कथा * प्राची भार्गवे

मनीष आपल्या पत्नीसोबत, मुक्तासोबत बाल्कनीत बसून चहा पित होता. दिवसभरात ऑफिसमध्ये घडलेल्या काही घटना तिला ऐकवत होता. मुक्ताही दिवस कसा गेला, काय, काय झालं ते सांगत होती. नुकतंच दोघांचं लग्न झालं होतं. नवा संसार सुरू झाला होता. दोघांनाही त्या नव्याची नवलाई अनुभवताना गंमत वाटत होती.

समोश्याचा घास घेत मनीषनं म्हटलं, ‘‘व्वा! चविष्ट समोसा, तोही तुझ्या हातचा अन् एयर फ्रायमध्ये तयार केलेला...म्हणजे रूचकर पदार्थ अन् तोही अत्यंत हेल्दी...खरोखर तू एक उत्तम पत्नी आहेस.’’

मुक्ता स्वत:ची स्तुती ऐकून लाजली. ती हसून काही बोलणार तेवढ्यात मनीषचा मित्र गोपाळ तिथं आला.

‘‘अरे? गोपाळ? ये ना, ये बैस. मुक्ता, गोपाळलाही चहा आवडतो.’’

मुक्ता तत्परतेनं स्वयंपाकघराकडे वळली.

‘‘अरे? मी येताच वहिनीला का आत पाठवलंस?’’ गंमतीनं मनीषच्या पाठीवर थाप देत गोपाळनं म्हटलं. ‘‘एका परीनं चांगलंच केलंस. मी तुला एक बातमी द्यायला आलो होतो. तुझी प्रिया तिच्या आईकडे परत आलीये. आज मला मार्केटात भेटली. तुझ्याबद्दल विचारत होती. तुझा फोननंबर मागितला. म्हणाली, तिचा मोबाइल चोरीला गेल्यामुळे तिच्याकडे आता कुणाचेच नंबर नाहीएत...’’

गोपाळ पुढेही काहीबाही सांगत होता, पण मनीषला काहीच ऐकू येत नव्हतं. तो भूतकाळात जाऊन पोहोचला होता. सहा महिन्यांपूर्वी त्याचं सगळं आयुष्य, त्याचं अवघं अस्तित्व याच नावाभोवती फिरत होतं. त्याची प्रिया, त्याचा प्राण, त्याचं पहिलं प्रेम...

कमलाकरनं दिलेल्या पार्टीत त्या दिवशी प्रत्येकाची नजर प्रियावर खिळलेली होती. मनीषचा स्वभाव लाजराबुजरा असल्यामुळे तो फक्त लांबूनच तिच्याकडे बघत होता. पार्टी संपली तेव्हा प्रत्येकानं आपापल्या घरी परतण्याची तयारी सुरू केली. कुणीतरी म्हणालं, ‘‘प्रियाचं घर मनीषच्या वाटेवर आहे.’’ प्रियाला घरी पोहोचवण्याची जबाबदारी ओघानंच मनीषवर आली आणि त्यानं ती आनंदानं स्वीकारली. प्रियाचं सौंदर्य, स्मार्टनेस आणि अवखळपणानं तोही वेडावला होताच. प्रिया कॉलेजात शिकतेय हे त्याला समजलं. कॉलेज संपवून तो प्रशासनिक सेवापरीक्षेच्या तयारीला भिडलाय हे त्यानं प्रियाला सांगितलं.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...