* दीपा अंतुले

पुरूष एकटा असतानाही त्यानं मनातलं बोलू नये याला काय पुरूषार्थ म्हणायचं का? अन् ती नाइटीवाली सुंदरी...तिला बघून आम्ही उत्तेजित होत असतो. आम्हाला आपलं वाटायचं की नाइटी म्हणजे उगाच रोज उठून कुठला पोषाख घालायचा या कटकटीतून मुक्त ठेवण्याचा उपाय म्हणून अंगभर घालण्याचं वस्त्र म्हणून स्त्रिया नाइटी वापरतात. पण नाइटीनं आमच्या आयुष्यात चांगलंच नाट्य निर्माण केलं की हो...

आमची हिडिंबा..चुकलं, जीभ जरा घसरलीच... आमची जीवनसंगिनी सुंदरी तर चोवीस तास साडीतच वावरत असते. गुबगुबित तक्क्याला अभ्रा घालावा अशी दिसते. सहा वार साडीही घट्ट होते किंवा फिट्ट बसते असा भक्कम बांधा आहे तिचा.

आमचे डोळे म्हणजे निर्जीव बटणं नाहीएत हो. ती जिवंत आहेत, त्यामुळे भिरीभिरी फिरून सौंदर्याचा शोध घेत असतात अन् खरं सांगा, सौंदर्याचे पूजक आहेत म्हणूनच तर सौंदर्याची किंमत आहे?

आज सौ. शेजारी गेलीय. ती संधी साधून आपलं मनोगत मांडायला बसलोय आम्ही.

शेवटी सहन करण्याचीही एक मर्यादा असते म्हटलं. सौ.नं तर कडेकोट चौक्या पहारे बसवलेत आमच्यावर. ‘इथं बाल्कनीत का उभे आहात?’, ‘तिथं वर गच्चीवर कशाला गेला होतात?’, ‘खिडकीतून एवढं काय बघताय?’, ‘दारात का उभे आहात?’ असे सतत तिरकस प्रश्न विचारल्यावर आम्हालाही शंका आली की काही तरी विशेष असणारच.

मन तर शंकेखोर अन् अवखळ असतंच ना? आम्हीही शेवटी ते रहस्य हुडकून काढलंच जे आमच्या हिडिंबेनं (सॉरी) आमच्यापासून दडवून ठेवलं होतं.

आता लवकरच रहस्योद्घाटन करतो नाही तर तुम्हीही आमच्यावर भडकाल.

तर झालं असं की अलीकडेच नव्यानं वसलेल्या या आमच्या सुसंस्कृत वस्तीत नेमकं आमच्या बंगल्या समोरच्याच बंगल्यात एक नवीन लग्न झालेलं जोडपं राहायला आलं. जेमतेम चार महिनेच झाले असतील लग्नाला. सुरूवातीला तर दोघांचं नखंही कुणाच्या दृष्टीला पडलं नव्हतं. पण आता मात्र आमचं नशीब उघडलंय. ऐकून आहोत की त्या नवऱ्याच्या धनदांडग्या सासऱ्यानं आपल्या लेकीला अन् जावयाला हा बंगला भेट दिलाय. नवरा साधारण तिशीचा अन् बायको पंचविशीची. नवरा सकाळीच कामावर निघून जातो आणि आम्ही दहा वाजता घर सोडतो. आमची तक्क्यासारखी सौ. जेव्हा स्वयंपाकघरात कामं आटोपत असते, तेव्हा आम्ही पेपर वाचण्याचं निमित्त करून नजरेला स्वैर संचार करू देतो. आमचं आतुर मन त्या समोरच्या बंगल्यातल्या नवयौवना, नवप्रफुल्ल्ता, नवसमर्पिता वगैरे वगैरे असलेल्या सुंदरीजवळ जाऊन पोहोचलं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...