कथा * सिद्धार्थ जयवंत

समीर ऑफिसच्या गोष्टी घरात कधीच बोलत नाही, त्यामुळेच त्याच्या ऑफिसात अधूनमधून होणाऱ्या पार्ट्यांना माझ्या लेखी खूप महत्त्व आहे. ऑफिसमधल्या ‘ऑफिसेत्तर बातम्या’ मला तिथेच समजतात.

कुणीही नवरा आपलं ‘लफडं’ किंवा ‘प्रकरण’ घरी कधीच सांगत नाही, पण इतरांचं काही असलं तर मात्र आवर्जून घरी सांगतो. मग तीच ‘मसालेदार’ झणझणीत बातमी बायको पार्टीत इतरांबरोबर शेयर करते त्यावेळी सांगणारीच्या डोळ्यांतली चमक अन् ऐकणाऱ्यांची उत्सुकता अगदी बघण्यासारखी असते.

मागच्या आठवड्यात जी पार्टी झाली त्यात सर्व बायकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू मी होते. मला सर्वांसमोर अपमानित करत सगळ्यात आधी नीलमने म्हटलं, ‘‘तुझ्या समीरचं, त्या अकाउंट सेक्शनच्या बडबड्या रितूबरोबर प्रकरण सुरू आहे, खरं का.’’

त्यानंतर इंदू, नेहा, कविता, शोभा सगळ्यांनीच या बातमीला दुजोरा देत त्यांना सिनेमाला जाताना, हॉटेलात कॉफी पिताना वगैरे बघितल्याचं सांगितलं. त्यामुळे शंकेला जागा नव्हतीच... मनातून मी हादरले. दु:खीही झाले, पण वरकरणी मात्र शांत व हसतमुखच होते. बातमीचा माझ्यावर काहीही परिणाम झालेला नाही हे दाखवण्यात मी यशस्वी ठरले.

त्यांचे सल्ले अन् सहानुभूती मला नको होती म्हणून मी सरळ प्रसाधनगृहात शिरले. तिथल्या एकांतात  मला दोन गोष्टी सुचल्या. एक तर अशा वेळी नवऱ्याशी भांडण करून फायदा होत नसतो. भांडणाचा परिणाम उलटा होतो. दुसरं म्हणजे अशा वेळी रडूनभेकूनही काही उपयोग होत नाही. तेव्हा काही तरी वेगळीच युक्ती करायला हवी.

यांचं प्रकरण नेमकं किती पाण्यात आहे याचा अंदाज घेण्यासाठी मी प्रसाधनगृहातून बाहेर पडले अन् पार्टी हॉलमध्ये गेले.

हॉलच्या एका कोपऱ्यात ती दोघं मला हसतबोलत असलेली दिसली. मी चेहऱ्यावर खोटं हसू आणलं अन् बेदरकारपणे चालत त्या दोघांपाशी पोहोचले.

मला अचानक आपल्याजवळ बघून दोघंही एकदम दचकलीच! त्यांच्या मनात चोर असणार हे सांगणारा तो पुरावाच होता.

‘‘रितू, किती सुंदर दिसते आहेस? तुझा ड्रेसही फार छान आहे हं! मी तिची स्तुती केल्याने ती जरा खूष झाली.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...