* शीतल शहा, संस्थापक, कोअर पिलेट्स स्टुडिओ
आधुनिक व्यायामाच्या क्षेत्रात पिलेट्सने आपले असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपली जीवनशैली अशी Peली आहे की आपल्याला खूप वेळ बसून राहावे लागते, जे खूप हानिकारक आहे. अशावेळी पिलेट्स वर्कआऊटमुळे शरीरात लवचिकता येते. तुमचे वय व फिटनेस बॅकग्राउंड काहीही असो पिलेट्स व्यायामामुळे शरीराला ढिगभर फायदे होतात. यामुळे एकाग्रता वाढणे, शारीरिक मुद्रा आणि बॉडी अलाइनमेंट सुधारणे याशिवाय शारीरिक ताकत वाढविण्यातही मदत मिळते.
पिलेट्सबाबत अनेक प्रकारचे गैरसमज आहेत व अर्धवट माहितीच्या आधारे काहीही करणे धोकादायक ठरू शकते. म्हणून पिलेट्स काय आहे, हे कसे काम करते याची माहिती असणे खूप आवश्यक आहे. यात त्या ५ गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांची माहिती तुम्हाला पहिल्या पिलेट्स क्लासपूर्वी असली पाहिजे.
पिलेट्स क्लासेस दोन प्रकारचे असतात : मॅट पिलेट्स आणि रिफॉर्मर पिलेट्स. मॅट क्लासेज तुम्ही व्यायाम मॅटवर करता, जेणेकरून तुमच्या प्रेशर पॉईंट्सना कुशन मिळेल किंवा मशिनवर व्यायाम करू शकता ज्याला रिफॉर्मर पिलेट्स म्हणतात. यात एक स्लायडिंग प्लॅटफॉर्म असतो, ज्यात स्टेशनरी फुटबार, स्प्रिंग्ज व पुलीज असतात, जे बॉडी टोनिंगसाठी रेसिस्टन्स आणते.
सामान्यत: एका चांगल्या पिलेट्स स्टुडिओत दोन्ही प्रकारच्या व्यायामाची व्यवस्था असते. हे तुम्हाला याचे स्वातंत्र्य देते की आपल्या शरीराप्रमाणे योग्य प्रकार निवडा. कोणत्याही प्रकारचे वर्क आउट करण्यासाठी तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की हे वर्कआउट ४५ मिनिटे ते एक तासाचे असते. दोन्ही प्रकारच्या पिलेट्समध्ये अंतहीन मांसपेशींना थकवण्याऐवजी नियंत्रणाच्या सिद्धांतावर काम केले जाते. तुम्ही कोणताही क्लास निवडा, पण तुमच्या मार्गदर्शकाला तुमच्या क्षमतेची माहिती अवश्य असेल याची खात्री करून घ्या, जेणेकरून तो त्यानुसार व्यायामाचा आराखडा तयार करेल. विशेषत: तुम्ही जर नवे असाल तर.
वेदना सहन करायला तयार रहा : पिलेट्स शरीर थकवण्यापेक्षा नियंत्रणावर अधिक भर देते. तरीही दीर्घ काळ एकाच स्थितीत स्थिर राहिल्यास शरीर थकतेच. म्हणून जरी तुम्ही क्रॉसफिट वा जड डंबेल्स उचलणे यासारखे व्यायाम करत नसाल तरीही पिलेट्समध्ये करवून घेतल्या जाणाऱ्या बॉडी वेटवर आधारित रुटीन खूपच कठीण असते.
उदाहरणार्थ, व्यायामात अॅबडॉमिनल फोकस्ड हालचालींवर भर दिला जातो, ज्यात सतत गती वाढवली जाते, ज्यामुळे आपल्या अॅब्जवर तीव्र परिणाम दिसून येतो. लहान हालचालींवर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता याचा अर्थ हा आहे की तुम्ही सर्व मांसपेशींवर काम करत आहात व हेच प्रत्येक व्यायामाचे ध्येय असते.
अशा प्रकारच्या वर्कआऊटमध्ये तुम्ही खूपच थकता. जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसरा व्यायाम कराल तेव्हा मांसपेशीतील ही जळजळ दुसऱ्या दिवशी वेदनादायी जाणवेल. म्हणून तुम्ही मानसिक दृष्टया तयार असायला हवे. अनेकांना वाटते की पिलेट्स खूप सोपे आहे, पण जेव्हा हे सुरु करता तेव्हा जाणवते की त्यांचा अंदाज किती चूक होता.
आरामदेह कपडे वापरा : पिलेट्स वर्कआऊट तुम्हाला आतून बळकट बनवते. हे तुमचे व्यक्तिमत्व, शारीरिक लवचिकता, उत्साह व शक्ति वाढवते. हे वर्कआऊट अतिशय उच्च स्तरावरचे असते. तुम्ही एवढे आरामदायक असायला हवे की तुमच्या मांसपेशी सहज हालचाल करू शकतील व व्यायाम सहज करू शकाल. जे कपडे तुम्ही वापराल ते आरामदायक असायला हवे. पण खूप सैल नसावे. आरामदायक मटेरियलच्या अंगाला चिकटणाऱ्या कपडयांना पिलेट्ससाठी योग्य मानले गेले आहे. असे यासाठी की तुमचा प्रशिक्षक तुम्ही व्यायाम कराल तेव्हा स्नायूंच्या हालचाली पाहू शकेल व गरज भासल्यास व्यायामाचे स्वरूप सुधरवू शकेल. पायाच्या बाबतीत सांगायचे झाले तर तुम्ही अनवाणीसुद्धा हे करू शकता. तुम्ही पिलेट्स सॉक्ससुद्धा वापरू शकता.
इतर फिटनेस रुटीनपेक्षा जास्त शब्दावली असत : यात एरोबिक्स ते क्रॉसफिटपर्यंत स्वत:ची अशी टर्मिनोलॉजी असते. पिलेट्स प्रत्येक जिममध्ये शिकवल्या जाणाऱ्या सामान्य व्यायामापेक्षा खूपच वेगळा व्यायाम आहे. यात वापरल्या जाणाऱ्या शब्दांची तुम्हाला माहिती असायला हवी जसे ‘पॉवर हाऊस’चा अर्थ एका कशेरुकापासून दुसऱ्या कशेरुकापर्यंत हळूहळू हालचाल करणे. २ क्लासेस झाल्यानंतर कोणीही ही शब्दावली ग्रहण करू शकतो.
फिटनेस प्लानचा भाग असायला हवे पिलेट्स : कोणीही आपले फिटनेस ध्येय प्राप्त करण्यासाठी एकाच प्रकारच्या व्यायामप्रकारावर अवलंबून असू नये. तुमच्या वर्कआऊटमध्ये निरनिराळया प्रकारच्या व्यायामाचे मिश्रण असायला हवे, जे तुमच्या शरीराला मानवतात.
कधी फिटनेस प्रोग्राममध्ये तुमच्या शरीराला नवीन हालचाली आणि नवे बदल अंगवळणी पडण्यास वेळ लागतो. पिलेट्स एकाच वेळी तुमच्या शरीराला स्ट्रेच, टोन व अलाइन करते हे इतर फिटनेस स्पोर्ट्स प्रोग्राम्ससाठीसुद्धा उपयोगी असते, कारण हे तुमच्या शरीराला जास्त चांगल्या हालचालींसाठी तयार करते. जसे की हे प्रत्येक लहानशी मांसपेशी बळकट करण्यावर भर देते, म्हणून पिलेट्स आपल्या रुटीनमध्ये सामील करून तुम्ही जास्त वजन उचलणे, वेगाने धावणे, जास्त चांगले पोहणे एवढेच नाही तर कंबरदुखीपासूनसुद्धा सुटका मिळवण्यात यशस्वी होऊ शकता.