कथा * सुनीत भाटे

‘‘मॅडम, प्रिन्सिपल सरांनी तुमचं काम संपल्यावर त्यांना भेटून जा म्हणून सांगितलंय.’’

शाळेच्या शिपायानं हा निरोप सांगताच अवनीला काळजी लागली. का बरं बोलावलं असेल? मागची एक कडवट आठवण अजून तिच्या मनातूनच गेली नव्हती...त्यांनी अप्रत्यक्षपणे तिच्यावर तिच्या कामावर ताशेरे ओढले होते.

शेवटचा पिरियड संपवून अवनीनं घाईघाईनं आपलं सामान आवरलं अन् ती भराभर चालत सरांच्या ऑफिसकडे निघाली.

वाटेत नलिनी भेटली. ‘‘इतक्या घाईनं कुठं निघाली?’’ तिनं विचारलं.

‘‘प्रिन्सिपल सरांनी भेटायला बोलावलंय...’’

‘‘अरेच्चा? मग त्यात एवढं घाबरण्यासारखं काय आहे?’’

‘‘मला...भीती वाटते त्यांची...’’

‘‘अवनी, तू पण ना...जा. भेटून ये, मी निघते.’’

अवनीनं सरांच्या ऑफिसच्या दारात उभं राहून विचारलं, ‘‘मे आय कम इन सर?’’

‘‘या, या, अवनी...’’

‘‘बसा...कॉफी घेणार?’’

अवनी संकोचली, कशीबशी म्हणाली, ‘‘चालेल.’’

‘‘यावेळी तुमच्या वर्गातल्या सर्वच मुलांचे मार्क्स उत्तम आहेत...म्हटलं, तुमचं अभिनंदन करावं.’’

‘‘थँक्यू सर.’’

‘‘सध्या स्टाफरूमध्ये पगारवाढीसाठी कुणाचं नावं चर्चेत आहे?’’

‘‘सर, सगळेच एकमेकांचे नाव घेत असतात.’’

‘‘असं होय? बरं, ते जाऊ दे...तुमच्याकडे तुमचा पासपोर्ट असेल ना?’’

‘‘नाही...नाहीए सर,’’ कशीबशी अवनी म्हणाली.

‘‘तर मग करून घ्या. यंदा टीचर्सचं जे डेलिगेशन जर्मनीला जाणार आहे, त्यासाठी तुमचं नाव पाठवायचं माझ्या मनात आहे म्हणून तुम्ही पासपोर्ट लवकर बनवून घ्या.’’

‘‘ओ. के. सर.’’

‘‘परदेश प्रवासाची तयारीही सुरू करा.’’

अवनीचा स्वत:च्या कानांवर विश्वास बसेना. तिनं जरा निरखून सरांच्या चेहऱ्याकडे बघितलं.

६०-६५ वर्षांचे प्रिन्सिपल सर शर्ट पॅन्ट अन् कोट, टायमध्ये होते. सोनेरी फ्रेमचा चष्मा लावलेला. अवनीला एकदम तिचे वडिल आठवले.

‘‘सर, कधी जावं लागेल?’’

‘‘अजून नक्की तारीख आलेली नाहीए...पण ही मिटिंग सहसा मार्चच्या शेवटच्या आठवड्यात असते.’’

अवनीला आपला आनंद लपवता आला नाही.

‘‘अरे हो, एक महत्त्वाची गोष्ट सांगायला विसरलो, ‘भारतीय स्त्रियांची सार्वत्रिक आगेकूच’ या विषयावर एक छानसं आर्टिकल तयार करा. त्या लोकांना भारतीय स्त्रीच्या प्रगतीविषयी, पर्यायानं देश किती पुढे गेलाय याविषयी कळायला हवं.’’

‘‘दोन तीन दिवसातच आर्टिकल तयार करून मी तुम्हाला आणून देते सर.’’

‘‘घाई नाहीए...आठवडाभरही वेळ घ्या. पण ठसठशीत उदाहरणं देऊन, व्यवस्थित आकडेवारी देऊन आर्टिकल लिहा. मी सुगंधालाही सांगतो. तिच्या आर्टिकलमध्ये  काही वेगळं अन् महत्त्वाचं वाटलं तर ते ही तुमच्या आर्टिकलमध्ये घालून एक उत्तम आर्टिकल तयार करू. तेच तुम्ही वाचून दाखवाल.’’

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...