कथा * अंजू साखरे

‘‘दिल धडक धडक के कह रहा है आ भी जा...’’ गाण्याची रिंग टोन ऐकून मृदुला आपला फोन उचलायला स्वयंपाकघरातून ड्रॉइंगरूममध्ये धावली. नाव येत नव्हतं. पण जो नंबर दिसत होता, तो बघून तिच्या हृदयाची धडधड वाढली. हा नंबर तिला झोपेतून उठवून कुणी विचारला तरी ती तोंडपाठ म्हणून दाखवू शकली असती.

आपल्या खोलीतून रोहन ओरडला, ‘‘आई, तुझा फोन वाजतोय...’’

मृदुलानं झटकन् फोन उचलला. पटकन् टीव्ही बघत असलेल्या नवऱ्याकडे एक कटाक्ष टाकला. दुसऱ्याच क्षणी खोलीत अभ्यास करत असलेल्या लेकाकडे एक दृष्टीक्षेप टाकून तिनं फोन कानाला लावत बाल्कनी गाठली.

‘‘हॅलो...हाय...काय चाललंय?’’

‘‘आता बरं वाटतंय,’’ पलीकडून आवाज आला.

‘‘का? काय झालं होतं?’’ तिनं विचारलं.

‘‘बस्स, तुझा आवाज ऐकला...माझा दिवस सत्कारणी लागला.’’

‘‘असं होय? बरं पण एक सांग, आज शनिवारी माझा नवरा ऋषी अन् मुलगा रोहन दोघंही घरी असतात हे ठाऊक आहे ना? मला मोकळेपणानं बोलता येत नाही,’’ घाईघाईनं मृदुला म्हणाली.

‘‘मी तर फक्त एवढं सांगायला फोन केला होता की आता मला अधिक संयम ठेवता येणार नाही. मी पुढल्या आठवड्यात दिल्लीला येतोय...तुला भेटायला. प्लीज एखाद्या हॉटेलात माझं बुकिंग करून ठेव ना? तिथल्या रूममध्ये फक्त तू, मी अन् एकांत असेल,’’ सिद्धार्थ म्हणाला.

‘‘हॉटेल? छे रे बाबा...मी नाही हॉटेलात येणार भेटायला.’’

‘‘तर मग आपण भेटायचं कुठं? मी एवढा १५०० किलोमीटर मुंबई ते दिल्ली अंतर ओलांडून तुला भेटायला येतोय अन् तुला हॉटेलपर्यंत यायला जमणार नाही?’’

मृदुला बोलण्यात गुंतली होती. मागे रोहन कधी येऊन उभा राहिला हे तिला कळलंच नाही.

रोहनकडे दृष्टी जाताच ती घाईनं म्हणाली, ‘‘मी नंतर फोन करते,’’ फोन बंद करून ती आत वळली.

‘‘कुणाचा फोन होता आई?’’ रोहननं विचारलं.

‘‘तो...तो माझ्या मैत्रीणीचा होता,’’ तिनं फोन उचलला अन् ती स्वयंपाकघरात जाऊन भाजी चिरू लागली.

तिचे हात तिथं काम करत होते पण मन मात्र मुंबईला पोहोचलं होतं...सिद्धार्थपाशी. गेली तीन चार वर्षं ती त्याच्याशी ऑनलाइन चॅटिंग अन् फोनवर संभाषण करत होती. तिलाही त्याला भेटायची खूप उत्सुकता होती. आता तो भेटायला यायचं म्हणतोय तर कुठं भेटायचं?

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...