* पद्मजा अग्रवाल
चंदिगडच्या एका शाळेत नशा करून आलेल्या एका विद्यार्थ्याला टीचर रागावले म्हणून त्याने टीचरला मारून मारून रक्तबंबाळ केले. परीक्षेत नापास झाल्यावर मुख्याध्यापक रागावले म्हणून विद्यार्थ्याने त्यांच्यावर ४ गोळया चालवल्या.
प्ले स्कूलच्या मुख्याध्यापक स्वाती गुप्ता यांचे म्हणणे आहे, ‘‘आजकाल एकल कुटुंबामुळे व महिला नोकरी करत असल्याने परिस्थिती बदलली आहे. दोन अडीच वर्षांची मुलं सकाळी सकाळी नटूनथटून, बॅग आणि बाटलीचे ओझे घेऊन शाळेत येतात. अनेक मुलं ट्युशनलासुद्धा जातात. कित्येकदा स्त्रियांना मी बोलताना ऐकते की काय करणार घरात खूपच त्रास देतो. शाळेत गेला की ४-५ तासांचा निवांत वेळ मिळतो.’’
गुरुग्राममधील रेयॉन शाळेतील प्रद्यूम्न हत्याकांड असो किंवा इतर कोणत्या घटना असो, जनमानसाला क्षणभरासाठीच विचलित करतात. म्हणजे पहिले पाढे पंच्चावन्नच.
अलाहाबाद विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाच्या प्रमुख दीपा पुनेठा यांच्या मते, ‘‘पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत नको तेवढे सतर्क राहू लागले आहेत. मूल जन्माला येताच ते ठरवतात की त्यांचा मुलगा डॉक्टर बनेल की इंजिनिअर. त्यांना आपल्या मुलाविरुद्ध एकही शब्द ऐकायला आवडत नाही.
चेन्नईतील एका विद्यार्थिनीने शिक्षिकेने मारले म्हणून आत्महत्या केली. दिल्लीतील एका विद्यार्थिनीने टिचरने डस्टर फेकून मारले म्हणून एक डोळा गमावला, अशाप्रकारच्या बातम्या नेहमीच वर्तमानपत्रांमधून चर्चेत असतात.
जितक्या सुविधा तितकी फीज
अलीकडे शिक्षण संस्था या पैसा कमावण्याचे स्रोत झाल्या आहेत. जणू काही बिझिनेस सेन्टर्सच आहेत. जितक्या जास्त सुविधा तेवढी जास्त फीज. सगळयाच पालकांना वाटते की आपल्या मुलाला उत्तम सुविधा मिळाव्या यासाठी ते शक्य तेवढे प्रयत्नसुद्धा करतात, तरीही अधिकांश पालक ना त्यांच्या मुलांच्या प्रगतीवर खुश असतात ना त्यांच्या वर्तनावर. यासाठी मोठया प्रमाणावर पालक स्वत:च जबाबदार असतात, कारण त्यांच्या स्वत:च्या हे लक्षात येत नाही की ते त्यांच्या मुलांशी कोणत्या वेळी कसे वागतात.
मुलं अभ्यास करण्याची टाळाटाळ करतात, तेव्हा आई कधीकधी थापड मारते, कधी रागावते तर कधी धमकी देते. पण कधी हे जाणून घ्यायचा प्रयत्न करत नाही की शेवटी मूलाला अभ्यास का करायचा नाही. शक्यता आहे की त्याला त्याच्या टीचर आवडत नसतील, त्याची आयक्यू लेव्हल कमी असेल किंवा त्याला त्यावेळी अभ्यास करायची इच्छा नसेल.