कथा * माधव गवाणकर

श्वेता सासरी गेल्यावर तिच्या मम्मी आणि पप्पांना घर खायला उठलं होतं. बडबडी, बोलकी, मनमोकळी अशी ती मुलगी. मम्मीला फक्त एकच गोष्ट खटकायची की श्वेता देवधर्म, कर्मकांड वगैरे मानत नव्हती. कर्मकांडाला तिचा नकार असायचा. ‘गोडधोड कधीही करावं, सण उत्सव कशाला हवा? दिवाळीचा फराळ तर आता वर्षभर मिळतो. आपली ऐपत आहे. मग काय प्रॉब्लेम आहे.’ अशी श्वेताची वेगळी विचारसरणी होती. तिला त्यात काही प्रॉब्लेम नसला तरी सासरच्या लोकांना तिचा प्रॉब्लेम होऊ लागला. श्वेताचा नवरा आकाश बराचसा सुपरस्टारसारखा दिसायचा. ‘सेम रोशन वाटतो गं’ अनेक बायका त्याच्याकडे वळून वळून बघत. श्वेताचा मैत्रिणी हेवा करत. जिमला जाणारा असा देखणा पती मिळाल्यामुळे श्वेताचं वैवाहिक जीवन छान बहरू लागलं होतं. प्रणयाला एक वेगळीच धुंदी चढायची, पण एके दिवशी आकाश तिला म्हणाला, ‘‘केवळ माझ्या आईबाबांसाठी तू रोज पूजा करत जा...प्लीज. प्रसाद म्हणून खोबरं वाटायला तुला काय प्रॉब्लेम आहे. फक्त आठवड्यातून एकदा उपवास कर. आईला समाधान मिळेल की सून सुधारली.’’

श्वेता थोडी रागावून म्हणाली, ‘‘सुधारली म्हणजे? नास्तिक बाई बिघडलेली, उनाड असते का? भक्ती ही सक्ती असता कामा नये. मला नाही पटत तर जबरी कशाला? मी कधीच माहेरी उपवास केलेले नाहीत. मला पित्ताचा त्रास आहे. तो वाढेल. शिवाय मी मुळात कमी जेवते. दोन फुलके आणि जरासा भात. मग उपवास कशाला?’’ श्वेता सत्यच बोलत होती. पण आकाश नाराज झाला. त्याने हळूहळू श्वेताशी अबोला धरला. लैंगिक असहकार करून पाहिला. श्वेताला मूड यायचा तेव्हा ‘आज दमलोय, नको’ म्हणत आकाश प्रणयाला नकार द्यायचा. असं वारंवार होऊ लागलं.

‘‘तुमचा माझ्यातला इंटरेस्ट कसा काय संपला? व्हॉट इज युवर प्रॉब्लेम?’’ असं श्वेताने आकाशला एके दिवशी विचारलं. त्याचं उघडं, पीळदार शरीर रात्री बेडरूममध्ये पाहिल्यावर तिच्या मनात स्वाभाविकच शरीरसुखाची इच्छा प्रबळ झाली. आकाश स्पष्टपणे म्हणाला, ‘‘तू देव मानायला लाग. आईला खूश कर. नंतरच आपण आपल्या सुखाचं बघू...

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...