कथा * गिरीजा पाठक

आयुष्यात कधी कधी एखाद्या वळणावर माणूस अशा अवस्थेत असतो की नेमकं काय करावं, कुठं जावं हेच त्याला समजेनासं होतं. सुनयना आज अगदी अशाच परिस्थितीत सापडली होती. काही क्षणांत तिचं आयुष्य पूर्णपणे ढवळून निघालं होतं.

आज सकाळी सुशांत त्याच्या खोलीतून फोनवर कुणाशीतरी बोलत होता. सहजच काही वाक्य तिच्या कानांवर पडली. ‘‘ओ. के. डियर, बरोबर पाच वाजता मी पोहोचतोय, हो, हो. नक्षत्र हॉटेलमध्ये...आता या क्षणी मी फक्त तुझाच विचार करतोय अन् प्रत्यक्ष भेटेपर्यंत माझ्या डोक्यात तूच असणार आहेस.’’ असं म्हणून त्यानं फोनवरच तिचा मुका घेतला. हे बघून सुनयनाला धक्काच बसला.

सुनयना मध्यमवर्गीय कुटुंबातली, शिक्षण अर्धवट सुटलेलं...रूप मात्र देखणं, त्यामुळेच गर्भश्रीमंत सुशांतशी लग्न झाल्यामुळे मिळालेली समृद्धी उपभोगताना ती सुशांतला दबून असायची. बंगला, शोफर ड्रिव्हन तिची स्वत:ची कार, स्वयंपाकी, घरगडी, मोलकरीण, माळी असं सगळं वैभव दिल्याबद्दल ती त्याची कृतज्ञ होती. पूर्णपणे समर्पित होती. दागदागिने, कपडालत्ता, हौसमौज कशातच उणीव नव्हती, पण आज हे काय भलंतच? तिनं ठरवलं प्रकरणाचा मागोवा घ्यायचा. तीही पाच वाजण्याच्या प्रतिक्षेत होती. नक्षत्र हॉटेलात जाऊन बघणार होती. खात्री करून घेणार होती.

पाच वाजण्याआधीच तिनं तिची गाडी नक्षत्र हॉटेलपासून काही अंतरावर पार्क केली अन् ती हॉटेलच्या लाउंजमध्ये येऊन बसली. तिनं आज डोक्यावरून पदर घेतला होता. काळा गॉगलही लावला होता. हातात वाचायला पुस्तक होतं. त्यामुळे चेहरा झाकला जात होता.

बरोबर पाच वाजता ऐटबाज कपडे घातलेला सुशांत गाडीतून उतरून रिसेप्शन समोर आला. त्याचवेळी एक मुलगीही तिथं आली. दोघांची गळाभेट झाली अन् हातात हात घालून दोघं लिफ्टकडे निघाली. नक्कीच वरच्या मजल्यावर रूम बुक केलेली असणार.

सुनयनाचे डोळे भरून आले. घशाला कोरड पडली. तिला वाटलं आता इथंच आपण जोरजोरात रडू लागणार. स्वत:ला कसंबसं सावरलं तिनं. काही वेळ स्तब्ध बसून राहिली. जरा शांत झाल्यावर उठली, गाडीत येऊन बसली आणि घरी येऊन पलंगावर कोसळली. आता ती मुक्तपणे रडू शकत होती. बराच वेळ रडल्यावर तिचं मन थोडं शांत झालं. ती विचार करत होती, तिच्या प्रेमात, तिच्या सेवेत, तिच्या समर्पणांत कुठं उणीव राहिली होती म्हणून सुशांतला अशी दुसऱ्या स्त्रीची ओढ वाटली? ती जरी फार शिकलेली नाही, तरी सुसंस्कृत, चांगल्या वळणाची आहे. सुंदर आहे, निरोगी आहे...सुशांतची काळजी घेते. त्याला कधीच तिनं तक्रार करण्याची संधी दिली नाही...तरीही?

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...