प्रतिनिधी

थंडीच्या दिवसात त्वचेचा कोरडेपणा सर्वसामान्य समस्या आहे. कोरडेपणा वाढल्यामुळे इचिंग आणि रॅशेजची समस्यादेखील वाढते. परंतु या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही तुमचं ड्रेसिंग टेबल विविध प्रकारचे मॉइश्चरायझिग लोशन, क्रीम व तेल विकत घेऊन भरून ठेवावं, हा काही यावरचा उपाय नाही.

चला जाणून घेऊया मॉइश्चरायजर्सबद्दल जे तुमच्यासाठी विंटर शील्डचं काम करतील :

अल्ट्रा हायड्रेटींग मॉइश्चरायजर्स असं मॉईश्चरायजर ज्यामध्ये दीर्घकाळपर्यंत त्वचेचा ओलावा लॉक करणारे इंग्रिडिएंट्स असतात. जसं की शिया बटर, आल्मण्ड ऑइल, ग्लिसरीन आणि सेरामाइट्स. बायोटीक हिमालया इत्यादीचे काही मॉइश्चरायजर्समध्ये या तत्त्वांचे मिश्रण मिळतं. जर तुमची त्वचा अधिक कोरडी राहत असेल तर या इंग्रिडिएंट्सच्या मॉईश्चरायझरचा वापर तुम्ही करू शकता.

क्रिमी अँड मिल्की : काही कमी बजेटच्या लाँग लास्टिंग मॉईस्चरायझर्सचा तुम्ही शोध घेत असाल तर क्रिम वा मिल्क बेस्ड मॉइश्चरायझरदेखील बाजारात उपलब्ध आहेत. काही प्रॉडक्ट्स तर बॉडी वॉश आणि मॉईश्चरायझरच्या कॉम्बोसोबत येतात. जर तुम्ही १२ तास व त्यापेक्षा अधिक काळपर्यंत बाहेर राहत असाल आणि वारंवार मॉईश्चरायझरचा वापर करणे शक्य नसेल तर असं मिल्क बेस्ड मॉइश्चरायझर निवडा; ज्यामध्ये विटामिन ई व आमंड ऑइल असू शकेल.

स्किन डॅमेज रिपेअर : जास्त कोरड्या त्वचेवर इचिंग रेड पॅचेस इत्यादींची समस्या अधिक असते. अनेकदा इचिंग एवढं जास्त होतं की असं वाटतं जणू फुल स्लीव ड्रेस विनाकारण वापरला. अशामध्ये काही हर्बल ऑप्शन्स ट्राय करू शकता. परंतु हे मात्र बघा की अशा ऑप्शन्समध्ये जोजोबा ऑइल, विटामिन ई, व्हिट जर्म इत्यादींच्या खुबी असतील.

नॉनकोमेडोजेनिक मॉईश्चरायजर : म्हणजे असं मॉईश्चरायझर ज्यामध्ये अशा इन्ग्रेडियंटसच्या वापर करण्यात आलेला नाहीये, जे तुमच्या त्वचेचे पोर्स बंद करेल. अशा प्रकारचे मॉइश्चरायजर जेंटली तुमच्या त्वचेतील ओलावा लॉक करतात आणि त्यावर एक प्रोटेक्टिव्ह लेयर बनवतात.

टिप्स

* अनेक महिला घाईघाईत तेच मोईश्चरायजर फेसवर अप्लाय करतात जे त्या बॉडीसाठी वापरतात. फेसची स्कीन, बॉडी स्किनपेक्षा वेगळी असते आणि शरीराच्या दुसऱ्या अवयवांच्या तुलनेत चेहरा प्रत्येकवेळी झाकून ठेवणं शक्य नसतं. म्हणून फेससाठी योग्य तेच मोईश्चरायजर काम करणार नाही जे तुम्ही बॉडीवरती करता. यासाठी तुम्ही तुमच्या त्वचेनुसार विंटर क्रीमची निवड करा.

* क्रीमचा योग्य फायदा तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही मेकअप रिमूव केल्यानंतर त्यावर अप्लाय कराल.

* क्रीम लावतेवेळी स्किन क्लीनजिंग करणं योग्य असतं. कारण पोर्स ओपन होतील आणि क्रीम योग्य प्रकारे ओलाव्याला लॉक करू शकेल.

* विंटर क्रीम अशी निवडा जिला बनवण्यात नॅचरल फॉर्मुलाचा वापर करण्यात आला असेल आणि ज्यामध्ये विटामिन सी, कोको बटर, अमंड ऑइल इत्यादी इन्ग्रेडियंटस असतील.

* वर्किंग वुमनने अशा प्रकारची फेस क्रीम घ्यावी, ज्यामध्ये सन प्रोटेक्शन देखील मिळेल. साधारण मॉइश्चरायजर्स युवी रेजने त्वचेला प्रोटेक्ट करू शकत नाहीत.

विंटर फॅब्रिक टिप्स

* तसं कॉटन ब्रिदेबल फॅब्रिक असतं परंतु विंटर सीजनसाठी ते योग्य नाहीये कारण हे बॉडी हिटला लॉक करू शकत नाही. असंच लिननसोबत देखील होतं.

* सिल्कला देखील कधी या सीझनमध्ये प्रायमरी फॅब्रिक बनवता कामा नये. कारण हे शरीराला चिकटतं आणि बॉडी हिट लॉकदेखील करत नाही.

* सिंथेटीक वूलपासून दूर राहा कारण यामुळे शरीरावर रेशेज होऊ शकतात. हा, जेव्हा तुम्ही चांगलं फॅब्रिकने बनलेलं थर्मल वापरलं असेल तर याचा वापर तुम्ही करू शकता.

और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...