मूर्ख

* कथा * सुधा अमृता

कार्यालयातून घरी परतत असताना वाटेत वहिनी भेटली. ती खूप दु:खी दिसत होती. विचारपूस केल्यावर ती म्हणाली, ‘‘निवेदिता आता या जगात नाही, असा रोमितचा संदेश मुंबईहून आला आहे.’’

हे ऐकून मला धक्काच बसला. मी घरी कसा पोहोचला माझे मलाच समजले नाही. घरी येताच एका खोक्यातून निवेदिताचा फोटो काढून बघत बसलो. तेवढयात श्रद्धा आली, तिने विचारले, ‘‘इतका काळजीपूर्वक कोणाचा फोटो बघतोस?’’

‘‘तुला माहीत नाही श्रद्धा, ही निवेदिता आहे. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी कोविड झाल्यामुळे पती आणि दोन मुलांना रडत सोडून तिने हे जग कायमचे सोडले.’’

‘‘खूप वाईट झाले, पण तू निवेदिताला कसं ओळखतोस? निवेदिताचा फोटो तुझ्याकडे कसा?’’

‘‘तू गोविंदपुरीच्या माझ्या वहिनीला तर ओळखतेसच.’’

‘‘हो, हनीमूनवरून परतताना आपण त्यांच्या घरी काही काळ थांबलो होतो.’’

‘‘बरोबर ओळखलेस. निवेदिता तिची भाची होती.’’

‘‘पण याआधी कधी तू निवेदिताबद्दल बोलला नाहीस?’’

‘‘अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या कदाचित मी तुला अजून सांगितल्या नसतील.’’

‘‘पण मी तुझ्यापासून कधी कोणतीच गोष्ट लपवून ठेवली नाही?’’

‘‘तुला नेमके काय म्हणायचे आहे?’’

‘‘काही नाही. तुम्ही पुरुष कसे असता तेच समजत नाही. आता तुझ्या बोलण्यातून स्पष्ट झाले की, तुझ्या आयुष्यात अशा किती निवेदिता आल्या असतील काय माहीत?’’

‘‘तू पुन्हा चुकीचे बोलतेस.’’

‘‘सत्य कडूच असते. वहिनीची भाची आणि त्रास तुला होतोय आणि तरीही तू म्हणतोस की, तुझा तिच्याशी काहीही संबंध नाही.’’

‘‘पण मी निवेदिताशी कधी नीट बोललोही नाही, हे मी तुला कसं समजावू?’’

‘‘जर मला दुसऱ्या कोणी सांगितले असते तर कदाचित मी त्यावर विश्वास ठेवलाही असता.’’

‘‘तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला पाहिजेस, कारण तुझा पती इतका मूर्ख आहे की, तो गरज असली तरीही खोटं बोलू शकत नाही हे तुला चांगलेच माहीत आहे.’’

‘‘खोटं बोलू नकोस, पण मला माहीत आहे की, वायफळ बोलायची तुझी सवय आहे. त्यामुळेच तू आयुष्यात प्रगती करू शकला नाहीस. कोणत्याही व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तू जास्त काळ नीट राहू शकत नाहीस.’’

‘‘बरोबर बोललीस. तुला माझ्यासारखा पती मिळाला, हे तुझे भाग्य समज. मी विवाहित असूनही सरळ जीवन जगतोय, त्यामुळेच मी आजपर्यंत प्रगती करू शकलो नाही.’’

‘‘कदाचित आतापर्यंत तुला निवेदिता न भेटल्याचा पश्चाताप होत असेल.’’

‘‘माझे जाऊ दे, पण निदान त्या गरीब मुलीवर तरी दया कर आणि आता तर ती या जगातही नाही.’’

‘‘अरे वा, तुझ्या या तत्वज्ञानाबद्दल मी काय बोलू? तरीही, मला सांग, तू तिला कसा ओळखत होतास?’’

‘‘तुला खरंच जाणून घ्यायचं असेल तर ऐक. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा एमएससी केल्यानंतर मला दिल्लीत नोकरी लागली. गाव सोडताना माझ्या वडिलांनी मला एका दूरच्या भावाचा पत्ता देऊन सांगितले होते की, बाळा, हा तुझ्या एका दूरच्या भावाचा पत्ता आहे. त्याच्याशिवाय दिल्लीत माझ्या ओळखीचे कोणीही नाही. ते एक मोठे शहर आहे. गरज पडल्यास त्याच्याकडे जा.

‘‘दिल्लीला पोहोचल्याच्या तिसऱ्या दिवशी मी त्या भावाच्या घरी गेलो. पहिल्याच भेटीत भाऊ आणि वहिनीच्या वागण्याने मी आनंदी झालो. त्यानंतर मी अनेकदा त्यांच्या घरी जाऊ लागलो. वहिनीबरोबर माझे चांगले जमू लागले.’’

‘‘अरे, खूप बोललास, आता लगेचच नायिकेला तुझ्या कथेत हजर कर.’’

‘‘एका संध्याकाळी मी वहिनीच्या घरी गेलो. मी दिवाणखान्यात प्रवेश करताच थांबलो. समोरच्या सोफ्यावर एक मुलगी बसून भरतकाम करत होती. तिचे मोकळे, काळे, घनदाट, लांब केस पाठीवर लटकत होते. खिडकीतून मावळतीचा सूर्य तिच्यावर सोनेरी किरणे उधळत होता.

‘‘मी त्या मुलीला माझ्या वहिनीच्या घरी पहिल्यांदा पाहात होतो. माझा आवाज ऐकून तिने भरतकामातून डोळे वर करून पाहिले आणि दचकली. मी काहीही न बोलता आत गेलो.

‘‘वहिनी स्वयंपाकघरात काहीतरी बनवत होती. मला पाहून ती आनंदी झाली आणि म्हणाली, अनिल, बरं झालं आलास. छोले-भटूरे बनवताना मला तुझी आठवण येत होती. तुला ते खूप आवडतात ना?

‘‘वहिनीच्या प्रेमळ बोलण्यामुळे मला फार बरे वाटले आणि मी म्हणालो, वहिनी, कृपया मला बसायला टेबल दे.

‘‘त्यावर ती म्हणाली, तू इथे या गरमीत बसणार?

‘‘मी म्हणालो, तू एवढया गरमीत छोले-भटुरे बनवू शकतेस तर मी इथे बसून ते खाऊ शकत नाही का?

‘‘वहिनी हसली आणि पदराने कपाळ पुसू लागली, मग मी अचानक विचारले की, बाहेर कोण बसली आहे?

‘‘वहिनीने सांगितले, ती तिची भाची निवेदिता आहे. वहिनीच्या भावाचे निधन झाल्यामुळे आणि घरी दुसरा आधार नसल्यामुळे, तिने आपली वहिनी आणि भाचीला बोलावून घेतले आहे.

‘‘काही वेळाने ती मुलगी स्वयंपाकघराच्या दरवाजाजवळ येऊन उभी राहिली.

‘‘माझ्या लक्षात आले की, वहिनीशी मी इतक्या मैत्रीपूर्णपणे बोलताना पाहून तिला आश्चर्य वाटत होते, पण मला बघितले नसल्यासारखे ती भासवत होती. वहिनीने ओळख करून दिली की निवेदिता, हा माझा दीर अनिल आहे.

‘‘निवेदिताने वर पाहिलं आणि मलाही पाहिलं, त्यानंतर लगेच वळून दिवाणखान्याच्या दिशेने गेली.

‘‘त्यानंतर तिने मला फक्त वहिनीच्या घरातील सदस्य म्हणून पाहिले. बारावीचे शिक्षण घेऊन ती गावातून आली होती. दिल्लीत आल्यानंतर ती चांगला अभ्यास करू शकेल आणि तिला एक चांगले स्थळही इथे सहज मिळू शकेल, अशीच काहीशी इच्छा वहिनी आणि निवेदिताच्या आईच्या मनात असल्याचं माझ्या लक्षात आलं.’’

‘‘हे बघ, मी तुला आधीच सांगितलं की, त्या दिवसांत दिल्लीत राहण्याची माझी एकमेव जागा माझ्या वहिनीचे घर होते. त्या वयातही मला उनाडपणा आवडत नव्हता. मोकळया वेळेत मी माझ्या खोलीत बसून प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचायचो आणि थकवा जाणवला की, वहिनीच्या पदराची मायेची उब मला तिच्या जवळ नेत असे. ती अनेकदा मला गमतीने म्हणायची की अनिल, लग्न झाल्यावर तू तुझ्या पत्नीचा असा गुलाम होशील की बिचारीचा जीव संकटात सापडेल. तिच्या या बोलण्यात किती तथ्य होते, हे तू मान्य करशीलच.’’

‘‘स्वत:चं कौतुक सोड, पत्नीचे गुलाम असणारे पुरुष चांगले असतात का?’’

‘‘तुला चांगलं माहीत आहे की, पुरुषांसारखा कणखरपणा माझ्याकडे नाही. मला कधीच राग येत नाही. नोकर मला घाबरत नाहीत. मला कोणाच्याही मनाशी खेळता येत नाही. म्हणूनच एक सुंदर मुलगी माझ्या अगदी जवळ जाऊनही मी तिच्यावर प्रेम करू शकलो नाही.’’

‘‘निवेदिता सुंदर होती का? फोटोवरून तर तसे वाटत नाही.’’

‘‘हा फोटो अगदी साध्या पोशाखात काढला होता, शिवाय फोटोमध्ये तुला जसे पाहिजे ते दिसत आहे. मला मात्र तिचा गव्हाळ रंग, मोठे डोळे आणि निरागस चेहरा खूप आवडला होता.’’

‘‘अरे, इतक्या लवकर का थांबलास? अजून तिची स्तुती कर.’’

‘‘श्रद्धा, टोमणे मारू नकोस, हे सत्य आहे.’’

‘‘अरे, माझ्या मूर्ख पतीदेवा, तुला थोडासा विनोदही सहन होत नाही. प्रकरण खूप गंभीर आहे, पुढे बोल.’’

‘‘यानंतर काही विशेष नाही, पण हो, कधी कधी धूसर चित्र डोळयांसमोर येतं. जसे पहाटे अर्ध्या झोपेत दिसणारे स्वप्न, ज्याला आकार नसतो तर त्याची नुसती झलक मनात अस्वस्थतेची भावना निर्माण करते. ते चित्र निवेदिताचे असेल असे वाटत असेल तर तू चुकत आहेस. मी सांगू शकत नाही की तुम्हा स्त्रियांच्या बाबतीत हे असे का घडते?’’

‘‘तू त्या वेळी निवेदिताला हा. प्रश्न विचारला असतास तर तुला ते कळले असते.’’

‘‘मी तुला पुन्हा एकदा सांगतो की, मी तिथे गेल्यावर आमची भेट नक्कीच व्हायची, पण आम्ही क्वचितच एकमेकांशी बोलायचो. वहिनी, तिची आई आणि आम्ही सगळेच बहुतेक संध्याकाळी बाहेर खुर्च्यांवर बसायचो. ती तिची खुर्ची काही अंतरावर ठेवायची. का ते माहीत नाही? होय, हे खरं आहे की, जेव्हाही वहिनीने विचारलं तेव्हा ती गाणे गायची. कधी कधी ती गाण्यांमध्ये इतकी रमून जायची की ती एकापाठोपाठ एक गाणीच म्हणत राहायची. तिचं गाणं बंद झाल्यावर आम्ही अनेकदा बोलायला विसरायचो.’’

‘‘ती कशी गायची?’’

‘‘श्रद्धा, मला काय माहीत? जरी सर्वजण तिच्या गाण्याचे कौतुक करत असले, तरी जेव्हा ती गायची तेव्हा तिच्या गाण्यातील वेदना आणि दु:ख माझ्या हृदयात आहे असे मला वाटायचे, पण ते व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते, भाषा नव्हती. तिची काही गाणी मी गुपचूप रेकॉर्ड केली होती.’’

‘‘ती फक्त तुझ्यासाठीच गाणी गायची, असेच तुला म्हणायचे आहे का?’’

‘‘असा मुर्खासारखा विचार मी कधीच केला नाही. एखाद्या मुलीने डोळे वर करून पाहिले म्हणजे ती काही खास कारणाने माझ्याकडे बघत आहे, असा विचार केल्यास ते माझ्या मूर्खपणाशिवाय दुसरे काय असेल? आणि रेकॉर्डिंगबद्दल बोलायचे तर त्यानंतर माझे मोबाईल फोन अनेकदा बदलले गेले. आता तो आवाज कुठे शोधणार?’’

‘‘तुझे हे बोलणे माझ्या डोक्यात आले नाही. बरं, पुढे सांग.’’

‘‘तिच्या आईला तिच्या लग्नाची खूप घाई होती, पण मी अनेकदा वहिनीला हे बोलताना ऐकले होते की, लग्नाची इतकी काय घाई आहे? मुलगी, निदान बी.ए. होऊ दे. तिला शिकू दे, वेळ आल्यावर लग्न होईलच.

‘‘पण, तिची आई सांगायची की, लग्नासाठी आधीपासून प्रयत्न करावे लागतात. हे मुलीचे लग्न आहे, कुठली थट्टा-मस्करी नाही.

‘‘एक दिवस निवेदिताच्या आईने मला सांगितले की अनिल, तू खूप चांगल्या नोकरीला आहेस. तू निवेदितासाठी तुझ्यासारखाच एखादा मुलगा शोधशील का?

‘‘त्यावर वहिनी माझी चेष्टा करत म्हणाली की, तू पण खूप चांगल्या माणसाला सांगत आहेस. आपल्यापेक्षा लहान असलेल्यांशीही बोलताना तो घामाने भिजतो, तो आपल्या मुलीसाठी कोणता मुलगा शोधणार? होय, पण त्याच्या नजरेत नक्कीच एक मुलगा आहे.

‘‘पण, वहिनी माझ्याकडे बघून नुसती हसत होती. मी तिथे क्षणभरही थांबू शकलो नाही. मी लगेच उठून बाहेर आलो. माझी वहिनी माझ्याबद्दल काय विचार करते, या विचाराने मी अस्वस्थ झालो.

‘‘मला लाज वाटत होती. मला वाटलं, मी निवेदिताच्या घरी तिच्या आकर्षणापोटी येत नाही हे मी वहिनीसमोर कसं सिद्ध करू? तिला मी कसं सांगू की, मी एवढा स्वार्थी नाही की, मी माझ्या वहिनीच्या निस्वार्थ मायेचा असा दुरुपयोग करेन. निवेदिता यायच्या आधीही मी वहिनीकडे अनेकदा यायचो आणि आताही कधी कधी येतो. निवेदिता आल्यानंतर माझ्या वागण्यात काही बदल झाला होता का?

मी वहिनीला असा विचार करण्याची संधी दिलीच कशी? मी संपूर्ण रस्ताभर या प्रश्नांचाच विचार करत होतो. माझ्याकडून चूक झाली आहे का? माझ्या कोणत्याही कृतीतून नकळतपणे वहिनीच्या स्त्री-मनाच्या नाजूक पटलावर काहीतरी प्रतिबिंब उमटले असेल का? हे कधी घडले? कसे घडले? मला काही समजले कसे नाही?

‘‘घरी आल्यावर मी डोळे मिटून खाटेवर पडलो, पण मन अस्वस्थ होतो. मनाची ही अस्वस्थता वाढतच गेली. शेवटी मी ठरवले की, काहीही झाले तरी वहिनीच्या मनातील संशय दूर केला पाहिजे.

‘‘दरम्यान, एके दिवशी अचानक माझी कॅनॉट प्लेसमध्ये रोमितशी भेट झाली. त्याने माझ्यासोबत एमएससी केले होते. तो अभ्यासात हुशार होता.

आयएएस स्पर्धेत निवड झाल्यानंतर तो राजपत्रित अधिकारी झाला. बोलण्याच्या ओघात जेव्हा मला समजले की, रोमित अजूनही अविवाहित आहे, तेव्हा माझ्या मनाने जणू आनंदाने उडी मारली.

‘‘त्याच्यासमोर प्रस्ताव मांडण्यास उशीर करणे मला योग्य वाटले नाही. सुरुवातीला गंमत म्हणून बोलणे सुरू झाले, पण काही वेळाने रोमित माझ्या बोलण्यावर गंभीर दिसला. त्याला दिल्लीबाहेरचे जीवन जगावेसे वाटले नाही. संधी साधून त्याने मला निवेदिताबद्दल विचारले.

‘‘मुलीला बघायचे ठरल्यावर रोमित म्हणाला, हे काय बोलतोस अनिल? जर मुलगी तुझ्या बघण्यातली आहे आणि तुला ती माझ्यासाठी सुयोग्य वाटत असेल तर ठीक आहे, पण माझी आई मुलगी बघितल्याशिवाय होकार देणार नाही.

‘‘मी म्हणालो नक्कीच… तुला हवं तेव्हा आईला घेऊन ये.

‘‘तो म्हणाला ठीक आहे अनिल, मी पुढच्यावेळी दिल्लीला येताना काही दिवसांची सुट्टी काढून येईन.

‘‘रोमित यापेक्षा जास्त काही बोलला नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव मला बरंच काही सांगून गेले.

‘‘त्याच रात्री मी माझ्या वहिनीला रोमितबद्दल सगळं सांगितलं. वहिनी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, तू खरं बोलतोस का अनिल?

‘‘मी म्हणालो, वहिनी, मी कधी तुझ्याशी खोटं बोललो आहे का?

‘‘वहिनी थोडावेळ माझ्या चेहऱ्याकडे बघतच राहिली, त्यानंतर म्हणाली, ठीक आहे.

‘‘तिला जितका आनंद होईल, असं मला वाटलं होतं, तितका आनंद मला तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता, पण निवेदिताच्या आईने अत्यानंदाने माझ्या खांद्यावर हात ठेवले आणि म्हणाली, अनिल, तू हे नाते लवकर जुळव, असे स्थळ सहसा मिळत नाही.

‘‘थोडयाच दिवसांत निवेदिताचे लग्न ठरले. सर्व नातेवाईकांमध्ये निवेदिताची आई माझे कौतुक करायची आणि प्रत्युत्तरात ते सर्वही माझे कौतुक करायचे. एवढं मोठं काम माझ्यासारख्या मुर्ख माणसाकडून होईल, अशी अपेक्षा कुणालाही नव्हती.

‘‘लग्नाची सर्व तयारी झाली होती. अचानक निवेदितानेच गोंधळ घातला. ती लग्न न करण्यावर अडून बसल्याचे मला समजले.

‘‘वहिनी मला म्हणाली, आता तूच जाऊन निवेदिताची समजूत काढ.

‘‘हे ऐकून मी स्तब्ध झालो आणि मग विचारले की, निवेदिताला अचानक काय झालं? मी तिला काय समजावू?

‘‘हे ऐकून वहिनी म्हणाली, अनिल, तू समजावलंस तरच काहीतरी होऊ शकतं. तिचं तुझ्यावर प्रेम आहे, हे तुला कळायला हवं.

‘‘मी वहिनीच्या चेहऱ्याकडे बघतच राहिलो. माझा चेहरा पडला होता. मी काळजीत पडलो. लग्नाचं प्रकरण इतकं पुढे सरकलं होतं की मला माघार घ्यायला लाज वाटली असती. मी कुणाला तोंडही दाखवू शकणार नव्हतो.

‘‘वहिनीच्या सांगण्यावरून मी तिच्याकडे गेलो. ती दुसऱ्या मजल्यावरील खोलीत खिडकीजवळ उभी राहून रडत होती. मी तिला हाक मारली. इतक्या दिवसांत मी पहिल्यांदाच तिच्याशी समोरासमोर बोललो.

‘‘मी म्हणालो, निवेदिता, लग्नाची बोलणी खूप पुढे गेली आहेत. आता तू सगळयांना खाली मान घालायला लावणार आहेस का?

‘‘तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिले. मग ती लगेच म्हणाली, आणि माझे प्रेम, माझ्या भावना?

‘‘मी विचारले तुला या नात्यात काही अडचण आहे का?

‘‘तिचा गोल चेहरा लाजेने आणखी खाली गेला. तिने ओढणीचे टोके गुंडाळायला सुरुवात केली.

‘‘मी पुन्हा म्हणालो, तू या सर्वांचा पुन्हा एकदा गंभीरपणे विचार करू शकत नाहीस का?

‘‘तिने डोळे वर करून काही क्षण माझ्याकडे पाहिले. मग ती म्हणाली, हे तू काय बोलतोस?

‘‘निवेदिताचा प्रश्न ऐकून मी थक्क झालो. मग ती म्हणाला की, तुझी आई, आत्ये सर्वांची हीच इच्छा आहे… दुसरीकडे रोमितही वाट पाहात बसला होता…

‘‘बोलणे अर्धवटच राहिले. माझा कंठ दाटून आला. अचानक मलाच सर्व काही निरर्थक वाटू लागले.

‘‘ती म्हणाली, मला हे सर्व माहीत आहे, पण तुझेही तेच म्हणणे आहे का?

‘‘मी जबरदस्तीने हसलो आणि म्हणालो, माझे म्हणणे मी नक्कीच सांगेन.

‘‘माझं उत्तर ऐकून ती म्हणाली, तुझा नकार का आहे? उगाच मित्रासमोर तुला मान खाली घालावी लागणार नाही.

‘‘मी म्हणालो नाही, तसं काही नाही. जे काही घडतंय ते तुझ्या भल्यासाठीच आहे.

‘‘ती म्हणाली, ‘‘माझं भलं? पण ते कशात आहे?

‘‘यानंतर निवेदिताने मला काही बोलण्याची संधी दिली नाही आणि पटकन खोलीतून बाहेर पडून पायऱ्या उतरून खाली निघून गेली.

‘‘लवकरच लग्नाचा दिवस उजाडला. घरभर गोंधळ सुरू होता. मी व्यस्त आहे हे दाखवण्यासाठी मी इकडे तिकडे फिरत राहिलो, पण मला काहीही करण्यात रस नव्हता. वरात दारात आली होती. त्याचवेळी वहिनीला शोधत मी दुसऱ्या मजल्यावरील त्याच खोलीत पोहोचलो.

‘‘लाल रंगाची खूपच सुंदर साडी नेसलेली निवेदिता, कपाळावर लाल बिंदी आणि पायात पैजण घालून गुडघ्यांमध्ये चेहरा खाली करून बसली होती. त्यावेळी ती खूपच सुंदर दिसत होती. मी तिच्याकडे बघतच राहिलो. अचानक तिने मान वर केली. ती काही वेळ माझ्या तोंडाकडे बघतच राहिली. मी पाहिले की तिचे दोन्ही डोळे खूप लाल झाले होते. लग्नाच्या रात्री सगळया मुली रडतात, असं मी ऐकलं होतं. कदाचित तीही रडली असावी. तिचे लाल डोळे मला खूप आवडले.

निवेदिता उभी राहिली आणि जड अंत:करणाने म्हणाली, हीच तुझी इच्छा होती ना? तिच्या डोळयातून अश्रू वाहू लागले.

‘‘मग मी तिथे थांबूच शकलो नाही. मान खाली घालून मी गुन्हेगारासारखा बाहेर आलो. त्या दिवशी पहिल्यांदा माझ्या डोळ्यात पाणी आले. यानंतर मला त्या घरात राहावंसं का वाटलं नाही माहीत नाही.’’

‘‘त्यानंतर काय झाले?’’

‘‘श्रद्धा, त्यानंतर काही झाले नाही.’’

‘‘तू निवेदिताला पुन्हा भेटला नाहीस का?’’

‘‘नाही.’’

‘‘ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे.’’

‘‘श्रद्धा, तुला आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. लग्नाच्या ८ दिवसानंतर रोमित आपल्या पत्नीसह मुंबईला परतला. कदाचित त्याला फारशी रजा मिळाली नसावी. इथे माझी बदलीही लखनऊला झाली. त्यानंतर आपलं लग्न झालं आणि मीही कामात व्यस्त झालो. तेव्हापासून आपण एकत्र आहोत. लखनऊनंतर माझी कानपूरला बदली झाली, नंतर घाटमपूर आणि आता १२ वर्षांनी मी पुन्हा दिल्लीला आलो आहे. या १२ वर्षात रोमित आणि वहिनीने अनेकवेळा पत्र लिहून त्यांना फोन करण्याची विनंती केली, पण रोमित आणि वहिनीकडे जाण्याची इच्छा अर्धवटच राहिली.’’

‘‘आपल्याला दिल्लीत येऊन एक महिना झाला आहे. या महिनाभरात एकदाही तू वहिनीच्या घरी का गेला नाहीस?’’

‘‘मी वहिनीच्या घरी गेलो नाही, असा अंदाज तू कसा लावलास?’’

‘‘याचा अर्थ तू वहिनीच्या घरी जातोस.’’

‘‘नाही, हे रोज कसे शक्य आहे?’’

‘‘तू कदाचित रागावली असशील, पण इथे आल्याच्या चौथ्या दिवशीच मी त्या मायाळू वहिनीला भेटायला गेलो होतो. तिथे गेल्यावर मलाही निवेदिताची आठवण आली, पण मी वहिनीकडे तिचा उल्लेख टाळला.

‘‘गप्पांच्या ओघात वहिनीने सांगितले की, निवेदिता तिच्या पतीसोबत खूप आनंदी आहे. दिल्लीला आल्यावर तिला माझी आठवण येते. ते ऐकून मी निश्चितच समाधानी झालो.

‘‘त्यानंतर मला इच्छा असूनही वहिनीच्या घरी जाता आले नाही, पण योगायोगाने आज सेक्टर ३ च्या वळणावर वहिनी भेटली आणि…’’

निवेदिताच्या निधनाची दु:खद बातमी तिने सांगितली.

‘‘अनिल, मला निवेदिताला बघता आले नाही, याची खंत वाटते.’’

‘‘तिला बघून तू काय करणार होतीस?’’

‘‘ते बघितल्यावर आणि भेटल्यावरच सांगता आले असते. तू तिला एकदाही आपल्याकडे बोलावले नाहीस. वाईट वाटून घेऊ नकोस, पण तू खरंच खूप मोठा मूर्ख आहेस…’’

‘‘श्रद्धा, यात वाईट वाटण्यासारखे काय आहे? कदाचित तू बरोबर आहेस. आता बिचाऱ्या रोमितचे काय होणार, हा विचार मनात येतोय. मला त्याला पत्र लिहायचे आहे, पण खूप विचार करूनही शब्द सापडत नाहीत. असे शब्द ज्यांच्या मदतीने रोमित निवेदिताने अर्धवट सोडलेल्या फुलांचे संगोपन करू शकेल आणि त्यांच्या सुगंधाने स्वत:ला सुगंधित करू शकेल.

‘‘कोणत्याही शब्दकोषात असे शब्द नाहीत का, जे मृत व्यक्तीला जिवंत करू शकतील?’’

‘‘श्रद्धा, तू माझी चेष्टा करतेस का मेलेल्या माणसाला पुन्हा जिवंत करण्याइतकी ताकद माझ्या शब्दांत नाही, पण माझ्या बोलण्याने तिघांच्या ओठांवरचे हिरवलेले हास्य परत आणलं तरी माझ्यासारख्या मूर्ख माणसासाठी ते खूप महान कार्य असेल.

गृहशोभिकेचा सल्ला

* प्रतिनिधी

माझी ननंद एका मुलासोबत आठ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे. ती सांगते की त्यांनी कधीच मर्यादा ओलांडल्या नाहीत. तरी देखील मला भीती वाटते की तिने एखादा चुकीचा निर्णय घेऊ नये. तिने ही गोष्ट घरातल्यांपासून लपवून ठेवली आहे.

मला देखील याची माहिती अनाहूतपणे झाली. आता मला वाटतं की ही गोष्ट मला माझे पती व सासूबाईंना सांगायला हवी. परंतु नणंद माझ्यापासून कायमची दुखावली जाऊ नये असं वाटतं, हे योग्य आहे का?

तुम्ही तुमच्या ननंदेच्या रागाची काळजी न करता ही गोष्ट घरातल्यांना सांगा, कारण तिच्या आयुष्यात उद्या काही चुकीचं झालं तर पूर्ण आयुष्यभर तुम्हाला याचं दु:ख राहील.

माझं लग्न साधारणपणे चार वर्षांपूर्वी दिल्लीत झालं होतं. पती व्यावसायिक आहेत. आमचं अरेंज मॅरेज झालं होतं. सुरुवातीला पतीसोबत थोड पटत नव्हतं, परंतु नंतर आम्ही हळूहळू एकमेकांना समजू लागलो आणि सर्व काही ठीक चालू लागलं. परंतु या दरम्यान माझी जाऊ, जी कुटुंबात सर्वात वरच्या मजल्यावर राहते,  अचानक स्वर्गवासी झाली. त्यांना दोन मुलं आहेत जे एवढे मोठे झाले आहेत की स्वत: स्वत:ची काळजी घेऊ शकतात.

माझ्या दिरांच जवळच कपडयांचं दुकान आहे. ते अनेकदा माझ्या पतींच्या मागे देखील आमच्या घरी येत असतात. जाऊ बाईच्या मृत्यूनंतर माझ्या मनात त्यांच्यासाठी सहानुभूतीची भावना असते, परंतु त्यांचं वागणं काही वेगळंच आहे ते अनेकदा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करतात. एके दिवशी ते बिनधास्त माझ्याशी लैंगिक संबंध ठेवण्याचा आग्रह करू लागले.

मी त्यावेळी त्यांना नकार दिला आणि जायला सांगितलं. परंतु आता मला भीती वाटू लागली आहे की पुन्हा जर ते या इराद्याने आले तर माझ्या पतींनादेखील या संदर्भात सांगायला भीती वाटते. कारण ते त्यांच्या मोठया भावाचा खूप आदर करतात. मला भीती आहे की ते मला दोषी मानतील. यासाठी काय करू?

सर्वप्रथम तुम्ही न घाबरता तसंच न संकोचता तुमच्या पतींना सर्व काही सांगा. त्यांना विश्वासात घेऊन तुमची भीती प्रकट करा. जर ते अजिबात मानले नाही तर एखाद्या दिवशी संधी मिळतात सर्व पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करा.

दिर जेव्हादेखील दरवाजा ठोठावतील, तेव्हा मोबाईल व्हॉइस रेकॉर्डर चालू करून तुमच्याजवळ ठेवा व दरवाजा उघडा. अशावेळी दिर जर चुकीचं बोलत असेल व अशा कोणत्या गोष्टी करत असेल तर सर्व रेकॉर्ड होईल आणि तुम्ही तुमच्या पतीला हे पुरावे म्हणून ते रेकॉर्डिंग ऐकवू शकता.

तुमच्या पतींना दुसरीकडे घर घेण्याचा आग्रह करा व दिरांचं पुन्हा लग्न करण्याचा प्रयत्न करा. त्यांना पत्नीची उणीव भासत आहे म्हणून ते तुमच्याकडे आकर्षित होत आहेत. नवी पत्नी आल्यानंतर कदाचित ते तुमच्याशी सामान्य व्यवहार करू लागतील.

मी कॉलेजमध्ये असताना एका मुलावर प्रेम करत होती, परंतु ते प्रेम व्यक्त करू शकली नाही. नंतर माझं अरेंज मॅरेज झालं. पती खूपच समजूतदार आणि केअरिंग स्वभावाचे आहेत. माझ्या आयुष्यात मी खूप आनंदी आहे. परंतु एके दिवशी अचानक आयुष्यात वादळ आलं, खरं म्हणजे फेसबुकवरती त्या मुलाचा मेसेज आला की त्यांना तू माझ्याशी बोलायचं आहे. माझ्या मनात दबलेली प्रेमाची भावना पून्हा जागी झाली. मी त्वरित त्याच्या मेसेजचं उत्तर दिलं.

फेसबुकवरती आमची खूपच चांगली मैत्री झाली. माझ्या रिकाम्या वेळात त्याच्याशी गप्पा मारू लागली.

हळूहळू लाज आणि संकोच गळून पडला. नंतर त्याने एके दिवशी मला एकटीला भेटण्यासाठी बोलावलं. मला त्याचा हेतू माहीत आहे, म्हणून हिम्मत होत नाहीए की एवढ मोठं पाऊल उचलू की नको. इकडे मनात दबलेल्या भावना मला हे पाऊल उचलण्यासाठी हट्ट करताहेत. सांगा मी काय करू?

हे खरं आहे की पहिलं प्रेम कोणी विसरू शकत नाही, परंतु जेव्हा आयुष्यात तुम्ही पुढे गेला असाल तर पुन्हा मागे वळून जाणं मूर्खापणा होईल. तसंही तुमच्या पतीबाबत तुमची कोणतीही तक्रार नाही आहे. अशा वेळी प्रियकरासोबत नातं जोडून उगाच अडचणी ओढून घेऊ नका.

त्या मुलाला स्पष्टपणे ताकीद द्या की तुम्ही केवळ त्याच्याशी हेल्दी फ्रेंडशिपच ठेवली आहे. ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील एक मरगळ दूर शांतता आणि प्रेरणा मिळते. परंतु शारिकरित्या तुम्ही या नात्यांमध्ये राहून तुमच्या वैवाहिक नात्यावरतीदेखील अन्याय कराल. म्हणून उशीर न करता मनात कोणतीही द्विधा न आणता तुमच्या प्रियकरांशी याबाबत बोलून तुमचा निर्णय सांगा.

नाती स्वार्थापेक्षा मनापासून जपा

* रितू वर्मा

बरखा जेव्हा लग्नानंतर तिच्या सासरी आली तेव्हा खूप आनंदी होती. तिला तिची ननंद श्रेयाच्या रूपात एक खूप चांगली मैत्रीण मिळाली होती. बरखाच्या या नवीन घरात फक्त श्रेया एक अशी होती जी तिची प्रत्येक गोष्ट ऐकत होती आणि आपल्या घरातल्यांच्या खाजगी गोष्टीदेखील बरखाला सांगत होती.

जेव्हा श्रेयाने बरखाला एका विवाहित पुरुष्याशी स्वत:चे संबंध असल्याबद्दल सांगितलं तेव्हा बरखाला तिला अडवायचं होतं, परंतु श्रेया म्हणाली, ‘‘वहिनी प्रेम तर प्रेम असतं, तुमचीदेखील लग्नापूर्वी कितीतरी प्रेम प्रकरणं होती याबद्दल मी कोणाला तरी बोलले का?’’

बरखा गप्प बसली. नंतर जेव्हा बरखाच्या कुटुंबीयांना श्रेयाच्या अफेअरबाबत बरखाला अगोदर माहिती होतं हे समजलं तेव्हा तिला सगळयांकडून खूप सुनावण्यात आलं.

अनुची आई सिंगल मदर आहे. ती घर बाहेर सर्वकाही सांभाळते आणि अनुच्या प्रत्येक गरजा पूर्ण करते. परंतु अनु जेव्हा स्वत:च्या मर्जीने काही करण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिच्या आईची बडबड सुरू होते, ‘‘मी एकटी कमावती आहे, पूर्ण आयुष्य तुझ्यासाठी स्वाहा केलंय, परंतु तरीदेखील तू मनमानी करू लागली आहेस.’’

‘‘मला आनंदी राहण्याचा वा स्वत:च्या मर्जीने काम करण्याचा कोणताही हक्क नाही आहे,’’ अनु आपल्या आईच्या या सवयीला कंटाळली आहे.

अनुच्या बोलण्यावरून असं वाटतं की आईने तिला सांभाळून तिच्यावर उपकारच केले आहेत.

प्रियाचे पती पंचाल जेव्हा मनात येतं तेव्हा प्रियाकडे दुर्लक्ष करतात आणि जेव्हा इच्छा होते तेव्हा प्रियाशी प्रेमाने बोलतात. प्रिया काही बोलली तर पंचाल एकच म्हणत असतात की, ‘‘प्रिया, माझं वर्कप्रेशर यासाठी जबाबदार आहे.’’

पंचाल स्वत:ला असं सादर करतात की अनेकदा प्रियाला स्वत:ला वाईट वाटतं.

जर सखोलपणे विचार केला तर अशी लोकं आपल्या घरकुटुंबात अगदी सहजपणे मिळतील. अशी लोकं प्रत्येक नातं स्वत:च्या मनाप्रमाणे साकारण्यात विश्वास ठेवतात. त्यांना समोरच्याच्या दु:खाशी, भावनांशी काहीच घेणं देणं नसतं. त्यांचं घेणं देणं असतं फक्त स्वत:शी. अशी लोकं नात्यांना अशा प्रकारे फोडणी देतात की हळूहळू ती पोकळ होतात.

‘‘मी सर्वकाही करतो वा करते.’’

‘‘माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणून तुम्ही माझ्यापासून दूर जाता.’’

‘‘लोकं मला फक्त कामासाठी जवळ करतात.’’

‘‘मी तर तुला माझं सर्वस्व मानतेय.’’

अशा प्रकारे कितीतरी गोष्टी आहेत ज्या तुम्ही अगोदरदेखील ऐकल्या असतील. त्यांना कशाप्रकारे जोडून तोडून स्वत:च्या फायद्यासाठी वापरतात हे लोकांना चांगलंच माहिती आहे.

तुम्हालाच बोलण्याची संधी देणं : तुमच्या आजूबाजूला जर कोणी असं जवळचं असेल तर नक्कीच सावध व्हा. मॅन्युपुलेटर अधिकाधिक तुम्हाला बोलण्याची संधी देतात कारण जेवढं तुम्ही बोलाल तेवढेच तुमच्या मनातील रहस्य खोलाल. ते तुमची प्रत्येक गोष्ट लक्षपूर्वक ऐकतात, तुम्हाला अशी खास जाणीव करून देतात की त्यांना तुम्ही आपले समजून तुमच्या आयुष्यातील काही खास गोष्टी शेअर करता. ज्या नंतर तुमच्यावर भारी पडू शकतात.

तुमच्या अगदी जवळचं असणं : अशा व्यक्ती तुमच्या जवळ येण्यासाठी काही त्यांच्या खास गोष्टीदेखील शेअर करू शकतात. ते तुम्हाला हा विश्वास देण्याचा प्रयत्न करत राहतात की ते तुमच्यावर किती विश्वास ठेवत आहेत. जर तुम्ही त्यांच्यापासून थोडं अंतर ठेवून रहात असाल तर ते असं वागतील की जसं काही तुम्ही त्यांच्यावर खूप अन्याय करत आहात. तुमच्या व्यतिरिक्त त्यांच्यासाठी कोणतीही व्यक्ती अधिक महत्त्वपूर्ण नाहीए.

विक्टीम कार्ड खेळणं : मॅनीपुलेटिव्ह लोकं अगोदर काही चुका करतात आणि जर तुम्ही त्यांना याबाबत जाब विचारला तर ती लोकं असं वागतात की जशी चूक त्यांनी नाही तुम्ही त्यांच्यासोबत केली आहे. त्यांच्याकडून जे काही झालं आहे ते अनाहूतपणे झालं आहे आणि परंतु तुम्हीच वारंवार प्रश्न करून त्यांना त्रास देत आहात आणि कमीपणा दाखवत आहात. शेवटी असं वाटू लागतं की तुम्ही चुकीचे आहात आणि तुम्हीच त्यांची माफी मागण्यासाठी गयावया करू लागता.

पॅसिव्हअग्रेशन : मॅन्युपुलेटिव्ह व्यक्तींची एक खास ओळख अशी असते की ते चुकूनही समोरून अटॅक करत नाहीत. जर तुमची एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही वा तुम्ही त्यांचं काही ऐकलं नाही तर ते निघून जातात आणि तुम्ही मनात आणूनदेखील त्यांच्याशी बोलू शकत नाही आणि हेदेखील जाणू शकत नाही की त्यांच्या डोक्यात काय चालू आहे. अशी लोकं एक वेगळाच पॉवर गेम खेळतात. या पॉवर गेममध्ये ते गप्प बसून स्वत:चा राग व्यक्त करतात. पॅसिव अग्रेशन नात्यांच्या गणितासाठी अधिक त्रासदायक असतं. हे गप्प बसणं एवढं तणावात्मक असतं की समोरची व्यक्ती स्वत:लाच दोषी समजून यांच्यासमोर      झुकते.

तुम्ही असे तर नव्हता : जर तुमचं एखादं काम त्यांच्या हिशेबानुसार तुम्ही केलं नाही वा त्यांची गोष्ट ऐकली नाही तर ते वारंवार तुम्हाला ही जाणीव करून देतात की तुम्ही किती बदलले आहात व बदलली आहे. ही गोष्ट वारंवार पुढे केली जाते की तुम्ही स्वत: त्यांच्यावर संशय घेऊ लागले आहात. तुम्हाला वाटू लागतं की नक्कीच तुमच्यामध्ये काहीतरी नकारात्मक बदल झाले आहेत, जे त्यांच्यासाठी त्रासदायक आहेत.

कटू गोष्टी मस्करीच्या गाळणीत टाकणं : हा मॅन्युपुले टीव्ह लोकांचा एक अनोखा गुण असतो की कटू आणि तिखट बोलून ते वर असं बोलतात की, ‘‘अरे मी तर मस्करी करत होतो वा करत होती. तुला खरं वाटलं तर मी काय करू?’’

समोरच्याच मन दुखावण्यात त्यांना एक असीम आनंद मिळतो. परंतु ते मन दुखावूनदेखील त्यातून सहजपणे बाहेर पडतात.

अशी लोकं मित्रमंडळी वा जोडीदाराच्या रूपात तुमच्या आजूबाजूला नक्कीच असतील. यासाठी गरज आहे त्यांच्या या गोष्टी व कृत्याने स्वत:ला दोषी समजू नका. तुम्ही तुमच्या जागी अगदी बरोबर आहात. त्यांच्या हिशोबाने स्वत:ला बदल बदलण्यासाठी त्यांना सांगा. नात्यांना तडजोडीने नाही तर समजूतदारपणे आणि प्रेमाने साकारलं जातं.

७ मजेदार सेक्स फँटसी

* वेणी शंकर पटेल ब्रज

निशांत आणि मंजुळाच्या लग्नाला २ वर्ष झाली आहेत. सकाळी नऊ वाजता ऑफिसला निघालेला निशांत जेव्हा संध्याकाळी सात वाजता घरी येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा अगदी सरळ स्पष्टपणे दिसून येतो.

दिवसभरापासून वाट पाहणारी त्याची बायको मंजुळा निशांतशी काहीही बोलायचा प्रयत्न करायची तेव्हा निशांतचा मूड मात्र गेलेला असायचा.

निशांतचा मूड खराब होण्यामुळे मंजुळादेखील त्याच्याशी कमी बोलायची. याचा परिणाम रात्री झोपतेवेळी बेडरूममध्येदेखील दिसून यायचा. थकव्यामुळे निशांत गाढ झोपी जायचा, तर मंजुळा मात्र कूस बदलत तडफडत राहायची.

लग्नानंतर प्रत्येक व्यक्तीच्या सेक्स लाईफमध्ये खूपच बदल होतो, जे अगदी सामान्य असतं. स्त्रिया अनेकदा घरच्या घरी कामे आटपून आपल्या पतीची वाट पाहत राहतात, परंतु पती जेव्हा घरी येतो तेव्हा त्यांचा मूड एकतर खराब झालेला असतो वा ते खूपच थकलेले असतात. अशावेळी आपल्याला वाटतं की पतीचं तुमच्या बाबतचं आकर्षण कमी होत चाललं आहे.

थकवा आणि ऑफिसच्या कामाच्या दबावामुळे जेव्हा ते सेक्समध्ये रुची दाखवत नाहीत तेव्हा नक्कीच तुमच्या संशयाची सुई दुसरीकडे फिरू लागते की पतीचं कोणासोबत लफडं तर नाही ना चालू आहे. अशा परिस्थितीत पती-पत्नीमध्ये प्रेमाची जागा तणाव घेऊ शकतो.

पतीचा खराब मूड व्यवस्थित करण्यासाठी आणि सेक्स लाईफ आनंदी बनविण्यासाठी जे उपाय कराल ते तुमच्या जोडीदारालादेखील सांगू शकता की आता तुम्ही मूडमध्ये आहात. शेवटी पुढाकार घेणं हे काही फक्त पुरुषाचं काम नाही आहे.

स्वत: पुढाकार घेऊन सेक्स करा

साधारणपणे सेक्ससाठी पुढाकार घेण्याबाबत स्त्रिया मागे राहतात. सेक्समध्ये पुढाकार पतीद्वारे केला जातो. कायम ही गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तुमच्या पतीसोबत बिछान्यावर असता तेव्हा त्यांना स्वत:कडे आकर्षित करण्यासाठी तुम्ही सेक्सची सुरुवात न संकोचता करा. यासाठी त्यांची वाट पाहू नका.

आपल्या पतीसोबत वेगळया अंदाजात अंतरंग होण्याचा प्रयत्न करा. जेव्हा सेक्सला स्वत:हून सुरुवात करता तेव्हा तुमचा शरीर तुमचं सर्वात मोठं हत्यार असायला हवं.

किस करायला संकोचू नका

तुमच्या भावना व्यक्त करण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे किस करणं. अशा वेळी जास्त विचार करण्याची काय गरज आहे, मॉर्निंग किसपासून स्वीट ड्रीमपर्यंत तुम्ही त्यांना विनाकारण किस करू शकता.

तुमचा हा अंदाज त्यांना खूप आवडेल. विश्वास ठेवा, असं केल्यामुळे तुम्हालादेखील काही दिवसातच रिप्लाय मिळायला सुरुवात होईल. पती घरात पाऊल ठेवताच तुमचा त्यांना किस करण्याचा हा अंदाज त्यांचा थकवा नक्कीच दूर करेल.

म्हणजे किस तुमच्या आयुष्यात सकारात्मक बनण्यासाठी मदत करतं. जेव्हा दोन लोकं लिपलॉक करतात, तेव्हा त्यांची जवळीक अधिक वाढते. म्हणून दृढ नात्यासाठी किस करणं खूप गरजेचं आहे.

त्यांच्यासोबत शॉवर घ्या

दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यामुळे थकलेले पती जेव्हा घरी परत येतील, तेव्हा त्यांच्यासोबत शॉवर घेऊन त्यांचा मूड बनवू शकता. हा पुढाकार तुमच्या पतीना खूपच उत्साहित आणि उत्तेजित करू शकतो.

एकत्रित शॉवर घेतल्यामुळे सेक्स करण्याची इच्छा अजूनही प्रबळ होते. तुम्ही यादरम्यान त्यांना किस करा. तुमच्या या अदेमुळे तुमच्या पतीचा मूड बदलून जाईल. तुमच्या जोडीदारासोबत पाणी आणि साबणाच्या बुडबुडयामध्ये मस्ती करा. एकमेकांना मिठया मारा आणि एकमेकांच्या शरीराला हलकासा मसाज करा. पाणी आणि बुडबुडयानंसोबत तुमचं ओलसर शरीर सेक्सकडे आकर्षित करेल. शॉवर घेऊन आंघोळ करतेवेळी सेक्स करणं एक सुखद अनुभव असेल.

सेक्सी मसाज करा

आपल्या पत्नीने एक छानसं मॉलिश करावं अशी प्रत्येक पतीचं एक स्वप्नं असतं. तर मग पतीला एक सुखदायक आणि समाधानकारक मालिश कराल तेव्हा निश्चितच त्यांना टर्न ऑन कराल आणि तुम्हा दोघांमध्ये शारीरिक संबंधासाठी मूड सेट होईल. तुमच्या जोडीदाराला खूश करण्यात आणि एकमेकांमध्ये हरवून जाण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे मसाज.

जेव्हादेखील तुमच्या पतीचा मूड थकलेला असेल व ते सेक्स करण्याच्या मुडमध्ये नसतील तेव्हा तुमच्या जवळ अजून एक योग्य पद्धत आहे. तुम्ही त्यांना सेक्सी बॉडी मसाज द्या. यासाठी तुम्ही सर्वप्रथम हलकसं म्युझिक लावून मान आणि पाठीचा मसाजसोबत तुमची बोटं त्यांच्या सेक्सी अंगावर स्पर्श केल्यामुळे तुम्हाला समजणार देखील नाही की केव्हा तुमच्या पतीचा मूड बदलला आहे. जेव्हादेखील मसाज कराल तेव्हा स्वत:ला सेक्सी ड्रेसमध्ये तयार करा. त्यांच्या कानात काहीतरी बोला. त्यांना यामुळे सेक्सची अनुभूती होईल.

कपडे घालण्याचा अंदाज बदला

पुरूषांना सर्वप्रथम स्त्रियांचे कपडे आकर्षित करतात. पतीदेखील तुमचे कपडे पाहून सेक्सच्या मूडमध्ये येऊ शकतो. तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं वापरा. ओपन कपडे वापरण्याचा प्रयत्न करा. काहीसा हलका मेकअपसोबत ट्रान्सपरंट कपडयांची निवड करा.

थोडासा मेकअप लावा आणि तुमच्या पतीसमोर स्वत:ला असं प्रस्तुत करा की त्यांची नजर तुमच्यावरच खिळून राहील. डिमांडिंग बना आणि त्यांना एक जोश भरा किस द्या. म्हणजे त्यांना जाणीव होईल की तुम्ही फक्त टर्न ओन करण्याच्या उद्देशाने तयार झाला आहात. तुमचं हे पाऊल १०० टक्के तुमच्या पतीचा मूड सेक्ससाठी बनवेल.

सांगा तुमच्या मनातल्या गोष्टी

अनेकदा जेव्हा आपण नर्वस होतो तेव्हा थोडी चेष्टा-मस्करी केली की नॉर्मल होतो. जर तुम्हीदेखील पुढाकार घेण्याबाबत नर्वस असाल तर चेष्टा-मस्करीत तुमच्या मनातलं सांगा. तसंदेखील अनेक जोडपी जेव्हा सेक्सच्या बहरात येतात तेव्हा टीन एजर्सप्रमाणे चेष्टा मस्करी करतात. तुम्ही त्यांच्यासोबत मस्ती करतांना फ्लर्ट करू शकता.

जोडीदाराच्या कंबरेला आपल्या दोन्ही हातांनी पकडून त्यांच्याकडून लिफ्ट करा. त्यांच्या कानामध्ये हळूच पुटपुटत काहीतरी म्हणा. त्यांच्या कानावर हलकासा चावा देखिल घेऊ शकता. असं करतेवेळी जोडीदाराला बेडरूमपर्यंत आणा. या दरम्यान तुमच्या शरीरावर कमीत कमी कपडे असतील तेवढ अजून छान होईल.

तुमचा जोश कायम ठेवा

लक्षात ठेवा माझा सेक्सचा मूड आहे फक्त हे बोलण्याने तुमचं काम होणार नाही. तुम्हाला अॅक्टिव राहावं लागेल. सेक्सच्या दरम्यानदेखील तुम्हाला त्यांच्या प्रत्येक गोष्टीत साथ द्यावी लागणार. स्वत:च्या हातांचा वापर करा आणि जोडीदाराला सांगा की तुम्हाला काय हवं आहे. जर तुम्ही स्वत:हून सेक्स करायचं मन बनवलं तर तुमचचा जोश कायम राहायला हवा.

जोश मध्ये राहा आणि त्याचा मोकळेपणाने दिखावादेखील करा. जेव्हा तुम्ही जोशात असाल तेव्हा तेदेखील त्यांचं होश हरवण्यास अधिक वेळ लावणार नाहीत. तुमचा उत्साह दाखविताना तुमच्या फँटसीबद्दल देखील त्यांना सांगा. ते तुमची आज्ञा पालन करण्यात जरादेखील मागेपुढे पाहणार नाहीत.

सेक्स फक्त एक उत्तम व्यायाम असण्याबरोबरच अनेक गंभीर आजारांपासूनदेखील बचाव करू शकतो. सेक्स आणि कामजीवन महत्त्वाचा भाग आहे.

नात्यात जेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात

* सुमन बाजपेयी

राधा आणि अनुजच्या लग्नाला २ वर्षे झाली. राधाला आपल्या नोकरीच्या निमित्ताने बऱ्याचदा बाहेर जावे लागते. वीकेंडला जेव्हा ती घरी असते, तेव्हा तिला काही वेळ एकटीने वाचन करायला किंवा मग आराम करायला आवडते किंवा घरातील बारीकसारीक कामे करण्यात तिचा वेळ जातो.

अनुजला आठवड्यातील ५ दिवस तिला मिस करत असतो. त्यामुळे त्याची अशी इच्छा असते की ते २ दिवस तरी तिने त्याच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवावा. दोघांनी एकत्र आउटिंग करावे, पण राधा ट्रॅव्हलिंग करून थकलेली असल्याने, बाहेर जाण्याच्या नावानेच संतापते.

अनुजला राधाचे हे वागणे हळूहळू खटकू लागले. त्याला असे वाटू लागले की राधा त्याला अव्हॉइड करत आहे. तिला कदाचित तो आवडत नसावा असे त्याला वाटू लागले होते आणि राधाला असे वाटत होते की अनुजला तिची आणि तिच्या इच्छांची मुळीच पर्वा नाही. तो फक्त आपल्या गरजा तिच्यावर लादत होता असे तिला वाटत होते. अशाप्रकारे आपल्या पद्धतीने जोडीदाराविषयी अनुमान काढल्याने त्या दोघांमध्ये गैरसमजाची भिंत उभी राहू लागली.

अनेक विवाह हे असे छोटे छोटे गैरसमज दूर न केल्यामुळे तुटतात. छोटासा गैरसमज खूप मोठा व्हायला वेळ लागत नाही. गैरसमज हा एखाद्या जहाजात झालेल्या छोटयाशा छिद्रासमान असतो. तो जर का वेळीच बुजवला गेला नाही तर नाते तुटायला वेळ लागत नाही.

भावना समजून न घेणे

गैरसमज हा एखाद्या काटयासारखा असतो आणि जेव्हा तो आपल्या नात्याला टोचू लागतो, तेव्हा कधी काळी फुलासारखे जपलेले नातेही जखमा करू लागते. जे युगुल कधीकाळी एकमेकांवर जीव ओवाळून टाकत होते, एकमेकांच्या बाहुपाशात ज्यांना सर्वस्व लाभत होते आणि जे आपल्या जोडीदाराच्या आनंदासाठी काहीही करण्यास तयार होते त्या नात्याला गैरसमजाचा सर्प जेव्हा दंश करतो, तेव्हा नात्यातील गोडवा आणि प्रेम यांना तिरस्कारात बदलण्यात वेळ लागत नाही.

साधारणपणे गैरसमज म्हणजे अशी स्थिती असते, ज्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे किंवा भावना समजून घेण्यास असमर्थ ठरते आणि जेव्हा हे गैरसमज वाढतात, तेव्हा मग भांडणे होऊ लागतात आणि याचा शेवट कधी कधी फार भयंकर असतो.

रिलेशनशिप एक्स्पर्ट अंजना गौड यांच्यानुसार, ‘‘साथीदाराला माझी पर्वा नाही किंवा तो फक्त स्वत:चाच विचार करतो अशा प्रकारचा गैरसमज युगुलांमध्ये निर्माण होणे ही खूप स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्या जोडीदाराच्या प्राथमिकता आणि विचारांना चुकीचे समजणे खूप सोपे असते.‘‘स्वत:च्या दृष्टीने जोडीदाराच्या वागण्याचा अर्थ काढणे किंवा आपले म्हणणे जोडीदाराच्या समोर मांडण्यात इगो आडवा येणे ही खरी समस्या आहे. ही गोष्ट हळूहळू मोठे रूप धारण करते आणि मग गैरसमजाचे कधी कडाक्याच्या भांडणात रूपांतर होते आपल्याला कळतच नाही.’’

कारणे काय आहेत

स्वार्थी असणे : पती आणि पत्नीचे नाते दृढ होण्यासाठी आणि एकमेकांवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी आवश्यक असते ते म्हणजे कोणतीही गोष्ट एकमेकांपासून न लपवणे आणि कायम एकमेकांना सांभाळून घेणे. जेव्हा तुमच्या जोडीदाराला तुमची गरज असते, तेव्हा तुम्ही त्याच्याजवळ असले पाहिजे. गैरसमज तेव्हा निर्माण होतो. जेव्हा तुम्ही आत्मकेंद्री असता. फक्त स्वत:चा विचार करता. त्यामुळे तुमच्या जोडीदाराने अविश्वास दाखवणे स्वाभाविकच ठरते.

माझी पर्वा नाही : पती किंवा पत्नी यापैकी कोणालाही असे वाटू शकते की आपल्या जोडीदाराला आपली पर्वा नाही आणि तो आपल्यावर प्रेमही करत नाही. पण वास्तव हे आहे की विवाह हा प्रेम आणि काळजी यांच्याआधारे टिकून असतो. जेव्हा जोडीदाराला आपण इग्नोर होत आहोत किंवा आपली गरज नाही असे वाटू लागते, तेव्हा गैरसमजाचे उंच बुरुज उभे राहतात.

जबाबदाऱ्या पार पाडण्यात कमी पडणे : जेव्हा जोडीदार आपल्या जबाबदाऱ्या निभावण्यात कमी पडतो किंवा घेत नाही तेव्हा गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशावेळी मनात असे प्रश्न उठणे स्वाभाविक असते की त्याचे आता आपल्यावर प्रेमच नाही का? त्याला माझी पर्वाच नाही का? तो जबरदस्ती तर माझ्यासोबत संसार करत नाही ना? असे गैरसमज नात्यांमध्ये येऊ नयेत म्हणून प्रत्येक युगुलाने आपापल्या जबाबदाऱ्या योग्य रीतीने पार पाडल्या पाहिजेत.

काम आणि कमिटमेंट : हल्ली स्त्रियांचे कार्यक्षेत्र घरापुरतेच मर्यादित राहिलेले नसून विस्तृत झाले आहे. आता त्या हाउसवाइफच्या कक्षेतून बाहेर आल्या आहेत त्यामुळे त्यांच्या पतिने त्यांच्या काम आणि कमिटमेंटची योग्य कदर करणे गरजेचे आहे. बदलणाऱ्या परिस्थितीत पत्नीस सर्वतोपरी सहकार्य करावे. नात्यात आलेला हा बदल स्वीकारणे हे पतिसाठी निश्चितच आव्हानात्मक आहे. कारण हीच गोष्ट आजच्या काळात गैरसमजाचे मोठे कारण ठरू पाहत आहे. त्यामुळे दोघानांही आपापल्या कमिटमेंट्स एकमेकांशी डिस्कस करून त्यानुसार स्वत:मध्ये बदल घडवून आणणे आवश्यक आहे.

धोका : हे सर्वात सामान्य कारण आहे. हा तेव्हा निर्माण होतो जेव्हा एका जोडीदाराला वाटू लागते की आपल्या पार्टनरचे दुसऱ्या कोणाशी तरी संबंध आहेत. आणि हे तो कोणत्याही ठोस पुराव्याच्या आधाराशिवायही मानू शकतो. असे ही होऊ शकते की ती गोष्ट खरीही असेल. पण ही गोष्ट जर योग्य रीतीने हाताळली गेली नाही तर लग्न मोडूही शकते. त्यामुळे जेव्हाही तुम्हाला असे वाटेल की तुमचा जोडीदार अस्वस्थ आहे आणि तुमच्याकडे संशयाने पाहत आहे तेव्हा त्वरित सतर्क व्हा.

दुसऱ्यांचा हस्तक्षेप : जेव्हा दुसरे लोक मग ते तुमचे कुटुंबातील सदस्य असोत की तुमच्या मित्रपरिवारापैकी किंवा नातेवाईक. जर ते तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू लागले तर गैरसमज निर्माण होऊ लागतात. अशा लोकांना दोघांमध्ये भांडणे लावून दिली की आनंद होतो. आणि त्यांचा स्वार्थ साधला जातो. पती आणि पत्नीचे नाते भले कितीही मधुर असो, त्यात किती का प्रेम असो, पण मतभिन्नता आणि भांडणे ही होतातच आणि हे अस्वाभाविकही नाही. असे झाल्यास कोणा तिसऱ्या व्यक्तिस आपल्या समस्या सांगण्यापेक्षा स्वत:च त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे तुम्हाला त्रास होत आहे.

सेक्सला प्राधान्य द्या : सेक्स संबंध हे वैवाहिक जीवनातील गैरसमजाचे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. पती पत्नी दोघांचीही इच्छा असते की सेक्स संबंध एन्जॉय करावेत. पण जेव्हा तुम्ही त्यात दुरावा निर्माण करता, आणि तो नात्याला कमकुवत करू लागतो. तुमचा साथीदार तुमच्यावर खुश नसेल किंवा तुमच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असेल तर यामुळे नात्यात खूप मोठा गैरसमज निर्माण होऊ शकतो.

ब्रेकअपपासून मुक्ती मिळविण्याचे ५ उपाय

* रितू वर्मा

जेव्हा अंशूला समजले की तिची भाची आरवीचे ५ वर्षं जुने नाते तुटले आहे, तेव्हा ती खूप घाबरली. आरवी आणि कबीरची जोडी किती छान होती. दोघेही मुंबईच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात एकत्र शिकत होते. दोन्ही कुटुंबांनी हे नाते स्वीकारले होते, फक्त सामाजिक मान्यता मिळणे बाकी होते. अंशु अतिशय दु:खी मनाने तिच्या बहिणीच्या घरी गेली तेव्हा तिने पाहिले की आरवी अगदी सामान्य दिसत होती आणि खदखदा हसत होती.

अंशूला मनाशी वाटले की आजकालच्या मुलांचे प्रेम पण काय प्रेम आहे. हवं तेव्हा नात्यात पडायचे आणि हवं तेव्हा ब्रेकअप करायचे. ही आजकालची नाती पण काय नाती आहेत? सर्व   केवळ शारीरिक पातळीवरच आधारित आहेत.

अंशूला तिचा तो काळ आठवला जेव्हा तिचे प्रवेशसोबतचे नाते तुटले होते. पूर्ण दोन वर्षे ती या गर्तेतून बाहेर पडू शकली नव्हती. तिने आपले नवीन नाते मोठया अवघडपणे स्वीकारले होते? कधी-कधी अंशूला वाटतं की आजपर्यंत ती आपल्या पतीला स्वीकारू शकली नाही. प्रवेशसोबतच्या त्या तुटलेल्या नात्याची सल अजूनही कायम आहे.

रात्री आरवीने अंशूला मिठी मारली आणि म्हणाली, ‘‘मावशी, तू आलीस हे खूप चांगले झाले. माझे संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी उभे आहे, म्हणूनच तर मी हा निर्णय घेऊ शकले.’’

पण अंशूला वाटले की खरंतर आरवीला कधीच कबीरशी प्रेम जडले नव्हते. पण आरवीच्या म्हणण्यानुसार गुदमरल्यासारखे जगण्याऐवजी जर तुमचे जमत नसेल तर ब्रेकअप करून आगेकूच का करू नये.

दुसरीकडे जेव्हा मानसीचे ऋषीसोबतचे २ वर्षे जुने नाते तुटले तेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली. आपल्या बरोबर तिने आपल्या संपूर्ण कुटुंबाचे जगणेही कठीण केले होते, कोणतेही नाते जबरदस्तीने टिकत नसते. जर तुमचा जोडीदार तुमच्याशी संबंध ठेवू इच्छित नसेल तर गयावया करण्याऐवजी जर तुम्ही सन्मानाने पुढे वाटचाल केलीत तर ते केवळ तुमच्या जोडीदारासाठीच नाही तर तुमच्यासाठीही चांगले होईल.

जर आपण वैयक्तिक जीवनात या छोटया-छोटया व्यावहारिक टिप्स अवलंबल्या तर खूप लवकर आपण परिपूर्ण जीवनाकडे वाटचाल करू शकता :

हुतात्मा भावनेने फिरू नका : ब्रेकअप झाला म्हणजे तुम्ही २४ तास मुळूमुळू रडक्या तोंडाने फिरत राहावे असे नव्हे. हा जीवनाचा शेवट नाही. आयुष्य तुम्हाला पुन्हा आनंद मिळवण्याची संधी देत आहे. तुमची ओळख ही तुमच्या स्वत:मुळे आहे. अनेकवेळा आपण नात्यांमध्येच आपले अस्तित्व शोधू लागतो. म्हणूनच आपल्याला कोणत्याही किंमतीत ब्रेकअप करायचे नसते. १-२ दिवस मूड खराब होणे स्वाभाविक आहे, परंतु त्या वाईट नातेसंबंधाच्या आठवणी च्युइंगमप्रमाणे दीर्घकाळ ओढत बसू नये.

हृदयाचे दरवाजे उघडे ठेवा : एका अपघाताचा अर्थ तुम्ही आयुष्य जगणे थांबवणे असा होत नाही. हृदयाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा. प्रत्येक रात्रीनंतर एक सकाळ नक्कीच असते. एखादा अनुभव वाईट असू शकतो, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आशेच्या किरणापासून तोंड फिरवावे.

कामात मन लावा : काम हे प्रत्येक आजारावरचे औषध असते, म्हणून स्वत:ला कामात बुडवून घ्या, अर्ध्याहून अधिक दु:ख तर असेच गायब होईल आणि जितके जास्त काम तुम्ही मन लावून कराल तितकी तुमची प्रतिभा अधिक सुधारेल आणि प्रगतीचे मार्ग उघडतील.

आशा सोडू नका : ब्रेकअप झाल्यानंतर लोक निराशेच्या गर्तेत गेल्याचे अनेकदा पाहायला मिळते. एका गुदमरणाऱ्या नात्यात सर्व आयुष्य निराशेत घालवण्यापेक्षा ब्रेकअप करून नव्याने सुरुवात करणे चांगले आहे, आशेचा पदर धरून ठेवा आणि ब्रेकअपनंतर नवीन सुरुवात करा.

आयुष्य सुंदर आहे : आयुष्य सुंदर आहे आणि ब्रेकअपमुळे त्याच्या सौंदर्याकडे दुर्लक्ष करू नका, तुमच्या ब्रेकअपमधून काहीतरी शिका आणि त्याच चुका पुन्हा करू नका.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर ब्रेकअप म्हणजे पूर्णविराम नव्हे, तर नात्याची नवी सुरुवात असते.

पती-पत्नीमधील प्रेम का कमी होत आहे?

* मिनी सिंग

प्रेमानंतर, प्रेमळ जोडपे अगदी सहज लग्न करतात, परंतु जेव्हा ते पूर्ण होते तेव्हा तेच नाते ओझे वाटू लागते. आजकाल अशा विवाहित जोडप्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे, ज्यांच्यामधील प्रेम कालांतराने कमी होऊ लागले आहे आणि परिणामी वर्षानुवर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ते एके दिवशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतात.

लग्नाचे बंधन हे एक अतिशय गुंतागुंतीचे मानवी नाते आहे आणि बहुतेक लोक फार कमी तयारीने या बंधनात अडकतात, कारण त्यांना वाटते की ते एकमेकांसाठी बनलेले आहेत. डॉ डीन एस. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आम्हाला काही प्रमाणात आमची क्षमता दाखवावी लागते, पण लग्नाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी फक्त सही पुरेशी असते, असे एडेल सांगतात.

जरी अनेक पती-पत्नी शेवटपर्यंत आनंदी जीवन जगतात, परंतु अनेक पती-पत्नीमध्ये तणाव असतो आणि त्याचे कारण म्हणजे एकमेकांकडून खूप अपेक्षा ठेवणे. लग्नाआधी पती-पत्नी एकमेकांकडून खूप अपेक्षा ठेवतात, पण आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी आवश्यक कौशल्ये त्यांच्याकडे नसतात. सुरुवातीला जेव्हा मुलं-मुली एकमेकांच्या जवळ येतात, तेव्हा त्यांना वाटतं की दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहेत आणि आपल्या जोडीदारासारखा जगात दुसरा कोणी नाही. त्यांना वाटतं, एकमेकांचा स्वभावही खूप सारखाच आहे, पण लग्नानंतर काही वर्षांनी त्यांच्या एकमेकांबद्दलच्या भावना कमी होऊ लागतात आणि असं झालं की मग वैवाहिक आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं.

काही लग्ने ठरलेल्या ठिकाणी पोहोचतात, पण काहींचा मृत्यू मध्येच होतो, का? चला जाणून घेऊया :

जास्त अपेक्षा : स्नेहा म्हणते की जेव्हा ती राहुलच्या प्रेमात पडली तेव्हा तिला वाटले की तो तिच्या स्वप्नांचा राजकुमार आहे. त्याच्यासारखा जगात दुसरा कोणी नाही आणि आता त्याच्या आयुष्यात फक्त रोमान्स असेल. दोघेही एकमेकांच्या मिठीत हात घालून हसत आयुष्य घालवतील. पण लग्नानंतर काही वर्षांनी स्नेहाला तिच्या स्वप्नातील राजकुमारात एक भूत दिसू लागला, कारण तो तिच्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करत नव्हता.

प्रेमकथेचे चित्रपट, रोमँटिक गाणी प्रेमाची अशी चित्रे मांडतात की प्रत्यक्षातही आपल्याला तेच दिसू लागते. पण ते सत्यापासून दूर आहे हे आपण विसरतो. लैलामजानु, हिरांजाचे प्रेम अजरामर झाले कारण त्यांना गाठ बांधता आली नाही, त्यांनी केले असते तर त्यांनी असेच काही सांगितले असते. लग्नाआधीच्या भेटीगाठींमध्ये मुला-मुलींना आपली सगळी स्वप्नं पूर्ण होतील असं वाटतं, पण लग्नानंतर आपण खरंच स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेलो होतो, असा निष्कर्ष त्या दोघांना येतो. अर्थात, पती-पत्नीने आयुष्यात एकमेकांकडून अपेक्षा ठेवणे चुकीचे नाही, पण इच्छा इतक्या ठेवू नका की समोरची व्यक्ती त्या पूर्ण करू शकत नाही.

परस्पर समन्वयाचा अभाव: विवाहित स्त्री म्हणते की प्रत्येक बाबतीत तिची आणि तिच्या पतीची मते पूर्णपणे भिन्न आहेत. एक पूर्व आणि दुसरा पश्चिम असा त्यांचा विचार कधीच आला नाही. एकही दिवस असा जात नाही की जेव्हा तिला तिच्या पतीशी लग्न करण्याच्या निर्णयाचा पश्चाताप होत नसेल.

लग्नानंतर काही दिवसांतच त्याला वाटू लागले की आपल्या जोडीदाराला त्याने जे वाटले होते ते अजिबात नाही. या प्रकरणी डॉ. नीना एस. फील्ड्स सांगतात की अनेकदा एखाद्या व्यक्तीचे गुण लग्नानंतर स्पष्टपणे दिसून येतात, ज्याकडे लग्नापूर्वी दुर्लक्ष केले जाते. याचा परिणाम असा होतो की लग्नानंतर काही वर्षांनी पती-पत्नी या निष्कर्षावर येऊ शकतात की ते एकमेकांशी जुळवून घेऊ शकत नाहीत. एकमेकांची मते न मिळाल्याने किती जोडपी लग्नाच्या बंधनात बांधली जातात कारण समाज आणि लोक काय म्हणतील आणि काहींना हे नाते टिकवायचे की तोडायचे हेच समजत नाही.

मारामारी : पती-पत्नीमध्ये भांडण होऊ नये, असे होऊ शकत नाही. पण जेव्हा संघर्ष मर्यादेपलीकडे वाढतो तेव्हा काय करावे? यावर डॉ. गोलमन लिहितात की, लग्नाचे बंधन घट्ट असेल तर पती-पत्नी एकमेकांची तक्रार करू शकतात असे वाटते, परंतु अनेकदा रागाच्या भरात तक्रार अशा प्रकारे केली जाते की त्यामुळे नुकसान होते. आणि यातूनच जोडीदाराच्या चारित्र्यावर चिखलफेक केली जाते, जी दुसऱ्याला अजिबात सहन होत नाही आणि भांडण वाढत जाते.

जेव्हा पती-पत्नी रागाच्या भरात बाहेर निघून जातात, तेव्हा त्यांचे घर रणांगण बनते आणि त्यांची मुले चिरडली जातात. वाद मिटवण्याऐवजी ते आपल्या आग्रहावर ठाम असतात. त्यांचे शब्द कधी शस्त्राचे रूप घेतात हे कळत नाही.

या संदर्भात तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, पती-पत्नी एकमेकांना अशा गोष्टी बोलतात की ज्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन धोक्यात येते, तेव्हा नियंत्रणाबाहेर जाणाऱ्या वादांमध्ये सर्वात जास्त नुकसान होते. त्यांनी असे बोलू नये.

यातून सुटका : लग्नाच्या काही वर्षानंतर, आपल्या वैवाहिक जीवनाला कंटाळलेल्या पत्नीने सांगितले की, ती आता त्याच्यासोबत राहणार नाही, कारण ती तिचे वैवाहिक जीवन वाचवताना कंटाळली आहे. काही उपयोग नसताना तिलाच माहीत, मग ती नाती जपण्याचा प्रयत्न का करतेय? आता तिला फक्त तिच्या मुलाची काळजी आहे.

असे म्हणतात की जेव्हा पती-पत्नी एकमेकांवर प्रेम करतात तेव्हा ते अपार प्रेम करतात. पण उदासीनता वाढली की ती वाढतच जाते. एकमेकांशी वैर ठेवा. पण काही पती-पत्नी नातं पुढे चालवतात कारण दुसरा पर्याय काय?

यावर नवरा म्हणतो की, विनाकारण लग्नाच्या बंधनात बांधले जाणे म्हणजे एखाद्या कामासारखे आहे जे करावेसे वाटत नाही, पण तरीही करावे लागेल. तुम्ही तुमच्याकडून खूप चांगले करण्याचा प्रयत्न करता, पण समोरच्या व्यक्तीला त्याची पर्वा नसते. त्याच वेळी, एका पत्नीने सांगितले की ती आता तिच्या वैवाहिक जीवनापासून निराश आहे. त्याने संबंध सुधारण्यासाठी खूप प्रयत्न केले, परंतु सर्व व्यर्थ.

निराशा, समन्वयाचा अभाव, मारामारी आणि उदासीनता ही काही कारणे आहेत ज्यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेमाचा अभाव असू शकतो. पण हे एकमेव कारण आहे की आणखी काही आहे?

लग्न मोडण्याची आणखी काही कारणे : पैसा हा पती-पत्नीमधील संवेदनशील मुद्दा आहे. दोघेही कमावत असताना पगार कसा खर्च करायचा आणि कुठे गुंतवणूक करायची, यावरून वाद होऊन भांडण सुरू होते. त्यामुळे हे टाळण्यासाठी पती-पत्नीने एकत्र बसून प्रत्येक महिन्याचे बजेट तयार केले पाहिजे आणि पैसा कुठे गुंतवायचा आहे, याचे भान एकमेकांना ठेवले पाहिजे.

जबाबदाऱ्या : असे दिसून आले आहे की 67% पती-पत्नी पहिले मूल येताच प्रेमात पडतात आणि पूर्वीच्या तुलनेत 8 पटीने भांडणे सुरू होतात. काही प्रमाणात याचे कारण म्हणजे दोघेही कामात इतके थकले आहेत की त्यांना स्वतःसाठीही वेळ मिळत नाही.

फसवणूक, झोका : यशस्वी वैवाहिक जीवनासाठी एकमेकांवरचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. एकमेकांवरील विश्वास कमी झाल्यामुळे पती-पत्नीचे नाते बिघडू शकते.

लैंगिक संबंध : दोघांमध्ये कितीही वितुष्ट आले तरी, जर लैंगिक संबंध योग्य असतील तर भांडण, विरोधही फार काळ टिकत नाही. पण जेव्हा तेच नातं त्यांच्यात टिकत नाही, तेव्हा नौबत घटस्फोटापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही.

हस्तक्षेप : पती-पत्नीच्या नात्यात ढवळाढवळ करणे, पती-पत्नीच्या नात्यात दुसर्‍याचा हस्तक्षेप किंवा लैंगिक संबंधात असमाधान, दुसर्‍याला आवडणे इत्यादी कारणांमुळे.

मुलांवर काय परिणाम होतो : तुमचे वैवाहिक जीवन कसे आहे, याचा मुलांवर स्पष्ट परिणाम होतो. डॉ. गोलमन यांनी जवळपास 20 वर्षे विवाहित जोडप्यांवर संशोधन केले. दोन 10 वर्षांच्या अभ्यासात, त्यांनी असे निरिक्षण केले की दुखी पालकांच्या मुलांचे हृदय धडधडत असताना ते जलद गतीने होते आणि त्यांना शांत होण्यास जास्त वेळ लागतो. पालकांमुळे मुले अभ्यासात चांगले गुण मिळवू शकत नाहीत, तर मुले अभ्यासात हुशार असतात. दुसरीकडे, ज्या पती-पत्नीमध्ये योग्य समन्वय असतो, त्यांची मुले अभ्यासाबरोबरच सामाजिक कार्यातही चांगली असतात.

पती-पत्नीच्या नात्यात दुरावा येऊ नये, नाते तुटू नये, वैवाहिक जीवन आनंदी असावे, वैवाहिक जीवनात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी पती-पत्नीने आपापसातील समस्या स्वतः सोडवणे आवश्यक आहे. कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात ढवळाढवळ करू देऊ नका.

लैंगिक शिक्षण नाही लाजिरवाणी गोष्ट

– शैलेंद्र सिंह

गाव असो किंवा शहर, तेथील मुला-मुलींना सेक्स म्हणजे लैंगिक संबंधासंदर्भातील शिक्षणाबाबत फारच कमी माहिती असते. शिवाय जी काही माहिती असते ती खूपच वरवरची असते. यामागचे कारण म्हणजे अभ्यासाऐवजी सोशल मीडियातून ही माहिती त्यांना मिळते आणि ती दिशाभूल करणारी असते. सोशल मीडियाव्यतिरिक्त पॉर्न फिल्ममधून ही माहिती मिळते. ती चुकीची असते. अनेकदा मुलींना न समजल्यामुळे त्या गरोदर राहतात.

केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही लैंगिक संबंधांबाबत पूर्ण माहिती नसते. स्त्री रोगांबाबत माहिती असलेल्या डॉक्टर रमा श्रीवास्तव यांनी सांगितले की, ‘‘आपल्याकडे अशा अनेक घटना घडतात जिथे मुलींना हे माहितीही नसते की त्यांच्यासोबत काय घडले. म्हणूनच किशोर वयातच त्यांना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे. घरात आई आणि शाळेत शिक्षक असे दोघे मिळून हे काम सहजतेने करू शकतात. पण आई आणि शिक्षकांना हे माहीत हवे की, मुलांना किती आणि कोणते लैंगिक शिक्षण द्यायला हवे. त्यासाठी आईने स्वत:ही याबाबत व्यवस्थित माहिती करून घ्यायला हवी.’’

गर्भनिरोधकाची माहिती असायला हवी

डॉक्टर रमा श्रीवास्तव यांच्या मते, आजकाल ज्या प्रकारच्या घटना समोर येत आहेत त्या पाहून असे लक्षात येते की, अल्पवयीन मुलींचे शारीरिक शोषण त्यांचे नातेवाईक किंवा जिवलग मित्राद्वारे केले जाते. म्हणूनच मुलीला तिच्या १० ते १२ वर्षांच्या वयादरम्यान लैंगिक किंवा शारीरिक संबंध म्हणजे काय, हे सांगून ते फसवणूक करून कसे ठेवले जाते, याची माहिती देणे गरजेचे आहे. मुलींना हे सांगायला हवे की, त्यांनी कोणासोबतच एकटीने एकांतात जाऊ नये. शिवाय अशा प्रकारची घटना घडलीच तरी आईला येऊन सांगावी, जेणेकरून आई मदत करू शकेल, असेही आईने आपल्या मुलींना विश्वासात घेऊन सांगायला हवे.

याच प्रकारे शाळेतील शिक्षिकांनीही गर्भनिरोधक गोळया म्हणजे काय? त्याचा वापर कशासाठी केला जातो, याची माहिती मुलींना द्यायला हवी. अनेक मुली बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर आई बनतात किंवा आत्महत्या करतात. अशा मुलींना याची माहिती द्यायला हवी की, आता अशा प्रकारची गोळीही येते जी खाल्ल्यामुळे नको असलेल्या गर्भापासून सुटका मिळते. ‘मॉर्निंग आफ्टर पिल्स’ नावाने या गोळया मेडिकलच्या दुकानात मिळतात.

रुग्णालयात मिळवा मोफत सल्ला

डॉक्टर रमा श्रीवास्तव यांचे असे म्हणणे आहे की, खासगी रुग्णालयात महिला डॉक्टरांनी एखाद्या दिवसातील काही तास किशोरवयीन मुलींच्या समस्या मोफत सोडवण्यासाठी राखून ठेवायला हवेत. कुटुंब नियोजनाबाबत माहिती द्यायला हवी. शाळेनेही वेळोवेळी डॉक्टरांना सोबत घेऊन यावर चर्चा करायला हवी, जेणेकरून विद्यार्थी आणि शिक्षकांनाही योग्य माहिती मिळेल.

किशोरवयीन मुलींची सर्वात मोठी समस्या मासिक पाळीबाबत असते. सर्वसाधारणपणे वयाच्या १२ ते १५ वर्षांदरम्यान मासिक पाळी येते. या वयात मासिक पाळी न आल्यास डॉक्टरांकडे जाऊन असे का झाले, हे समजून घ्यायला हवे. मासिक पाळी उशिरा येण्यामागे कुटुंबाचा पूर्वेतिहास कारणीभूत ठरतो. जसे की, आई, बहिणीला पाळी उशिराने आली असेल तर तिलाही ती उशिराने येऊ शकते. याशिवाय काही आजारांमुळेही पाळी उशिराने येऊ शकते. या आजारांमध्ये गर्भाशय नसणे, ते छोटे असणे, अंडाशयातील उणीव, याशिवाय क्षय रोग आणि अॅनिमियामुळेही पाळी येण्यास उशीर होतो. पण नेमके कारण काय, हे डॉक्टरांकडे गेल्यानंतरच समजते.

मासिकपाळीवेळी घ्या विशेष काळजी

मासिकपाळीवेळी इतर समस्याही निर्माण होतात. कधीकधी ती वेळेवर येते, पण त्यानंतर १-२ महिने येत नाही. सुरुवातीला असे होणे स्वाभाविक असते, पण त्यानंतर असे वरचेवर होत असेल तर मात्र डॉक्टरांकडे जायला हवे. कधीकधी मासिक पाळी वेळेत येते, पण रक्तस्त्राव जास्त होतो. याकडे दुर्लक्ष केल्यास मुलीमधील हिमोग्लोबिन कमी होते आणि तिचा पुरेसा विकासही होत नाही.

अस्वस्थ करणारी गोष्ट अशी की, काही पालक आपल्या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जायला घाबरतात. त्यांना असे वाटते की, अविवाहित मुलीची चाचणी केल्यामुळे तिच्या खासगी अंगाचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे लग्नानंतर पती तिच्यावर संशय घेऊ शकतो. अशा लोकांना हे माहीत असायला हवे की, आता घाबरण्याची गरज नाही. अल्ट्रासाऊंड आणि तत्सम दुसऱ्या पद्धतीनेही कुठलेही नुकसान न होता चाचणी करता येऊ शकते.

जेव्हा बिघडू लागते मुलांचे वागणे

* पद्मजा अग्रवाल

चंदिगडच्या एका शाळेत नशा करून आलेल्या एका विद्यार्थ्याला टीचर रागावले म्हणून त्याने टीचरला मारून मारून रक्तबंबाळ केले. परीक्षेत नापास झाल्यावर मुख्याध्यापक रागावले म्हणून विद्यार्थ्याने त्यांच्यावर ४ गोळया चालवल्या.

प्ले स्कूलच्या मुख्याध्यापक स्वाती गुप्ता यांचे म्हणणे आहे, ‘‘आजकाल एकल कुटुंबामुळे व महिला नोकरी करत असल्याने परिस्थिती बदलली आहे. दोन अडीच वर्षांची मुलं सकाळी सकाळी नटूनथटून, बॅग आणि बाटलीचे ओझे घेऊन शाळेत येतात. अनेक मुलं ट्युशनलासुद्धा जातात. कित्येकदा स्त्रियांना मी बोलताना ऐकते की काय करणार घरात खूपच त्रास देतो. शाळेत गेला की ४-५ तासांचा निवांत वेळ मिळतो.’’

गुरुग्राममधील रेयॉन शाळेतील प्रद्यूम्न हत्याकांड असो किंवा इतर कोणत्या घटना असो, जनमानसाला क्षणभरासाठीच विचलित करतात. म्हणजे पहिले पाढे पंच्चावन्नच.

अलाहाबाद विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख दीपा पुनेठा यांच्या मते, ‘‘पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत नको तेवढे सतर्क राहू लागले आहेत. मूल जन्माला येताच ते ठरवतात की त्यांचा मुलगा डॉक्टर बनेल की इंजिनिअर. त्यांना आपल्या मुलाविरुद्ध एकही शब्द ऐकायला आवडत नाही.

चेन्नईतील एका विद्यार्थिनीने शिक्षिकेने मारले म्हणून आत्महत्या केली. दिल्लीतील एका विद्यार्थिनीने टिचरने डस्टर फेकून मारले म्हणून एक डोळा गमावला, अशाप्रकारच्या बातम्या नेहमीच वर्तमानपत्रांमधून चर्चेत असतात.

जितक्या सुविधा तितकी फीज

अलीकडे शिक्षण संस्था या पैसा कमावण्याचे स्रोत झाल्या आहेत. जणू काही बिझिनेस सेन्टर्सच आहेत. जितक्या जास्त सुविधा तेवढी जास्त फीज. सगळयाच पालकांना वाटते की आपल्या मुलाला उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी ते शक्य तेवढे प्रयत्नसुद्धा करतात, तरीही अधिकांश पालक ना त्यांच्या मुलांच्या प्रगतीवर खुश असतात ना त्यांच्या वर्तनावर. यासाठी मोठया प्रमाणावर पालक स्वत:च जबाबदार असतात, कारण त्यांच्या स्वत:च्या हे लक्षात येत नाही की ते त्यांच्या मुलांशी कोणत्या वेळी कसे वागतात.

मुलं अभ्यास करण्याची टाळाटाळ करतात, तेव्हा आई कधीकधी थापड मारते, कधी रागावते तर कधी धमकी देते. पण कधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही की शेवटी मूलाला अभ्यास का करायचा नाही. शक्यता आहे की त्याला त्याच्या टीचर आवडत नसतील, त्याची आयक्यू लेव्हल कमी असेल किंवा त्याला त्यावेळी अभ्यास करायची इच्छा नसेल.

मुंबईतील एका आंतरराष्ट्रीय शाळेतील शिक्षिका आपले दु:ख व्यक्त करताना म्हणाली की अलीकडे शिक्षकांवर मॅनेजमेंटचा दबाव, मुलांचा दबाव, पालकांचा दबाव खूप असतो. समजा एखाद्या मुलाचा गृहपाठ झाला नसेल तर २-३ वेळा सांगितले जाते किंवा चांगल्याप्रकारे बोलायला सांगितले तरी मुलं घरी जाऊन तिखट मीठ लावून सांगतात म्हणून आम्ही आजकाल विषय शिकवून आपले काम संपवतो.

पालकांचा दबाव

आता शाळा असो वा पालक, सगळयांना मुलांच्या टक्केवारीतच रस आहे. शाळांना आपली निकालाची काळजी आहे तर पालकांना आपल्या मुलाला सर्वात पुढे ठेवण्याची चिंता आहे. मुलांवर आवश्यकतेपेक्षा जास्त दबाव टाकला जात आहे. पालक आणि शाळा दोघेही मुलाच्या त्या क्षमतांकडून अतीअपेक्षा बाळगतात. मुलांवर एवढा दबाव व ओझे वाढते की तो या ओझ्याखाली दबून सगळया अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो किंवा बंड पुकारून आपल्या मानासारखे वागू लागतो.

अलाहाबादमधील एका सुप्रसिद्ध शाळेतील रुची गुप्ता सांगते की पालकांच्या नको तेवढया हस्तक्षेपामुळे मुलांना अभ्यास करणे अतिशय कठीण होऊन बसले आहे. मुलांना अभ्यास करायचा नसतो आणि जर त्यांच्यावर जबरदस्ती केली तर राईचा पर्वत करतात. सगळे खापर शिक्षकांच्या डोक्यावर फोडले जाते. जेव्हा मॅनेजमेंट नाराज असते, तेव्हा बळीचा बकरा शिक्षकांनाच बनवले जाते.

पैशाचा माज

आजकाल मुलं पालकांच्या जीवावरच शाळेत शिक्षकांना कस्पटासमान लेखतात. वर्गात शिक्षकांची थट्टा उडवणे व उगाच मुर्खासारखे प्रश्न विचारत राहणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. आजकाल पालक शाळा व टिचरमधले दुर्गुण मुलांसमोरच बोलतात. अनेकदा पालक मुलांसमोरच म्हणतात की या टिचरची तक्रार मॅनेजमेंटकडे करू. लगेच त्यांना काढून टाकू. असे बोलणे ऐकल्यावर शिक्षकांबाबत मुलांच्या मनात आदर सन्मान कसा राहील?

टिचरचे कर्तव्य

पालक मंजू जायस्वाल आपले दु:ख व्यक्त करत म्हणाल्या की कोणतेच शिक्षक आपली चूक कबूल करायला तयार नसतात. जर घटना गंभीर होऊन वरपर्यंत गेली तर ते मुलाला क्षणोक्षणी अपमानित करतात. त्यामुळे मुलं घरी काही सांगत नाहीत. अशाप्रकारच्या तक्रारी अनेक पालकांनी केल्या की पालकसभेत शिक्षक केवळ आपलेच म्हणणे पुढे करतात आणि तेही मुलांच्या तक्रारी. आपल्या व्यस्त जीवनशैलीमुळे आईवडील मुलांना वेळ देऊ शकत नाहीत. ते पैशाच्या बळावर क्रश वा नोकराच्या भरवशावर वाढतात. त्यामुळे त्यांच्या मनात संस्काराऐवजी आक्रोश असतो. पालकांना हे सांगण्यात अभिमान वाटतो की त्यांचा मुलगा त्यांचे ऐकत नाही. मोबाईल व टीव्हीला चिकटलेला असतो. तरीही ते शिक्षकांकडून अशी अपेक्षा करतात की त्यांनी ही सवय सोडवावी. जर मूल जास्तीतजास्त वेळ तुमच्याजवळ असते.

शिवाय जे विद्यार्थी अभ्यासात कमकुव असतात, त्यांची इतकी उपेक्षा केली जाते की ते घुसमटत राहतात व अभ्यासातून त्यांचे मन उडते. अशावेळी सर्व मुलांकडे लक्ष देणे हे शिक्षकांचे कर्तव्य असते. त्यांच्यातील प्रतिभा शोधून व त्यांच्या गरजांकडे लक्ष देऊन त्यांनी मुलांना पुढे जाण्यासाठी प्रेरित केले पाहिजे.

प्रेमाने सांभाळा नातेसंबंध

* गरिमा पंकज

भारतात घटस्फोटाची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. १० वर्षांपूर्वी एक हजार लोकांमध्ये एक व्यक्ती घटस्फोट घेत होती, तिथे आता ती संख्या हजारावर १३पेक्षा जास्त झाली आहे. घटस्फोटांसाठी अर्ज पहिल्यापेक्षा दुप्पट संख्येने दाखल होत आहेत. विशेषत: मुंबई, बंगळुरू, कोलकाता, लखनौसारख्या मोठया शहरात हा ट्रेंड जास्त पाहायला मिळत आहे. या शहरांमध्ये केवळ पाच वर्षांत घटस्फोटाचे अर्ज फाइल करण्याच्या प्रकरणांत तिप्पटीने वाढ नोंदविण्यात आली.

२०१४मध्ये घटस्फोटाच्या ११,६६७ केस फाइल करण्यात आल्या. याउलट २०१०मध्ये ही संख्या ५,२४८ होती. अशा प्रकारे २०१४मध्ये लखनौ आणि दिल्लीमध्ये क्रमश: ८,३४७ आणि २,००० केसेस फाइल करण्यात आल्या. याउलट २०१० मध्ये ही संख्या क्रमश: २,३८८ आणि ९०० होती.

घटस्फोटांच्या प्रकरणांची वाढणारी संख्या आणि दाम्पत्यांमध्ये वाढत्या मतभेदाचे कारण काय आहे, नाते का टिकत नाहीत, अशी काय कारणे आहेत, जी नात्यांचे आयुष्य संपवितात?

या संदर्भात अमेरिकेचे मानसशास्त्रज्ञ आणि विवाह तज्ज्ञ जॉन गॉटमॅनने ४० वर्षांचा अभ्यास आणि अनुभवांच्या आधारावर निष्कर्ष काढलाय की मुख्य रूपाने अशी चार कारणे आहेत, ज्यामुळे दाम्पत्यामध्ये संवादहिनतेची स्थिती निर्माण होऊ लागते. या स्थितीच्या चार वर्षांत त्यांचा घटस्फोट होतो.

टीकात्मक वागणे : तसे तर कधी ना कधी सर्वच एकमेकांवर टीका करतात. अर्थात, पतिपत्नीमध्ये ही सामान्य गोष्ट आहे. मात्र समस्या तेव्हा निर्माण होते, जेव्हा टीका करण्याची पद्धत एवढी वाईट असते की समोरच्याच्या मनालाच जखमा होतात. कोणत्याही परिस्थितीत एकजण दुसऱ्याला चुकीचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावर आरोपांवर आरोप केले जातात. अशा वेळी पतिपत्नी एकमेकांपासून एवढे दूर निघून जातात की तिथून परतणे शक्य नसते.

घृणा : जेव्हा आपल्या मनात जोडीदाराबाबत घृणा आणि तिरस्काराच्या भावना निर्माण होऊ लागतात, तेव्हा समजून जा की हे नाते जास्त दिवस टिकणार नाही. घृणा व्यक्त करताना टोमणे मारणे, नक्कल करणे, एकेरी बोलणे यासारख्या अनेक गोष्टी सामील असतात. ज्यामुळे समोरच्याला महत्त्वहिन वाटते. अशा प्रकारचे वागणे नात्याच्या मुळावरच घाव घालते.

स्वत:चा बचाव करणे : जोडीदारावर आरोप करून स्वत:चा बचाव करणारे वागणे नात्याला शेवटाकडे नेते. पतिपत्नीकडून अपेक्षा केली जाते की त्यांनी प्रत्येक परिस्थितीत एकमेकाला साथ द्यावी. मात्र ते एकमेकांच्याच विरोधात उभे राहात असतील, तर त्यांचे नाते कोणीही वाचवू शकत नाही.

संवादहीनता : जेव्हा व्यक्ती आपल्या जोडीदारा प्रति उदासीनता दाखवू लागतो, संवाद संपुष्टात आणतो आणि त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागतो, तेव्हा दोघांमध्ये निर्माण झालेली ही दरी नात्यातील उरलेसुरले आयुष्यही संपवून टाकते.

आणखीही काही कारणे

क्वालिटी टाइम : इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज, बंगळुरूद्वारे केल्या गेलेल्या रिसर्चनुसार, पतिपत्नीतील दुराव्याचे मुख्य कारण म्हणजे, ड्युअल कॅरिअर कपल (पतिपत्नी दोघेही नोकरदार असणे)ची वाढती संख्या. या अभ्यासामध्ये एक खास गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे, ५३ टक्के महिला आपल्या पतीशी भांडतात, कारण त्यांचे पती त्यांना क्वालिटी टाइम देत नाहीत, तसेच ३१.७ टक्के पुरुषांना आपल्या नोकरदार पत्नीविषयी तक्रार असते की त्यांच्याकडे कुटुंबासाठी वेळ नसतो.

सोशल मिडिया : नुकतेच अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासात आढळून आले की, सोशल मिडियामध्ये जास्त वेळ घालविण्याच्या प्रवृत्ती व घटस्फोटांची टक्केवारी यात परस्पर संबंध आहे.

व्यक्ती जेवढी जास्त सोशल मिडियामध्ये अॅक्टिव्ह असते, तेवढी संसार मोडण्याची भीती जास्त असते.

त्याची मुख्यत: दोन कारणे असतात. पहिले म्हणजे, सोशल मिडियामध्ये जास्त वेळ घालविणारी व्यक्ती आपल्या पत्नीला जास्त वेळ देत नाही. तो संपूर्ण वेळ नवीन मित्र बनविण्यात व लाइक व कमेंट्स मिळविण्यात बिझी असतो. दुसरे म्हणजे, अशा व्यक्तींचे विवाहबाह्य संबंध निर्माण होण्याची शक्यता वाढते. सोशल मिडियावर फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट करणे आणि मैत्री पुढे चालू ठेवणे खूप सोपे असते.

धर्माचा नात्यावर होणारा परिणाम

सामान्यपणे नात्यांमध्ये कधी कडू-गोड क्षण येतच राहतात. पण याचा अर्थ हा नव्हे की आपण आपल्या चुकांकडे दुर्लक्ष कराल आणि मग मार्ग काढण्यासाठी बुवा-बाबांकडे धाव घ्याल. बुवा-बाबा पतिपत्नीच्या नात्याला ७ जन्माच्या बंधनात बांधतात. नाते वाचविण्यासाठी ते नेहमी स्त्रीलाच सल्ले देतात की, तिने दबून राहावे, कशालाही उत्तर देऊ नये.

खरे तर अशा धर्मगुरूंची इच्छा असते की व्यक्ती ७ जन्माच्या फेऱ्यात अडकून राहावा आणि गृहक्लेशापासून मुक्ती मिळविण्यासाठी तो वेगवेगळया प्रकारचे धार्मिक यज्ञ व पूजाअर्चनेमध्ये पाण्यासारखा पैसा त्याने खर्च करत राहावा.

स्त्रिया जास्त भावुक असतात. जप-तप व दान-पुण्यावर विश्वास ठेवतात. याचाच फायदा उठवून धर्मगुरू त्यांच्याकडून हे सर्व करवून घेतात, जेणेकरून त्यांना दानाचा फायदा मिळत राहील.

नुकताच एक संसार यासाठी मोडला, कारण गृहक्लेशापासून वाचण्यासाठी एक स्त्री तांत्रिकाकडे गेली.

गेल्या २५ मे ला दिल्लीच्या पालम भागात एका मुलाने आपल्या आईची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या केली. ६३ वर्षांची आई म्हणजेच प्रेमलता आपल्या मुलगा आणि सुनेसोबत राहात होती. प्रत्येक छोटया-मोठया समस्येसाठी ती तांत्रिक आणि ज्योतिषाकडे जात असे. घरात रोज-रोज होणाऱ्या भांडणांच्या कचाटयातून सुटण्यासाठी ती तांत्रिकाकडे गेली आणि मग त्याने सांगितलेले उपाय घरी येऊन आजमावू लागली. हे सर्व पाहून सुनेला वाटले की ती जादूटोणा करतेय. त्यामुळे तिने ही गोष्ट पतीला सांगितली. मग त्या गोष्टीवरून घरात खूप भांडण झाले आणि मुलाने भाजी कापायच्या चाकूने आईवर हल्ला केला.

नाते मजबूत बनवा

नाते जोडणे खूप सोपे असते, पण ते निभावणे खूप कठीण असते. जॉन गॉटमॅनच्या मतानुसार, नाते मजबूत बनविण्यासाठी दाम्पत्यांनी या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

लव्ह मॅपचा फंडा : लव्ह मॅप मानवाच्या मेंदूतील तो भाग आहे, जिथे व्यक्ती आपल्या जोडीदाराशी संबंधित प्रत्येक प्रकारच्या सूचना उदा. त्याच्या समस्या, अपेक्षा, स्वप्नांसह इतर महत्त्वपूर्ण तथ्य आणि भावनांना जमा करून ठेवते. गॉटमॅनच्या मतानुसार, दाम्पत्य लव्ह मॅपचा उपयोग एकमेकांप्रती समंजसपणा, जिव्हाळा आणि प्रेम प्रदर्शित करण्यात करू शकतात.

नेहमी साथ द्या : जीवनसाथीच्या जीवनाशी संबंधित प्रत्येत लहान-मोठया प्रसंगी त्याच्यासोबत उभे राहा. संपूर्ण उत्साह आणि प्रेमाने त्यांच्या प्रत्येक सुखदु:खाचे भागीदार बना.

महत्त्व स्विकारा : कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना किंवा कोणतेही महत्त्वपूर्ण काम करताना जोडीदाराला विसरू नका. त्याची परवानगी अवश्य घ्या.

तणाव दूर करा : पतिपत्नीमधील तणाव दीर्घकाळ राहू देऊ नये. जोडीदार आपल्या एखाद्या गोष्टीने दुखावला गेला असेल, तर गोड शब्दांचा लेप जरूर लावा. एकमेकांसोबत सामंजस्याने वागा. तडजोड करायला शिका.

दुरावा वाढू देऊ नका : अनेक वेळा पतिपत्नीमधील विवाद एवढा टोकाला जातो की त्यांचे जवळ येण्याचे सर्व मार्ग खुंटतात. जोडीदारामध्ये एकटेपणाची भावना येते. दोघेही याबाबत एकमेकांशी बोलतात, पण काही सकारात्मक उपाय काढू शकत नाहीत. प्रत्येक भांडणानंतर ते जास्तच तणावात येतात.

गॉटमॅन सांगतात की कधी अशी वेळ येऊ देऊ नका. पतिपत्नीचे भांडण यामुळे विकोपाला जाते, कारण त्यांच्या बोलण्यात माधुर्य, उत्साह आणि जिव्हाळयाची कमतरता असते. त्यांना तडजोड करायची नसते. यामुळेच ते भावनात्मक दृष्टीने एकमेकांपासून दूर निघून जातात. हा दुरावा कितीही वाढो, परंतु दाम्पत्याने हे जरूर जाणून घेतले पाहिजे की भांडणाचे मूळ काय आहे आणि ते कसे दूर करता येईल.

जोडादाराला सुखद अनुभूती द्या : पतिपत्नीने या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की त्याच्या जोडीदाराला काय आवडते, तो कोणत्या गोष्टीने खूश होतो. वेळोवेळी जीवनसाथीसोबत घालविलेल्या आनंदांच्या क्षणांना उजाळा द्या. जेणेकरून तेच प्रेम तुम्ही पुन्हा अनुभवाल.

अनलिमिटेड कहानियां-आर्टिकल पढ़ने के लिएसब्सक्राइब करें