* शीतल शहा, संस्थापक, कोअर पिलेट्स स्टुडिओ

आधुनिक व्यायामाच्या क्षेत्रात पिलेट्सने आपले असे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आपली जीवनशैली अशी Peली आहे की आपल्याला खूप वेळ बसून राहावे लागते, जे खूप हानिकारक आहे. अशावेळी पिलेट्स वर्कआऊटमुळे शरीरात लवचिकता येते. तुमचे वय व फिटनेस बॅकग्राउंड काहीही असो पिलेट्स व्यायामामुळे शरीराला ढिगभर फायदे होतात. यामुळे एकाग्रता वाढणे, शारीरिक मुद्रा आणि बॉडी अलाइनमेंट सुधारणे याशिवाय शारीरिक ताकत वाढविण्यातही मदत मिळते.

पिलेट्सबाबत अनेक प्रकारचे गैरसमज आहेत व अर्धवट माहितीच्या आधारे काहीही करणे धोकादायक ठरू शकते. म्हणून पिलेट्स काय आहे, हे कसे काम करते याची माहिती असणे खूप आवश्यक आहे. यात त्या ५ गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांची माहिती तुम्हाला पहिल्या पिलेट्स क्लासपूर्वी असली पाहिजे.

पिलेट्स क्लासेस दोन प्रकारचे असतात : मॅट पिलेट्स आणि रिफॉर्मर पिलेट्स. मॅट क्लासेज तुम्ही व्यायाम मॅटवर करता, जेणेकरून तुमच्या प्रेशर पॉईंट्सना कुशन मिळेल किंवा मशिनवर व्यायाम करू शकता ज्याला रिफॉर्मर पिलेट्स म्हणतात. यात एक स्लायडिंग प्लॅटफॉर्म असतो, ज्यात स्टेशनरी फुटबार, स्प्रिंग्ज व पुलीज असतात, जे बॉडी  टोनिंगसाठी रेसिस्टन्स आणते.

सामान्यत: एका चांगल्या पिलेट्स स्टुडिओत दोन्ही प्रकारच्या व्यायामाची व्यवस्था असते. हे तुम्हाला याचे स्वातंत्र्य देते की आपल्या शरीराप्रमाणे योग्य प्रकार निवडा. कोणत्याही प्रकारचे वर्क आउट करण्यासाठी तुम्हाला हे माहीत असणे आवश्यक आहे की हे वर्कआउट ४५ मिनिटे ते एक तासाचे असते. दोन्ही प्रकारच्या पिलेट्समध्ये अंतहीन मांसपेशींना थकवण्याऐवजी नियंत्रणाच्या सिद्धांतावर काम केले जाते. तुम्ही कोणताही क्लास निवडा, पण तुमच्या मार्गदर्शकाला तुमच्या क्षमतेची माहिती अवश्य असेल याची खात्री करून घ्या, जेणेकरून तो त्यानुसार व्यायामाचा आराखडा तयार करेल. विशेषत: तुम्ही जर नवे असाल तर.

वेदना सहन करायला तयार रहा : पिलेट्स शरीर थकवण्यापेक्षा नियंत्रणावर अधिक भर देते. तरीही दीर्घ काळ एकाच स्थितीत स्थिर राहिल्यास शरीर थकतेच. म्हणून जरी तुम्ही क्रॉसफिट वा जड डंबेल्स उचलणे यासारखे व्यायाम करत नसाल तरीही पिलेट्समध्ये करवून घेतल्या जाणाऱ्या बॉडी वेटवर आधारित रुटीन खूपच कठीण असते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...