* नसीम अन्सारी कोचर

युग शोबाजीचे आहे. प्रत्येकजण एकमेकांपेक्षा चांगली स्थिती दर्शविण्यास उत्सुक आहे. सोशल साइट्स आणि इंटरनेटच्या युगाने शहरी राहणीमानात बराच बदल घडवून आणला आहे. फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर टाकण्यात आलेल्या चित्रांमध्ये स्वत:च्या फोटोपेक्षा पार्श्वभूमीत कोणकोणत्या सुंदर आणि मौल्यवान वस्तू दिसून येतात यावर अधिक लक्ष दिले जात आहे. हे एखाद्या व्यक्तिची स्थिती दर्शवते. आमच्या गृहिणींवर या गोष्टींचा सर्वाधिक परिणाम होतो, ज्या त्यांच्या गोड घरांना अजून अधिक गोड बनविण्याच्या नादात असतात.

कमी बजेटमध्ये घर कसे सुंदर बनवायचे, आपल्या ड्रॉईंग रूममध्ये अशा कोणत्या अनोख्या गोष्टी लावल्या की भेट देणारे पाहुणे कौतुक केल्याशिवाय राहू शकणार नाहीत, याचा शोध चालू आहे. तसे, सुंदर दिसण्यात-दाखवण्यात काही चूकही नाही.

निसर्गाच्या आश्रयात परत या

चला, आम्ही आपले घर सुंदर बनविण्यास मदत करतो. आजकाल, धूळमाती आणि प्रदूषणांनी भरलेल्या वातावरणात धावते जीवन निसर्गाच्या आश्रयाकडे परतू इच्छिते. हिल स्टेशनांवरील लोकसंख्या वाढत असताना, निसर्गाच्या कुशीत मनुष्याला मनशांति मिळते हे समजणे कठीण नाही. परंतु आपल्या घरात जर आपल्याला ही मनशांति मिळाली तर...

एका रंगाच्या भिंती, खिडक्या आणि दारावर समान रंगाचे पडदे, बाबांच्या काळातील फर्निचर बदलण्याची वेळ आली आहे. आता हे इंटीरियर बदला. आपल्या आयुष्यात आणि घरात निसर्गाचे वातावरण निर्माण करण्यासाठी, आपल्या घराचा कोपरांकोपरा निसर्गाच्या थीमवर सजवा. प्राणी, पक्षी, पर्वत, बर्फ नद्या, हिरवे गवत, झुलणारी झाडे, जर तुमच्या डोळयांसमोर असतील तर मनाला खूप आराम व मनशांती मिळेल. दिवसभर कार्यालयात काम केल्यावर, जेव्हा कंटाळलेला माणूस संध्याकाळी अशा घरात प्रवेश करेल, तेव्हा त्याला मोठा आराम आणि आनंद वाटेल.

वॉल पेंटिंग आणि सजावट

सर्व प्रथम आपण घराच्या भिंतींबद्दल बोलूया. पांढऱ्या, पिवळया किंवा फिकट निळया रंगांच्या भिंतींचे दिवस संपले आहेत. आता तेजस्वी, नखरेबाज आणि खटयाळ रंगांचा कल आहे. आजकाल बाजारात हिरव्या वेल्वेटच्या बॅकग्राउंडवर उमलणाऱ्या सुंदर फुलांचे वॉल पेपर खूप विकले जात आहेत. जर घराचा ड्रॉईंगरूम चमकदार रंगाचा असेल तर तो सकारात्मक उर्जा आणि आशा प्रसारित करेल. निसर्ग-थीम असलेले वॉल पेपर आजकाल घरांमध्ये मोठया प्रमाणात वापरले जात आहेत. ते लावणेही सोपे आहे आणि स्वच्छ करणेदेखील.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...