* डॉ. नीरजा श्रीवास्तव द्य
कुठे दिखाव्याचे सोंग, कुठे भीतिवर श्रद्धा, तर कुठे भाग्यरेषांवर आश्रित, एकूण मिळून हेच आहोत आपण, हाच आपला समाज. जिथे धर्मांवतेमुळे ढोंगी बाबा, पुजारी पुरोहितांद्वारे पर्व, उत्सवांना नानाप्रकारच्या उत्सवांना जोडून, सत्य नाकारत त्यांचे मूलभूत, आनंदी स्वरूप नष्ट केले जात आहे, तर दुसरीकडे शुभ गोष्टींचा मोह आणि अनिष्ट होण्याची भीती या सगळयाचे पालन करण्यास विवश झाल्याने सामान्य माणसांचे भयभीत मन अंधविश्वासाने घेरले गेले, कारण आपले धार्मिक ग्रंथसुद्धा याच गोष्टींची वकिली करतात की देवाशी संबंधित धार्मिक कार्यक्रमांवर कोणतेही प्रश्नचिन्ह लावू नका. जर गोष्टी ऐकल्या नाहीत तर तुम्ही नष्ट व्हाल.
‘…अथचेत्त्वमहंकारात्त् नश्रोष्यसि विनंगक्ष्यसि.’ (भा. गीता श्लोक १८/५८), बस्स गुपचूप पालन करत राहायचे. एखाद्या अधर्मी माणसासमोर बोलायचे नाही…‘…न च मां यो अभ्यसूयति.’ (भा. गीता श्लोक १८/६७) सगळे धर्म सोडून आम्हाला शरण या. आपल्या धर्माकडे आकर्षित होण्याचा रट्टा मारत रहा की मी सगळया पापातून तुमचा उध्दार करेन.
सर्वधर्मान् परित्यज्य, माम एकं शरणं व्रज:।
अहं त्वां सर्वपापेभ्योमोक्षयिष्यामि मा शुच:॥
(भा. गीता श्लोक १८/६६)
हे सगळे काय आहे? परमेश्वर आहे तो, सर्वशक्तिमान असणारच नं? त्याला सगळयांना सांगायची काय गरज होती. मग त्यांनी आपली ही सगळी वचनं सगळया भाषांमध्ये का नाही लिहिलीत? कम्प्युटर सॉफ्टवेअरसारखे त्यांच्याजवळ तर सगळे ज्ञानविज्ञान कायमचे आहे. पत्र, खडकांवर का लिहिले? जे त्यांचे ऐकत नाहीत त्यांच्या समोर गीतेतील परमेश्वर वचनं वाचण्यास का मनाई केली, ही वचनं कानी पडताच ते पवित्र झाले असते. मग मनाई का केला? अगदी साधी गोष्ट आहे, त्यांना तर्क हवा असतो आणि यांच्याजवळ काही उत्तर नसते आणि त्यांचे बिंग फुटते, सत्य समोर येते. सत्य गोष्टी नाकारणे, कारण जाणून घेतल्याविना कशावरही विश्वास ठेवणे, इथूनच पटवून सांगायला सुरूवात झाली.
या भीतीमुळे नवनवीन अंधविश्वास जन्माला आले आणि अंधश्रद्धाळुंची संख्या वाढीस लागली. एकच गोष्ट मनात खोलवर रुजली आहे की जर विनाकारण, तर्कांविना असे केल्याने चांगले व न केल्याने वाईट होऊ शकते तर आमच्या आणि इतरांच्या कृतीनेसुद्धा चांगले वाईट घडू शकते. बस्स सुरु झालं आहे अंधविश्वासाचं दुष्टचक्र. कधी क्रिकेट टीमच्या विजयासाठी, तर कधी ऑलिंपिक मेडलसाठी अथवा नेत्याचा निवडणुकीत विजय व्हावा यासाठी हवन केले जाते.
दिखाव्याचे ढोंग
मांजर रस्त्यात आडवी गेली यासारखी लहानशी गोष्ट अंधविश्वास बनवली गेली. मनात इतकी भीती बसवली गेली की रस्ताच बदलला अथवा कोणी दुसरे त्या रस्त्यावरून जायची वाट बघण्यातच भले आहे असा विचार केला गेला. यापुढे आणखी काही करून बघायची हिंमतच केली गेली नाही. भीती मनात एवढी ठाण मांडून बसली की कधी लक्षातच आले नाही की चांगलेही घडले होते कधी. आपली भीती दुसऱ्यालाही देत गेले. एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, तोंडातोंडी सगळीकडे हे पसरवण्यात आलं?
धर्मभिरुची संख्या जितकी वाढते, अंधविश्वास आणि अशा माणसांच्या संख्येतही कितीतरी वाढ होते. म्हणून सर्वप्रथम धर्म, व्यक्तीचे मन, भित्रे मन आणि कमकुवत मन ही प्रमुख कारणं आहेत, ज्याचा परिणाम म्हणून अंधविश्वासी हे कारण दाखवत सत्याच्या तथ्यांची सहजता नाकारू लागलेत.
आणखी एक कारण आहे दिखाव्याच्या ढोंगाप्रमाणे काही जनधार्मिक कर्मकांडांशी संबंधित राहून असे दाखवतात की ते खूपच धार्मिक आहेत, म्हणून जास्त चांगले, खरे आणि विश्वासपात्र एक पवित्र आत्मा आहेत. मग भले ते अन्नदान, दान पुण्य याच्या मागे लपून धंदा वा काळा धंदा मोठ्या प्रमाणावर चालवतात.
भ्रष्ट मोठमोठे नेते, टॅक्स चोरी करणारे, मोठमोठया चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती मोठया ऐटीत आपल्या जाम्यानिम्यानिशी आणि मिडियाच्या झगमगाटासहीत मंदिरात व्हीव्हीआयपी पद्धतीची सुविधा घेत, देवीदेवतांची दर्शन, भरभक्कम दान, चॅरिटी करत स्वत: धार्मिक, पवित्र आणि प्रामाणिक असण्याचे ढोंग करत असतात. हे सगळे डोळे उघडायला पुरेसे नाही का? सत्य तर हे आहे की आपण झोपले नाही आहोत, सगळे जाणूनबुजून डोळे मिटून पडले आहोत. पण झोपण्याचे नाटक करणाऱ्याला नाही.
बाबांचे सत्य उघडे पडले आहे
फसवी फकिरी आणि परंपरेचे रडगाणेसुद्धा या असत्याचे कारण आहे. आपले पूर्वज बनून जे करत आले आहेत, डोळे मिटून फसवे फकीर बनलेले, आपणसुद्धा त्यांचे अनुकरण करत आहोत. असे करणे आपण आपले कर्तव्य मानू लागलो आहोत. त्यांच्या प्रती आदर बाळगण्याचा एक मार्ग समजतो आहे. त्याच्याशी कोणी वाद घालत नाही. बस मान्य करत चाललो आहोत. थोडे समाधान मिळाले, थोडे चांगले वाटू लागले, असे करताकरता विश्वाससुद्धा बसू लागतो. अगदी तसेच जसे कुलूप ठोकून आपण आरामात फिरायला निघून जातो की आता आपले घर सुरक्षित आहे. त्या कर्मकांडांना, अंधविश्वासाला मान्य करून, त्याचे पालन करून आपल्याला आपोआप स्वत:चे भविष्य सुरक्षित वाटू लागते, बस जसे आपण आपल्या घरातील थोरामोठ्यांना बघतो तसेच आपण कोणताही विचार न करता करत जातो.
अशिक्षितता, अज्ञान आणि तर्काला नाकारणेसुद्धा एक मोठे कारण आहे. मान्य आहे आज शिक्षणाचा फारच वेगाने प्रसार होत आहे. काहींच्या डोक्यात काय आणि कसे निर्माण होऊ लागले आहेत. एखादी व्यक्ती प्रत्येक गोष्टीचे आधी कारण जाणू इच्छिते, मगच मान्य करू इच्छिते. परंतु आजही आपल्या देशातील लोकसंख्या १०० टक्के सुशिक्षित होऊ शकली नाही आहे. मोबाईल, गाडीचा वापर करतात पण बाबांच्या चमत्काराच्या आशेने तिकडे जाणे सोडत नाहीत आणि त्याच्या तावडीत फसत जातात. सत्य साई बाबा, आसाराम बाबू यांच्यासारखे लोक कुठे गेले? त्यांचा खरा चेहरा आज लपून राहिला नाही.
अशिक्षितपणा एक मोठे कारण
जगात असे काहीही नाही आहे, ज्याचे कारण नाही, तर्क नाही. माहीत नसेल तर हा आपला अशिक्षितपणा आणि अज्ञानच आहे. दोन अधिक दोन चारच होतील. तीन अधिक एकसुद्धा चारच होतील. जर हे आपल्याला माहीत नसेल तर याला आपण आपले अज्ञानच म्हणायला हवे. रात्र आणि दिवस कसे होतात? माहित नाही तर काहीही काल्पनिक अंदाज लावत बसा, जसे की एक राक्षस रोज सुर्याला गिळतो किंवा कोणत्याही बिनबुडाच्या कल्पना परंतु त्यामागचे कारण…
एक सत्य नेहमी तसेच राहणार आहे. आपल्याला उशिरा कळले. मोबाईल, टीव्ही डिश, गाडी असो वा विमान उडवण्याचे विज्ञान हे आधीही होते, आपल्यालाच उशिरा कळले. आजही न जाणे किती कला, किती विज्ञानजगत लपलेले आहे. आपण त्यात आपला मेंदू खर्च करू इच्छित नाही.
अशिक्षितांचे सोडा, सुशिक्षितांनीसुद्धा आपली बुद्धी अंधविश्वासाने बनवली आहे. त्यांना बुद्धी वापरून काही समजून घ्यायचे नाही आहे. शिक्षण चांगले नाही, घरून दही खाऊन मंदिरात देवाचे दर्शन घेऊन परीक्षा देऊन येतात, याचा परिणाम त्यांचा त्यानाच कळतो की त्यांना एवढेच मिळू शकते.
अंधविश्वासाने घेरलेले असे लोक आनंदीसुद्धा राहू शकत नाही. अशातश्या शिक्षणाच्या साथीने लोकांनी ज्ञानाचा प्रकाश सर्वात आधी आपल्या आत पसरवायला हवा. काही असेल तर वास्तव काय आहे? कसे आहे? का आहे? हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. या सगळयाचे उत्तर जाणून घ्यायचे आहे, मगच मान्य करायचे आहे. आपला खरा विकास आणि उध्दार तिथूनच सुरु होईल.