* नसीम अन्सारी कोचर
प्रत्येक प्रेमकहाणी यशस्वी होईलच असे नाही. नाती तुटतात ही आणि इथूनच ‘द्वेष’ निर्माण होतो. प्रत्येक प्रकरणात असे घडेलच असे नाही, परंतु बहुतेक प्रकरणांमध्ये हे घडते. ब्रेकअप झाल्यावर जिथे काही लोक त्यांच्या आयुष्यात आनंदी होतात किंवा दुसरा जोडीदार शोधतात. तर काही लोक बदला घेण्याचे ठरवतात. विचार करतात की ती माझी झाली नाही तर ती दुसऱ्याची कशी होऊ शकते.
अशा परिस्थितीत काय करावे, चला जाणून घेऊया :
सावधगिरी बाळगा : एका गाण्याचे बोल आहेत, ‘वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे एक खूबसूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा...’
एखाद्याशी नात्यात असणे ही एक सुंदर भावना आहे, परंतु जेव्हा हे सुंदर स्वप्न तुटते, तेव्हा खूप जोराचा आघात पोहोचतो. प्रेमसंबंध तुटण्याची काही कारणे असतात, जसे की दोघांपैकी कोणा एकाचे लग्नाला तयार नसणे, घरातील सदस्यांचा दबाव असणे, धर्म-जाती वेगळया असणे, मुलाकडे नोकरी नसणे, कुठले भविष्यातील नियोजन नसणे, इ. जेव्हा तुम्हाला असे वाटते की तुमचे नाते कोणत्याही गंतव्यापर्यंत पोहोचू शकत नाही, तेव्हा योग्य कारणे समोर ठेवून वेगवेगळया मार्गांची निवड करण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. जर तुमचा प्रियकर तुमच्याशी कुठल्या स्वार्थामुळे संलग्न असेल तर तो तुम्हाला धमकावण्याचा किंवा घाबरवण्याचा प्रयत्न करेल. कदाचित तो तुम्हाला ब्लॅकमेलदेखील करू शकतो.
हळूहूळू अंतर वाढवा : जर तुमचे लग्न ठरले असेल, तर तुम्ही तुमचे नाते क्षणार्धात तोडावे हे आवश्यक नाही. जेव्हा नातं तयार व्हायला वेळ लागतो, तेव्हा ते संपवायलाही वेळ लागतो. म्हणून हळूहळू अंतर वाढवा, त्याला त्या गोष्टींची जाणीव करून द्या की त्या कोणत्या विवशता आहेत, ज्यामुळे तुम्ही त्याच्यापासून दूर जात आहात. एका क्षणात सर्वकाही संपवण्याचा प्रयत्न करू नका, कारण समोरची व्यक्ती अचानक निर्माण झालेली पोकळी सहन करू शकणार नाही. त्याला वेळ द्या आणि हळूहळू सर्व संपर्क संपवा.