* डॉ. नीरजा श्रीवास्तव द्य

कुठे दिखाव्याचे सोंग, कुठे भीतिवर श्रद्धा, तर कुठे भाग्यरेषांवर आश्रित, एकूण मिळून हेच आहोत आपण, हाच आपला समाज. जिथे धर्मांवतेमुळे ढोंगी बाबा, पुजारी पुरोहितांद्वारे पर्व, उत्सवांना नानाप्रकारच्या उत्सवांना जोडून, सत्य नाकारत त्यांचे मूलभूत, आनंदी स्वरूप नष्ट केले जात आहे, तर दुसरीकडे शुभ गोष्टींचा मोह आणि अनिष्ट होण्याची भीती या सगळयाचे पालन करण्यास विवश झाल्याने सामान्य माणसांचे भयभीत मन अंधविश्वासाने घेरले गेले, कारण आपले धार्मिक ग्रंथसुद्धा याच गोष्टींची वकिली करतात की देवाशी संबंधित धार्मिक कार्यक्रमांवर कोणतेही प्रश्नचिन्ह लावू नका. जर गोष्टी ऐकल्या नाहीत तर तुम्ही नष्ट व्हाल.

‘...अथचेत्त्वमहंकारात्त् नश्रोष्यसि विनंगक्ष्यसि.’  (भा. गीता श्लोक १८/५८), बस्स गुपचूप पालन करत राहायचे. एखाद्या अधर्मी माणसासमोर बोलायचे नाही...‘...न च मां यो अभ्यसूयति.’  (भा. गीता श्लोक १८/६७) सगळे धर्म सोडून आम्हाला शरण या. आपल्या धर्माकडे आकर्षित होण्याचा  रट्टा मारत रहा की मी सगळया पापातून तुमचा उध्दार करेन.

सर्वधर्मान् परित्यज्य, माम एकं शरणं व्रज:।

अहं त्वां सर्वपापेभ्योमोक्षयिष्यामि मा शुच:॥

(भा. गीता श्लोक १८/६६)

हे सगळे काय आहे? परमेश्वर आहे तो, सर्वशक्तिमान असणारच नं? त्याला सगळयांना सांगायची काय गरज होती. मग त्यांनी आपली ही सगळी वचनं सगळया भाषांमध्ये का नाही लिहिलीत? कम्प्युटर सॉफ्टवेअरसारखे त्यांच्याजवळ तर सगळे ज्ञानविज्ञान कायमचे आहे. पत्र, खडकांवर का लिहिले? जे त्यांचे ऐकत नाहीत त्यांच्या समोर गीतेतील परमेश्वर वचनं वाचण्यास का मनाई केली, ही वचनं कानी पडताच ते पवित्र झाले असते. मग मनाई का केला? अगदी साधी गोष्ट आहे, त्यांना तर्क हवा असतो आणि यांच्याजवळ काही उत्तर नसते आणि त्यांचे बिंग फुटते, सत्य समोर येते. सत्य गोष्टी नाकारणे, कारण जाणून घेतल्याविना कशावरही विश्वास ठेवणे, इथूनच पटवून सांगायला सुरूवात झाली.

या भीतीमुळे नवनवीन अंधविश्वास जन्माला आले आणि अंधश्रद्धाळुंची संख्या वाढीस लागली. एकच गोष्ट मनात  खोलवर रुजली आहे की जर विनाकारण, तर्कांविना असे केल्याने चांगले व न केल्याने वाईट होऊ शकते तर आमच्या आणि इतरांच्या कृतीनेसुद्धा चांगले वाईट घडू शकते. बस्स सुरु झालं आहे अंधविश्वासाचं दुष्टचक्र. कधी क्रिकेट टीमच्या विजयासाठी, तर कधी ऑलिंपिक मेडलसाठी अथवा नेत्याचा निवडणुकीत विजय व्हावा यासाठी हवन केले जाते.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...