइन पेमेंट केल्यास तुम्ही सुरक्षित पद्धतीने पेमेंट करू शकाल. चला तर मग ते कसे करायचे, हे जाणून घेऊया –

* आपल्या कार्डाचा पासवर्ड आणि नेट बँकिंगची माहिती कोणालाही देऊ नका.

* वरचेवर पासवर्ड बदलत राहा.

* वन टाइम पासवर्ड (ओटीपी)चा वापर करा, ज्यामुळे हा आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित होईल.

* ऑनलाइन व्यवहारावेळी प्रायव्हेट ब्राऊजरचाच वापर करा, कारण तो जास्त सुरक्षित असतो.

* काम झाल्यावर लॉगआऊट करायला विसरू नका.

* तुम्ही ऑनलाइन व्यवहार करत असलेली साईट सुरक्षित आहे का, हे तपासून पाहा.

* कुठल्याही सार्वजनिक वायफाय किंवा कॉम्प्युटरचा वापर ऑनलाइन आर्थिक व्यवहारासाठी करू नका.

* स्वत:च्या मोबाईलवर तुम्ही ऑनलाइन व्यवहार करणार असाल तर फक्त वेरीफाय अॅपच मोबाईलमध्ये डाऊनलोड करा, जे प्ले स्टोअर, अॅप्पल स्टोअरवर असतील.

* मोबाईलमध्ये अॅप डाऊनलोड करण्यासोबतच कॅमेरा, फोन, फोटो, कॉन्टॅक्टस, मेसेज इत्यादींची परवानगी मागतात. ज्याची गरज असेल त्याच अॅपना परवानगी द्या. इतरांना डिनाय करा अर्थात परवानगी नाकारा.

लाइफ इन सोसायटी

* प्रतिभा अग्निहोत्री

४ दिवसांच्या मुंबईतील ट्रेनिंगची ऑर्डर पाहून नीतू अस्वस्थ झाली. तिचा नवरा नमन ६ महिन्यांच्या ऑफिशिअल टूरसाठी परदेशात गेला होता. घरात वृद्ध सासू-सासऱ्यांना एकटे सोडून कसे जायचे? याचा विचार करुन तिचे डोके दुखू लागले. घरी आल्यानंतरही तिचे कामात लक्ष लागत नव्हते. आम्ही एकटे राहू, तू काळजी करू नकोस, असे सासू-सासरे सांगत होते, तरी त्यांना ४ दिवस एकटे सोडून जाण्यासाठी तिचे मन तयार होत नव्हते.

संध्याकाळी सोसायटीच्या पार्कमध्ये समोरच्या फ्लॅटमध्ये राहणारी तिची मैत्रीण नीनाने नीतूला असे अस्वस्थ पाहून विचारले की, ‘‘काय झाले? आज चेहऱ्यावर असे १२ का वाजले आहेत?’’

सुरुवातीला नीतूने काहीही सांगितले नाही. पण नीना सतत विचारू लागल्याने तिने मुंबईला ट्रेनिंगसाठी जायचे असल्याचे सांगितले. हे ऐकल्यानंतर नीनाने हसतच सांगितले की, ‘‘अगं यात काळजी करण्याचे किंवा अस्वस्थ होण्याचे काय कारण आहे? मी समोरच तर राहते. काका-काकूंना काहीच त्रास होऊ देणार नाही. मी स्वत: येऊन त्यांची काळजी घेईन. पण तरीही तू माझा फोन नंबर त्यांना दे, म्हणजे त्यांना अचानक गरज पडली तरी ते लगेचच मला बोलावून घेतील.’’

नीनाचे बोलणे ऐकल्यानंतर नीतूला हायसे वाटले. त्यानंतर ती आनंदाने म्हणाली की, ‘‘नीना तू तर माझी अडचण चुटकीसरशी सोडवलीस. मला तर सकाळी ऑर्डर मिळताच टेन्शन आले होते. मागच्या वेळेला आजारी पडल्यामुळे ट्रेनिंगला जाऊ शकले नव्हते. त्यामुळे आता नकारही देऊ शकत नव्हते.’’

दुसऱ्याच दिवशी नीनाच्या विश्वासावर सासू-सासऱ्यांना सोडून नीतू मुंबईला गेली. परत आली तेव्हा सासू-सासऱ्यांनी नीनाचे खूप कौतुक केले. ते ऐकून नीतूला बरे वाटले. तिला २ वर्षांपूर्वीचा घटनाक्रम आठवला जेव्हा ती फ्लॅटऐवजी स्वत:चे स्वतंत्र मोठे घर घेण्याच्या विचारात होती. तर नमनला फ्लॅट घ्यायचा होता, कारण तिथे आजूबाजूला शेजारी असतात. ते मदतीला धावून येतात. याउलट स्वतंत्र घरात महिनोन महिने एका शेजाऱ्याचे दुसऱ्या शेजाऱ्याला दर्शन घडत नाही,असे त्याचे म्हणणे होते.

सभ्य शेजारपाजार

रानूचा फ्लॅट तिच्यासाठी वरदानच ठरला. काही वर्षांपूर्वी तिने व तिच्या पतीने साठवलेल्या पैशांतून एका सोसायटीत फ्लॅट घेतला होता. सासूच्या मृत्यूनंतर तिचे वृद्ध सासरेही त्यांच्यासोबतच राहत होते.

सकाळी १० वाजता पतीपत्नी दोघेही ऑफीसला जात आणि संध्याकाळी परत येत. तिचे सासरे दिवसभर त्यांच्या कामात मग्न असायचे आणि संध्याकाळी सोसायटीच्या पार्कमध्ये फिरायला जायचे. तिथे समवयस्क मित्रांसोबत गप्पा मारताना वेळ कसा निघून जात असे, हे त्यांनाही कळत नसे. वर्षभरानंतर रानूची कानपूरहून अलाहाबादला बदली झाली.

अमन गोंधळून गेला. घर आणि वडिलांना एकटयाने सांभाळणे त्याच्यासाठी अवघड होते. रानूची एवढी चांगली सरकारी नोकरीही तिला सोडायला लावणे योग्य नव्हते. कसेबसे आठवडाभरासाठी घर मॅनेज करुन रानू अलाहाबादला निघून गेली.

एका आठवडयानंतर जेव्हा ती वीकेंडला घरी आली तेव्हा हे ऐकून तिला आश्चर्य वाटले की, रानू बाहेर जाणार असल्याचे समजताच तिच्या सासऱ्यांचे आजूबाजूला राहणारे सर्व मित्र त्यांच्या मदतीला धावून आले. घरात जेवण, नाश्ता काहीच बनवू दिले नाही. नंतर रानूने हळूहळू तिच्या कामावरच्यांना प्रशिक्षण दिले आणि कसेबसे वर्षभर काम केल्यानंतर कानपूरला बदली करुन घेतली.

रानू तिच्या शेजाऱ्यांचे कौतुक करताना थकत नाही. ती सांगते, ‘‘मी वीकेंडलाच येऊ शकत होते. पण यादरम्यान माझ्या सर्व शेजाऱ्यांनी माझे घर एवढया चांगल्या प्रकारे सांभाळले की, त्यांच्यामुळेच मी अलाहाबादला १ वर्ष काढू शकले. याशिवाय आमच्या सोसायटीत प्रत्येक प्रकारच्या सुविधा आहेत. त्यामुळे मी नसताना माझे सासरे आणि पती दोघांनाही घर मॅनेज करताना कोणतीच अडचण आली नाही.’’

गरज पडताच मिळते मदत

बँकेत काम करणाऱ्या अनिताचा सोसायटीबाबतचा अनुभव वेगळाच आहे. त्या सांगतात, त्यांच्यासोबत त्यांची सासूही राहत होती. पतीची बदली दुसऱ्या शहरात झाली होती. एकुलती एक मुलगीही अन्य शहरात इंजिनीअरिंग करत होती.

एके दिवशी मोलकरणीकडून काम करुन घेताना त्यांच्या सासूचा पाया घसरला आणि खाली कोसळून त्या बेशुद्ध पडल्या. त्यांच्या समोरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या तनुला हे समजताच त्या त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेल्या. अनिता हॉस्पिटलला पोहोचेपर्यंत त्यांनी उपचार सुरू केले होते. या घटनेला दोन वर्षे झाली, पण आजही आपल्या सासूला वेळेवर मदत करणाऱ्या शेजाऱ्यांचे अनिता मनापासून आभार मानतात.

एके दिवशी अस्मिताचे पती जेव्हा सकाळी झोपून उठले तेव्हा त्यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले. काही वेळातच त्यांना चक्कर आली. घाबरलेल्या अस्मिताने शेजारी राहणाऱ्या राजेंद्रजींना याबाबत सांगताच, ते त्वरित त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ताबडतोब उपचार झाल्यामुळे त्यांचा जीव वाचला. अस्मिता यांनी सांगितले की, ‘‘मी ७ दिवस हॉस्पिटलमध्येच होते. घरात माझी वृद्ध सासू आणि १२ वर्षीय मुलगा होता. त्या दोघांनाही माझ्या शेजाऱ्यांनीच सांभाळले. मी प्रत्येकालाच सांगेन की, फ्लॅटमध्येच राहणे सुरक्षित आहे. कमीत कमी आजूबाजूला कोणीतरी विचारपूस करणारा असतो.’’

सोसायटीतील फ्लॅटला प्राधान्य

पूर्वी लोकांना स्वतंत्र घर आवडायचे. कारण तेथे त्यांना जमीन आणि छत दोन्ही सोयी मिळत होत्या. मात्र आता लोक सोसायटीतील घरात राहण्यास प्राधान्य देत आहेत. यामागची कारणे पुढीलप्रमाणे :

* आजकाल पतीपत्नी दोघेही नोकरीला जातात. अशावेळी घरी उरतात ते वृद्ध किंवा मुले. अनेकदा संपूर्ण दिवस त्यांना एकटे रहावे लागते. बँक कर्मचारी रागिणी आणि त्यांचे पती संध्याकाळी घरी येतात. पण त्यांची दोन्ही मुले दुपारी चार वाजताच शाळेतून घरी येतात. त्यांच्या शेजारी एक जोडपे राहते. त्यांची मुले परदेशात राहतात. रागिणी आणि त्यांचे पती येईपर्यंत हे जोडपे त्यांच्या मुलांना सांभाळते. यामुळे त्यांचाही वेळ चांगला जातो आणि रागिणी यांनाही मुलांची चिंता वाटत नाही.

* सोसायटीत एकाच परिसरात अनेक घरे असतात. यामुळे कुठल्या ना कुठल्या शेजाऱ्याशी तुमचे चांगले संबंध प्रस्थापित होतात. जे संकटसमयी तुमच्यासाठी धावून येतात.

* आजकाल सोसायटीचे लुकही अत्याधुनिक झाले आहे. तिथे जिम, क्लब, पार्टी, हॉल, गार्डन, लायब्ररी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रही असते.

* जागतिकीकरणाच्या आजच्या युगात मुले देशातच नाहीत, तर परदेशातही नोकरीसाठी जातात. अशावेळी अनेकदा आईवडिलांना त्यांच्यासोबत जावेच लागते. जिथे स्वतंत्र घरामध्ये चोरीची भीत असते तिथे सोसायटीत सुरक्षारक्षक तसेच लोकांची ये-जा असल्याने अशा प्रकारची कोणतीच भीती नसते.

* सोसायटी आपल्या परिसरात राहणाऱ्यांना दरमहा थोडेसे शुल्क आकारते, ज्यातून वेळोवेळी सोसायटीची देखभाल-दुरुस्ती केली जाते. ठराविक शुल्क दिल्यानंतर तुम्हाला कसलीच काळजी उरत नाही. याउलट स्वतंत्र घरात एखादी समस्या आल्यास तुम्हालाच ती सोडवावी लागते आणि वृद्धावस्थेत तुमच्यासाठी ती खूप मोठी समस्या ठरते.

* सोसायटीत विविध संस्कृतीचे लोक राहतात. यामुळे देशातील विभिन्न संस्कृतीशीही तुमची ओळख होते. संपूर्ण सोसायटीतील रहिवासी एकत्र येऊन सण साजरे करतात. मात्र स्वतंत्र घरात राहिल्यास सण आला कधी आणि निघून गेला कधी, हेही कळत नाही.

मृत्यूनंतर सामानाचं काय करायचं?

* सुमन वाजपेयी

अनुराधाच्या पतींचा मृत्यू होऊन दीड वर्ष झालीत. मृत्यूदेखील अचानक झाला होता. कोणताही आजार नव्हता. हार्ट अटॅक आला आणि इस्पितळात पोहोचण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं. आता ते गेल्यानंतर त्यांच्या वस्तू म्हणजेच चष्मा, मोबाईल, परफ्युम, घड्याळ, शेविंगचं सामान, चपला जशाच्या तशा ठेवल्या आहेत.

अनुराधाला त्या वस्तू तिथून काढण्याची व कोणाला देण्याची हिम्मतच होत नाही. प्रत्येक गोष्टीसोबत तिची एक आठवण जोडली आहे आणि ती वेगळी करण्याच्या विचाराने ती अधिकच घाबरून जाते. आपल्या मृत्यूच्या एक दिवसापूर्वी एका परिचितांच्या लग्नात जो सूट घालून ते गेले होते त्याला हात लावून पहाते.

अगदी तिच्या मुलाचंदेखील म्हणणं आहे की बाबांच्या वस्तू जशा आहेत तशाच राहू दे. त्या काढायच्या नाही. जिथे बसून ते काम करत होते ती त्यांची खोलीदेखील अजूनपर्यंत तशीच आहे. अगदी टेबलावर ठेवलेला लॅपटॉपदेखील काढला गेला नाहीए. तिला वाटतं की तिचे पती अजूनही काम करायला बसतील.

एका दु:खद वेदनेनंतर

जर अचानक कोणाचा मृत्यू झाला तर अगोदरपासूनच कोणतीही तयारी करणं शक्य होत नाही. कोणी दीर्घकाळ आजारी असेल वा वृद्ध असेल तर अगोदरपासूनच सर्व गोष्टींबद्दल विचार करता येऊ शकतो. परंतु अचानक निघून जाण्याने शोकाकुल कुटुंबीयांना अगोदर विचार करण्याची संधीच मिळत नाही. मृतकाशी संबंधित प्रत्येक गोष्टीमध्ये तो असल्याची जाणीव होते, तसंच त्याच्या नसण्याचे दु:खदेखील देत रहातं. हे दु:ख केवळ तेच समजू शकतात ज्यांनी हे सहन केलं आहे. महिने, अनेकदा वर्ष लागतात या वास्तविकतेला स्वीकारण्यात आणि तेव्हाच निर्णय घेऊ शकतात की या वस्तूंचं काय करायला हवं.

जाणाऱ्याच्या वस्तूंचं काय करायचं आहे, हे ठरवणं अनेक गोष्टींवरती अवलंबून असतं, ज्यामध्ये मृतकासोबतचं नातं काय होतं, याचादेखील समावेश असतो. जसं नातं असतं त्याच हिशोबाने दु:खदेखील होतं. एका नातवाला आपल्या आजोबांच्या वस्तू हटविताना  तेवढा त्रास होत नाही, जेवढा त्यांच्या मुला वा पत्नीला तो होऊ शकतो.

शालिनीला वाटतं की जेव्हादेखील ती तिच्या आईच्या वस्तू कोणाला दान म्हणून देते तेव्हा तिला जाणीव होते जसं की तिचा एखादा भाग तिच्या हातातून सुटत आहे. हे माहीत असूनदेखील आता आई कधीच परतून येणार नाही. तिने तिचा चष्मा आणि तिची उशीदेखील सांभाळून ठेवली आहे.

जेव्हा कोणी जातं तेव्हा घरातील त्यांचा ट्युथ ब्रशपासून धुण्यासाठी मशीनमध्ये ठेवलेले कपडे, त्यांची पुस्तकं, तिने बाजूला ठेवलेला पाण्याचा ग्लास वा लॅम्प, अर्धवट विणलेलं स्वेटर वा कॉफीचा मगपर्यंत वारंवार त्याच्या जाण्याची आठवण देत असतात. मनाला खूप वाईट वाटतं, तेव्हा आठवण येऊ शकते की या वस्तूंनी वारंवार दुखी होण्यापेक्षा किंवा त्या फेकून वा कोणाला दिल्या जाव्यात. स्वत:साठी असं करणं खूपच कठीण असेल तर एखादे परिचित, मित्र वा नातेवाईकांना असं करायला सांगू शकतो.

वेळ घ्या घाई करू नका

सामानाचं काय करायचं आहे, हा निर्णय घेण्यात घाई करण्याची गरज नसते. वेळ घ्या, म्हणजे या प्रक्रियेतून जाणं तेवढं सोपं नसतं परंतु वास्तविकता स्वीकारण्याची कोणतीही योग्य वेळ नसते. म्हणूनच या वेदनेचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार करा. जेवढं या गोष्टींशी जुळून रहाल तेवढेच तुम्हाला स्वत:पासून वेगळं करणं कठीण होईल. काही काळ गेल्यानंतर मृतकाच्या वस्तूंशी संबंधित आठवणीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करा.

सामान काढण्याचा अर्थ असा नाही आहे की जाणाऱ्याच्या आठवणीतून तुम्हाला सुटका करून घ्यायची आहे वा त्यापासून नातं तुटलं आहे लोकं असं बोलू शकतात, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका कारण हे दु:ख तुमचं आहे आणि यातून कसं बाहेर पडायचं आहे हेदेखील तुम्हालाच ठरवायच आहे.

काय आहे योग्य पद्धत

मृतकच्या वस्तू घरात इतर कोणाच्या कामी येऊ शकतात जसं की कपडे इत्यादी. परंतु हे गरजेचं नाही आहे की त्याचा उपयोग करायला हवा. माधवीने कितीतरी वेळा आपल्या मुलाला सांगितलं की त्याने बाबांचे कपडे घालावेत, परंतु त्याने स्पष्टपणे नकार दिला की अशा प्रकारे त्याला बाबांची आठवण अधिक येईल. कोणत्याही नातेवाईकांना कपडे देण्याची तिची हिंमत झाली नाही की कदाचित कोणाला तरी वाईट वाटेल की जो निघून गेला आहे त्याचं सामान वाटत आहे. याला अनेक लोक अपशकुन आणि अशुभदेखील मानतात की जो जगात नाही आहे त्याचं सामान वापरलं तर त्याचंदेखील वाईट होऊ शकतं.

अनेकदा लोक सल्ला देतात की एखाद्या गरजूला म्हणजे गरिबाला द्यावं; त्याला दिलं तर तो आशीर्वाद देईल. परंतु असं होतं का? तुम्ही ज्याला गरजवंत समजून देत आहात त्याच्या उपयोगाचं ते सामान नसावं आणि त्याने एखाद्याला विकून वा कचऱ्यात फेकून दिलं तर ते योग्य राहील का? जेवढा सेंटीमेंटल व्हॅल्यू तुमच्यासाठी त्या सामानाची आहे, ती दुसऱ्यासाठी कशी असू शकते? एखाद्या गरीबाने ते कपडे घातले आणि ते व्यवस्थित ठेवू शकला नाही तर ते घाणेरडे आणि इकडे तिकडे फाटलेले कपडे पाहून तुम्हाला सहन होईल का? अशावेळी सर्वात उत्तम पर्याय आहे की ते सामान विकून टाका. विकण्याचा उद्देश पैसा कमावणं नसला तरी त्यापासून मिळालेल्या पैशाचा योग्य विनियोग करू शकता. त्या पैशांनी एखाद्याची मदत केली जाऊ शकते वा   जर मृतक कोणत्या सामाजिक कार्याशी  संबंधित असेल तर तिथेदेखील मदत करू शकता.

ऐका आणि ऐकवादेखील…

* प्रीता जैन

‘‘प्रणव तुझी लखनौची जमीन कितीला विकली गेली, कोणी घेतली, कुठचा रहाणारा आहे, केव्हापर्यंत पैसे मिळतील?’’

तसंही प्रणव त्यांच्यापासून काहीच लपवून ठेवत नव्हता, परंतु आज अधिक काही सांगावसं त्याला वाटत नव्हतं. कारण दुसऱ्यांना प्रत्येक गोष्ट विचारायची आणि स्वत:बद्दल काहीच न सांगता. बस, एवढंच सांगायचं की सर्व काही ठीक आहे.

अशाप्रकारे अंजू आणि तिच्या बहिणीमध्ये गप्पा चालल्या होत्या. बोलता-बोलता अंजूच्या ताईने विचारलं, ‘‘तू काही बचत करतेस की नाही? काही दागिने घेतले आहेस का?’’

‘‘हो ताई, अविनाश दर महिन्याला बचतीच्या काही पैशाची एफडी माझ्या नावावर करतात. या व्यतिरिक्त काही दिवसांपूर्वी आम्ही सोन्याचा एक सेटदेखील विकत घेतला आहे.’’

‘‘तू सांग ना ताई तू कायकाय विकत घेतलंस?’’

‘‘अगं अंजू, तुला तर माहित आहे मी सर्व पैसे खर्च करून टाकते. आता तर माझ्याजवळ काहीच नाही आहे.’’

‘‘ताई, तू गेल्या महिन्यातच सोनाराकडे गेली होतीस आणि असं ऐकलंय की काही प्रॉपर्टीदेखील घेतली आहेस.’’

असं फक्त प्रणव वा अंजूसोबतच झालं नाही आहे तर अनेकांसोबत होतच असतं. काही अशा परिचितांशी बोलणं होतं जे समोरासमोर वा मग फोनवर वैयक्तिक गोष्टी माहीत करून घेण्यात तरबेज असतात. ते एवढी माहिती काढून घेतात की दुसरी व्यक्ती खरोखरंच त्रासली जाते आणि त्यांच्यामध्ये ही खासियत असते की स्वत:बद्दल ते जरासुद्धा काही सांगत नाहीत, उडवून लावतात.

अनेकदा तर दररोजच्या गोष्टी माहिती करून घेत राहतात. उदाहरणार्थ, आज तू काय जेवण बनवलंस? सर्व दिवस काय काय केलं? कोण आलं कोण गेलं? कुठे कुठे फोनवर बोललीस वगैरे वगैरे आणि हो, जर त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही तर ते सल्ला द्यायलादेखील लागतात की असं करायला हवं, तसं करायला हवं.

असं करणे योग्य आहे का?

एखाद्या समजूतदार व्यावहारिक व्यक्तीला जर तुम्ही त्याचं मत विचारलं तर त्याचं उत्तर असेल की हे करणे योग्य नाही आहे. दुसऱ्यांची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची उत्सुकता असते तेव्हा त्यांनी स्वत:बद्दलदेखील सांगावं अन्यथा कोणत्याही प्रकारची रुची घेऊ नये. जर दुसरी व्यक्ती स्वत:च्या इच्छेनुसार काहीदेखील सांगत असेल तर ते नक्कीच ऐकावं. परंतु प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची आणि सल्ला देण्याची सुरुवात अजिबात करू नये. जर ऐकावसं वाटत असेल तर स्वत:बद्दलदेखील सांगावं. यामध्येच स्वत:चा समजूतदारपणा तसंच मोठेपणा मानला जातो. आपापसातील नातेसंबंधांमध्ये स्नेह व जवळीक बनून राहते आणि आपापसातील संबंध अधिक दृढ व घनिष्ठ होतात.

त्यामुळे आता या गोष्टी लक्षात ठेवून वर्षानुवर्षे प्रियजनांचीसोबत मिळवून आनंदी जीवन जगा :

* प्रत्येकाचं स्वत:चं वैयक्तिक आयुष्य व गोष्टी असतात, कोणी कितीही जवळचं असलं तरी काही गोष्टी दुसऱ्यांसोबत शेअर केल्या जात नाहीत. त्यामुळे कोणाच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट व बोलणं जाणून घेण्याचा प्रयत्न अजिबात करू नका.

* कोणाच्याही वैयक्तिक गोष्टीची माहिती दुसरीकडून माहिती करून घेण्याची सवय स्वत:ला लावून घेवू नका. असं केल्यामुळे आपणच आपली अव्यावहारिकता आणि मूर्खपणा दर्शवितो.

* नात्यांना खूप सांभाळून ठेवलं जातं. यांच्या आधारेच आयुष्यात प्रत्येक आव्हानाचा सामना केला जातो. म्हणून गरजेपेक्षा अधिक एकमेकांच्या गोष्टी वा वैयक्तिक गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नका आणि ना ही कौटुंबिक प्रकरणांमध्ये सल्ला मागितल्याशिवाय देऊ नका. जर दीर्घकाळापर्यंत नात्यांमध्ये प्रेम व आपलेपणा ठेवायचा असेल तर आजूबाजूला विनाकारण लक्ष केंद्रित करण्याऐवजी, मी आणि माझं आयुष्य एवढयापर्यंतच विचार करा. यामध्येच सुख व आनंद आहे.

प्रियकर अडचण बनू नये

* नसीम अन्सारी कोचर

प्रत्येक प्रेमकहाणी यशस्वी होईलच असे नाही. नाती तुटतात ही आणि इथूनच ‘द्वेष’ निर्माण होतो. प्रत्येक प्रकरणात असे घडेलच असे नाही, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे घडते. ब्रेकअप झाल्यावर जिथे काही लोक त्यांच्या आयुष्यात आनंदी होतात किंवा दुसरा जोडीदार शोधतात. तर काही लोक बदला घेण्याचे ठरवतात. विचार करतात की ती माझी झाली नाही तर ती दुसऱ्याची कशी होऊ शकते.

अशा परिस्थितीत काय करावे, चला जाणून घेऊया :

सावधगिरी बाळगा : एका गाण्याचे बोल आहेत, ‘वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा…’

एखाद्याशी नात्यात असणे ही एक सुंदर भावना आहे, परंतु जेव्हा हे सुंदर स्वप्न तुटते, तेव्हा खूप जोराचा आघात पोहोचतो. प्रेमसंबंध तुटण्याची काही कारणे असतात, जसे की दोघांपैकी कोणा एकाचे लग्नाला तयार नसणे, घरातील सदस्यांचा दबाव असणे, धर्म-जाती वेगळया असणे, मुलाकडे नोकरी नसणे, कुठले भविष्यातील नियोजन नसणे, इ. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे नाते कोणत्याही गंतव्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा योग्य कारणे समोर ठेवून वेगवेगळया मार्गांची निवड करण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. जर तुमचा प्रियकर तुमच्याशी कुठल्या स्वार्थामुळे संलग्न असेल तर तो तुम्हाला धमकावण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न करेल. कदाचित तो तुम्हाला ब्लॅकमेलदेखील करू शकतो.

हळूहूळू अंतर वाढवा : जर तुमचे लग्न ठरले असेल, तर तुम्ही तुमचे नाते क्षणार्धात तोडावे हे आवश्यक नाही. जेव्हा नातं तयार व्हायला वेळ लागतो, तेव्हा ते संपवायलाही वेळ लागतो. म्हणून हळूहळू अंतर वाढवा, त्याला त्या गोष्टींची जाणीव करून द्या की त्या कोणत्या विवशता आहेत, ज्यामुळे तुम्ही त्याच्यापासून दूर जात आहात. एका क्षणात सर्वकाही संपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण समोरची व्यक्ती अचानक निर्माण झालेली पोकळी सहन करू शकणार नाही. त्याला वेळ द्या आणि हळूहळू सर्व संपर्क संपवा.

भेटवस्तू नष्ट करा : तुमच्या प्रियकराने तुम्हाला गिफ्ट, कार्ड किंवा कपडे इत्यादी दिले असतील. जितक्या लवकर तुम्ही त्यांना स्वत:पासून दूर कराल तितक्या लवकर तुम्ही त्याच्या आठवणींपासून मुक्त व्हाल. तसेच आपण त्याला दिलेल्या सर्व भेटवस्तू किंवा कार्ड वगैरे त्याच्याकडून परत मिळवण्याचा प्रयत्न करा, त्यांचादेखील नाश करा. जुन्या गोष्टींची सावली नव्या आयुष्यात पडू नये.

ब्रेकअपनंतर स्वत:ला वेळ द्या : ब्रेकअपनंतर अनेकदा असं वाटतं की, हे काही काळाचं अंतर आहे, आम्ही पुन्हा एकत्र येऊ. या भावनेतून बाहेर पडणे सोपे नसते. ब्रेकअपनंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी बहुतेक लोक लगेच दुसरा मित्र शोधतात किंवा लग्नासाठी तयार होतात, हे योग्य नाही. प्रियकरासोबत घालवलेले क्षण विसरण्यासाठी आणि सत्याचा पूर्णपणे स्वीकार करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या. चिंतन करा आणि तुम्ही उचललेले पाऊल अगदी योग्य आहे हे स्वत:ला समझवून घ्या. नवीन मित्र किंवा जीवनसाथी निवडण्यात घाई करू नका.

नवऱ्याला सर्व काही सांगू नका : तुमच्या जोडीदारापासून तुमचे भूतकाळातील नाते लपवणे चुकीचे असेल, पण तुमच्या भूतकाळातील सर्व काही सांगणे आवश्यक नाही, आजकाल शाळा-कॉलेजेसमध्ये बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बनणे सामान्य गोष्ट आहे. अनेकदा पती पत्नीला याबाबत विचारत नाहीत. तरूणाईमध्ये विरुद्ध लिंगाबद्दल आकर्षण असणे स्वाभाविक आहे. हा सामान्य कल आहे. म्हणूनच तुमच्या पतीला हे सांगणे की होय, तुमचा प्रियकर होता, ही काही आकाश कोसळणारी गोष्ट नाही. होय, पण जर तुम्ही त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवला असेल किंवा तुम्ही कधी त्यापासून गरोदर राहिला असलात किंवा तुमचा गर्भपात झाला असेल, तर तुम्ही हे सर्व पतीला सांगण्याची गरज नाही. कारण असे केल्याने तुमच्या नात्यात कटुता येईल.

नवऱ्याची तुलना प्रियकराशी करू  नका : तुमच्या प्रियकराच्या अनेक गोष्टी कदाचित तुमच्याशी मेळ खात असाव्यात, तेव्हाच तुमची मैत्री झाली आणि कदाचित तुम्ही ज्याच्याशी लग्न केले आहे त्याच्या सवयी तुमच्याशी अजिबात जुळत नसतील. अशावेळी तुम्हाला तुमच्या प्रियकराची आठवण येऊ शकते.

लक्षात ठेवा तुम्ही ज्या व्यक्तीशी लग्न केले आहे ती खूप चांगली आहे, कारण त्याने तुम्हाला स्थिरता दिली आहे, तुम्हाला आर्थिक सुरक्षा दिली आहे. कधी तुमचा प्रियकर तुम्हाला इतके सर्व देऊ शकला असता का? कदाचित नाही, म्हणूनच आपल्या पतीची तुलना त्या व्यक्तीशी कधीही करू नका.

सगळयात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नानंतर जर अशा कोणत्याही अप्रिय परिस्थितीला सामोरे जावे लागले तर आत्मविश्वासाने सामोरे जा.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें