कथा * पौर्णिमा अत्रे

‘‘हे स्थळ मला सर्वार्थानं योग्य वाटतंय. एकदा तनूला विचारून घेतो अन् मग फायनल करून टाकू,’’ गिरीशनं आपल्या बायकोला, सुधाला म्हटलं.

‘‘हो, पण तिनं आधी होकार तर द्यायला हवा ना? त्रस्त झालेय या मुलीपायी. इतकी छान छान स्थळं येताहेत पण काही तरी खुसपट काढून नाकारतेय ती सगळ्यांना. त्यातून एकत्र कुटुंब म्हटलं की संतापतेच! आता मात्र मी तिचं अजिबात ऐकून घेणार नाही. आता खरं म्हणजे हे स्थळ तिच्या अपेक्षेनुरूपच आहे, पण एकच डोक्यात घेऊन बसलीय की एकत्र कुटुंबात सून म्हणून जाणार नाही...काही तरी एकेक खुळं या मुलींची!’’ सुधानं म्हटलं.

तुला माहीत आहे ना, हे सगळं त्या तिच्या लाडक्या मैत्रिणीमुळे झालंय. अशी पूर्वी नव्हती आपली तनु, पण हल्ली त्यांच्यावर आई वडिलांपेक्षा मित्र मैत्रिणींचाच प्रभाव जास्त असतो.

नवरा बायको सचिंत चेहऱ्यानं बोलत असतानाच तनु ऑफिसातून घरी परतली. आईवडिलांचे चेहरे बघून तिनं हसून विचारलं, ‘‘आज पुन्हा एखादं स्थळ आलेलं दिसतंय?’’

तिचा हसरा चेहरा अन् विचारण्याची पद्धत यामुळे आईवडिलांच्या चेहऱ्यावरही हसू उमटलं. तिघांनी एकत्र बसून चहा घेतला. मग सुधानं म्हटलं, ‘‘हे स्थळ खरंच छान आहे. इथं लखनौमध्येच मुलाचे आईवडिल त्यांच्या थोरल्या लेकसुनेसह राहताहेत. धाकटा मुंबईला असतो. तो एका औषधांच्या कंपनीत प्रॉडक्ट मॅनेजर आहे.’’

तनुनं क्षणभर विचार केला. मग हसून म्हणाली, ‘‘म्हणजे, तो तिथं एकटा राहतो?’’

‘‘होय.’’

‘‘तर मग हरकत नाही...फक्त त्याच्या आईवडिलांनी वारंवार मुंबईला येऊन धडकू नये...’’

‘‘कसं गं बोलतेस तनु? अगं त्याचे आईवडिल आहेत. ते काय आपल्या मुलाकडे येऊन राहू शकत नाहीत? अशी, इतकी तुसडी अन् माणूसघाणी कशी गं झालीस तू? हे काय नवीनच फॅड तुझं? आम्हाला आजही वाटतं, घरात कुणी वडिलधारं असावं...पण सगळेच खूष आणि निवर्तले अन् तुला घरात फक्त नवरा हवाय...अगं सासरच्या घरात किती तरी नाती असतात. नातलग असतात...ते ही सगळं महत्त्वाचंच असतं...’’ जरा चिडूनच सुधानं म्हटलं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...