कथा * पूनम साने

फ्रांसचा बीच टाऊन नीस फ्रेंच रिवेरियाची राजधानी आहे. तिथं उत्तम संग्रहालयं आहेत, सुंदर चर्चेस आहेत, रशियन ऑर्थोडॉक्स कैथिड्रल आहे, तिथूनच जवळ असलेल्या हॉटेल नीग्रेस्कोच्या कॅफेटेरियात बसून इवा आणि जावेद कॉफी पित होते. इवाच्या चेहऱ्यावर काळजी दाटून आलेली होती, ‘‘जावेद,’’ ती कातर आवाजात म्हणाली, ‘‘मला वचन दे, तू कोणतंही वाईट काम करणार नाहीस.’’

‘‘इवा मी फार त्रस्त आहे गं! माझ्या हृदयात एक आग भडकलेली असते. इथं मी फार अपमान सहन केलाय. मी जणू तुच्छ वस्तू आहे असं मला इथले लोक वागवतात. छे, मी कंटाळलोय या छळाला. आता मी फार पुढे गेलो आहे या वाटेवर...मला परत फिरता येणार नाही.’’

‘‘नाही जावेद, मी तुझ्याखेरीज राहू शकत नाही हे तुला ठाऊक आहे, तू पकडला गेलास तर काय होईल, कल्पना तरी आहे का? गोळ्या घालून ठार मारतील तुला...’’

‘‘चालेल मला. पण हे लोक माझा अपमान करतात ते मला सहन होत नाही.’’

इवानं त्याला परोपरीनं समजावण्याचा प्रयत्न केला. एकत्र राहण्याची सोनेरी भविष्याची स्वप्नं, त्यांचं एकमेकांवरचं प्रेम, किती किती गोष्टी ती सांगत होती, पण जावेद अतिरेकी मित्रांच्या सहवासात कट्टर अतिरेकी झालेला होता.

घड्याळ बघत जावेदनं म्हटलं, ‘‘इवा, मला एक महत्त्वाची मिटिंग आहे. प्रथमच मला काही काम देताहेत ते लोक, त्यांच्या विश्वासाला मी पात्र ठरायला हवं. सायंकाळी वेळ मिळाला तर भेटतो. औरवोर (बाय) बोलून जावेदनं तिच्या गालावर हलकेच ओठ टेकवले अन् तो निघून गेला.’’

एक नि:श्वास सोडून इवा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली. डोळ्यांत दाटून आलेल्या अश्रूंमुळे तिचे सुंदर डोळे झाकोळून गेले.

हॉटेल नीग्रेस्कोमध्ये इवा हॉस्पिटलिटी इंचार्ज होती. खरं तर तिने ड्यूटीवर जायला हवं होतं. पण जावेदच्या बोलण्यामुळे ती फार दु:खी झाली होती. तिनं मैत्रिणीला थोडा वेळ चार्ज घ्यायला सांगितला अन् ती थोडा वेळ बाहेर आली. आत तिचा जीव गुदमरत होता. फॉर्मुला वनचा एक खूपच छान सर्किट नीस आहे. हॉटेलच्या अगदी मागेच, त्या वाटेनं ती बीचवर पोहोचली. क्वेदे एतादयूनीस     बीचवर एका कोपऱ्यात बसून ती तिथं खेळणाऱ्या मुलांकडे बघू लागली. मुलं आपल्याच नादात मजेत खेळत होती. कुणी वाळूत किल्ले बनवत होती, कुणी फुग्यांमागे धावत होती.

आगे की कहानी पढ़ने के लिए सब्सक्राइब करें

डिजिटल

(1 साल)
USD10
 
सबस्क्राईब करा

डिजिटल+१२ प्रिंट मॅगझिन

(1 साल)
USD79
 
सबस्क्राईब करा
और कहानियां पढ़ने के लिए क्लिक करें...