कथा * मोनिका अत्रे

‘‘कुठं होतीस तू? केव्हापासून फोन करतोय मी. माहेरी गेली की वेडीच होतेस तू...’’ खूप वेळानं मोनीनं फोन उचलला तेव्हा सुमीत रागावून म्हणाला.

‘‘अहो...तो मोबाइल कुठं तरी असतो अन् मी दुसरीकडेच असते, त्यामुळे मला रिंग ऐकायला आली नाही. अन् सकाळीच तर आपण बोललो होतो, त्यामुळे मला...बरं, ते जाऊ देत. फोन कशासाठी केला होता? काही विशेष बातमी? काय विशेष?’’ मोनीनं त्याच्या रागाकडे साफ दुर्लक्ष करत विचारलं.

‘‘म्हणजे आता तुझ्याशी बोलायचं झालं तर माझ्याकडे काही विशेष बातमीच असायला हवी. एरवी मी बोलू शकत नाही? तुझी अन् मुलांची चौकशी नाही करू शकत? तेवढाही हक्क नाहीए मला? बरोबर आहे आता त्यांच्यावर आजीआजोबा, मामामामींचा हक्क आहे ना?’’ मोनीवर भडकलाच सुमीत. त्याला वाटलं होतं की मोनी त्याच्या रागावण्यावर सॉरी म्हणेल, प्रेमानं बोलेल...

इकडे मोनीचाही संयम संपला. माहेरी आल्यावर खरं तर तिला पूर्ण स्वांतत्र्य हवं असायचं. ‘‘तुम्ही भांडायला फोन केला आहे का? तसं असेल तर मला बोलायचंच नाहीए. एक तर इथं इतकी माणसं आहेत. काय काय चाललंय, त्यातच मनीषाला जरा...’’ बोलता बोलता तिनं जीभ चावली.

‘‘काय झालंय मनीषाला? तुला मुलं सांभाळायला होत नाही तर तू त्यांना नेतेस कशाला? आपल्या बहीणभावंडात रमली असशील...तिला बरं नाहीए तर तुमचं परतीचं तिकिट बुक करतोय मी. ताबडतोब निघून ये. माहेरी गेलीस की फारच चेकाळतेस तू. माझ्या पोरीला बरं नाहीए अन् तू इकडे तिकडे भटकतेस? बेजबाबदारपणाचा कळस आहेस. इतकं दुर्लक्ष?’’ साधी चौकशी करण्यासाठी केलेला फोन आता महायुद्धात बदलत होता. सुमीतनंही रूद्रावतार धारण केला.

‘‘अहो, थोडं अंग तापलंय तिचं...पण आता ती बरी आहे अन् हे बघा, मला धमकी देऊ नका. दहा दिवसांसाठी आलेय, तर पूर्ण दहा दिवस राहूनच येईन. मला माहीत आहे, माझं माहेरी येणं फार खटकतं तुम्हाला. जेव्हा तुमच्या गावी जातो, तेव्हा तिथं बारा-बारा तास वीज नसते. तिथं मुलांना ताप येतो, तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही. वर्षभर तुमच्या तैनातीत असते, तुमच्या तालावर नाचते तेव्हा नाही काही वाटत. पण दहा दिवस माहेरी आले तर लगेत तमाशे सुरू करता....’’ मोनीही भडकली. खरं तर बोलता बोलता तिला रडायला येऊ लागलं होतं. पण तिनं प्रयासानं रडू आवरलं होतं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...