* गरिमा पंकज

आज रंजनाला कार्यालयात बॉसचा ओरडा मिळाला होता. गेल्या काही दिवसापासून तिची मुलगी आजारी होती त्यामुळे ऑफिसमध्ये कामावर पूर्ण लक्ष देऊ शकत नव्हती. तर दुसरीकडे तिचं तिच्या सर्वात खास मैत्रीणीशीदेखील एका गोष्टीवरून भांडण झालं होतं. त्यामुळे घरी परततेवेळीदेखील तिचं मन खूपच अस्वस्थ होतं. तिच्या मनात येत होतं की घरी पोहोचताच कोणीतरी गरमागरम चहा द्यायला हवा म्हणजे डोकेदुखी थोडी कमी होईल. परंतु तिला माहीत होतं की असं कधीच होऊ शकत नाही. मुलीची तब्येत खराब आहे आणि मुलगासुद्धा अजून खूपच लहान आहे. पती तर रात्री ९ वाजण्यापूर्वी घरी येतच नाहीत.

थोडी वैतागतच ती घरात घुसली तेव्हा मुलाने तिच्याकडे चॉकलेटची मागणी करत मिठी मारली. रंजना त्याच्याकडे दुर्लक्ष करून खाली बसली, तेव्हा तो रडू लागला. यावर रंजनाला खूपच राग आला. तिने मुलाला एक लगावून दिली. मुलगा जोरजोरात रडू लागला. आता तर रंजनाचं डोकं अजूनच दुखायला लागलं. कसबसं मुलाला गप्प बसून ती स्वयंपाकघरात आली आणि स्वत:साठी चहा केला. नंतर जेवणाची तयारी करू लागली. जेवण बनविण्यात तिचं अजिबात मन लागत नव्हतं, तेव्हा तिने सकाळचीच भाजी आणि पराठे बनवून मुलांना जेवायला वाढलं. जेव्हा पती घरी परतले तेव्हा सकाळचंच जेवण पाहून तेदेखील वैतागले. रात्री एका छोटया गोष्टीवरून दोघांचे भांडण झालं आणि रंजना रडत रडत झोपी गेली.

तणावात राहू नकाखरंतर रंजना आपल्या ऑफिसचा तणाव घरी घेऊन आली होती, ज्यामुळे तिला घरातदेखील आनंद मिळू शकला नाही. एवढेच नाही तर घरातील दुसऱ्या सदस्यांनादेखील तिच्या तणावाचा त्रास भोगावा लागला. कार्यालयातील तणाव घरी आणल्यामुळे घराची शांती भंग होते. ज्या अन्नासाठी आपण पैसा कमवतो जर तोच तणाव त्या अन्नाला वाया घालवत असेल तर कमविण्याचा काय फायदा? तुम्ही जे अन्न खाता तसाच तुमचा स्वभाव बनतो. खाण्यामुळेच तुम्ही कोणाच्या हृदयापर्यंत पोहोचू शकता आणि अन्नच तुम्हाला निरोगी आणि मजबूत बनवतं. मग या खाण्याबाबत एवढे बेपर्वा होऊन कसे चालेल?

शेवटी योग्य आहे की कामावरून परतून स्वयंपाक करतेवेळी सर्व तणाव स्वयंपाक घराच्या बाहेर ठेवा तेव्हा तुमचं कुटुंब सुखी राहू शकते. जर तुम्ही नोकरदार महिला आहात आणि तुमचा संपूर्ण दिवस नोकरी व घराच्या देखभालीमध्ये जात असतो. आणि त्यात तुम्ही कार्यालयातील तणावदेखील घरी आणत असाल तर नक्कीच सावध व्हा. असं करून तुम्ही कधीच आनंदी होऊ शकणार नाही.

यासाठी गरजेचं आहे की कार्यालयातील तणाव कार्यालयातच सोडून मोकळया आणि प्रसन्न मनाने घरी या. यासंदर्भात रिलेशनशिप एक्सपर्ट डॉक्टर आरती दहिया उपाय सांगत आहेत ज्याकडे तुम्ही लक्ष दिल्यास तुमचं  वैयक्तिक आयुष्य व काम दोन्हीमध्ये सुधारणा होऊ शकते.

* तुम्ही जेव्हा कार्यालयातून घरी येता तेव्हा घरांमध्ये प्रवेश करताच स्वयंपाकघरात अजिबात जाऊ नका. थोडा वेळ आरामात बसून दिवसभराचा शारीरिक व मानसिक थकवा उतरवा. चहा प्या आणि नंतर जेवण बनविण्यासाठी स्वयंपाकघरात जा.

* घरी येतेवेळी मुलांसाठी त्यांच्या आवडीची वस्तू जसं की खाण्याची एखादी वस्तू व एखादं खेळणं घेऊन या. घरात येताच जेव्हा ती वस्तू तुम्ही मुलांच्या हातात ठेवाल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून नक्कीच तुमचं मनदेखील आनंदी होईल.

* घरी आल्यानंतर कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी मुलं आणि घरातील मोठयांसोबत वेळ नक्की व्यतीत करा. जर पतीदेखील त्याच वेळी कार्यालयातून घरी येत असतील तर कार्यालयातील तणाव विसरून थोडा वेळ त्यांच्यासोबत बसा आणि चहा सोबत स्नॅक्सचा आनंद घ्या. घरी येऊन एकमेकांशी गप्पा मारत आणि एकमेकांना त्या दिवसाबद्दल माहिती द्या. नंतर रात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आरामात तुमच्या समस्या वा ऑफिसमधील त्रास तुमच्या जीवनसाथीसोबत शेअर करा तुम्हाला नक्कीच समजून घेतील आणि तुमची समस्यादेखील सोडविण्याचा प्रयत्न करतील.

* कामावरुन  घरी परतल्यानंतर घरात सुवासिक कॅन्डल्स लावा आणि स्लो म्युझिक चालू करा. यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होईल आणि तुमचं मनदेखील शांत होईल. वाटेतदेखील संगीत ऐकत व पुस्तक वाचत या. यामुळे मनात तणावाच्या गोष्टी येणार नाहीत आणि तुम्हाला ताजतवानं वाटेल.

* जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादी बाग असेल तर कार्यालयातून येतेवेळी थोडावेळ तिथे बसून, निसर्गासोबत वेळ घालवा, म्हणजे तुमच्या मनातून तणाव निघून जाईल.

* तुम्ही वाटेत मोबाईलवर विनोद वा व्हिडीओ पाहू शकता. यामुळे तुमचं लक्ष इतर नकारात्मक गोष्टींपासून दूर जाईल.

* जर तुमच्याकडे एखादा पाळीव प्राणी असेल तर प्रयत्न करा की कामावरून परतून वा सुट्टीच्या दिवशी त्याच्यासोबत थोडा वेळ घालवा. यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल आणि त्यालादेखील छान वाटेल.

* कार्यालयातून घरी येऊन अगोदर आपल्या शरीराला डिटॉक्स करा. थंड पाण्याने आंघोळ करा मन ताजंतवानं होईल.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...