कथा * अर्चना पाटील

‘‘सौ मित्र, मजा आहे यार तुझी.’’

‘‘का रे निनाद, काय झालं?’’

‘‘सोन्यासारखी दोन मुले आहेत. स्वत:चं घरसुद्धा घेतलंस, चारचाकी गाडी आहे, कस्तुरीसारखी समजुतदार बायको आहे, अजून काय पाहिजे यार आयुष्यात.’’

गाडी ऑफीसच्याच दिशेने जात होती. सौमित्र ड्रायव्हिंग करत होता. तेवढयात ऑफिसमधीलच दोन मुली बसस्टॉपवर दिसल्या.

‘‘निनाद, सोडायचं का यांना ऑफिसला?’’

सौमित्रने निनादला बोलण्याची वेळच येऊ दिली नाही, मुलींजवळच गाडी नेऊन थांबवली.

‘‘शाल्मली मॅडम, सोडू का ऑफिसला?’’

‘‘हो ,हो सोडा की,’’ मनवा पटकन बोलली आणि दरवाजा उघडून गाडीत बसली. त्यामुळे शाल्मलीही बसली.

‘‘तुम्ही रोजच इथून बसमधे चढता ना.’’

‘‘हो,’’ मनवानेच उत्तर दिलं

‘‘आम्हीही रोज इकडूनच जातो. सोडत जाऊ तुम्हालाही, काय रे निनाद.’’

‘‘हो ना, काय हरकत आहे. संध्याकाळी थांबा. आपण सोबतच येऊ. वीस पंचवीस मिनीटांचा रस्ता आहे.’’

सौमित्रला सावळया रंगाची शाल्मली त्याच्या गाडीत हवी होती. त्याचा उद्देश सफल झाला. सौमित्र दिसायला हँडसम होता. ऑफिसमध्ये त्याची पोस्टिंगही चांगली होती. ऑफिसच्या सर्वच लेडीज त्याच्या मागेपुढे करायच्या. शाल्मलीलाही तो आवडू लागला होता. सतत सगळयांना हसवायचा. पार्टी अरेंज करायचा. नवनवीन कलरचे शर्ट्स आणि जिन्स, एकदमच भारी पर्सनॅलिटी होती त्याची. त्याच्या गोऱ्या चेहऱ्यावर तर काळा गॉगल शोभून दिसायचा. हळूहळू सौमित्र शाल्मलीशी जवळीक वाढवू लागला.

‘‘खुपच कमी वयात नोकरी करत आहेस तू, सॉरी हं... मी पटकन एकेरीवर येतो. अजून कॉलेज शिकायला हवं होतं.’’

‘‘वडील आजारी असतात माझे, म्हणून शिक्षण सोडलं. घरी पैशांची चणचण असते.’’

‘‘तुला एक सांगु का? तुझा रंग जरी सावळा असला तरी तू माझ्या दृष्टीने खुप सुंदर आहेस. या ऑफिसमध्ये तुझ्याइतकं हुशार कोणीच नाहीए.’’

‘‘धन्यवाद सर.’’

‘‘धन्यवाद काय, चल कॉफी घेऊ बाहेर. थोडं मोकळं बोलता येईल.’’

‘‘नाही नको, हे जरा जास्तच होईल.’’

‘‘काय जास्त होईल? मी सांगतो आहे ना. चल गुपचूप.’’

शाल्मलीही निमुटपणे निघून गेली. ऑफिसमध्ये दोघांची चर्चा चांगलीच रंगली.

‘‘सौमित्र, काय सध्या शाल्मलीच्या मागेमागे फिरतो? ‘दोघंही आज मँचिंग...’ अशीच चर्चा ऑफिसमध्ये सुरू असे. शाल्मलीला सगळे समजत होते पण तिच्यासाठी सौमित्र म्हणजे सुखाची सर. त्यामुळे नाव जरी खराब होत होतं तरी ती बिनधास्त सौमित्रसोबत फिरत असे. शाल्मली आणि सौमित्रच्या संबंधांना आता सहा महिने झाले होते. सौमित्र सतत शाल्मलीला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत असे. तिच्यासाठी, तिच्या कुटुंबातील लोकांसाठी सतत काहीतरी नवीन वस्तु घेत असे. एक दिवस सौमित्र तिला घेऊन गावाबाहेरच्या हॉटेलवर आला. दुपारचे बारा वाजले होते. शाल्मलीला वाटतं होतं हा नेहमीसारखाच कुठेतरी बाहेर जेवण करायला घेऊन आला. त्यामुळे ती बिनधास्तपणे बोलत होती, हसत होती. सौमित्रने बुक केलेल्या रूममध्ये ते दोघे आले.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...