कथा * दीपा पांडे

अजून लोकल ट्रेन यायला पंधरा मिनिटांचा अवकाश होता. रम्या वारंवार प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या बाजूला बघत होती. राघव अजून पोहोचला नव्हता. ही लोकल चुकली तर पुढे अर्धा तास वाट बघावी लागणार होती.

तेवढ्यात रम्याला राघव येताना दिसला. तिनं हसून हात हलवला. राघवनंही हसून प्रतिसाद दिला. सकाळचे सात वाजले होते. गर्दी फारशी नव्हती. स्टेशनवर तुरळक माणसं होती. शाळेत जाणारी तीन चार मुलं, एक दोन जोडपी अन् थोड्या अंतरावर एक तरूणांचं टोळकं...बाकी कुणी नव्हतं.

रम्या बाकावरून उठून प्लॅटफॉर्मच्या मध्यावर आली. तेवढ्यात तिचा मोबाइल वाजला. ती मोबाइल ऑन करतेय तेवढ्याच कुणीतरी मागून तिच्या पाठीत सुरा खुपसला. धक्क्यानं ती कोलमडून खाली पडली. डोकं आपटल्यामुळे जखम झाली...ती बेशुद्ध पडली.

राघव तिच्याजवळ पोहोचतो हल्ला करणारा पळून गेला होता. सगळे लोक घाबरून ओरडत होते. रेल्वे पोलिसांनी ताबडतोब तिला सरकारी इस्पितळात पोहोचवलं. रम्याच्या मोबाइलवरून तिच्या बाबांना फोन केला. ते स्टेशनच्या जवळच होते. रम्याबरोबर ते स्टेशनला आले होते. तिथं त्यांना कुणीतरी भेटणार होतं. रम्याला रोज ट्रेन बदलून महिंद्रा सिटीत आपल्या ऑफिसला जावं लागायचं.

अचानक असा फोन आलेला बघून रम्याच्या वडिलांना धक्काच बसला. त्यांच्यासोबत असलेल्या माणसानं धीर देऊन त्यांना इस्पितळात नेलं.

रम्याला आयसीयूत नेलं होतं. घरून तिची आई, थोरली विवाहित बहीण आणि तिचा नवरा ही तिथं आली होती. आई अन् बहिणीचे अश्रू थांबत नव्हते. बहिणीचा नवरा सगळी धावपळ करत होता.

राघव कोपऱ्यातल्या एका बाकावर डोकं धरून बसला होता. रम्याच्या कुटुंबीयांना त्यानं प्रथमच बघितलं होतं. त्यांच्याशी काय अन् कसं बोलावं तेच त्याला समजत नव्हतं. रम्यानं त्याला सांगितलं होतं की तिचे आईवडिल खेड्यात राहतात. त्यांना तामिळखेरीज इतर कोणतीही भाषा येत नाही. ती स्वत: अभ्यासात हुशार होती. शहरात हॉस्टेलला राहून शिकली. इंजीनियर झाली. थोरल्या बहिणीचं लग्न तर बारावी होता होताच जवळच्या गावातल्या एका श्रीमंत शेतकरी कुटुंबात करून दिलं होतं. राघव सकाळपासून आपल्या जागेवरून उठलाही नव्हता. आत कुणालाच जाऊ देत नव्हते. त्यानं ऑफिसतल्या काही सहकाऱ्यांना फोन करून रम्याची बातमी कळवली होती. सायंकाळी ते लोक येणार होते. ती मंडळी आल्यावरच तो रम्याच्या आईवडिलांजवळ आपल्या भावना व्यक्त करू शकणार होता.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...